Sunday, December 28, 2025
Home Blog Page 397

दिवाळीत 5,599 रुपयात खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन; 5000 mAh ची बॅटरी सोबत मिळणार 8GB RAM

Motorola G04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर फोनची खरेदी करतात . या हंगामात कमी किमतीत चांगला फोन ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो . त्यामुळे ग्राहकवर्ग त्याकडे आकर्षित होत असतो. तुम्हाला दमदार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर Motorola G04 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. सणासुदीच्या काळात हा फोन अगदी परवडणाऱ्या जोगा आहे. यात उत्तम स्टोरेजसह इतर नवीन फीचर्स देखील आहेत. याचसोबत तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटसह हा फोन आणखी स्वस्त मिळू शकतो.

Motorola G04 फीचर्स

या फोनमध्ये 6.56 इंचाची IPS LCD डिस्प्ले असून, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 720×1612 पिक्सल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच याचा आस्पेक्ट रेशो 20:9 एवढा आहे. हा फोन ऑक्टा कोर Unisoc T606 प्रोसेसरवर चालतो, ज्यासोबत Mali-G57 MP1 GPU सुद्धा दिले आहे. सेल्फीसाठी 5MP कॅमेरा आणि प्रमुख कॅमेरा हा 16MP आहे. जो कि 1080p@30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. बॅटरी बदल बोलायचं झालं तर फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोन सिक्युरिटीसाठी कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. याशिवाय ब्लूटूथ 5.0, GPS, Wi-Fi सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

बँक ऑफर आणि किंमत

फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना 5% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 4050 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो, जो जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. तसेच हा फोन तुम्हाला निळया , हिरव्या आणि केशरी रंगामध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोन खरेदी करू शकता. हा फोन तुम्हाला केवळ 5599 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आधुनिक पद्धतीने केळीची शेती ‘हा’ शेतकरी कमवतोय लाखो रुपये; विदेशातही होतीये निर्यात

Banana Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक तरुण लोक शेतीमध्ये पदार्पण करत आहेत. आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत आहेत. आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न देखील चांगले मिळते आणि शेतमाल देखील चांगल्या किमतीने विकला जातो. शेतामध्ये जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला. आणि चांगले व्यवस्थापन केले तर पिकाचा दर्जा उत्पादनासाठी खूप वाढतो.

आज काल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करून केवळ भाजीपालाच नाही, तर फळांची देखील लागवड करत आहेत. एवढेच नाही तर मसाल्यांच्या पिकांचे देखील लागवड होताना दिसत आहेत. त्यामुळे आपला महाराष्ट्रातील शेतकरी चांगलाच आधुनिक पद्धतीने शेती करत आहे हे समोर येते.

तालुक्यातील राजुरी येथे एका शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे. त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करायला सुरुवात केलेली आहे. त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे केळीचे पीक घेतलेले आहे. आता त्याच्या त्याची केळी ही इराक, इराण आणि ओमान यांसारख्या देशामध्ये निर्यात देखील होऊ लागलेली आहे. जुन्नर तालुक्यात त्याच्या केळीला देखील खूप चांगला भाव मिळत आहे.

या शेतकऱ्याने मागील काही वर्षापासून योग्य असे व्यवस्थापन करून चांगल्या केळीचे उत्पादन घेतले. आणि त्याची ही केळी बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली. सध्या ही केळी इराण इराक ओमान यांसारख्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे. यामुळे शेतकऱ्याला देखील खूप चांगला आर्थिक नफा झालेला आहे. त्याने जवळपास 250 ते 300 एकर क्षेत्रामध्ये केळीचे पीक घेतलेले आहे. तसेच इंदापूर भागातील ज्या काही एक्सपोर्ट कंपन्या आहेत. त्या देखील केळी बागेची पाहणी करून केळीची खरेदी केली जाते.

