Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 40

Pune Lonavala Tourism Bus : पुणे ते लोणावळा स्पेशल पर्यटन बस सुरु; तिकीट किती? कुठे-कुठे थांबणार?

Pune Lonavala Tourism Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Lonavala Tourism Bus पुण्याहून लोणावळ्याला पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने लोणावळ्यासाठी स्पेशल इलेक्ट्रिक पर्यटन बस सेवा सुरु केली आहे. या बसच्या माध्यमातून प्रवाशांना अगदी आरामात लोणावळ्याला जाता येईल. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या नव्या बसला हिरवा झेंडा दाखवला. ज्यात ९९ प्रवासी होते. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये महिला पर्यटकांची संख्या जास्त होती.

कुठे कुठे थांबणार ? Pune Lonavala Tourism Bus

रूट नंबर ११ वरून सुरु झालेली स्वारगेट लोणावळा बस (Pune Lonavala Tourism Bus) डेक्कन जिमखाना, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला गुंफा येथे थांबेल. णावळा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पर्यटक स्वतःहून भूशी धरण, मनशक्ती ध्यान केंद्र आणि मेण संग्रहालय यासारख्या जवळच्या ठिकाणांना जाऊ शकतात. लोणावळ्या पोचल्यानंतर बस त्याच दिवशी पुन्हा रिटर्न स्वारगेटला येईल. प्रवासादरम्यानच्या ठिकाणांबद्दल माहिती देण्यासाठी प्रत्येक बससोबत एक मार्गदर्शक असतो.

तिकीट किती?

स्वारगेट ते लोणावळा साठी (Pune Lonavala Tourism Bus) प्रत्येक प्रवाशाकडून एका फेरीसाठी ५०० रुपये तिकीट आकारले जातात. यासाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, कात्रज, स्वारगेट, हडपसर, पुणे महानगरपालिका भवन, निगडी आणि भोसरी यासह शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या पीएमपीएमएल पास सेंटरवर तिकिटे बुक करता येतात. या पर्यटन प्रवासासाठी खास अशी ऑफर सुद्धा ठेवण्यात आली आहे. बस मधील सर्वच्या सर्व ३३ तिकिटे एकदम ग्रुपने बुक केल्यास प्रवाशांना ५ तिकिटांचे पैसे माफ होणार आहेत.

जर प्रवाशांचा प्रतिसाद कमी असेल किंवा काही अपरिहार्य कारणास्तव बस सेवा रद्द झाली, तर बुकिंग केलेल्या प्रवाशांना पीएमपीच्या अन्य पर्यटन मार्गांवर प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. तसेच, ज्या दिवशी प्रवाशांचे आरक्षण आहे त्या दिवशी त्यांनी त्यांच्या राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पुन्हा त्यांच्या राहत्या घरी पोहोचण्यासाठी पीएमपीच्या अन्य बस मार्गांद्वारे मोफत प्रवास करता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

PhonePe Gpay New Rules : PhonePe, Gpay वापरतायत?? 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू

PhonePe Gpay New Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PhonePe Gpay New Rules । एकेमेकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी तुम्हीही फोन पे किंवा गुगल पे नक्कीच वापरत असाल. तर खरं या सुविधेमुळे आपला बँकेत जाण्याचा वेळ वाचतो आणि अगदी कमी वेळेत एकमेकांना पैसे पाठवणे तसेच इतर अनेक कामे आपण करू शकतो. परंतु आता फोन पे आणि गुगल पे वापरकर्त्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. येत्या १ ऑगस्ट पासून फोनपे आणि गुगल पे बाबत नियम बदलले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI सिस्टम जलद, सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी बँका आणि पेमेंट अॅप्ससाठी नवीन API मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे.

काय आहेत नवीन नियम?

नवीन नियमानुसार, (PhonePe Gpay New Rules) येत्या १ ऑगस्ट पासून तुम्ही फोन पे किंवा गुगल पे च्या माध्यमातून दिवसातून फक्त ५० वेळा बँक खात्यातील बॅलेन्स तपासू शकाल. NPCI चा असा विश्वास आहे की यामुळे सर्व्हरवरील अनावश्यक भार कमी होईल आणि वेग सुधारेल. तसेच तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसातून फक्त २५ वेळा पाहता येईल. यामुळे अनावश्यक API कॉल कमी होतील आणि सिस्टम अधिक स्थिर होईल असं NPCI ला वाटत.

