Saturday, December 27, 2025
Home Blog Page 414

लाडकी बहीण योजनेला हात लावाल तर… करेक्ट कार्यक्रम ! एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

ladaki bahin yojana

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. आज महायुती सरकार कडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना वोरोधकांवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवरून विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते याच टीकेला उत्तर लाडकी बहीण योजनेला हात लावाल तर करेक्ट कार्यक्रम होईल असं शिंदेंनी भर पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं..

… तर करेक्ट कार्यक्रम होईल

यावेळी बोलताना ते म्हणाले, विरोधक म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर पोलखोल करणार,महायुतीने आणलेल्या सर्व योजना बंद करणार,अशी टीका विरोधक करतात. पण या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. हे खुलेआम बोलायला लागले त्यांच्यात जेलसी निर्माण झाले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या अशा बोलण्याने लोक त्यांच्या विरोधात जातील आणि लाडकी बहीण योजनेला जर कोणी टच करायला गेलं तर त्याचा कार्यक्रम झाला समजा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार… आमच्या लाडक्या बहिणी हे ऐकून घेणार नाहीत. असा हल्लाबोल पत्रकार परिषदेच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला.

पुढे बोलताना ते म्हणाले आम्ही त्यांना सांगितले केंद्र सरकार आणि आम्ही मिळून आमच्या बहिणींना लखपती बनवणार आहोत त्यासाठी आम्ही काम करतो आहे असेही यावेळी शिंदे म्हणाले.

महायुतीकडून रिपोर्टकार्ड प्रकाशित

या पत्रकार परिषदेत महायुती सरकार कडून महायुती सरकारचे रिपोर्टकार्ड प्रकाशित करण्यात आले. २०२२ ते २०२४ या दोन वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामांचा आढावा या रोपोर्टकार्डमध्ये देण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना दोन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी , महिला , युवक ,वृद्ध अशा सर्व घटकांसाठी महायुतीने काम केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या ‘या’ मार्गावर धावणार फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन, पहा वेळापत्रक

indian rail

वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या गावी जात असतात. या काळात बस आणि रेल्वेला मोठी गर्दी असते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात रेल्वेला प्राधान्य दिले जाते. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे खात्याकडून घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने अहमदाबाद ते ग्वाल्हेर दरम्यान विशेष भाड्यावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे असेल वेळापत्रक ?

ट्रेन क्रमांक ०९४११/०९४१२ अहमदाबाद – ग्वाल्हेर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

गाडी क्रमांक ०९४११ अहमदाबाद – ग्वाल्हेर स्पेशल अहमदाबादहून १९, २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर (शनिवार) रोजी 20.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता ग्वाल्हेरला पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक ०९४१२ ग्वाल्हेर-अहमदाबाद स्पेशल ग्वाल्हेरहून २०, २७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर (रविवार) रोजी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.05 वाजता सुटेल

या स्थानकांवर थांबे

अहमदाबाद-ग्वाल्हेर विशेष ट्रेन आनंद, छायापुरी, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन, माकसी, गुना आणि शिवपुरी स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील.

कसे कराल बुकिंग ?

ट्रेन क्रमांक 09411 चे बुकिंग 16 ऑक्टोबरपासून प्रवासी आरक्षण केंद्र आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. ट्रेनच्या कामकाजाच्या वेळा, थांबे आणि संरचनेबाबत तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in वर भेट देऊन माहिती मिळवू शकतात.

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचं जागावाटप ठरलं?? कोणत्या पक्षाला किती जागा?

mahayuti jagavatap

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे. आज महायुतीकडून पत्रकार परिषद घेऊन ‘रिपोर्ट कार्ड’ सुद्धा प्रकाशित करण्यात आले. आता उत्सुकता आहे ती जागावाटपाची. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे मुख्य पक्ष एकत्रित येऊन तयार झालेल्या महायुतीमध्ये कोणाला किती जाग मिळणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 90 टक्के जागांचे वितरण निश्चित झाले असल्याची चर्चा आहे. 288 जागांपैकी भाजप 158 जागांवर, शिवसेना शिंदे गट 70 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गट 50 जागांवर लढणार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत तिन्ही पक्षांमध्ये 278 जागांवर एकमत झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

दरम्यान, याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुती आघाडीत करार झाला आहे. जागांवर अंतिम निर्णय झाल्यानंतर याबाबतची संपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांना देऊ.

याआधी भाजपने जवळपास 100 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीत जागांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मंगळवारी सीईसीची बैठकही झाली, ज्यामध्ये पीएम मोदीही सहभागी झाले होते. अशा परिस्थितीत भाजप झारखंड आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करू शकते.

