Sunday, December 28, 2025
Home Blog Page 404

Weather Update | राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

Weather Update

Weather Update | सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबई आणि ठाण्यात तर गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल सतत अंदाज व्यक्त करत आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे? याबद्दलची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये देखील आज ढगाळ वातावरण असणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि परिसरात देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर इथून पुढे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज 26 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

यासोबतच मराठवाड्यात देखील आज पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने शेतकऱ्यांना देखील आपले धान्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा इशारा दिलेला आहे. सध्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. त्याचप्रमाणे भात काढणीस आलेले आहे. परंतु पावसामुळे ही हात काढणी लांबली आहे. त्याचा फटका देखील भाताच्या पिकाला बसत आहे.

अखेर सलमान खानला मारण्याचा कट झाला उघड; शार्प शूटरने स्वतः दिली कबूली

Salman Khan
Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे, कारण आताच झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा आणि लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांचा विषय उफाळून आला आहे. या परिस्थितीमुळे सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबरोबरच त्याच्या शूटिंगच्या सेटवरही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याआधीही सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता. त्यातच आता नवीन धक्कादायक बातमी समोर आली असून, शार्प शुटर सुक्खा हा सलमानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन करत होता हे कबूल केलं आहे.

सलमानला मारण्याचा कट

हरियाणाच्या पानीपत शहरातून शार्प शुटर सुक्खाला अटक करण्यात आली आहे. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी वाढवली होती, पण पोलिसांनी त्याला हॉटेलमधून पकडलं. अटकेच्या वेळी सुक्खा प्रचंड नशेत होता, त्यामुळे त्याला शुद्ध नव्हती. नवी मुंबई पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी एकत्रित कारवाई करत त्याला पकडले आहे. शार्प शुटरने पोलीस तपासादरम्यान हादरून टाकणारी माहिती दिली. सलमान खानला फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅनसाठी त्याने फार्महाऊसची पूर्ण तपासणी आणि निरीक्षण केले होते. यासाठी त्याने गार्डसोबत मैत्री केल्याचीही माहिती समोर आली आहे. हि सगळी योजना आखून मग तो सलमान खानला मारणार होता .

बिश्नोई टोळीचा हात

सलमान खानला मारण्याच्या कटात बिश्नोई टोळीचा हात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या विषयावर पोलीस जोरात चौकशी करताना दिसत आहे. तसेच या घटनांमुळे सलमान खानला पोलिसांकडून अधिक सुरक्षा प्रदान केली गेली आहे.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल; 35 नाहीतर केवळ 20 गुणांना पास

Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी कसून अभ्यासाला लागलेले आहेत. तसेच शाळा देखील त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांकडून योग्यरित्या तयारी करून घेत आहेत. अशातच आता या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जी बातमी वाचून नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणित या विषयाची खूप भीती वाटते. कारण गणित विषयाचा पेपर आला की, तो खूपच अवघड जातो. यामध्ये पाठांतर करावे लागत नाही. परंतु योग्य बुद्धीचा वापर करून हा पेपर द्यावा लागतो. परंतु अनेक विद्यार्थ्यांना 35 मार्क्स मिळवून काठावर पास होणे जमत नाही.

त्याचप्रमाणे दहावीमध्ये गेल्यावर विज्ञान हा विषय देखील आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अवघड गेल्याचे दिसत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या बोर्डाचे निकाल पाहिले, तर त्यातील गणित आणि विज्ञान या विषयाला कमी मार्क दिसतात. आता याच दोन विषयांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थ्यांना देखील पास केले जाणार आहे. गणित आणि विज्ञान या विषयात तुम्हाला जर 20 पेक्षा जास्त मार्क्स असतील, तरी देखील तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता. आणि तुमच्या निकालावर पास असा शेरा येणार आहेत.

परंतु जर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी गुण असतील, तर तुम्हाला या दोन विषयावर आधारित पुढे अकरावीत प्रवेश घेता येणार नाही. तर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषयावर आधारित उच्च शिक्षण करायचे, असेल तर तुम्हाला या परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. परंतु ज्यांना या विषयावर आधारित करिअर करायचे नाही. त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली बातमी आहे. त्यामुळे आता गणित आणि विज्ञान विषयाची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून कमी होणार आहे. आणि आता त्यांना इतर विषयांचा चांगला स्कोर करता येणार आहे.