या शेतकऱ्याने वेगवेगळ्या जातीच्या केळींची लागवड केलेली आहे. नवती केळ्यांना26 ते 29 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. तर खोडवा केळीला 23 ते 24 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. हा शेतकरी एका एकरमध्ये जवळपास 35 ते 40 त्यांना पर्यंत केळीचे उत्पादन घेत आहे. आणि एका एकरमध्ये त्याला 7 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या शेतकऱ्याने योग्य प्रकारे व्यवस्थापन केलेले आहे. पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी दुहेरी ठिबक सिंचनाचा वापर केलेला आहे. तसेच पाण्यात विद्राव्य म्हणजेच वॉटर सोल्युबल खतांचा गरजेप्रमाणे पुरवठा केलेला आहे. त्यामुळे पिकांना देखील त्याचा फायदा होतो. तसेच वेळोवेळी तो औषध फवारणी करतो. तसेच पोंगे भरणी करतो. तसेच जुलै महिन्यामध्ये केळीचे घड बाहेर यायला लागले तेव्हा बडइंजेक्शन देखील करून घेतलेले आहे.

TMC Bharti 2024 | टाटा मेमोरियल सेंटरमध्ये या पदासाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

TMC Bharti 2024

TMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोतम तुमच्यासाठी एक भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा मेमोरियल सेंटर मुंबई 9TMC Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती दंतप्रयोग शाळा तंत्रज्ञ या पदासाठी आहे. या पदाच्या नोकरीसाठी त्यांनी मुलाखत आयोजित केलेली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. ही भरती 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | TMC Bharti 2024

या भरती अंतर्गत दंत प्रयोग शाळा तंत्रज्ञ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

निवड प्रक्रिया

ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

एच आर डी विभाग आऊट सोर्सिंग सेल चौथा मजला सर्विस ब्लॉक बिल्डिंग टाटा मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर ई बोरगेस रोड परळ मुंबई 40012

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे बारावी सायन्स मधून झालेले असणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी दोन वर्षाचा डेंटल मेकॅनिझमचा कोर्स देखील केलेला असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 24 हजार 700 रुपये ते 35 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा ? | TMC Bharti 2024

  • ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्तावर दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • 11 नोव्हेंबर 2024 रोजी ही मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Mumbai Port Trust Bharti 2024 | मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत मोठी भरती सुरू ; येथे करा अर्ज

Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. अनेक उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई (Mumbai Port Trust Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती सेवानिवृत्ती कार्गो परिवेक्षक, सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक डॉक क्लर्क या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 24 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करू शकता. त्याचप्रमाणे 12 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mumbai Port Trust Bharti 2024

या भरती अंतर्गत सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक, सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक, डॉक क्लर्क या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 24 रिक्त जागांची भरती केली जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वय हे 65 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती | Mumbai Port Trust Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी कार्यालय बोर्ड लेबर विभाग तिसरा मजला आंबेडकर भवन इंदिरा डॉक मुंबई 400001

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिना 45 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचा आहे.
तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकता.
12 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

बँकेत पासबुक घेऊन जाण्याची चिंता मिटली; केवळ आधार कार्डद्वारे करू शकता आर्थिक व्यवहार

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांसाठी आधार कार्ड (Adhar Card) हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. आधार कार्डचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये केला जातो. हे आपले ओळखीचे एक महत्त्वाचे असे कागदपत्र असते. कोणत्याही सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झालेले आहे. एवढंच नाही तर पैशांच्या व्यवहारासाठी देखील आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. शैक्षणिक कामात देखील आधार कार्डला खूप महत्त्व आहे. आता तुम्ही या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेतून पैसे देखील काढू शकता. आधार इन वर्ल्ड पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता जमा करू शकता. किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर देखील करू शकता. आज काल सगळेच आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. आणि हे व्यवहार आधार कार्डच्या माध्यमातून अत्यंत सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही नवीन प्रणाली विकसित केलेली आहे.

आधार युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर हे आधारित आहे ही एक बँक आधारित मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे केवळ आधार कार्ड आणि फिंगर प्रिंट यांच्याद्वारे व्यवहार करता येतो. बँकेचे कोणतेही व्यवहार करण्यासाठी तुम्हाला बँक डिटेल्सची गरज लागत नाही. कोणताही ओटीपीची देखील गरज लागत नाही. केवळ तुमच्या आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही या प्रणालीद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकता.

AePS मिळणाऱ्या सुविधा

AePS द्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स देखील चेक करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या खात्यातून शेत पैसे देखील काढता येतात. तसेच पैसे जमा देखील करता येतात. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. तसेच आधार बेस्ट सिस्टिम द्वारे देखील तुम्हाला व्यवहार करता येतात यासाठी तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्सची गरज नाही. केवळ तुमच्या आधार कार्ड तुमच्यासोबत असले, तरी सगळे आर्थिक व्यवहार होतील. परंतु यासाठी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणे खूप गरजेचे आहे.

