Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 41

Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये AC सुविधा मिळणार!! मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकल ट्रेन मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकल ट्रेन मध्ये मागच्या काही दिवसांत सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण झालाय. त्यातच मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर हा विषय आणखी चर्चेत आला. यानंतर आम्ही लवकरच लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे बसवू आणि अशी माहिती प्रशासनाने दिली होती. अखेर आता याला केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील उपनगरीय गाड्यांचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे असलेल्या वातानुकूलित दरवाज्यांनी बदलण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत आपल्याला माहिती दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितलं.

कोणतीही भाडेवाढ नाही- Mumbai Local Train

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सध्याची भाडेवाढ न करता उपनगरीय गाड्यांना मेट्रोसारखे डबे बसवण्याची विनंती केली होती. आज सकाळी मुंबईत असलेल्या रेल्वेमंत्र्यांनी मला सांगितले की ते या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत आहेत आणि ते लवकरच अधिकृत घोषणा करतील. परंतु नवीन वातानुकूलित कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील, आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईकरांना कोणत्याही भाडेवाढीचा सामना करावा लागणार नाही यावर फडणवीसांनी जोर दिला.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकल ट्रेन मधील (Mumbai Local Train) गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास ऑफिसवर पोहचायला सूट दिली आहे. मात्र सकाळचा हा अर्धा तास सदर सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी भरून काढावा लागेल. म्हणजेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांत कोणताही बदल होणार नाही. कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

दुसरीकडे, मध्य रेल्वेने (Mumbai Local Train) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबई लोकल ट्रेन मधील प्रवास किती असुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे.

Islampur Name Change : सांगलीतील इस्लामपूर शहराचे नाव बदलणार!! भुजबळांची मोठी घोषणा

Islampur Name Change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Islampur Name Change । मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. सर्वात आधी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, त्यानंतर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असं झालं, नंतर अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं. आता सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या इस्लामपूरचे नाव बदलण्याची तयारी सरकार कडून सुरु आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. त्यानुसार, इस्लामपूरचे नामकरण आता ईश्वरपूर असं होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

अनेक दिवसांपासून मागणी- Islampur Name Change

मागील काही दिवसांपासून इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी सुरू होती. यापूर्वी हिंदू संघटनेने शिवप्रतिष्ठानने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती. यावर आज विधानसभेत चर्चा झाली, या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या वतीने ही मागणी मान्य केली . इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच हा प्रस्ताव पूर्णपणे स्वीकारला जाईल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. काही दिवसात यासंदर्भातील शासनस्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली की शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असं सर्वच ठिकाणी इस्लामपूर ऐवजी ईश्वरपूर असं नामकरण होईल. Islampur Name Change

यापूर्वी महाराष्ट्र सरकारने दोन शहरांची नावे बदलली होती. यातील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केलं तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव ठेवलं.. आता छत्रपती संभाजीनगर शहरात ज्याठिकाणी औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचे नाव सुद्धा बदलण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली आहे. आपल्या भारतावर ज्या ज्या आक्रमकांनी राज्य केलं आहे, मग तो आदिलशाह असो, निजामशाह असो वा इतर मुघल किंवा इंग्रज असो, या सर्वांचा इतिहास जागविण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. परंतु हा इतिहास मिटविण्याचे काम आम्ही करू. वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे आहे, मात्र याठिकाणी शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लपवण्यात आला आहे. आणि आक्रमण ज्यांनी केलं त्यांचा इतिहास जागवण्यात आलं आहे. जेव्हा मी खुलताबादला जातो आणि तिथे औरंगजेबाचे नाव पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. त्यामुळेच खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर असे करण्याची मागणी केणेकर यांनी केली.

Nagpur Nashik Special Train : नागपूर ते नाशिक स्पेशल ट्रेन; या 16 स्थानकांवर थांबणार

Nagpur Nashik Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Nashik Special Train। विदर्भातून उत्तर महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्ये रेल्वेने नागपूर आणि नाशिक रोड दरम्यान ट्रेन ऑन डिमांड व्यवस्थेअंतर्गत दोन एकेरी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सावरण्यासाठी मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या २३ आणि २४ जुलैला २ रेल्वे गाड्या नागपूर ते नाशिक दरम्यान धावतील. या ट्रेनमुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल अशी अपेक्षा आहे.

