Saturday, December 27, 2025
Home Blog Page 415

दिवाळीपूर्वी Reliance Jio चा धमाका !!! 1100 रुपयांपेक्षा कमी किमतीत 2 नवीन फोन लॉन्च

JioBharat V3 and V4

Reliance Jio ने इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 (IMC 2024) मध्ये दोन नवीन 4G फीचर फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फीचर फोन V3 आणि V4 4G फीचर फोन Jio भारत सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन मॉडेल्स 1099 रुपये किमतीत बाजारात दाखल होतील. गेल्या वर्षी कंपनीने Jio Bharat V2 मॉडेल लाँच केले होते. या फोनने लॉन्च झाल्यानंतर लगेचच भारतीय फीचर फोन बाजारात खळबळ उडवून दिली होती. कंपनीचा दावा आहे की लाखो 2G ग्राहक JioBharat फीचर फोनद्वारे 4G नेटवर्ककडे वळले आहेत.

1000 mAh बॅटरी आणि 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज

नवीन नेक्स्ट जनरेशन 4G फीचर फोन नवीनतम डिझाईन, 1000 mAh पॉवरफुल बॅटरी, 128 GB पर्यंत वाढवता येण्याजोगा स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फीचर फोन 23 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. Jio Bharat फोन फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज केला जाऊ शकतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटाची सुविधा मिळेल.

या सुविधाही उपलब्ध असतील

Jio भारत सीरीज अंतर्गत सादर केलेले V3 आणि V4 दोन्ही मॉडेल Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारख्या काही सर्वोत्तम प्री-लोड ॲप्ससह बाजारात येतील. 455 हून अधिक लाइव्ह टीव्हीसोबतच या फोनमध्ये एका क्लिकवर ग्राहकांना चित्रपट, व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही मिळेल.
दुसरीकडे, JioPay सुलभ पेमेंट ऑफर करते आणि JioChat अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअरिंग आणि ग्रुप चॅट पर्याय ऑफर करते.

कुठून खरेदी करता येणार ?

JioPay ला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडले गेले आहे, त्यात एक साउंड बॉक्स देखील आहे. हे डिजिटल पेमेंट सहज करण्यास मदत करते. Jio Bharat V3 आणि V4 लवकरच सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वर उपलब्ध होतील.

Kojagiri Pornima 2024: कोजागिरीसाठी घराच्या घरीच बनवा दीर्घकाळ टिकणारा दूध मसाला

kojagiri pornima

Kojagiri Purnima 2024: यंदाच्या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा उद्या दिनांक 16 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हमखास मसाला दूध बनवून पिण्याची परंपरा आहे. मात्र बऱ्याच गृहिणी मसाला दूध बनवण्यासाठी बाहेरून मसाला विकत आणतात पण तसे करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घराच्या घरी दुधाचा मसाला बनवू शकता. दीर्घकाळ टिकणारा दूध मसाला कसा बनवायचा ? (Kojagiri Purnima 2024) चला जाणून घेऊया…

मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Kojagiri Pornima 2024)

बदाम – 1/2 कप
काजू – 1/2 कप
पिस्ता – 1/4 कप
हिरवी वेलची – 25
काळी मिरी पावडर – 1/2
टीस्पून सुंठ पावडर – 1 टीस्पून
जायफळ – 1/4 (किसलेले)
केशर – 1/2 ग्राम (किंवा आवडीनुसार)
हळद पावडर – 1 टीस्पून

कृती (Kojagiri Pornima 2024)

  • दूध मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम काजू, पिस्ता आणि बदाम मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. त्यानंतर ते पुर्णपणे थंड होऊ द्या.
  • केशर 10 सेकंद भाजून घ्या आणि बाजूला ठेवा, त्याच पॅनमध्ये मिरपूडदेखील 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. सुंठ देखील असेच भाजून घ्यायचे आहे. सर्व सामान पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • त्यानंतर जायफळ आणि वेलची मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड पावडर करून घ्या. आता भाजलेला सुकामेवा गार झाला असल्यास तो मिक्सरमध्ये घालून त्याचीही जाड पावडर करून घ्या.
  • सुकामेव्याची पावडर आणि आधी तयार केलेली पावडर एका भांड्यात एकत्र करा. त्याता केशर, घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करा म्हणजे दूध मसाला तयार होईल.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (Kojagiri Pornima 2024)