AePS द्वारे व्यवहार कसा करावा ?

एईपीएस द्वारे व्यापार करण्यासाठी तुम्हाला बँकिंग प्रतिनिधी किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या ऑपरेटेडकडे जावे लागेल. त्यानंतर तुम्ही डिजिटल व्यवहारांसाठी बँकेकडून बँक करत असताना जबाबदारी दिली जाते. त्यानंतर तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. ग्राहक बँकेत न जाता घरबसल्या बँकेच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. डिजिटलायजेशनच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

Viral Video | बाई, काय प्रकार ! रात्रीच्या वेळी स्पोर्ट बाईकवर स्टंटबाजी करताना दिसलं कपल

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आज-काल एकही तरुणाचा सापडणार नाही. जो सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडियावर आपण बसल्या जागेवर जगातील विविध माहिती मिळू शकतो. सोशल मीडियावर अनेक मनोरंजन करणारे तसेच अनेक भीतीदायक स्टंट व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या पाहायला मिळत आहे. प्रसिद्धी कमावण्याच्या नावाखाली आजकाल तरुण स्वतःच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. यात अनेकांनी जीव देखील गमावलेला आहे. तरी देखील अनेक लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही ना काही स्टंटबाजी करतच असतात. सध्या अशाच एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते दोघेही त्यांच्या बाईकवर स्टंट करताना दिसत आहे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, हायवे साईटला एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर जास्त वाहने येत जात नाही. मात्र या रस्त्यावर एक स्पोर्ट्स बाईकवर कपल बसलेले असते. आणि ते दोघे त्या बाईक व स्टंटबाजी करताना दिसत आहे. अजिबात न घाबरता ते दोघे स्टंट करत आहेत. तेथील एका व्यक्तीने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.

https://www.instagram.com/reel/DBQjJQaSdlp/?utm_source=ig_embed&ig_rid=cc40a230-c6df-4d4e-8e80-5a9cb6cf9633

हा व्हिडिओ 9Viral Video) इंस्टाग्रामवरून व्हायरल करण्यात आलेला आहे. सात दिवसापूर्वी व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या आधी देखील सोशल मीडियावर अशा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील केलेल्या आहेत. आणि अनेक लोक त्यावर संताप देखील व्यक्त करत आहेत.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलेली आहे की, “कारवाई झाली पाहिजे” तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, “काय करावा यांचं” अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. आणि या स्टंटबाजीमुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागू शकतो. या काळजीने देखील अनेक लोक त्यांना सोशल मीडियावर सल्ला देताना दिसत आहे.

Jio Recharge Plan | दिवाळीत जिओकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट; रिचार्जसह मिळणार फ्लाईटने प्रवास करण्याची संधी

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक टेलिकॉम कंपन्या या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज योजना घेऊन येत असतात. अशातच आता रिलायन्स जिओने त्यांच्या युजरसाठी दिवाळीत एक धमाका ऑफर आणलेली आहे. कंपनीने दोन ऑफर आणलेल्या आहेत. या ऑफर 90 दिवस आणि 365 दिवसांसाठी आहे. तुम्हाला केवळ 3588 रुपयांमध्ये हा फायदा मिळत आहे. आता या ऑफर्स बद्दल आपण जाणून घेऊया. ..

तुम्ही जर रिलायन्स जिओचे (Jio Recharge Plan) ग्राहक असाल आणि तुमच्याकडे प्रीपेड सिम असेल तर तुम्हाला जिओचा 899 चा प्लॅन आणि 3599 रुपयाच्या लाभ घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला खूप डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ट्रॅव्हल पोर्टल ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटसाठी खूप देखील मिळणार आहे. तसेच दोन्ही प्लॅन्सवर 3000 रुपयांचे इझी माय ट्रिप, 200 रुपयांची Ajio आणि 150 रुपयांच्या स्विगीचा लाभ देखील दिला जाणार आहे. तुम्ही इझी माय ट्रिपचे 3 हजार रुपयांचे बाउजर फ्लाईट आणि हॉटेल बुकिंग साठी वापरू शकतात. तसे अजिओकडून नवीन कपडे खरेदी करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही स्विगी वरून जेवण देखील 150 रुपयांपर्यंत ऑर्डर करू शकता.