नागपूर ते नाशिक रोड दरम्यान चालवण्यात येणाऱ्या या दोन्ही ट्रेन (Nagpur Nashik Special Train) या वन वे ट्रेन असणार आहे. २३ आणि २४ जुलै २०२५ रोजी हि ट्रेन नागपूर वरून संध्याकाळी ७:३० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता नाशिक रेल्वे स्टेशनला पोहोचेल, हा प्रवास हा जवळपास १० तासांचा असेल. या दोन्ही शहरादरम्यान असलेल्या महत्वाच्या स्टेशन वर हि ट्रेन थांबेल. प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या रेल्वे चालवल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या काळात प्रवाशांची गरज ओळखून ट्रेन ऑन डिमांड हि सेवा सुरु केली आहे. लाखो प्रवाशाना या सेवेचा फायदा होत असतो.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा मिळेल ? Nagpur Nashik Special Train

नागपूर ते नाशिक दरम्यान धावणाऱ्या या विशेष ट्रेनमध्ये (Nagpur Nashik Special Train) १८ सामान्य अनारक्षित कोच असतील, ज्यात १६ सामान्य अनारक्षित आणि २ एसएलआरडी कोच चा समावेश आहे. हि रेल्वेगाडी नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर थांबेल. महत्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही ट्रेन पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे आणि प्रवास करता येणार आहे. ट्रेनला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरच जाऊन तिकिट काढता येणार आहे.

South Western Railway Recruitment 2025 : 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; रेल्वे विभागात 904 पदांसाठी भरती

South Western Railway Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन South Western Railway Recruitment 2025। १० वी उत्तीर्ण असणाऱ्या आणि सरकारी नोकरीची स्वप्ने बघणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेअंतर्गत तब्बल ९०४ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. हि भरती अप्रेंटिस पदांसाठी असून यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीसाठी पात्रता निकष काय आहे? निवड प्रक्रिया कशी आहे आणि अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात…..

कोणती पदे भरली जाणार –

रेल्वेच्या या भरती अंतगत फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, प्रोग्राम अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, पेंटर हि पदे भरली जाणार आहेत.

कोणत्या विभागात किती पदे – South Western Railway Recruitment 2025

हुबली डिवीजनमध्ये १२५ पदे भरली जाणार आहेत. कैरिज रिपेअर वर्कशॉप हुबलीमध्ये ११२ पदे, बंगळुरु डिविजनमध्ये ११२ पदे, म्हैसूर डिवीजनमध्ये ९१ पदे, सेंट्रल वर्कशॉप मैसूर येथे २३ पदे भरती केले जाणार आहेत.

पात्रता निकष-

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५०% गुणांसह १० वी किंवा त्याच्या समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) ITI उत्तीर्ण असावा आणि सदर उमेदवाराकडे NCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय अधिसूचनेच्या शेवटच्या तारखेला १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. South Western Railway Recruitment 2025

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज शुल्क १००/- रुपये ठेवण्यात आलं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे पैसे भरू शकता. मुक्त श्रेणी साठी म्हणजेच SC (अनुसूचित जाती), ST (अनुसूचित जमाती), PwBD (बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्कआकारले जात नाही.

निवड प्रक्रिया कशी आहे ?

सर्व पात्र अर्जदारांसाठी तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल. गुणवत्ता यादी खालील गुणांची सरासरी घेऊन तयार केली जाईल

किमान ५०% गुणांसह मॅट्रिक (१०वी) आणि
संबंधित ट्रेड मधील ITI गुण.
कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
मॅट्रिक आणि आयटीआयच्या गुणांच्या सरासरी वरून निवड केली जाणार आहे.