  • ड्रायफ्रुट्स आणि मसाले बारीक करताना ते गरम नसावेत.
  • ड्रायफ्रुट्स मसाला वाटताना पल्स मोशनमध्ये मिक्सर चालवा. म्हणजे दुधात वरून ड्रायफ्रूट घालण्याची गरज नाही.
  • तयार मसाला हवाबंद डब्यात ठेवा.
  • पावडर रेफ्रिजरेटरमध्ये बराच काळ ठेवता येते.

NMPML Bharti 2024 | महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत मोठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड

NMPML Bharti 2024

NMPML Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशी ती संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. ती म्हणजे आता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड नाशिक यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक प्रशासक आणि तांत्रिय, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारां साठी एक मुलाखत आयोजित केलेली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NMPML Bharti 2024

या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाअधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला नाशिक या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया

तुमची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख | NMPML Bharti 2024

25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक – 1 जागा
उपमहाव्यवस्थापक – 2 जागा
सहाय्यक लेखाधिकारी – 1 जागा

वेतन श्रेणी

महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक – 75 हजार रुपये
उपमहाव्यवस्थापक – 60 हजार रुपये
सहाय्यक लेखाधिकारी – गव्हर्मेंटच्या जीआर नुसार

भरती प्रक्रिया

ही भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.
25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
या तारखेला मुलाखतीसाठी हजर रहावे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

BMC Engineer Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता ती इच्छा पूर्ण लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई महानगरपालिके (BMC Engineer Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिक, दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 690 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | BMC Engineer Bharti 2024

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)

पदसंख्या

या भरती अंतर्गत 690 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | BMC Engineer Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा

रिक्त पदसंख्या

कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 250 जागा
कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल – 130 जागा
दुय्यम अभियंता स्थापत्य – 233 जागा
दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत – 77 जागा

वेतनश्रेणी | BMC Engineer Bharti 2024

कनिष्ठ अभियंता स्थापत्य – 41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये
कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल – 41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये
दुय्यम अभियंता स्थापत्य – 49 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये
दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत – 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये

अर्ज कसा करावा ?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, निकाल 23 तारखेला; निवडणूक आयोगाची घोषणा

Assembly

मागच्या दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा राज्यामध्ये सुरु होती. मात्र आज अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुकांसाठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी 22 तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल आणि अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर ही तारीख निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली आहे. तर 30 ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार असून विधानसभा निवडणुकांचे निकाल हे 23 तारखेला जाहीर केले जाणार आहेत.

राज्यात 288 जागांकरिता होणार निवडणूक होणार असून २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार असल्याचे राजीव कुमार यांनी जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ९. ६३ करोड मतदार मतदान करतील. तर राज्यात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असल्याचे कुमार यांनी जाहीर केले.

किती टप्प्यात होणार निवडणूक ?

कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सध्याचा विचार करता महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी महायुती आघाडीकडे 218 जागा आहेत. भाजप (106), शिवसेना (40), राष्ट्रवादी (40), बीव्हीए (3), पीजेपी (2), मनसे (1), आरएसपी (1), पीडब्ल्यूपी (1), जेएसएस (1) आणि अपक्ष (12) .

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. या निवडणुकीत भाजप 105 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील एकसंध शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि 44 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते.

यावेळचे चित्र वेगळे

मात्र यावेळचे चित्र वेगळे असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर आता एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांचे मिळून महायुती सरकार आणि दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे.