ऑटो-डेबिट पेमेंटसाठी टाइम स्लॉट- PhonePe Gpay New Rules

नेटफ्लिक्स, SIP आणि इतर सबस्क्रिप्शनसाठी ऑटो-डेबिट पेमेंट आता फक्त तीन निश्चित स्लॉटमध्ये केलं जाईल.
१) सकाळी १० वाजण्यापूर्वी
२) दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत
३) रात्री ९:३० नंतर

याचा परिणाम पीक अवर्समध्ये सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर होणार नाही.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे , जर तुमचे पेमेंट फेल झाले तर तुम्ही आता त्याची स्टेटस फक्त तीन वेळा तपासू शकाल. तसेच, दोनदा चेक करताना किमान ९० सेकंदांचे अंतर असेल. सर्व्हर लोड कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हि नवीन मार्गदर्शक तत्त्वे (PhonePe Gpay New Rules) UPI सिस्टम जलद आणि अधिक विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत. या नव्या नियमांमुळे भलेही सर्व सामान्य वापरकर्त्याला काही मर्यादांशी जुळवून घ्यावे लागेल, परंतु हे बदल डिजिटल पेमेंट अनुभव आणखी चांगला बनवणार आहेत.

Porsche Taycan 4S Black Edition : 18 मिनिटांत चार्ज, 668 KM रेंज; Porsche ची इलेक्ट्रिक कार बाजारात घालणार धुमाकूळ

Porsche Taycan 4S Black Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Porsche Taycan 4S Black Edition । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेज आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर ब्रँडेड कंपनी Porsche आपली नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Taycan 4S असं या गाडीचे नाव असून तिचे ब्लॅक एडिशन कंपनीने बाजारात आणलं आहे. हि कार सिंगल चार्ज मध्ये तब्बल ६६८ किमी पर्यंतचे अंतर पार करू शकते. मात्र तिची किंमत २.०७ कोटी रुपये आहे . आज आपण या सेडान कारचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

लूक आणि डिझाईन – Porsche Taycan 4S Black Edition

Porsche Taycan 4S Black Edition पूर्णपणे ब्लॅक कलर मध्ये दिसतेय. यामध्ये तुम्हाला फ्रंट एप्रन, साइड स्कर्ट, रिअर डिफ्यूझर आणि आउटसाइड मिरर व्ह्यू आहे. याशिवाय, बॅज आणि लेटरिंगवर हाय ग्लॉस ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे. हेडलाइट्सना स्मोक्ड फिनिश देण्यात आले आहे आणि पांढऱ्या पोर्श प्रोजेक्शनसह पुडल लॅम्प्स देखील देण्यात आले आहेत. यात ग्लॉस ब्लॅक फिनिशमध्ये २१-इंच एरो डिझाइन अलॉय व्हील्स देखील आहेत. टायकॅन ४एस ब्लॅक एडिशनला स्टँडर्ड मॉडेल लेआउट मिळतो. यामध्ये तुम्हाला अनेक आधुनिक आणि आश्चर्यकारक वैशिष्ट्ये मिळतात. यामध्ये पॅनोरॉनिक सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, एडीएएस सुई, १४ वे पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट, ४ झोन क्लायमेट कंट्रोल, ७१० वॅट्स १४ स्पीकर बोस साउंड सिस्टमचा समावेश आहे.

बॅटरी आणि रेंज –

Porsche Taycan 4S Black Edition चाय ब्लॅक एडिशन मध्ये कंपनीने १०५ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, ज्या एकत्रितपणे ५९८ एचपी पर्यंत पॉवर आणि ७१० एनएम पर्यंत टॉर्क जनरेट करतात. महत्वाची बाब म्हणजे हि इलेक्ट्रिक कार ३२० किलोवॅट डीसी फास्ट चार्जरने फक्त १८ मिनिटांत चार्ज होते. आणि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ती तब्बल ६६८ किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते असा दावा कंपनीने केला आहे. यादरम्यान हि लक्झरी कार फक्त ३.७ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवू शकते.