यासंदर्भात शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले की, “हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक निर्णय आहे. आपल्याला पदवीधरांची संख्या वाढवायचे आहे का की गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे आहे. हे एकदा शासनाने ठरवले पाहिजे. जागतिक पातळीवर जे अभ्यास येतात. त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा ठरवला जातो. यामध्ये 2020 साली भारत 33 व्या क्रमांकावर होता. इथून पुढे तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणार आहे. यांनी यासाठी विज्ञान आणि कधी विषय अतिशय महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना फक्त पास करण्यापेक्षा जास्त ज्ञान आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करा. सरकारला फक्त परीक्षा सोप्प्या करून निकाल वाढवायचे असेल तर माझी सूचना आहे की, जन्म दाखल्याबरोबर पदवीचे प्रमाणपत्र द्यावी. याचे कारण की, आपल्याकडे वेगवेगळे सर्वे जोतात. त्या मध्ये पदवी घेऊनच साधा अर्ज लिहिता येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. गणितात पास करण्याकरिता गणिताची गोडी कशी लागेल.अशा पद्धतीने शिक्षण पद्धती करा.”

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | आदिवासी विकास विभाग अंतर्गत 614 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 |नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आज देखील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आज देखील आम्ही एक विशेष भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता आदिवासी विकास महामंडळ (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024) येथे एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ

या पदाच्या एकूण 614 रिक्त जागा आहेत.आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 614 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये एवढी फी असणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये एवढी फी असणार आहे.

अर्ज पद्धती

तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

2 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा ? | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 2 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेला अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

LIC ची नवीन योजना ! 2 लाखांपर्यंत विमा कव्हरची सुविधा

LIC plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आयुर्विमा महामंडळ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते . नुकतेच त्यांनी ग्रुप मायक्रो टर्म इन्शुरन्स प्लॅन लाँच केला असून , यामध्ये विमाधारकांना 2 लाखापर्यंत विमा कव्हर मिळू शकते. ही योजना सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, लहान वित्त संस्था आणि गैरसरकारी संस्था (NGOs) यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अनेक गट घेऊ शकतात. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार एलआयसीच्या योजनांना प्राधान्य देतात. यामधील गुंतवणुकीमुळे चांगला नफा तसेच विमा कव्हर देखील मिळतो .

कोणाला लाभ घेता येईल

या योजनेचा लाभ 50 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या गटाला होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून एकदाच प्रीमियम भरावा लागतो. तसेच पॉलिसीधारकाला एका महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंतचा कालावधी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही . तसेच एकाच संस्थेमध्ये पती आणि पत्नी काम करत असतील तरीही त्या दोघांनाही लाभ घेता येईल.

किती विमा कव्हर मिळणार

ही योजना संस्थांमधील सदस्यांना अपघाती मृत्यूच्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत करते . पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो, तसेच कोणते कर्ज असल्यास तेही या पॉलिसीच्या माध्यमातून परत केले जाऊ शकते. यामध्ये पाच हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम कव्हर करण्यात आली आहे.

मॅच्युरिटी लाभ मिळणार नाही

ही योजना मॅच्युरिटी लाभ प्रदान करत नाही. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच कुटुंबाला पॉलिसीची रक्कम मिळते. मात्र अपघाती मृत्यू झाल्यासच नॉमिनीला संपूर्ण विमा रक्कम दिली जाते. अपघाता व्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यू झाल्यास कमी रक्कम दिली जाते. पॉलिसी रद्द होण्याचा ठराविक कालावधी ठरवला जातो . एखाद्या व्यक्तीने गट सोडल्यास किंवा वयोमर्यादा संपल्यास पॉलिसी रद्द केली जाते. तसेच पॉलिसी सरेंडर केल्यानंतर सुद्धा लाभ मिळत नाही आणि पॉलिसीचा कालावधी संपल्यावरही लाभ मिळत नाही .