चित्रा वाघ यांच्यासह राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी घेतली शपथ

MLA

सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असून कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. बारा पैकी सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. आज दुपारी बारा वाजता विधिमंडळात उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला. सात आमदारांमध्ये कोणाची नाव आहेत चला जाणून घेऊयात…

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांची नावे पाठवण्यात आली होती. त्यानंतर या सात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये भाजपला तीन, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आले आहेत.

भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थांचे बाबुसिंग महाराज राठोड यांना भाजपन संमती दिली आहे. शिवसेनेकडून माझी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकजा भुजबळ आणि इंद्रिष नायकवडी यांना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे पुढीलप्रमाणे

  • इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)
  • चित्रा वाघ (भाजप)
  • विक्रांत पाटील (भाजप)
  • मनीषा कायंदे (शिंदे गट)
  • बाबूसिंग महाराज राठोड (भाजप)
  • हेमंत पाटील (शिंदे गट)
  • पंकज भुजबळ (अजित पवार गट)

भारतातील पहिली हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक बाइक लाँच, सिंगल चार्जमध्ये 200KM पर्यंत रेंज

Raptee HV T30 Launched

चेन्नईस्थित राप्ती इलेक्ट्रिक स्टार्टअपने त्यांच्या पहिल्या उत्पादनाचे अनावरण केले आहे. या ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक बाइक HV T30 शोकेस आहे. कंपनीने T30 आणि T30 Sport नावाच्या दोन नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या दोन्हीची किंमत 2.39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बाईकसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे आणि इच्छुकांनी 1,000 रुपयांच्या टोकनसह ही बाईक बुक करू शकतात. राप्तीने सांगितले की, ग्राहकांना जानेवारी 2025 पासून चेन्नई आणि बेंगळुरू येथून ई-बाईकची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

बाईकमध्ये कारसारखी वैशिष्ट्ये

राप्ती एचव्हीचे डिझाइन प्रतिस्पर्धी स्ट्रीट फायटर मोटरसायकलसारखेच आहे. ही इलेक्ट्रिक बाइक ओव्हल आकाराचे हेडलॅम्प, शार्प फ्रंट मडगार्ड आणि स्प्लिट सीट सेटअपसह दिसायला अतिशय मजबूत आहे. इंजिनाऐवजी, येथे पूर्ण फेअरिंग दिसते जे बाइकच्या मागील भागापर्यंत पसरते. बाईक 7-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येते जी नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, OTA अपडेट्स आणि इतर माहिती प्रदान करते. ही बाईक आर्क्टिक व्हाईट, एक्लिप्स ब्लॅक, मर्क्युरी ग्रे आणि होरायझन रेड या चार रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. भारतातील पहिली हाय व्होल्टेज बाइक म्हणून तिचे वर्णन करण्यात आले आहे.

एका चार्जवर किती चालेल ?

आरामदायी राईडसाठी, इलेक्ट्रिक बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस अनुक्रमे USD आणि मोनोशॉक सस्पेंशन दिलेले आहे. समोर 320 mm डिस्क आणि मागील बाजूस 230 mm डिस्क व्यतिरिक्त ड्युअल पिस्टन फ्रंट कॅलिपर्स आणि रियर सिंगल पॅनल कॅलिपर देण्यात आले आहेत. हे 5.4 kWh-R बॅटरी पॅकसह येते जे पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमी पर्यंतची रेंज देते. टॉप स्पीड १३५ किमी/तास असल्याचा दावा केला जातो, तर तो ३.५ सेकंदात ०-६० किमी/ताशी वेग वाढवतो. यात 22 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 70 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

सोलापूर-तुळजापूर मार्ग 17 तारखेपर्यंत राहणार बंद ; पर्यायी मार्ग कोणते ?

देशभरात उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार आहे. महाराष्ट्रात देखील कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरी निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत येतात. मात्र सोलापूर -तुळजापूर या महामार्गावरील वाहतुकीमुळे पायी जाणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाकडून १४ तारखेपासून पुढील ४ दिवस सोलापूर ते तुळजापूर मार्गावर वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग सुद्धा दिले आहेत.