हि इलेक्ट्रिक कार १३ रंगात लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅक, व्हाइट, जेट ब्लॅक मेटॅलिक, आइस ग्रे मेटॅलिक, व्होल्कॅनो ग्रे, डोलोमाइट सिल्व्हर, जेंटियन ब्लू, कार्माइन रेड, प्रोव्हन्स (हलका जांभळा), नेपच्यून ब्लू, फ्रोझनबेरी (गुलाबी), फ्रोझन ब्लू आणि पर्पल स्काय मेटॅलिक या रंगाचा समावेश आहे.

Mhada Lottery 2025 : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा? कोणकोणती कागदपत्रे लागतात?

Mhada Lottery 2025 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । मुंबईकरांना स्वस्तात मस्त आणि कमी पैशात स्वतःचे हक्काचे घर खरेदी करता यावे यासाठी म्हाडाने तब्बल 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. १४ जुलैपासून यासाठी अर्ज सुरु झाले असून माधयमवर्गीय कुटुंबासाठी हि सर्वात मोठी संधी आहे. मात्र म्हाडा मधून घर खरेदी करण्यासाठी पात्रता काय असावी ? कोणकोणती कागदपत्रे लागतात ? आणि म्हाडाचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा असतो हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर आज आम्ही सांगतो.

म्हाडाच्या घरांसाठी पात्रता काय ? Mhada Lottery 2025

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे
मागील 20 वर्षांत किमान 15 वर्षे महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक आहे
अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate) तसेच address proof आवश्यक आहे
अर्जदार उपयुक्त उत्पन्न गटात बसावा

कोणकोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड, पॅन कार्ड (Mhada Lottery 2025)
रहिवासी दाखला
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते तपशील, पासपोर्ट फोटो
स्वाक्षरीचा फोटो

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in/ ला जाऊन भेट द्या.
यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका. (Mhada Lottery 2025)
नोंदणी झाल्यावर लॉगिन करून हवी असलेली योजना निवडा आणि अर्ज भरा
अर्ज भरताना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आता ठराविक अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सबमिट करा.

अधिक माहितीसाठी https://lottery.mhada.gov.in येथे भेट द्या.

दरम्यान, कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

१) २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका,

२) १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका,

३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, Mhada Lottery 2025

४) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

५) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

लॉटरीसाठी (Mhada Lottery 2025) स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी साठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

Shahrukh Khan Injured : शाहरुख खानला शूटिंग दरम्यान दुखापत; उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना

Shahrukh Khan Injured

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shahrukh Khan Injured। बॉलीवूड विश्वातून एक हादरवणारी बातमी समोर येत आहे. बॉलीवूडचा किंग शाहरुख खानला शुटिंग दरम्यान मोठी दुखापत झाली… दुखापती इतकी गंभीर आहे कि उपचारासाठी शाहरुखने तातडीनं अमेरिका गाठलं आहे. सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खानला हि दुखापत झाली. एक्शन सीन करताना शाहरुख जखमी झाला आहे.

पायाला मार बसल्याचे बोललं जातंय- Shahrukh Khan Injured

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या शूटिंग दरम्यान, ऍक्शन सिन करत असताना शाहरुखचा अपघात झाला, त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्याच्या पायाला मार बसल्याचे बोललं जातंय. हि दुखापत फार अशी गंभीर नसली तरी शाहरुख टीमसोबत उपचारासाठी तात्काळ अमेरिकेला गेला आहे. या दुखापतीनंतर शाहरुखला त्याच्या कामापासून १ ते २ महिन्याचा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाच्या शूटिंगचे पुढील वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होऊ शकेल

ऍक्शन सीन करताना दुखापत (Shahrukh Khan Injured) होण्याची शाहरुखची ही काय पहिलीच वेळ नाही, याआधीही तो शूटिंग दरम्यान अनेक वेळा जखमी झाला आहे. आता १ ते २ महिने विश्रांती घेतल्यानंतर आणि दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतरच शाहरुख खान सेटवर परतेल आणि त्याचे काम पूर्ण करेल असं बोललं जातेय.