लोकसभेच्या आधारे जागा वाटप

महायुतीतील जागावाटप लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजप 158 जागांवर, शिवसेना 70 जागांवर आणि राष्ट्रवादी 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 15 जागांवर निवडणूक लढवली आणि त्यापैकी 7 तर राष्ट्रवादीने 4 जागांवर निवडणूक लढवली मात्र केवळ एक जागा जिंकण्यात यश आले. तर भाजपने 28 जागांवर निवडणूक लढवली आणि केवळ 9 जागांवर विजय मिळवला.

MPSC कडून विविध विभागांतील 2021 पदांसाठी भरती ; कधीपर्यंत करता येणार अर्ज ? जाणून घ्या

mpsc

MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी आत एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज दाखल करू शकतात. ही भरती विविध विभागातील 2021 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे.

कोणत्या पदांवर होणार भरती

MPSC च्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक या पदांची भरती होणार आहे. गट-क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा 2024 च्‍या माध्यमातून उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलिफ व लिपिक, नगरपाल (मुंबई कार्यालय), तसेच लिपिक टंकलेखक अशा पाच पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच सहायक नगर रचनाकार, श्रेणी एक, गट ब या परीक्षेतून सहायक नगररचना कार, नगर रचनाकार आणि गट अ या संवर्गातील परीक्षेच्या माध्यमातून नगर रचनाकार पदासाठी भरती केली जाणार आहे.

कशी असेल पदसंख्या

गट क संवर्ग – 1333 पदे
गट ब (अराजपत्रित) – 480 पदे
सहायक नगर रचनाकार, गट ब – 148 पदे
नगर रचनाकार, गट अ – 60 पदे

प्रवाशांचा वेळ वाचणार ! पुणे रेल्वे स्थानकासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

pune railway station

देशभरात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी कामे देखील आता त्यामुळे घर बसल्या करता येणे शक्य होणार आहे. अशातच मध्य रेल्वेने सुद्धा डिजिटलायझेशन च्या दिशेने पाऊल टाकत तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकांनवर QR कोड प्रणाली बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत देशातील बऱ्याच रेल्वे स्थानकांमध्ये QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. आता पुणे स्थानकासाठी देखील QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. मध्य रेल्वेचा हा उपक्रम प्रवाशांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर तिकीट अनुभव देईल यात शंका नाही.

पुणे स्थनाकावर देखील या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. पुणे स्थानकावरील विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचा उद्देश QR पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देणे हा आहे. हेमंत कुमार बेहरा, विभागीय कमर्शियल मॅनेजर यांच्या देखरेखीखाली असलेल्या या मोहिमेमध्ये प्रमुख ठिकाणी बॅनर आणि पोस्टर्सचे प्रदर्शन, तसेच प्रवाशांना डिजिटल व्यवहारांच्या फायद्यांविषयी शिक्षित करण्यासाठी आकर्षक पथनाट्याचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

मध्य रेल्वेचा पुणे विभाग अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या काउंटरवर तिकीट खरेदीसाठी QR कोड पेमेंट प्रणाली वापरण्यास प्रोत्साहित करते. या नवीन वैशिष्ट्यासह, भारतीय रेल्वेचे लक्ष्य गर्दी कमी करणे आणि प्रवाशांच्या एकूण सोयी वाढवण्याचे आहे.

QR कोड प्रणालीचे फायदे

  • प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
  • यामुळे कॅशलेस व्यवहार होणार असून सुट्या पैशांची कटकट मिटणार आहे.
  • यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.
  • डिजिटल देवाण -घेवाणीमुळे व्यवहार स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहेत.

विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्रात 7 दिवस ड्राय डे !

dry day

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच कोणत्या दिवशी ‘ड्राय डे’ असेल हे देखील स्पष्ट झालं आहे.

निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध माध्यमातून मतदारांना लालूच दिले जाते. जेवणावळी, पैसे , दारू वाटून मतदारांना आमिष दिले जाते. याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून निवडणुकीच्या महत्वाच्या दिवसांमध्ये दारू विक्रीला बंदी केली जाते. राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांना लालूच देण्यासाठी दारूचा वापर करू नये यासाठी निवडणूक आयोगानं मतदानाच्या 48 तास आधी म्हणजे दोन दिवस आधी ड्राय डे घोषित केला जातो तसा नियमच बनवण्यात आला आहे आणि यामानुसार मतदारांना अमिष म्हणून दारू सेवन आणि वितरण रोखण्यासाठी संपूर्ण राज्यांमध्ये दारूची दुकान बंद ठेवली जातात.

महाराष्ट्रात कोणत्या दिवशी ड्राय डे?