कोणते आहेत पर्यायी मार्ग ?

सोलापूर तुळजापूर मार्ग सोमवार रात्रीपासून चार दिवस बंद राहणार असल्यामुळे सोलापूर ते तुळजापूर या मार्गाने जाणारी वाहतूक सोलापूर ते तांदुळवाडी खानापुर ते तुळजापूर अशी वळविण्यात आली आहे. याची वाहधारकांनी दखल घ्यावी असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; या औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ

Medicine Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकताच दसरा झालेला आहे आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. या सणासुदीच्या काळामध्ये सामान्य नागरिकांच्या आर्थिक बजेट बिघडते. आणि अशातच असतात प्राधिकरणाने आज औषधांच्या 11 फॉर्म्युलाशनच्या किमतीमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. सध्या औषधांच्या निर्मिती खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे त्यांनी औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. औषध उत्पादकांकडून यात सुधारणा करण्याची मागणी केलेली आहे. तरी अजून एपीआयने ती मान्यता दिलेली नाही. एपीआयने असे सांगितले आहे की, हे पाऊल उचलण्याचा उद्देश म्हणजे लोकांना औषधे सतत उपलब्ध करून देणे हा आहे.

नुकतेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्रधिकरणासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर या औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याआधी 2019 आणि 2021 मध्ये औषधांच्या फॉर्म्युलाशनच्या किमती वाढवण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा 20 24 मध्ये या औषधांच्या फॉर्म्युलाशनच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या औषधांमध्ये दमा, टीबी, थॅलेसेमिया आणि मानसिक आरोग्याच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. यामध्ये साल्बुटामोल गोळ्या 2 MG आणि 4 MG तसेच रेस्पिरेटर सोल्युशन 5 MG यांचा समावेश असणार आहे. तसेच यांसारख्या अनेक औषधांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने या आवश्यक औषधांची यादी देखील तयार केलेली आहे. यामध्ये कॅन्सर विरोधी औषध, सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत होणारी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांच्यासह अनेक औषधांचा समावेश आहे. यामध्ये इतर औषधांच्या किमतींचे मूल्यांकन केले जाते. औषधांची कमाल किंमत निश्चित करण्यात आलेली असून, आता कोणतीही कंपनी या किमती वाढवू शकत नाही. अशी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु या औषधांच्या किमती वाढल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आजारपण देखील परवडणार नाही. कारण त्यांना औषधासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

इंदूरच्या सुनबाईंनी केला देशाचा गौरव; निकिता कुशवाह ठरल्या मिसेस युनिव्हर्स रनर-अप; पहा फोटो

Mrs universe runner up

इंदूरची सून निकिता कुशवाह यांनी मिसेस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकावून देशाचा गौरव केला आहे. निकिता व्यवसायाने कार्डियाक आणि रेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट आहेत. दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे झालेल्या 47व्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत निकिता यांनी उत्तर आशियाचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 100 हून अधिक देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला.

राम मंदिर थीम वरील पोशाख

निकिताने तिच्या राष्ट्रीय पोशाख फेरीत अयोध्येच्या राम मंदिर थीमवर आधारित ड्रेस परिधान करून सर्वांना प्रभावित केले.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निकिताने तिचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांचे आभार मानले आणि सांगितले की, तिचा विजय त्या सर्व महिलांचा आहे ज्यांनी स्वप्न पाहण्याची हिंमत केली आहे. या यशामुळे महिलांना त्यांची आवड जोपासण्याची प्रेरणा मिळेल, असे त्या म्हणाल्या.




या स्पर्धेत बेलारूसच्या नतालिया डोरोश्को हिला मिसेस युनिव्हर्सचा किताब मिळाला, पण निकिताचे प्रथम उपविजेतेपदही विशेष ठरले. निकिताची कामगिरी जागतिक स्तरावर भारतीय महिलांची प्रचंड प्रतिभा दर्शवते आणि तिच्या समाजसेवेच्या कार्याने न्यायाधीश आणि प्रेक्षकांना प्रभावित केले.