Sunday, December 28, 2025
Home Blog Page 403

HAL Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

HAL Bharti 2024

HAL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत डिप्लोमा तंत्रज्ञ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 8 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत डिप्लोमा तंत्रज्ञ या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

डिप्लोमा तंत्रज्ञ या पदाच्या एकूण 8 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 28 वर्षे असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मुख्य व्यवस्थापकी एच आर औद्योगिक आरोग्य केंद्र हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगलोर कॉम्प्लेक्स सुरंजनदास रोड जुन्या विमानतळा जवळ बेंगलोर 560017

अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा झालेला असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला 57 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.
  • 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Ration Card Rule | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; ‘या’ नागरिकांचे 1 नोव्हेंबरपासून रेशन होणार बंद

Ration Card Rule

Ration Card Rule | सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा असतात. यातील एक महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. आता याच लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ती म्हणजे आता इथून पुढे या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशनचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला, आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे. आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच तुमच्या आधार कार्ड रेशन कार्डला (Ration Card Rule) लिंक करणे खूप गरजेचे आहे.

केवायसी करणे का गरजेचे आहे | Ration Card Rule

ई केवायसी केल्यामुळे आधार कार्ड आणि रेशन कार्ड एकमेकांना लिंक केले जातात. यामुळे आधार कार्डची पडताळणी करणे देखील सोपे होणार आहे. आणि या योजनेचा गैरफायदा अनेक लोक येतात. ते देखील कमी होणार आहे. ई केवायसीच्या मदतीने एक व्यक्ती एकापेक्षा जास्त ठिकाणी राशनचा लाभ घेऊ शकत नाही. जर ते कुणी घेत असेल, तर पुढे जाते ठीक ई केवायसीमुळे कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत ई केवायसी पूर्ण केले नाही, तर तुमचे संपूर्ण रेशन कार्ड रद्द होऊ शकते. याचा अर्थ तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.

केवायसी कशी करावी ?

इ केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या राशन दुकानदाराकडे जावे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत घेऊन जायचे आहे. तिथे तो दुकानदार तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल. यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही. अगदी काही मिनिटातच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जर त्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही ई केवायसी करणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांना EPFO चं दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट; 6 कोटी लोकांना होणार फायदा

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या आधी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळालेली आहे. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन दिवाळीपूर्वी मोदी सरकारने जवळपास 6 कोटी सदस्यांना एक मोठं गिफ्ट दिलेले आहे. सरकारने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजे EDLI ही योजना चालू केली. या योजनेची आता शेवटची तारीख 28 एप्रिल 2024 नंतरही वाढवणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी घेतलेला आहे. त्यांनी सांगितले की, EPOF च्या सर्व सदस्यांना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेअंतर्गत सेवानिवृत्ती निधीचा लाभ मिळणार आहे. या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण कवच देखील मिळणार आहे.

खाजगी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी यासाठी ईपीएफओ खात्यामध्ये गुंतवणूक केली जाते. हा एक प्रॉव्हिडंट फंड आहे. या EPFO मध्ये कर्मचारी प्रत्येक महिन्याला त्याच्या वेतनातून जवळपास 12% रक्कम फंडात गुंतवत असतात. यासाठी कंपनी देखील मदत करते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीच्या ईपीएफओवर त्याची पत्नी ही नॉमिनी लागते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वारसदाराला पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती पूर्वी त्याचा मृत्यू झाला, तरी ही रक्कम त्याच्या पत्नीला देता येते.

काय आहे सरकारची EDLI योजना ?

कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा दुर्घटना घडली, तर त्याच्या कुटुंबीयांना या विम्याच्या रकमेवर दावा करता येतो. विम्याची रक्कम एक रकमी देखील वारसदाराला मिळते. या योजनेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसदाराला रक्कम देते. ही रक्कम जवळपास 7 लाख रुपये एवढी आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतना आधारे ही विम्याची रक्कम ठरवली जाते.