महाराष्ट्रात कोणत्या दिवशी ड्राय डे असणार आहे याची माहिती आता समोर आली आहे. 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त तर 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती निमित्त ड्राय डे असणार आहे. तर 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंड होतील तेव्हापासून ते 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेपर्यंत राज्यातील दारूचे दुकान बंद राहणार आहेत. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल असल्यामुळे त्यादिवशी देखील ड्राय डे असणार आहे.

निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड प्रकाशित’

mahyuti sarkar

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे. आज महायुती सरकार कडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेत महायुती सरकार कडून महायुती सरकारचे रिपोर्टकार्ड प्रकाशित करण्यात आले. २०२२ ते २०२४ या दोन वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामांचा आढावा या रोपोर्टकार्डमध्ये देण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना दोन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी , महिला , युवक ,वृद्ध अशा सर्व घटकांसाठी महायुतीने काम केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली.

२ लाख बहिणींना मानधन

पत्रकार परिषदेत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, विरोधकांकडून निवडणूक जाहीर होण्यापुर्वी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात येतात अशी टीका झाली. मात्र अजित पवारानी या टीकेला उत्तर दिले. नेहमीच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कॅबिनेट मध्ये मोठे निर्णय घेतले जातात. असे अजित पवारानी सांगितले. शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही अनेकांनी टीका केली , ही योजना सुरु होणारच नाही, पैसे मिळणारच नाहीत अशी टीका होत होती. मात्र राज्यातील जवळपास २ लाख भगिनींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळले अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिजिटल युगातील नवा ट्रेंड ! आता आधार कार्डनेही पैसे काढता येणार

money withdrawal by adhar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एकविसावे शतक सुरू असून डिजिटल पेमेंटने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे .अगदी छोटा कारणापासून ते मोठ्या कारणापर्यंत डिजिटल माध्यमांचा वापर होत असताना दिसतो. पण काही ठिकाणी तुम्हाला कॅशने व्यवहार करणे बंधनकारक असते , अशावेळी तुम्ही एटीएम कार्डचा वापर करून कॅश काढता. पण तुम्हाला माहित आहे का आता आधार कार्डच्या साह्याने देखील पैसे काढले जाऊन शकतात.

AEPS म्हणजे काय

आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AEPS) ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची एक सेवा असून, ज्यामध्ये आधार क्रमांक आणि बायोमॅट्रिक डेटा वापरून बँकिंग सेवा दिली जाते. यामध्ये कॅश विड्रॉल, बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट, फंड ट्रान्सफर आणि मायक्रो एटीएमद्वारे सेवा उपलब्ध आहेत.

कसे कढता येणार पैसे ?

जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, तर खालील पद्धत वापरून तुम्ही आधारच्या मदतीने पैसे काढू शकता.

  • प्रथम तुम्ही AEPS सेवा देणाऱ्या बँकिंग एजंटकडे किंवा मायक्रो एटीएमवर जावा .
  • ही सुविधा ग्रामीण भागात, बँक शाखांमध्ये, तसेच मोबाइल बँकिंग सेवांमध्ये मिळू शकते.
  • नंतर मायक्रो एटीएमवर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाका.
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर फिंगर प्रिंट असा ऑप्शन येईल तिथे फिंगरप्रिंट देऊन बायोमेट्रिक करून घ्या.
  • ही प्रक्रिया केल्यानंतर स्क्रीन वरती अनेक ऑप्शन दिसतील ,त्यातील कॅश विड्रॉवल ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम तेथे टाका.
  • ही रक्कम तुम्हाला काही क्षणातच मिळेल.
  • त्यानंतर लगेच तुम्ही लिंक केलेल्या बँक खात्यातून पैसे डेबिट झालेले आहेत असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल.

BSNL ग्राहकांसाठी मोठी बातमी ! जून 2025 पर्यंत सुरू करणार 5G सेवा

BSNL 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 वर्ष उजडायला अजून दोन महिने आणि काही दिवसच शिल्लक आहेत. त्यातच बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आणली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसएनएल हे मे 2025 पर्यंत एक लाख बेस स्टेशनच्या माध्यमातून देशभरात 4G सेवा लागू करेल आणि ते जून 2025 पर्यंत 5G नेटवर्कवर जाईल. हि बातमी ग्राहकांसाठी आनंदाची असल्याचे दिसून येते.

2025 पर्यंत एक लाख साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट

भारताने 4G तंत्रज्ञानात इतर देशांच्या मागे राहून सुरुवात केली, मात्र आता भारत 5G तंत्रज्ञानात इतर देशांसोबत चालत आहे. त्याचबरोबर 6G तंत्रज्ञानामध्ये भारत जागतिक नेतृत्व करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की बीएसएनएल कोणत्याही परकीय उपकरणाचा वापर न करता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करेल . त्याचसोबत भारताकडे एक प्रमुख रेडिओ ऍक्सेस नेटवर्क आहे . ते पुढच्या वर्षी एप्रिल-मेपर्यंत 4G नेटवर्क सुरू करणार असून , जे जून 2025 पर्यंत 5G वर जाईल आणि असे करणारा भारत हा जगातील सहावा देश असेल . आता यांच्या एकूण 38300 साइट्स सुरू असून , त्यांचे 2025 पर्यंत एक लाख साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे .

सी-डॉट आणि TCS चे सहाय्य

बीएसएनएलने 6 ऑगस्ट रोजी जाहीर केले होते कि, ते ओवर-द-एयर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म सादर करणार आहे. ते 4G तंत्रज्ञानासाठी सी-डॉट आणि TCS यांच्या सहकार्याने विकसित केलेली स्वदेशी तंत्रज्ञान वापरत करत आहेत . त्यांचे 2025 पर्यंत, BSNL चा 25% ग्राहकवर्ग जोडण्याचा उद्देश आहे.

80% जनतेसाठी 5G सेवा उपलब्ध

देशभरातील 80% जनतेसाठी 5G सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, बीएसएनएलच्या सध्याच्या साइट्समद्ये काही बदल झाले असून , सॉफ्टवेअर अपग्रेड होऊन ते 5G सेवांसाठी तयार केले जाईल. ग्राहकांना आता त्यांच्या मोबाइल क्रमांकावर आधारित सिम कार्ड निवडता येणार असून, कोणत्याही भौगोलिक बंधनाशिवाय सिम बदलता येईल.

5G सेवा जून 2025 उपलब्ध

BSNL ची 5G सेवा जून 2025 पर्यंत सर्वत्र उपलब्ध होईल. ही मोठी बातमी बीएसएनएलच्या ग्राहकांना जलद इंटरनेट आणि प्रगत सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.

काय सांगता ! BEST च्या ताफ्यातून 262 बसेस रद्द ? प्रवाशांचे होणार हाल

BEST Mumbai

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ज्या प्रमाणे लोकल सेवेचे खूप मोठे योगदान आहे अगदी त्याच प्रमाणे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बेस्टचं देखील मोठ योगदान आहे. दररोज हजारो प्रवासी बेस्ट न प्रवास करत असतात. मात्र आता बेस्ट बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बेस्ट ला वेटलीज सर्विस देणाऱ्या एका कंपनीने एकाच वेळी एक दोन नाही तर तब्बल 262 बसेस सेवेतून मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील बेस्ट बस ची एकूण संख्या आता 3195 वरून 2933 वर पोहोचली आहे. त्यामुळे सहाजिकच याचा परिणाम बेस्टच्या प्रवाशांवर होणार आहे. मुंबईत प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे बेस्टचा प्रवासाला सुद्धा मुंबईकरांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र अचानक 262 बस सेवेतून मागे घेतल्यामुळे सहाजिकच सध्या उपलब्ध असलेल्या बसेसना गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ भागातील बस कमी

मुंबईमधल्या पश्चिम उपनगर म्हणजेच अंधेरी गोरेगाव जोगेश्वरी या भागातून धावणाऱ्या मिनी बस कमी झाल्यामुळे येथील प्रवाशांचा त्रास वाढणार आहे. सध्या परिस्थिती पाहता यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट कडून इथं सर्वसामान्यांसाठी सिंगल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम बेस्टच्या मुख्य प्रवास मार्गावर पडला असून जिथे उपलब्ध असणाऱ्या बसची संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झेलावा लागतोय.

याबाबत एका माध्यमाला माहिती देताना बेस्टचे महाप्रबंधक अनिल दिघीकर यांनी सांगितले की, कंत्राटदार अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यामुळे बस सेवा सुरू ठेवण्यात अडचणी येत आहेत या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून प्रवाशांची गैरसोय होणार नाही हा मुख्य हेतू असे माहिती दिग्गीकर यांनी दिली आहे.

बेस्टच्या ताब्यातील मिनी बस हटवण्यात आल्यामुळे जवळपास बाराशे चालक आणि बशीत देखभाल करणारे कर्मचारी बेरोजगारात झाले आहेत या कर्मचाऱ्यांच्या वतीने बेस्टच्या महाप्रबंधकांकडे एक अर्ज करण्यात आला असून त्यांच्यामध्ये श्रमिकांच्या नोकऱ्यांना सुरक्षितता देत कंत्राटदारांना सेवा पूर्ववत न केल्यास या कर्मचाऱ्यांना बेस्ट मध्ये समावेश करून घ्यावे अशी मागणी ही करण्यात आली आहे.