किंग कधी रिलीज होणार?

बाकी, शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, निर्मात्यांनी ‘किंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरीहा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख अंडरवर्ल्डनी जोडलेल्या एका किलरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात तुम्हाला शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, सुहाना खान, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी, अर्शद वारसी आणि अभय वर्मा सारखे प्रसिद्ध कलाकार दिसतील

Ganeshotsav 2025 : सरकारने जाहीर केली गणेशोत्सव स्पर्धा; 5 लाखांचे बक्षीस, कुठे कराल नोंदणी

Ganeshotsav 2025 Competition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025। यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून सर्वत्र गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात घरगुती गणपती सोबतच मोठमोठ्या मंडळात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने यंदाचा गणेशोत्सव आणखी चांगला व्हावा यासाठी एक नवीन स्पर्धा आयोजित केली आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. एल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने नोंदणीकृत संस्था आणि परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांसाठी “महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा २०२५” (Maharashtra State Best Public Ganesh Mandal 2025) जाहीर केली आहे. या स्पर्धेसाठी २० जुलै ते २० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.

अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेलं नाही. तुम्ही अगदी मोफत अर्ज करू शकता. खरं तर . या स्पर्धेचे उद्दिष्ट (Ganeshotsav 2025) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वारसा आणि किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन, राष्ट्रीय आणि राज्य स्मारकांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीद्वारे पर्यावरण संवर्धन, ध्वनीमुक्त उत्सव आणि समाजकल्याणकारी उपक्रम यासारख्या उपक्रमांना मान्यता देणे आणि प्रोत्साहन देणे आहे. या निकषांवर आधारित मंडळांचे मूल्यांकन केले जाईल.

कशी होईल निवड? Ganeshotsav 2025

२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान, संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांनी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समित्या सहभागी मंडळांना भेट देऊन त्यांचे मूल्यांकन करतील. या मूल्यांकनांमधून मिळालेल्या शिफारसी राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठवल्या जातील. पुणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मंडळे आणि इतर प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. Ganeshotsav 2025

अर्ज कुठे आणि कसा कराल?

तुम्हला अकॅडमीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावा लागेल. किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मंडळांनी त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

बक्षीस किती?

राज्यस्तरीय स्पर्धेत, पहिल्या ३ विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळेल तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना २५,००० रुपये आणि प्रमाणपत्रे मिळतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त 250 स्पेशल ट्रेन!! या तारखेपासून आरक्षणाला सुरुवात

Ganeshotsav 2025 Trains (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav 2025 । यंदाचा गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असून मुंबईतील चाकरणामी गावी जाण्याचा प्लॅन आखत आहेत. गणेशोत्सव काळात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आधीच ५००० एसटी बसेसची घोषणा केली आहे. आता रेल्वे विभागानेही प्रवाशांच्या सुविधेसाठी २५० स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान चालवल्या जातील. मुंबईतील CSMT सीएसएमटी सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, मडगावकरिता या गाड्या धावणार असून या रेल्वेसाठी २४ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांना जणू बाप्पाचा पावला आहे.

कोणकोणत्या मार्गावर रेल्वे धावणार ? Ganeshotsav 2025

१) सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी डेली स्पेशल (४० सेवा)

०११५१ ही विशेष गाडी २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ पर्यंत दररोज सकाळी ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (२० फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११५२ विशेष गाडी २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ पर्यंत दररोज १५.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (२० फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

२) सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी डेली स्पेशल (३६ सेवा)

०११०३ ही विशेष गाडी २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ पर्यंत दररोज १५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११०४ ही विशेष गाडी २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ पर्यंत दररोज ०४.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. Ganeshotsav 2025

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

३) ३) सीएसएमटी- रत्नागिरी-सीएसएमटी दैनिक विशेष (३६ सेवा)

०११५३ ही विशेष गाडी २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ पर्यंत दररोज सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर ०११५४ ही विशेष गाडी २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ पर्यंत दररोज पहाटे ४.०० वाजता रत्नागिरीहून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड,