जिओचा 899 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओचा हा 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 500 डेटा मिळेल. दररोज 100 एसएमएस तरी मिळेल फ्री कॉलिंग 5 जमग डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनची वैद्यता 90 दिवसांची असणार आहे. तसेच तुम्हाला यामध्ये 20जीबी अतिरिक्त डेटा देखील प्रदान केला जाणार आहे.

जिओचा 3599 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा 3599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 362 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड कॉलिंग येणार आहे. तसेच दर 100 एसएमएस देखील मिळणार आहे. या दोन्ही प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 | नामदेव जाधव यांची राजकारणात एंट्री; स्थापन केला स्वतःचा नवीन पक्ष

Maharashtra Assembly Elections 2024

Maharashtra Assembly Elections 2024 | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी देखील होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक उमेदवारांची घोषणा देखील झालेली आहे. महाराष्ट्रात आणखी एका नवीन पक्षाची देखील स्थापना झालेली आहे. शिवाजीचा मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक नामदेव जाधव यांनी स्वतःचा एक पक्ष काढलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केलेली आहे. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत नक्की काय हालचाली होणार आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत.

लेखक नामदेव जाधव यांची ओळख नेहमीच एक वादग्रस्त लेखक म्हणून राहिलेली आहे. आणि त्यांनी आता राजकारणात प्रवेश करून स्वतःचा एक नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. जर कोणत्याही उमेदवाराला विधानसभा निवडणूक लढाईची असेल आणि त्यांना जर कोणत्याही पक्षातून उमेदवारी देत नसेल अशा लोकांसाठी हा पक्ष एक चांगला पर्याय असणार आहे. याबाबतची माहिती लेखक नामदेव जाधव यांनी दिलेली आहे.

या आधीची लोकसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2024) नामदेव जाधव हे बारामतीच्या मतदार संघातून लढले होते. नामदेव जाधव यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे नाव छत्रपती शासन असे आहे. मागेल त्याला उमेदवारी असं धोरण त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घोषित केलेले आहे. ते स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हणतात. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक लोकांनी आक्षेप देखील दर्शवला होता. तसेच त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आलेली होती. या आधी नामदेव जाधव यांना पुण्यामध्ये त्यांच्या तोंडाला काळं देखील फासण्यात आलेलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेले होते. कारण त्यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आणि त्यामुळे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आले होत3. परंतु आता यावर्षी ते विधानसभा निवडणूक स्वतःचा एक पक्ष घेऊन उतरलेले आहेत. आता त्यांच्या पक्षात नक्की कोण कोण जाईल,म आणि यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीची चक्र कशाप्रकारे फिरणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Mobile Slow Charging Problem | तुमचाही मोबाईल अगदी स्लो चार्ज होतो का? मग वेळीच करा हे उपाय

Mobile Slow Charging Problem

Mobile Slow Charging Problem | आजकाल स्मार्टफोनचा जमाना आलेला आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत असतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी अगदी सोप्या झालेल्या आहेत. अगदी एका जागेवर बसून आपल्याला सगळी माहिती मिळते. परंतु बरेच लोक स्मार्टफोन चार्जिंगबाबत तक्रार करत असतात. अनेक लोकांचे असे म्हणणे असते की, त्यांचा मोबाईल खूप हळूहळू चार्ज होतो. परंतु काही विशिष्ट कारणांमुळे तुमचा फोन हा हळूहळू चार्ज (Mobile Slow Charging Problem) होऊ लागतो. आता यासाठी कोणती कारणे आहेत ल?आणि मोबाईल फास्ट चार्ज होण्यासाठी काय करावे लागते? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मोबाईल हळू चार्ज होण्याची कारणे | Mobile Slow Charging Problem

चार्जर आणि केबल खराब होणे

जर तुमच्या मोबाईलचा चार्जर किंवा केबल खराब झाली असेल, तरी देखील तुमच्या मोबाईलची चार्जिंग अगदी हळूहळू होत असते. तसेच डेटा केबल देखील खराब असेल, तरी देखील समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी तुम्ही तुमची केबल दुसऱ्या चार्जरला जोडून चार्जिंग करून पहा. जर तुमच्या मोबाईलची फास्ट होत असेल, तर तुमच्या मोबाईलचा चार्जर खराब झालेला आहे.