ऐन दिवाळीत महागाईचा फटका ! CNG च्या दरात वाढ होण्याची शक्यता

CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधीच सामान्य जनता महागाईच्या तडाख्याने त्रस्त झाली आहे. त्यात सणासुदीचा काळ म्हंटल कि , महागाई वाढणार कि काय याच वेगळंच टेंशन असत . त्यातच सरकारने देशाच्या प्रमुख तेल विपणन कंपन्यांसोबत सीएनजीच्या ( Compressed natural gas ) किमतीत वाढ करण्याची योजना आखत आहे. यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. कारण ऐन दिवाळीत महागाईचा फटका फुटणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

4 ते 6 रु वाढण्याची शक्यता

सीएनजीचे दर वाढवण्यावर फक्त चर्चा सुरु आहेत . हे किती महाग होणार याचा अंदाज वर्तवला गेला आहे. सरकारने शहरी रिटेलरच्या नैचुरल गॅस पुरवठ्यात 20% कमी केला आहे. त्याचा परिणाम तेलाच्या किंमतींवरही दिसून येऊ शकतो. यामुळे सीएनजीच्या किमतीत 4 ते 6 रु वाढण्याची शक्यता आहे. तसेच सरकाने इंधनाच्या किंमतींवर लागणाऱ्या एक्साईज ड्युटीमध्ये सुद्धा घट केली आहे. याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो .

पुरवठा कमी

सीएनजीची किंमत सरकार ठरवते. मागील काही काळात सीएनजीची सप्लाई कमी होत असून , ज्यामुळे शहरी गॅस रिटेल विक्रेत्यांकडेही कमी सप्लाई येत आहे. नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात वार्षिक 5% ची घट होत आहे. पुरवठा कमी होत असल्यामुळे बाजारात सीएनजीच्या किंमतींचा ताण कमी होऊ शकतो. तयामुळे आगामी काळात इंधनाच्या मागणी आणि किंमतींवर परिणाम होऊ शकतो.

सीएनजी वाढीची कारणे

सीएनजीच्या किमतींमध्ये वाढ होण्यामागे काही कारणे आहेत. मे 2023 च्या तुलनेत सीएनजीची मागणी कमी झाली आहे. तेव्हा याची मागणी 90% होती , ती 16 ऑक्टोबर 2024 रोजी कमी होऊन 50.75% झाली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये सीएनजीची मागणी 67.74% होती. या मागणीतील घटामुळे सीएनजीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत विक्रेता किमती वाढवतो .

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! लवकरच Hotstar आणि Jio सिनेमा एकत्र येणार

jio + hotstar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी डिज्नी हॉटस्टार ( Disney Hotstar ) या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची मालकी मिळवली आहे. ते लवकरच हॉटस्टार आणि जिओ सिनेमा याचे एकत्रीकरण करणार असून , हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी हॉटस्टार याच नावाने ओळखला जाणार आहे. याआधी दोन्ही प्लॅटफॉर्म्स वेगळे चालवण्याचा विचार होता . पण हॉटस्टारकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रिलायन्सने हा प्लॅटफॉर्मच कायम स्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिओ सिनेमा हे स्वतंत्र अस्तित्व गमावेल आणि ते डिज्नी हॉटस्टारमध्ये विलीन होईल .

हॉटस्टारला जास्त पसंती

हॉटस्टारकडे लोकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येते. जवळ जवळ हि अँप 50 कोटी लोकांनी डाउनलोड केली असून , त्याचे मासिक वापरकर्ते 33.3 कोटी एवढे आहेत. त्यामध्ये 3.5 कोटी लोकांनी सबस्क्रीप्शन घेऊन सेवांचा आनंद लुटत आहेत . तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या दरम्यान हा आकडा 6.1 कोटी सबस्क्रायबर्सपर्यंत पोहचला होता. हॉटस्टारच्या तुलनेत जिओ सिमेनाचे डाऊनलोड्स फक्त 10 कोटी असून , त्यांच्या मासिक वापरकर्त्यांची संख्या 22.5 कोटी आहे. म्हणजे हॉटस्टारपेक्षा जिओ सिनेमाचे वापरकर्ते कमी आहे , म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज हा निर्णय घेतला आहे.