४) एलटीटी- सावंतवाडी रोड – एलटीटी डेली स्पेशल (३६ सेवा)

०११६७ ही विशेष गाडी २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ पर्यंत दररोज रात्री ९.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११६८ ही विशेष गाडी २३.०८.२०२५ ते ०९.०९.२०२५ पर्यंत दररोज ११.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप. (Ganeshotsav 2025)

५) एलटीटी- सावंतवाडी रोड – एलटीटी डेली स्पेशल (३६ सेवा)

०११७१ विशेष गाडी २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ पर्यंत दररोज सकाळी ०८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल (१८ फेऱ्या) आणि त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११७२ विशेष गाडी २२.०८.२०२५ ते ०८.०९.२०२५ पर्यंत दररोज २२.३५ वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल (१८ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

६) एलटीटी- सावंतवाडी रोड – एलटीटी साप्ताहिक विशेष (६ सेवा)

०११२९ ही साप्ताहिक विशेष गाडी २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ रोजी दर मंगळवारी सकाळी ०८.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर ०११३० ही साप्ताहिक विशेष गाडी २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ रोजी दर मंगळवारी रात्री २३.२० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप. Ganeshotsav 2025

७) एलटीटी-मडगाव- एलटीटी साप्ताहिक विशेष (४ सेवा)

०११८५ ही साप्ताहिक विशेष गाडी २७.०८.२०२५ आणि ०३.०९.२०२५ रोजी दर बुधवारी (२ फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता मडगावला पोहोचेल. तर ०११८६ ही साप्ताहिक विशेष गाडी २७.०८.२०२५ आणि ०३.०९.२०२५ रोजी दर बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी.

८) एलटीटी-मडगाव- एलटीटी एसी साप्ताहिक विशेष (६ सेवा)

०११६५ एसी साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी, २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ (३ फेऱ्या) रोजी सकाळी ००.४५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता मडगावला पोहोचेल. तर ०११६६ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ (३ फेऱ्या) दर मंगळवारी १६.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम आणि करमाळी.

९) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (६ सेवा)

०१४४७ ही साप्ताहिक विशेष गाडी २३.०८.२०२५, ३०.०८.२०२५ आणि ०६.०९.२०२५ (३ फेऱ्या) दर शनिवारी पुण्याहून रात्री ००:२५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर ०१४४८ ही साप्ताहिक विशेष गाडी २३.०८.२०२५, ३०.०८.२०२५ आणि ०६.०९.२०२५ (३ फेऱ्या) दर शनिवारी सायंकाळी ५:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

१०) पुणे-रत्नागिरी एसी साप्ताहिक स्पेशल (६ सेवा)

०१४४५ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ (३ फेऱ्या) दर मंगळवारी पुण्याहून ००:२५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर ०१४४६ एसी साप्ताहिक विशेष गाडी २६.०८.२०२५, ०२.०९.२०२५ आणि ०९.०९.२०२५ (३ फेऱ्या) दर मंगळवारी १७:५० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

११) दिवा-चिपळून-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (३८ सेवा)

०११५५ मेमू स्पेशल २३.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ (१९ फेऱ्या) पर्यंत दिवा येथून सकाळी ७.१५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता चिपळूण येथे पोहोचेल. तर ०११५६ मेमू स्पेशल २३.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ (१९ फेऱ्या) पर्यंत चिपळूणहून १५.३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी २२.५० वाजता दिवा येथे पोहोचेल.

मुक्काम: निलजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निधी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखणी, बुधवार, कांबोळी आणि कांबळे.