चार्जिंगला लावलेला असताना फोन वापरणे

अनेक लोक मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन वापरतात. अशा वेळी तुमच्या मोबाईलची चार्जिंग अजिबात फास्ट होत नाही. आणि ती चार्जिंग जास्त वेळ टिकतही नाही. त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन वापरू नका.

चार्जिंग पोर्टमध्ये घाण जमा होणे | Mobile Slow Charging Problem

जर तुमच्या मोबाईलचे चार्जिंग पोर्ट मध्ये धूळ किंवा घाण अडकली असेल, तरी देखील तुमचा मोबाईल अत्यंत कमी वेगाने चार्ज होतो. अशावेळी तुम्ही तुमच्या चार्जिंग पोर्टमध्ये काही घाण अडकली आहे का? हे तपासा आणि जर घाण दिसत असली, तर मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात जाऊन ते स्वच्छ करून घ्या. नंतर तुमच्या फोनची चार्जिंग फास्ट होईल.

बॅटरीची समस्या

एका ठराविक काळानंतर हळूहळू फोनच्या बॅटरीची क्षमता कमी होऊ लागते. आणि मोबाईल फोन हळू चार्ज होतो. तुमची जर बॅटरी खराब झाली असेल, तरी देखील फोनची चार्जिंग अगदी स्लो होते. अशावेळी तुमचे फोनची बॅटरी खराब झाली, असेल तर बॅटरी बदलून घ्या.

Cinnamon Benefits | दालचिनीमुळे डायबिटीस राहतो नियंत्रणात; रोज अशाप्रकारे करा सेवन

Cinnamon Benefits

Cinnamon Benefits | आपल्या स्वयंपाक घरात वापरले जाणारे हे सगळे मसाले आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. त्यामुळेच आपल्या भारतातील अनेक मसाले हे इतर देशांमध्ये देखील निर्यात केले जातात. शतकानुशतकापासून या मसाल्यांचा वापर भारतीय जेवणामध्ये केला जातो. म्हणूनच भारतीय जेवन हे अत्यंत आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले जेवन असते. भारतीय मसाल्यांमध्ये वापरली जाणारी दालचिनी यामध्ये औषधी गुणधर्म आहे. तसेच यामुळे आपल्या जेवणाला देखील चांगली चव येते. तसेच आरोग्याला असंख्य फायदे होतात. तुम्ही जर तुमच्या जेवणामध्ये दालचिनीचा (Cinnamon Benefits) चहा पिला किंवा सामान्य पाण्याचा वापर करून देखील केला तरी तुमच्या आरोग्याला याचे खूप फायदे होतात.

आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे (Cinnamon Benefits) पाणी पिले, तर तुम्हाला मधुमेह, वजन कमी करण्यास खूप मदत होते. आज आपण दालचिनीचे पाणी पिल्याने तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

मधुमेहावर नियंत्रण राहते | Cinnamon Benefits

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दालचिनी अत्यंत रामबाण उपाय आहे यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तुम्ही जर दररोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिले किंवा दालचिनीचा चहा पिला, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आणि मधुमेहावर नियंत्रण राहते.

वजन कमी करण्यास मदत

जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करता. त्यावेळी तुमची पचन क्रिया सुधारते. आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. दालचिनीमध्ये असणारे गुणधर्म हे तुमची भूक नियंत्रित ठेवतात. त्यामुळे जेवणही कमी जाते. आणि कॅलरीज कमी प्रमाणात सेवन होते. त्यामुळे पोटाजवळ जमा झालेली चरबी देखील कमी होऊ शकते.

हृदयाचे आरोग्य निरोगी राहते

उद्याच्या आरोग्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीरात असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दालचिनी मदत करते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी दालचिनीचे पाणी पिले तर रक्तवाहिन्यांची संबंधित आरोग्य सुधारते आणि तुम्हाला इतर आजारांचा धोका देखील कमी होतो.

पचनक्रिया सुधारते | Cinnamon Benefits

दालचिनीमध्ये अनेक गुणधर्म असतात. यामुळे तुम्ही जर दालचिनीच्या पाण्याचे सेवन केले, तर तुमच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. तुम्हाला गॅस सारख्या समस्येपासून सुटका मिळते. तुमची पचत क्रिया सुधारते.