जिओ सिनेमाचे हॉटस्टारमध्ये विलीन

डिज्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन्हीमधील प्लॅटफॉर्मचा पहिला मंच क्रीडासाठी तर दुसरा मनोरंजनासाठी असेल असा त्यांचा विचार होता , पण तो विचार बदलण्यात आला . आता जिओ सिनेमा हे हॉटस्टारमध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे लोकांना आता नव्या सेवांचा अनुभव घेता येणार आहे . या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या प्लॅटफॉर्मकडे एकूण 100 चॅनेल्स आणि 2 स्ट्रिमिंग सर्व्हिसेस असणार आहेत.

भाजपनंतर तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची नावे घोषित ; कुणाची लागली वर्णी ?

tisari aghadi

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर आता राज्यातील तिसरी आघाडी म्हणजेच ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ कडून ६ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

यामध्ये अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला चार जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर छत्रपती संभाजी राजे यांच्या ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून’ एरोली मतदारसंघातून अंकुश सखाराम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

स्वाभिमानीची नावे अद्याप जाहीर नाहीत

तर दोन जागांवर स्वाभिमानी पक्षांना उमेदवार जाहीर केला आहे. शिरोळ आणि मिरज या २ जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या असून त्यावर कोण उमेदवार असणार हे मात्र राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या तिसऱ्या आघाडीमध्ये आता मिरज आणि शिरोळ या दोन मतदारसंघांमध्ये कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

बच्चू कडू- अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष
अनिल चौधरी- रावेर प्रहार जनशक्ती पक्ष
गणेश निंबाळकर- चांदवड प्रहार जनशक्ती पक्ष
सुभाष साबणे- बिलोली प्रहार जनशक्ती पक्ष
अंकुश कदम- एरोली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
माधव देवसरकर -हदगाव हिमायतनगर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
गोविंदराव भवर- हिंगोली महाराष्ट्र राज्य समिती
वामनराव चटक- राजुरा स्वतंत्र भारत पक्ष

Hero A2B इलेक्ट्रिक सायकल लॉन्च ! 73km ची रेंज,स्वस्त किंमत ; जाणून घ्या फीचर्स

hero a2b electric cycle

मित्रांनो, जर तुम्ही जबळपास कुठेतरी ये-जा करण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी चांगले वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या लेखात आम्ही तुमच्या सर्वांसाठी एक उत्तम इलेक्ट्रिक सायकल घेऊन आलो आहोत. ही सायकल हिरो ब्रँडची आहे. या सायकलचे नाव Hero A2B इलेक्ट्रिक सायकल असे आहे. सायकलची किंमत देखील खूपच कमी दिसेल.

Hero A2B ची वैशिष्ट्ये

जर आपण Hero A2B इलेक्ट्रिक सायकल वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर ही इलेक्ट्रिक सायकल खूप चांगल्या वैशिष्ट्यांसह येते. मोबाइल चार्जिंगसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह, Hero A2B इलेक्ट्रिक सायकल सायकल समोर आणि मागील दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेकसह दिसेल. आणि ही सायकल MTV टायरसह येते जी ट्यूबलेस टायर आहे. या सायकलच्या पुढच्या बाजूला एक डिस्क ब्रेक चा ऑप्शन मिळतो. ज्यामुळे तुमच्या सायकलचा परफॉर्मन्स वाढतोय. याशिवाय सायकलमध्ये 4.2 इंचाचा एलईडी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

२ व्हेरियंट मध्ये उपलब्ध

ही सायकल तुम्हाला दोन वेगवेगळ्या वेरियंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये पहिला व्हेरियंट 2.5 किलोमीटरच्या बॅटरी सोबत येतो ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 50 किलोमीटरची रेंज मिळते. आणि यातील बॅटरी चार्ज होण्यासाठी जवळपास दोन तास दहा मिनिटे लागतात. तर यातला दुसरा व्हेरियंटमध्ये 3.2 kg ची बॅटरी आहे ज्यामध्ये चार्जिंग होण्यासाठी तुम्हाला तीन तासाचा वेळ लागतो एका सिंगल चार्जिंग मध्ये ही सायकल 73 किलोमीटर रेंज देते. आता सायकलच्या किमती बद्दल बोलायचं झाल्यास या सायकलची किंमत 38 हजार रुपयांच्या जवळपास आहे

Winter Travel | हिवाळ्यात ‘या’ ठिकाणांना द्या भेट; कमी बजेटमध्ये येईल फॉरेन ट्रिपचा अनुभव