रेल्वेमध्ये तुमची सीट कुणी बळकावलीये ? उठतच नाहीयेत ? करा ‘हे’ काम, मिनिटात मिळेल जागा

railway rule

देशभर दिवाळी सणाची लगबग सुरु आहे. वर्षातील या सर्वात मोठ्या सणाला लोक आवरून आपल्या गावाकडे जातात. सणासुदीच्या काळात ट्रेनला खूप गर्दी असते. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातमधून यूपी-बिहारकडे जाणाऱ्या गाड्या तुडुंब भरल्या आहेत. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकिटांसह प्रवास करणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, कारण वेटिंग तिकीट असलेले लोक त्यांच्या जागेवर बसतात आणि त्यांना उठण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट असलेल्या व्यक्तीला संपूर्ण प्रवास बसूनच करावा लागतो. पण आता तुमच्या कन्फर्म केलेल्या सीटवर कोणी बसले असेल तर त्याला आपल्या जागेवरून उठवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. त्यामुळे अर्ध्या तासात जागा रिकामी करून आरामात प्रवास करता येईल.

अशा प्रकारे तुमची सीट सहज रिकामी करा

Rail Madad ॲपवर तक्रार करून सीट रिकामी करता येते. ॲपवर तक्रार केल्यानंतर 28 मिनिटांत तोडगा काढला जात असल्याचा रेल्वेचा दावा आहे. यामध्ये इतर तक्रारींसोबतच कन्फर्म सीटवर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीबाबतही तक्रार करता येते. त्यानंतर टीटी स्वतः सीटवर पोहोचेल आणि सीट रिकामी करेल, जेणेकरून कन्फर्म तिकीट प्रवाशाला कोणतीही अडचण येऊ नये. रेल्वे सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत आहे.

सर्व तक्रारींसाठी सिंगल विंडो

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हेल्पलाइन क्रमांक 139 प्रमाणे, X (ट्विटर), फेसबुक सारख्या तक्रारी आणि सूचनांची सर्व माध्यमे “रेल मदत ” पोर्टल आणि त्याच्या ॲपशी जोडली गेली आहेत. प्रवासी त्यांच्या तक्रारी रेल्वेला “रेल मदत ” पोर्टलद्वारे किंवा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर ॲपद्वारे करू शकतात. विहित मुदतीत तोडगा न निघाल्यास तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि जबाबदारीही निश्चित केली जाईल. तक्रारदाराला तक्रार निवारण माहिती देण्याबरोबरच त्याच्याकडून अभिप्रायही मागवला जात आहे.

Diwali 2024: दिवाळी कधी कराल साजरी? 31 ऑक्टोबर की1 नोव्हेंबर ? संभ्रम करा दूर , जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 : वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.मात्र यंदाच्या वर्षी दिवाळी नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची ? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यंदा कार्तिक अमावस्येची तारीख एका दिवसाऐवजी दोन दिवसांवर येत असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे.यावेळची दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी करायची की १ नोव्हेंबरला, अशी शंका लोकांच्या मनात आहे. दिवाळीबाबत (Diwali 2024) हीच शंका दूर करण्यासाठी अनुभवी आणि विद्वान ज्योतिषी संस्कृत संस्थांशी बोलून एका माध्यमाद्वारे आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करीत आहोत.

कार्तिक अमावस्या 31 ऑक्टोबर तसेच 1 नोव्हेंबरला आहे. हिंदू धर्मात तिथींना विशेष महत्त्व आहे आणि त्यातही उदय तिथीचे महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मात, उपवास आणि सण फक्त उदय तिथीच्या आधारे साजरे केले जातात. उदय तिथी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी येणाऱ्या तिथीला महत्त्व दिले जाते. अशा प्रकारे काही लोक उदय तिथीला महत्त्व देऊन 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणे चांगले मानत आहेत. काही लोकांचे म्हणणे असे आहे की दिवाळीची (Diwali 2024) लक्ष्मी पूजा नेहमी कार्तिक अमावस्या प्रदोष काल आणि मध्यरात्री दरम्यान साजरी केली जाते, म्हणून दिवाळी 31 ऑक्टोबरलाच साजरी करावी. या दोन्ही युक्तिवादांना ज्योतिषशास्त्र आणि मुहूर्त शास्त्राच्या नियमांच्या आधारे जाणून घेऊ.

कधी साजरी कराल दिवाळी (Diwali 2024)

वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.12 वाजता सुरू होईल, जी 01 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत चालेल. अशाप्रकारे, दिवाळीच्या सर्व प्रकारच्या वैदिक अटी 31 ऑक्टोबर रोजी लागू होतील तर 01 नोव्हेंबर 2024 रोजी अमावस्या तिथी सूर्योदयाच्या वेळी असेल परंतु संध्याकाळी 06.16 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, काही पंचांगांमध्ये, अमावस्या तिथीची समाप्ती सूर्यास्तापूर्वी सांगितली जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये, उपवास आणि सणांच्या तारखांच्या संदर्भात उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत, इतर गोष्टी आणि शुभ काळ लक्षात घेऊन, आगमन तिथीला अधिक महत्त्व दिले जाते. या कारणास्तव, प्रदोष काळ आणि मध्यरात्री दरम्यान असणारी अमावस्या तिथी लक्षात घेऊन, बहुतेक विद्वान आणि पंडित 31 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा करण्याचा (Diwali 2024) सल्ला देत आहेत. 31 ऑक्टोबरला दिवाळी या लक्ष्मी पूजनाने साजरी करा असा सल्ला दिला आहे.

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त 31 ऑक्टोबर

पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रदोषव्यपिनी अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. 31 ऑक्टोबरला लक्ष्मी-गणेशाची पूजा करण्याचा पहिला शुभ मुहूर्त प्रदोष काळातच मिळत (Diwali 2024) आहे. 31 ऑक्टोबर रोजी प्रदोष काल संध्याकाळी 05:36 ते 08:11 पर्यंत राहील.

लक्ष्मी पूजन मुहूर्त (निशिथकाल) 31 ऑक्टोबर

निशिथ काळात पूजा करणे अधिक फायदेशीर मानले जाते. 31 ऑक्टोबर रोजी निशिथ कालच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 ते 12:31 पर्यंत असेल.

Iodine deficiency | मीठ पूर्णपणे सोडून देणे चुकीचे; आयोडीनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

Iodine deficiency

Iodine deficiency | आपल्या शरीरात जर मिठाची पातळी गरजेपेक्षा कमी झाली, तर आयोडीनची (Iodine deficiency) पातळी देखील कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरात थायरॉईड हा हार्मोन तयार होतो. थायरॉईड हा चयापचय, वाढ तसेच इतर करत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जर शरीरात आयोडीनची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबाबत जनजागृती केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोडीनची कमतरता असल्यामुळे जगभरात मानसिक आणि शारीरिक अपंगत्व येऊ शकते. आणि आयोडीनची (Iodine deficiency) कमतरता हेच अपंगत्वाचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे आयोडीनची कमतरता असणे ही एक मोठी समस्या मानली जाते. जगभरातील जवळपास दोन अब्ज लोक आयोडीनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. खास करून स्त्रियांमध्ये आणि मुलांमध्ये आयोडीनचा धोका जास्त असतो.

आयोडीनच्या कमतरतेची लक्षणे | Iodine deficiency

  • मानेमध्ये गोइटर
  • थकवा आणि अशक्तपणा
  • वजन वाढणे
  • केस गळणे
  • कोरडी त्वचा
  • एकाग्रता आणि स्मरणशक्तीचा अभाव
  • मंद वाढ आणि विकास
  • आयोडीनच्या कमतरतेमुळे

आयोडीनच्या कमतरतेची कारणे | Iodine deficiency

आयोडीनची कमतरता प्रामुख्याने आयोडीनयुक्त अन्नपदार्थांमुळे होते. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना त्यांचे आरोग्य तसेच त्यांच्या बाळाच्या विकासासाठी इतरांपेक्षा जास्त आयोडीनची आवश्यकता असते. जर ते पुरेसे आयोडीन युक्त अन्न घेत नाहीत. त्यामुळे या महिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.

आयोडीनच्या कमतरतेवर उपचार

हे प्रामुख्याने त्याच्या उपचारांच्या तीव्रतेवर अवलंबून असते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे अधिक आयोडीनयुक्त पदार्थ खाऊन किंवा आयोडीन सप्लिमेंट्स वापरून सहज सुधारता येते. गंभीर प्रकरणांमध्ये, डॉक्टर थायरॉईड कार्य वाढवण्यासाठी थायरॉईड हार्मोन्स लिहून देऊ शकतात.

बँकांकडून ग्राहकांसाठी अलर्ट ! आता ठेवावा लागणार ‘इतका’ मिनिमम बॅलन्स

minimum bank balance

सध्या बहुतांश बँका बचत खाते उघडताना किमान शिल्लक ठेवण्याची अट घालतात. याचा अर्थ खातेदाराला त्याच्या खात्यात एक निश्चित रक्कम कायम ठेवावी लागते. नाहीतर बँक दर महिन्याला शुल्क आकारतात. बऱ्याच लोकांना बँकांच्या या नियमांबद्दल माहिती नसते.

नियमित शुल्कामुळे खातेदारांच्या खात्यातील रक्कम हळूहळू संपत येते. त्यामुळे कोणत्या बँकेत मिनिमम बॅलन्स म्हणून किती पैसे ठेवावेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून अनावश्यक दंड टाळता येईल! चला तर मग जाणून घेऊया की बचत खातेधारकाने त्याच्या खात्यात किती किमान शिल्लक रक्कम ठेवणे आता बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती …

इंडसइंड बँक

इंडसइंड बँकेच्या खातेधारकांनाही किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये किमान 10,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. आणि छोट्या शहरांमध्ये ही मर्यादा 5,000 रुपये आहे. खातेदाराने ही मर्यादा पूर्ण केली नाही तर! त्यामुळे बँक नॉन मेंटेनन्स चार्जेस लावते.

Yes Bank

येस बँकेचे सेव्हिंग ॲडव्हांटेज खाते असलेल्यांनाही किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. येस बँकेत किमान 10,000 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. ही रक्कम खात्यात ठेवली नाही तर! त्यामुळे बँक दरमहा ₹ 500 नॉन मेंटेनन्स चार्ज आकारते.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेलाही त्यांच्या खातेदारांनी किमान शिल्लक राखण्याची अट ठेवली आहे. मोठ्या शहरांमधील खातेधारकांना त्यांच्या खात्यात ₹ 10,000 शिल्लक ठेवावी लागतात. ही मर्यादा लहान शहरांमध्ये ₹ 5,000 आणि ग्रामीण भागात ₹ 2,000 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

तुमचे बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असल्यास! त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यात किमान ठराविक रक्कम ठेवावी लागेल. जे तुमच्या शहरावर किंवा क्षेत्रावर अवलंबून आहे! महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये खातेधारकांना किमान 3,000 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. छोट्या शहरांमध्ये ही मर्यादा 2,000 रुपये आहे. आणि खेड्यात राहणाऱ्यांसाठी ही किमान शिल्लक 1,000 रुपये असावी. ही किमान रक्कम खात्यात ठेवली नाही तर! त्यामुळे बँक दर महिन्याला नॉन मेंटेनन्स चार्ज म्हणून काही कपात करते.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. शहरी आणि मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या बँक खात्यात किमान 2,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. त्याच वेळी, ग्रामीण भागातील खातेदारांना त्यांच्या खात्यात किमान 1,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. अशा परिस्थितीत खात्यातील रक्कम किमान शिल्लकपेक्षा कमी असल्यास बँक शुल्क आकारते.

HDFC बँक

शहरी आणि मेट्रो भागातील HDFC बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक मर्यादा जास्त आहे. येथे मेट्रो शहरांमध्ये, HDFC बँकेच्या बचत खात्यात 10,000 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. आणि लहान शहरांमध्ये ही मर्यादा 5000 रुपये असेल आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना खात्यात 2,500 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. किमान शिल्लक न ठेवल्यास बँक दरमहा नॉन मेंटेनन्स शुल्क आकारते.

Benefits of Vitamin-E Capsule | व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेसाठी आहे फायदेशीर; अशाप्रकारे करा फेसपॅक

Benefits of Vitamin-E Capsule

Benefits of Vitamin-E Capsule | हिवाळा जवळ आलेला आहे. या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये त्वचा अत्यंत रखरखीत आणि कोरडी पडून जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी विटामिन ई खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा मॉइश्चराईज होते. तसेच त्वचेवरील डाग धब्बे कमी होण्यास मदत देखील होते. म्हणूनच अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये विटामिन ईचा वापर केला जातो. परंतु ब्युटी प्रॉडक्ट घेणे प्रत्येकालाच परवडत नाही. म्हणून तुम्ही विटामिन ई कैप्सूलचा वापर करून घरच्या घरी फेस मास्क तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचा देखील अत्यंत मुलायम होईल आणि तुम्हाला जास्त खर्च देखील येणार नाही. आता या विटामिन ईचा (Benefits of Vitamin-E Capsule) आपल्या त्वचेला नक्की कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

विटामिन ईचे फायदे | Benefits of Vitamin-E Capsule

मॉइश्चरायझेशन

विटामिन ई हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असते. विटामिन ई मध्ये मॉइश्चराईज करण्याची क्षमता असते. त्यामुळे आपली त्वचा अत्यंत मऊ आणि दीर्घकाळासाठी कोमल बनते. तसेच आपली त्वचा जास्त कोरडी देखील होत नाही.

अँटिऑक्सिडंट | Benefits of Vitamin-E Capsule

विटामिन ई फ्री रॅडिकल्ससोबत लढून त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. त्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे कमी दिसतात. आणि आपण चिरकाल तरुण दिसतो.

डाग कमी होतात

विटामिन ईमध्ये त्वचेवरील डाग कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे जर तुम्ही दररोज विटामिन ई चा चेहऱ्यावर वापर केला. तर लवकरच तुमची त्वचा अत्यंत नितळ आणि सुंदर होईल.

त्वचेचा रंग सुधारतो

विटामिन ईमध्ये त्वचेचा रंग सुधारण्याची देखील क्षमता असते, यामुळे तुमच्या त्वचेचा रंग तर सुधरतोच परंतु त्या सोबत त्वचा अत्यंत चमकदार आणि तरुण दिसते.

व्हिटॅमिन ईपासून बनवलेले फेस मास्क

  • व्हिटॅमिन ई आणि कोरफड
  • साहित्य:
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • टीस्पून एलोवेरा जेल

पद्धत | Benefits of Vitamin-E Capsule

  • व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडून त्यात कोरफड जेल मिसळा.
  • हे मिश्रण स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
  • थंड पाण्याने धुवा.
  • व्हिटॅमिन ई आणि मध

साहित्य

  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • 1 चमचे मध

पद्धत

  • व्हिटॅमिन-ई कॅप्सूल फोडून त्यात मध मिसळा.
  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
  • कोमट पाण्याने धुवा.

OLA s1x देशातील सर्वात स्वस्त आणि लांब रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ; जाणून घ्या फीचर्स

OLA s1x

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना इलेक्ट्रिक स्कूटरला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. वाहन कंपन्या सुद्धा नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक वर्जन मध्ये आणत आहेत. मग यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर या दोन्ही गाड्यांचा समावेश आहे. त्यातही टू व्हीलर ला ग्राहकांची अधिक पसंती मिळत असल्याचा दिसत आहे. आता जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेईकल विकत घ्यायचं असेल तर सर्वात आधी बजेटचा प्रश्न पुढे येतो पण स्वस्तात इलेकट्रीक स्कुटर खरेदीचा पर्याय कोणता ? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त लांब रेंज देणारी स्कुटर असा कम्पनीचा दावा असलेल्या OLA s1x याबद्दल आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

आता लोक रोजच्या कामासाठी इलेक्ट्रिक स्कूटर वापरत आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकला अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही फक्त 20 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटसह Ola S1X खरेदी करू शकता.

Ola S1X स्वस्तात घ्यायची आहे ?

ओला इलेक्ट्रिकने ओला Ola S1X इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. लॉन्च झाल्यापासून या स्कूटरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 75 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच वेळी, ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 95 ते 195 किमीची अंतर कापते.

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2 kW वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74,999 रुपये आहे. तर याची ऑन रोड किंमत ७९ हजार रुपये आहे.आता या स्कूटरवर 20 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून सुमारे 59 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज 3 वर्षांसाठी दिले जाईल, त्यानंतर तुम्ही 3 वर्षांसाठी बँकेला EMI म्हणून दरमहा सुमारे 1876 रुपये द्याल.

8 वर्षांची वॉरंटी

याशिवाय बँक तुम्हाला या कर्जावर 9 टक्के व्याज देखील आकारेल. 2 kWh बॅटरीसह, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 95 किमी जाते . या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 85 किमी आहे. तसेच त्याचे वजन फक्त 101 किलो आहे. इतकंच नाही तर त्यात बसवलेल्या बॅटरीवर कंपनी ग्राहकांना 8 वर्षांची वॉरंटीही देते.

Ola S1X 3kWh

आता या इलेक्ट्रिक स्कूटरच्या 3 kWh बॅटरी व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्कूटर एका पूर्ण चार्जवर सुमारे 143 किमीची रेंज देते. तसेच, कंपनीने ताशी 90 किमीचा टॉप स्पीड दिला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन रोड किंमत सुमारे 89 हजार रुपये आहे. आता तुम्ही 20 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला बँकेकडून 3 वर्षांसाठी 69 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. या रकमेवर बँक तुमच्याकडून 9 टक्के व्याज देखील आकारेल. यानंतर तुम्ही या स्कूटरसाठी 3 वर्षांसाठी 2194 रुपये EMI द्याल. आणि स्वस्तात OLA स्कुटर तुमची होईल.