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: rrchubli.in
होमपेजवरील ‘Register’ टॅबवर क्लिक करा
नवीन वापरकर्त्यांसाठी, आवश्यक तपशीलांसह नोंदणी पूर्ण करा
Log In करा आणि तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यापार-विशिष्ट तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा
स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करा
अर्ज शुल्क भरा
सर्व तपशील नीट चेक करा आणि फॉर्म सबमिट करा
भविष्यातील संदर्भासाठी पेज डाउनलोड करा आणि प्रिंट करा

Shirdi Railway : साईभक्तांना आनंदाची बातमी!! शिर्डी रेल्वे मार्गासाठी 239.80 कोटी मंजूर

Shirdi Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi Railway । शिर्डीला साईबाबांचे दर्शन घ्यायला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने १६.५ किलोमीटर लांबीच्या पुणतांबा-साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च २३९.८० कोटी रुपये असून हा प्रकल्प २०२४-२५ च्या अम्ब्रेला वर्क फॉर मल्टी-ट्रॅकिंगचा एक भाग असणार आहे. शिर्डीतील पायाभूत सुविधांना चालना देणे आणि शिर्डी सारख्या प्रमुख विभागांमध्ये रेल्वे क्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

भाविकांसह, शेतकरी विद्यार्थ्याना फायदा – Shirdi Railway

पुणतांबा-साईनगर शिर्डी रेल्वेमार्ग (Shirdi Railway) सध्या १९.६६% लाईन क्षमतेने कार्यरत आहे. मात्र, भविष्यात दुहेरीकरणाशिवाय वापर क्षमता ७९.७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मार्गावर ताण वाढू शकतो. पुणतांबा आणि साईनगर शिर्डी हे दोन्ही शहर आधीच रेल्वे मार्गाने जोडले गेले असून या मार्गावर अनेक ट्रेन धावत आहेत. त्यामुळे पुणतांबा-साईनगर शिर्डी मार्गावरील वाढती गर्दी कमी करावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच प्रस्तावित दुपदरीकरण करण्यात येणार आहे. पुणतांबा-साईनगर शिर्डी मार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे भाविक, दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बाजारपेठेत कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश –

दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा, वेळप्रसंगी जास्तीचे मनुष्यबळ वापरा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.शिर्डी येथील विमानतळावर (Shirdi Airport) नवीन हवाई वाहतूक नियंत्रण इमारत, एकात्मिक मालवाहू इमारत आणि टर्मिनल इमारतीचे काम प्रस्तावित आहे. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा. तसेच, विमानतळासाठी आवश्यक असलेले खरेदी आणि स्ट्रक्चरल डिझाइनचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करावे असे निर्देश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवा या दोन्ही वाहतुकीमुळे शिर्डीच्या पर्यटनाला येत्या काळात आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price Cut Soon : पेट्रोल- डिझेल स्वस्त होणार!! केंद्रीय मंत्र्यांनी दिली खुषखबर

Petrol Diesel Price Cut Soon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Petrol Diesel Price Cut Soon। पेट्रोल – डिझेलच्या किमतीबाबत एक दिलासादायक बातमी आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. भारताने ऊर्जा आयात धोरणात केलेला बदल आणि नवीन पुरवठा स्रोतांकडे वाढता कल या २ कारणांमुळें कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन पेट्रो आणि डिझेलचे दर कमी होतील. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबद्दलची खुशखबर दिली आहे.

कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ- Petrol Diesel Price Cut Soon

हरदीप सिंग पुरी म्हणाले, जर पुढील दोन-तीन महिने कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किमती कमी करण्याची (Petrol Diesel Price Cut Soon)संधी आहे. नवीन स्रोत उदयास येत असल्याने तेलाच्या किमती कमी होतील. भारताने, कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केली आहे.आधी २७ देशातून कच्चे तेल आयात करत होते. आता ४० देशांमधून निर्यात केली जाईल.या विविधीकरणामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत तर होईलच, याशिवाय जागतिक भू-राजकीय दबावांमध्ये भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा मिळेल. याचा फायदा शेवटी सामान्य ग्राहकांना होईल अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले, जगातील तेल बाजारातील वाढीपैकी 16 टक्के वाढ भारतातून झाली आहे आणि येत्या काळात हा आकडा 25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच, भारत केवळ ग्राहक बनत नाही, तर जागतिक ऊर्जा बाजाराला दिशा देणारा देश देखील बनत आहे. Petrol Diesel Price Cut Soon

दरम्यान, अलीकडेच, अमेरिकेने रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना हरदीप सिंग पुरी यांनी एक मोठे विधान केले. जागतिक तेल उत्पादनात रशियाचा वाटा १० टक्के आहे. जर रशियाला तेल व्यापारातून वगळले असते तर किंमती प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या असत्या. तुर्की, चीन, ब्राझील आणि युरोपियन युनियननेही रशियाकडून तेल आणि वायू खरेदी केला आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने जागतिक किमती स्थिर ठेवण्यातही मदत झाली असल्याचा दावा हरदीप सिंग पुरी यांनी केला.

Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाईन

Shirdi Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shirdi Airport । आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा, वेळप्रसंगी जास्तीचे मनुष्यबळ वापरा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाशिक कुंभमेळा हा २०२७ ला होणार आहे. त्याच्या आधीच शिर्डी विमानतळाचा विस्ताराची कामे पूर्ण करण्याच्या सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्या.

अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करा- Shirdi Airport

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिर्डी येथील विमानतळावर (Shirdi Airport) नवीन हवाई वाहतूक नियंत्रण इमारत, एकात्मिक मालवाहू इमारत आणि टर्मिनल इमारतीचे काम प्रस्तावित आहे. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा. तसेच, विमानतळासाठी आवश्यक असलेले खरेदी आणि स्ट्रक्चरल डिझाइनचे काम येत्या आठवड्यात पूर्ण करावे. शिर्डी विमानतळ हे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे. त्यामुळे लहान विमाने पार्क करण्यासाठी शिर्डी विमानतळाचा वापर करता येईल. या संदर्भात, आवश्यक असल्यास, शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून अधिक जमीन संपादित करावी अशा सूचना फडणवीसांनी दिल्या.

दरम्यान, दुसरीकडे पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमिन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवेचे जाळे आणखी विस्तारणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी तातडीने कार्यवाही करावी. तसेच, तेथे मोठी विमाने उतरवण्याची सुविधा असावी, ज्यासाठी आतापासून आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. या विमानतळावर विमान हँगरची व्यवस्था देखील असावी.” महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांनी शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामाचे सादरीकरण केले.

Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra : IRCTC कडून अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा; खर्च किती?

Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra । श्रावण महिन्यात अष्ट ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने अष्ट ज्योतिर्लिंगाची विशेष यात्रा जाहीर केली आहे. ०५ ऑगस्ट २०२५ रोजी मडगाव येथून ही यात्रा सुरु होईल. या यात्रेच्या माध्यमातून द्वारका (नागेश्वर), सोमनाथ, उज्जैन (महाकालेश्वर), ओंकारेश्वर, नाशिक (त्र्यंबकेश्वर), औरंगाबाद (गृष्णेश्वर), परभणी (परळी वैजनाथ) आणि मरकापूर (श्रीशैलम मल्लिकार्जुन) अशा धार्मिक स्थळांना तुम्हाला भेटी देता येणार आहेत. या विशेष टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,८८० रुपयांपासून सुरु होते.

IRCTC च्या पश्चिम क्षेत्र मुंबई कार्यालयाने आयोजित केलेली ही यात्रा (Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra) भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून पूर्ण होईल. श्रावण सारख्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेली हि यात्रा भक्तांना परवडणारा आणि संस्मरणीय प्रवासाचा आनंद देईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले, “आमचे उद्दिष्ट कुटुंबे, गट आणि एकट्या प्रवाशांसाठी धार्मिक पर्यटन सोपे आणि अधिक आनंददायी बनवणे आहे. या यात्रेबद्दल भक्तांच्या मनात आधीच मोठी उत्सुकता आहे आणि नियमित प्रवासी हे पॅकेज त्वरित ऑनलाइन बुक करत आहेत.

कशी असेल ट्रेन ?

भारत गौरव पर्यटन ट्रेनमध्ये स्लीपर (नॉन-एसी), एसी III टियर आणि एसी II टियर कोच आहेत. या मधून एकाच वेळी सुमारे ६०० ते ७०० प्रवाशी प्रवास करू शकतात. ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ताजे अन्न देणारी पेंट्री कार असेल. या ट्रेनला भारतीय हेरिटेज दर्जाच्या कलाकृतीने सजवण्यात आलेले आहे. सोलापूर,कुर्डूवाडी, दौंड,पुणे,लोणावळा,कर्जत, कल्याण,वसई रोड, डहाणू रोड, वापी आणि सुरत या स्थानकांवर थांबेल.

किती आहे पॅकेज? Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra

अष्ट ज्योतिर्लिंग विशेष यात्रेच्या पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,८८० रुपयांपासून सुरू होते. तुम्ही www.irctctourism.com या अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करू शकता. या सर्व समावेश पॅकेजमध्ये (Ashta Jyotirlinga Shravan Special Yatra) ट्रेनचा प्रवास, हॉटेस स्टे, जेवण, साईट पाहण्यासाठी रस्ता वाहतूकीचा खर्च,टुर गाईड, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि इतर ऑनबोर्ड सोयीसुविधांचा समावेश आहे.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी पॅकेज ठरलं!! शेतकऱ्यांना इतके पैसे मिळणार

Purandar Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Purandar Airport । पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतीने जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. विमानतळासाठी संमतीने जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून 10 टक्के विकसित भूखंड आणि चार पट मोबदला दिला जाणार आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी हजर होते. या बैठकीतच पुरंदर विमानतळासाठी पॅकेज निश्चित करण्यात आलं आहे.

पुरंदर विमानतळासाठी (Purandar Airport) वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव सात गावांमधील शेतकऱ्यांकडून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यावर २ हजार ५२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुमारे महिनाभर चाललेल्या सुनावणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी विमानतळाला पाठिंबा, तर काहींनी विरोध कायम ठेवला. शेतकर्‍यांचा आक्षेप होता की केवळ रोख रक्कम नव्हे, तर जमीनही परत दिली जावी. यासाठी पॅकेजची लवकर घोषणा व्हावी, अशीही मागणी करण्यात आली होती. अखेर सरकारने या मागणीला प्रतिसाद देत भूसंपादनासाठीचे पॅकेज निश्चित केले आहे.

नोकरीही मिळणार – Purandar Airport

त्यानुसार, शेतकर्‍यांना एकूण जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड परतावा म्हणून मिळणार आहे. तसेच या शेतकर्‍यांना सध्याच्या बाजारभावाच्या 4 पट रक्कम रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. एवढच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांना नोकरीच्या संधीही देण्यात येतील. सरकारच्या या निर्णयामुळे पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुरंदर विमानतळासाठी थांबलेले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून जमीन संपादित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ‘या’ नक्षलग्रस्त गावात सुरु झाली ST बससेवा

ST Bus In Gadchiroli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील मारकनार (Markanar) गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. ही बस अहेरी (Aheri) ते मारकनार मार्गावर धावणार असून, या सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी राष्ट्रीय झेंडा फडकावून आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. या बस सेवेचा फायदा मारकनार आणि आसपासच्या गावांतील विद्यार्थ्यांसह सुमारे १,२०० रहिवाशांना होईल, असे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मारकनार हे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते.

आदिवासी लोकसंख्या आणि नक्षलग्रस्त भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला बऱ्याच काळापासून खराब कनेक्टिव्हिटीचा सामना करावा लागत आहे. दुर्गम भाग असल्याने याठिकाणी रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा आहे. नागरिकांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय. मात्र आता प्रथमच मारकनार सारख्या नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र शासनाची बस पोचल्याने नागरिक चांगलेच खुश झाले आहेत. गावकऱ्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या परिसरात बस बघितली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मरकणारचे गाव पाटील झुरु मालु मट्टामी यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी, कोठीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला.

या बसमार्फत मारकनारसह फुलणार, कोपर्शी, पोयरकोठी, मुरुमभुशी, गुंडूरवाही अशा सहा गावांचे सुमारे 1,200 जण (विद्यार्थी, रुग्ण, कामगार) लाभान्वित होणार आहेत. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी आणि इतर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना होईल. पूर्वी या गावातील लोकांना कोठीपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ–दहा तास जंगलात पायी चालावे लागायचे. दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बस सेवा सुरू करण्यात आल्या.