Winter Travel

Winter Travel | ऑक्टोबर महिना संपत आलेला आहेन आणि हळूहळू थंडीची चाहूल लागत आहे. हिवाळा ऋतू आला की, सर्वत्र थंड वारे वाहायला लागतात. आणि वातावरण देखील अगदी प्रसन्न होऊन जाते. हिवाळ्यामध्ये (Winter Travel) देखील आपल्या भारतात फिरण्यासारखी अनेक ठिकाण आहेत. जिथे तुम्ही जाऊन अगदी मनमोकळेपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पर्यटकांसाठी हिवाळा ही एक मोठी भेट असते. कारण या महिन्यांमध्ये देशामध्ये अशी अनेक ठिकाण आहेत. जिथे लोक मोठ्या संख्येने भेट देतात. आणि निसर्गाचा आनंद घेतात. अगदी फॉरेन ट्रीप करण्यापेक्षा लोक भारतातील काही ठिकाणांना भेट देणे जास्त प्रसंत करतात. आता आपण जाणून घेऊया की, या हिवाळ्यामध्ये अशी कोणती ठिकाणी आहे? जिथे जाऊन तुम्हाला नक्कीच मनमोकळे वाटेल आणि तुम्ही एका चांगल्या पिकनिकचे नियोजन करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब तसेच जोडीदारासोबत देखील जाऊ शकता..

कुर्ग भारताचे स्कॉटलंड | Winter Travel

कुर्ग या शहराला भारतातील काश्मीर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी नोव्हेंबर हा महिना अत्यंत योग्य असा महिना आहे. हे ठिकाण कर्नाटकात आहे. त्याला भारताचे स्कॉटलंड असतील असे देखील म्हटले जाते. हे एक सुंदर असे हिल स्टेशन आहेत. या ठिकाणी संपूर्ण हिरवाई तसेच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद आपल्याला घेता येतो. हे अत्यंत शांत असे ठिकाण आहे. तसेच ज्या लोकांना ट्रेकिंग आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण तर अत्यंत चांगले आहे. त्यामुळे तुम्ही या हिवाळ्यात कुर्गला नक्कीच भेट देऊ शकता.

जैसलमेर

राजस्थान हे ठिकाण सहलीसाठी अत्यंत लोकप्रिय असे ठिकाण आहे या ठिकाणाला अनेक लोक भेट देत असतात. उन्हाळ्यामध्ये राजस्थानला लोक जात नाही. परंतु नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि हिवाळा चालू झाला की जैसलमेरला भेट देण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. येथील वातावरण देखील अत्यंत उत्साही असते. तसेच स्थानिक बाजारपेठा, किल्ले, राजगडे या सगळ्या गोष्टी आपल्याला जायचं पाहता येतात. तसेच नोव्हेंबरमध्ये येथील वाळू थंड असते. त्यामुळे वाळवंटात देखील फिरता येते.

उज्जैन | Winter Travel

उज्जैन हे मध्यम प्रदेशमधील अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी जाण्यासाठी लोक नेहमीच हिवाळ्याची वाट पाहत असतात. कारण हिवाळ्यामधील येथील वातावरण देखील खूप चांगले असते. इथे महाकालेश्वर मंदिर देखील आहे. तसेच हिवाळ्यामध्ये येथे तलाव देखील पाहण्यासारखे असतात. त्यामुळे हिवाळ्यात उज्जैनला खूप जास्त गर्दी असते.

मनाली | Winter Travel

तुम्हाला जर डोंगराळ भागांमध्ये जायचे असेल आणि बर्फाळ ठिकाणचा अनुभव घ्यायचा असेल, तर मनाली हे तुमच्यासाठी अत्यंत चांगले असेल ठिकाण आहे. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी जास्त बर्फ वृष्टी नसते. त्यामुळे तुम्ही सर्वत्र सहज फिरू शकता. मनालीला जाण्यासाठी नोव्हेंबर महिना हा अत्यंत योग्य असा महिना आहे. इथे जंगलांनी वेढलेली अनेक ठिकाण आहेत. त्याचे सौंदर्य हिवाळ्यामध्येच वाढते. तुम्ही अगदी बजेट कमी असताना देखील मनालीला भेट देऊ शकता. आणि तुमची हिवाळ्यातील ट्रीप अत्यंत चांगली करू शकता.