Indian Railways : मराठवाडा- विदर्भातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन; या स्थानकांवर थांबणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । मराठवाडा आणि विदर्भांतील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारी काचीगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन उद्यापासून म्हणजे २० जुलै पासून नियमितपणे धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनची देखभाल आणि संचालन दक्षिण मध्य रेल्वे (SCR) झोनद्वारे केले जाईल. ही गाडी या मार्गावरील अनेक प्रमुख धार्मिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडते. आणि महत्वाची बाब म्हणजे ती आपल्या महाराष्ट्रातून धावेल. खरंतर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी ही गाडी नियमितपणे सुरू करावी अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत हा हि एक्सप्रेस दररोज सूरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन अंदाजे १९५३ किमी अंतर कापेल. ट्रेन क्रमांक १७६०५/१७६०६ असं या रेल्वेचा (Indian Railways ) क्रमांक आहे. ट्रेन क्रमांक १७६०५ काचेगुडा-भगत की कोठी एक्सप्रेस २०.०७.२०२५ पासून दररोज २३:५० वाजता काचेगुडा स्टेशनवरून निघेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २०:०० वाजता भगत की कोठी स्टेशनवर पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक १७६०६ भगत की कोठी-कचेगुडा एक्सप्रेस २२.०७.२०२५ पासून दररोज २२:३० वाजता भगत की कोठी स्टेशनवरून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १५:४० वाजता काचेगुडा स्टेशनवर पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा ? Indian Railways

काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेन (Indian Railways ) या संपूर्ण प्रवासादरम्यान २९ स्थानकांवर थांबेल. यांमध्ये निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, संत हिरडाराम नगर, सिहोर, मकसी, उज्जैन, रतलाम, जावरा, मंदसौर, नीमच, चित्तौड़गड, बिजराबाद, बिज्जाबाद, भिलवार, अ. सोजत रोड, मारवाड आणि पाली मारवाड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

ट्रेनची रचना कशी असेल?

काचेगुडा ते भगत की कोठी एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन सेकंड AC , सात थर्ड एसी, 7 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन असतील. काचेगुडा ते भगत की कोठी दरम्यान स्लीपर क्लासचे भाडे ७७० रुपये, एसी ३ टियरचे भाडे २०३० रुपये आणि एसी २ टियरचे भाडे २९३० रुपये असेल .

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

Mumbai Local Mega Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Mega Block। लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन या तिन्ही मार्गावर उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, घराबाहेर पडताना हि बातमी वाचूनच बाहेर पडा. ट्रॅक आणि ओव्हरहेड उपकरणांवर महत्त्वपूर्ण देखभालीचे काम करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार , हार्बर लाईन वर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे यादरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार आहे.

१) बोरिवली ते गोरेगाव –

बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Mumbai Local Mega Block) नियोजित केला आहे. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत, बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर धावणाऱ्या अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील, शॉर्ट-टर्मिनेट केल्या जातील किंवा जलद मार्गावर वळवल्या जातील. बोरिवलीच्या पलीकडे धावणाऱ्या हार्बर लाईन गाड्या आणि सेवा सामान्यपणे सुरू राहण्याची अपेक्षा असली तरी, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना थोडा विलंब होऊ शकतो.

२) CSMT ते विद्याविहार – Mumbai Local Mega Block

सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

३) CSMT ते चुनाभट्टी / वांद्रे-

सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे हार्बर लाईन वर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगा ब्लॉक राहील. त्यामुळे सीएसएमटीहून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा आणि सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे / गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी यूपी हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी यूपी हार्बर लाईन सेवा बंद राहतील. पनवेल ते कुर्ला दरम्यान कुर्ला फलाट क्र. आठ वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात (Mumbai Local Mega Block) सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.

Free ST Bus Travel : आता ‘या’ व्यक्तींना ST मध्ये मोफत प्रवास मिळणार

Free ST Bus Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free ST Bus Travel । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नेहमीच आपल्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. सध्या MSRTC च्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत आहे तर जेष्ठ नागरिकांचा प्रवास मोफत आहे. आता यात पत्रकारांचाही समावेश होणार आहे. MSRTC च्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

सध्या 8000 किमीची मर्यादा – Free ST Bus Travel

विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पदाधिकाऱ्यांसोबत अधिस्वीकृती संदर्भातील बैठकीत बोलताना प्रत सरनाईक म्हणाले, सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत (Free ST Bus Travel) मिळते. मात्र, या सवलतीवर ८,००० किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे पत्रकारांना जिल्हा व तालुका पातळीवर देखील सेवा देता येईल.

तसेच पत्रकारांना एसटी प्रवासासाठी (Free ST Bus Travel) सध्या ऑनलाइन रिजर्वेशन करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल. या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना जास्तीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत असं सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले.