Saturday, December 27, 2025
Home Blog Page 416

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘सहमतीने ठेवलेले अनैतिक संबंध बलात्कार नाही’

High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रमध्ये बलात्काराच्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याबाबत अनेक गुन्हे देखील न्यायालयात दाखल झालेले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने दीर्घकाळापासून जर परस्पर सहमतीने आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय नैतिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरत नाही. असे वक्तव्य केलेले आहे. त्यानंतर आता भारतीय दंड संहितेतील कलम 375 नुसार याचा निकाल देखील देण्यात आलेला आहे.

यावेळी न्यायमूर्ती अनिश कुमार गुप्ता यांनी असे म्हटले की, “लग्नाचे वचन हे परस्पर संमतीने शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे वचन ठरत नाही. अशा नातेसंबंधांच्या सुरुवातीपासूनच आरोपींनी जर फसवे आश्वासन दिले असेल, तर ते खोटे वचन म्हणता येते. नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या फसवंतीच्या काही घटक असेल, तर लग्नाचे खोटे आमिष म्हटले जाते. परंतु लग्नाचे खोटे वचन म्हणता येणार नाही.’

पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणांमध्ये श्रेय गुप्ता नावाच्या व्यक्तीवर लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. न्यायमूर्तींनी हा खटला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तिने श्रेयने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध ठेवले. अशी तक्रार दाखल केली आहे. तसेच तिने श्रेय यांच्यावर खंडणी मागितल्याची तक्रार देखील पोलिसात केली होती. या विरोधात श्रेयने देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे या दोघांमध्ये 12 वर्षांपासून संबंध होते. या संबंधित महिलेचे वय जास्त आहे. तसेच श्रेय त्या महिलेच्या मृत झालेल्या पतीच्या कंपनीत कामाला होता. त्यामुळे महिलेने श्रेय याच्यावर दबाव टाकला असे देखील दिसून आलेले आहे. कलम 375 लागू होण्यासाठी महिलेने महिलेची संमती ही दबावाने, धमकावून किंवा गैरसमज निर्माण करून घेतलेली असावी असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळेच आता खूप काळापासून जर सहमतीचे अनैतिक संबंध असल्यास तो बलात्कार ठरत नाही. असे देखील उच्च न्यायालयाने घोषित केलेले आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana | आपले राज्य सरकार समाजातील विविध नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. त्याचा फायदा अनेकांना होत असतो. सरकारने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana ) असे आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप दिवसांपूर्वी सुरू झालेली होती. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत वाढ केलेली आहे. समाज कल्याण विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

सरकारच्या या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत. वाढत्या वयासोबत अनेक शारीरिक व्याधी देखील निर्माण होतात . आणि त्यासाठी जेष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहता येऊ नये. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा यांसारखे अत्यावश्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

या योजनेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना निधीचे वितरण त्यांच्या वैयक्तिक आधार कार्ड संलग्न असणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दिले जातील. ही रक्कम एक रकमी 3000 रुपये दिली जाणार आहे. अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहेत. परंतु समाजात आणखी असे अनेक लोक आहेत. ज्यांना अजूनही या योजनेची माहिती नाही. त्यामुळे त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता यावा तसेच या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सरकारने मुदत वाढ केलेली आहे.

मध्य रेल्वेचा लय भारी निर्णय ! मुंबई -पुणे प्रवाशांसह पर्यटकांना होणार फायदाच फायदा

mumbai pune railway

मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असला तरी यातून चांगला प्रतिसाद रेल्वेला मिळाला तर हा निर्णय पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. आता जास्त उत्सुकता न तणावता हा कोणता निर्णय ते पाहूयात.

लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये थांबा

मध्य रेल्वेने प्रवाशांचा विचार करता काही महत्त्वाच्या गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये दोन मिनिटांचा थांबा मंजूर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑक्टोबर पासून करण्यात आली असून थंड हवेचे ठिकाण असणारा लोणावळा इथे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना या ट्रेनच्या थांब्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरातून पर्यटक वीकेंडला लोणावळ्याला हजेरी आवर्जून लावत असतात. त्यांना आता थेट लोणावळा स्टेशनवर उतरता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून येथील पर्यटन व्यवसायाला सुद्धा चालना मिळणार आहे. लोणावळ्याला जात असताना अनेकदा रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे तासंतास वाहतुकीमध्ये प्रवाशांना अडकून राहावे लागते मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासी थेट मुंबई आणि पुण्याहून लोणावळ्याला जाऊ शकतात.

कोणत्या रेल्वे गाडयांना थांबे ?

  • 12163 लोकमान्य टिळट टर्मिनस- एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळ टर्मिनस एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी लोणावळ्यामध्ये रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी पोहचेल आणि 8 वाजून 58 मिनिटांनी पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
  • 12164 – एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळ टर्मिनस – या एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर लोणावळ्यात 10 तारखेपासून थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी लोणावळ्यात दाखल होईल आणि 12 वाजून 42 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल.
  • 11139 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हौसपेठ – या ट्रेनला 10 ऑक्टोबरपासून लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. हा थांबा रात्री 11 वाजून 51 मिनिटं ते 11 वाजून 53 मिनिटांदरम्यान असणार आहे.
  • 11140 – हौसपेठ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अप मार्गावरील या ट्रेनला लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा दिला जाणार आहे. हा थांबा ही ट्रेन रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी लोणावळा स्थानकात दाखल होईल आणि ती 2 वाजून 7 मिनिटांनी पुढे प्रस्थान करेल.

सुविधेचा लाभ घ्या

दिवाळी सणानिमित्ताने अनेकजण कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असतात. तुमही देखील लोणावळा फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर रेल्वेमार्गे तुम्ही थेट लोणावळा गाठू शकता. अधिक माहितीसाठी प्रवासी https://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच एनटीईएस या अॅप्लिकेशनवरही ही माहिती उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.

Bussiness Idea | केवळ 50 हजारात सुरु करा हा व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल अनेक लोक नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला जास्त प्राधान्य देतात. परंतु व्यवसाय सुरू करताना नक्की कोणता व्यवसाय सुरू करावा? बाजारात कोणत्या व्यवसायाला मागणी आहे. आणि त्यासाठी किती भांडवल लागेल? या सगळ्याचा विचार करणे देखील गरजेचे असते. परंतु अनेक लोकांना कोणता व्यवसाय (Bussiness Idea) करावा हाच प्रश्न पडतो. जर तुम्हाला देखील कोणता व्यवसाय करायचा हा प्रश्न पडला असेल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

कारण आज आम्ही तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करण्याची एक नवीन बिजनेस आयडिया सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला जास्त भांडवल देखील गुंतवावे लागणार नाही. तुमच्याकडे केवळ पन्नास हजार रुपये असेल, तर त्याची गुंतवणूक करून देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये देखील कमवू शकता. आज आपण कॉटन बर्ड्स बनवण्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. या व्यवसायाला बाजारात खूप जास्त मागणी देखील आहे.

तुम्ही हा कॉटन बसचा व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करण्यासाठी सुरुवातीला छोट्या यंत्राचा वापर करू शकता. हे यंत्र खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ पन्नास हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतील. किंवा तुम्ही या व्यवसायासाठी कर्ज देखील मिळू शकता हे कॉटन बर्ड्स बनवण्यासाठी प्लास्टिक किंवा लाकडाच्या स्टिक वापरल्या जातात. ज्यात बाजारात अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील. कॉटन बर्ड्स करताना. त्या स्टिकच्या दोन्ही टोकांना कापूस लावला जातो.

कॉटन बड्स बनवण्यासाठी स्टिक ही लाकडाची वापरली जाते. यामुळे ही स्टिक इको फ्रेंडली बनते. ही काडी 5 सेंटीमीटर ते 7 सेंटीमीटर असावी लागते. ही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध मिळेल. तसेच कापूस देखील बाजारात तुम्हाला विकत मिळेल. हा कापूस दोन्ही बाजूंना चिटकवण्यासाठी काठीच्या दोन्ही टोकांना चिकट पदार्थ वापरावा लागेल. जेणेकरून कापूस घट्ट चिटकून राहील तसेच कॉटन वर्ड्स रेडी झाले त्यावर सेल्युलोज पॉलिमर युज करावे लागते.

Ration Card | रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी; इथून पुढे मिळणार नाही ही गोष्ट

Ration Card

Ration Card | केंद्र सरकार हे देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असतात. या योजनेचा लाभ देशातील अनेक लोकांना होत असतो. देशातील प्रत्येक गटाचा विचार करता, विविध योजना राबवल्या जातात. आपल्या समाजातील गरिबी दूर व्हावी आणि लोकांना दोन वेळेचे चांगले अन्न खाता यावे. यासाठी देखील सरकार खूप प्रयत्न करत असतात. आणि या लोकांसाठी सरकार कमी दरात राशन देखील पुरवत असतात. परंतु हे राशन घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे खूप गरजेचे आहे. रेशन कार्ड असेल तरच सरकारच्या या कमी किमतीच्या राशन योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार. परंतु आता या रेशन कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहे आणि आता या रेशन कार्डमध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळणार नाही.

याआधी शासन राशन कार्डवर (Ration Card) अनेक गोष्टी देत होते. परंतु आता इथून पुढे या रेशन कार्डवर मोफत तांदूळ देणे बंद करणार आहे. शिधापत्रिका द्वारे राशन वितरण केंद्रावर मोफत तांदूळ दिला जाणार नाही. सरकारने ही त्यांची एक सुविधा बंद केलेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याद्वारे नागरिकांच्या अन्नातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तांदूळ देणे बंद होणार आहे. आणि त्याऐवजी आता इतर गोष्टीत गोष्टी दिल्या जाणार आहेत. तांदळा ऐवजी सरकार आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि इतर मसाले देखील देणार आहेत.

त्याचप्रमाणे तुम्ही जर रेशन कार्ड (Ration Card) धारक असेल आणि तुम्ही जर कमी किमतीत या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.अन्यथा तुम्हाला इथून पुढे सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन दुकानात जाऊन ही केवायसी करणे खूप गरजेचे आहे. ज्या लोकांनी एक केवायसी केले नाही. त्यांचे नाव या रेशन कार्डमधून टाकणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. तसेच 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही ईकेवायसी करू शकता. अशी देखील माहिती सरकारकडून दिलेली आहे.

गुलाबी थंडीची चाहूल ! नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे कोणती ?

tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑक्टोबर महिन्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते. त्यामध्ये प्रत्येकाची फिरण्याची इच्छा होत असते . नोव्हेंबर म्हटलं कि दिवाळीचा हंगाम , त्यामुळे मुलांना तसेच अनेक कामगारांना सुट्ट्या दिल्या जातात. म्हणून वीकेंडमध्ये मित्र-परिवारासोबत बाहेर जाण्याची ही योग्य वेळ ठरू शकते . पण कुठे फिरायला जायचे हे समजत नाही . त्यामुळे खूप गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसतो . तर आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातल्या थंड वातावरणात भारतातील काही अशी ठिकाणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ते दिवस कधीच विसरू शकणार नाही . तर चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात कुठे फिरायला जाणे योग्य ठरेल .

रन ऑफ कच्छ

कच्छ गुजरात राज्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. रन ऑफ कच्छ या विशाल खाऱ्या रणभूमीमुळे त्याला अनोखी अशी ओळख मिळालेली आहे . हे लोकसंस्कृती आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे पारंपारिक कच्छी वस्त्रे, कापड तसेच चांदीच्या दागिन्यांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात येथे अनेक सण साजरे केले जातात . त्यामुळे अनेक पर्यटक कच्छी संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतात. तसेच इथे धोलावीरा एक प्राचीन हडप्पा संस्कृतीचं स्थळ असून ते UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर हिवाळ्यातील सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली कच्छ रणची पांढरी वाळू पाहण्याचा सुंदर अनुभव मिळेल. या ठिकाणी शाही विजय विलास पॅलेस पाहण्यास मिळेल .

गोवा , शिलॉंग

मित्रांसोबत फिरायला गोवा हे नेहमीच एक लोकप्रिय ठिकाण राहिले आहे. नोव्हेंबरमध्ये गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आयोजित होतो, ज्यात जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपट दाखवले जातात. या हंगामात चित्रपटप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. संगीत आणि कला महोत्सवाचा उत्तम अनुभव हवा असेल तर तुम्ही शिलॉंगला भेट देऊ शकता .मेघालयमधील शिलाँगमध्ये हलक्या थंडीत तीन दिवसीय चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल साजरा केला जातो, ज्यात संगीत, कला आणि संस्कृतीचा आनंद घेता येतो. यावर्षी हा उत्सव 17 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान आयोजित केला जाणार आहे.

शांतिनिकेतन , सुवर्णमंदिर

युनेस्कोने नुकतेच शांतिनिकेतनला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे नैसर्गिक सौंदर्य, संग्रहालयं आणि अनोखी बाजारपेठा यांचा अनुभव तुम्हाला घेता येईल . म्हणून कोलकाताजवळील शांतिनिकेतन हे नोव्हेंबरमध्ये भेट देण्यास उत्तम ठिकाण ठरू शकते . जर तुम्हाला सुवर्णमंदिराची रोषणाई आणि शहरातील उत्सवाचे वातावरण याचा अनुभव घ्याचा असेल तर अमृतसरला नक्की भेट द्या . गुरुपर्वाच्या निमित्ताने सुंदरपणे सजलेले असते. याशिवाय पंजाबच्या स्वादिष्ट पदार्थांचाही आस्वाद घेता येईल.

Government Employee | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जाणार आनंदात; सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस

Government Employee

Government Employee | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. आणि या दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने अनेक कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलेले आहे. अशाच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रात सरकारने कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2023-24 या आर्थिक वर्षासाठी हा 30 दिवसांचा नॉन प्रॉडक्टिव्हिटीचा लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. याआधी 10 ऑक्टोबर रोजी देखील अर्थ मंत्रालयाच्या विभागाने त्यांच्या आधी सूचनेत ही माहिती दिलेली होती. याला नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस किंवा ऍड हॉक बोनस असे देखील म्हणतात.

कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार | Government Employee

मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना केलेली आहे. त्यानुसार 2023-24 आर्थिक वर्षासाठी जे उमेदवार पात्र आहेत. त्यांना त्यांच्या पगारा एवढा 30 दिवसांचा बोनस देणार आहे. यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांमध्ये गट ब आणि राजपत्रित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच बोनस मोजणीसाठी कमाल मासिक वेतन हे 7 हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. हा बोनस केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांना देखील देण्यात येणार आहे.

31 मार्च 2024 पर्यंत जे लोक सेवेत आहेत. तसेच त्यांनी या 2023-24 या वर्षांमध्ये सलग सहा महिने सेवा दिलेली आहे. अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा कमी काळ सेवा दिलेली आहे. त्यांना त्यांच्या पगाराच्या आधारे हा बोनस मिळणार आहे

तसेच ज्या मजुरांनी सलग 3 वर्ष किमान 240 दिवस कॅज्युअल मजूर म्हणून काम केलेले आहे. ते देखील या बोनससाठी पात्र असणार आहेत. या कामगारांना दर महिन्याला 1200 रुपये आधारे बोनस दिला जाणार आहे. सणासुदीच्या काळात खर्च वाढतो त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारावी आणि त्यांना चांगला सण साजरा करता यावा. यास उद्देशाने हा बोनस दिला जाणार आहे.

Elon Muskने मेगा स्टारशिप रॉकेट केले लाँच , सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट म्हणून ओळख

Elon Musk
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा एलन मस्क यांनी 13 ऑक्टोबर रोजी आपले मेगा स्टारशिप रॉकेट लाँच केलं . हे रॉकेट टेक्सासच्या दक्षिणने वरून सूर्योदयाच्या वेळी मेक्सिकोच्या सीमेपासून उडवण्यात आले. हे रॉकेट आतापर्यंतचे सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट मानले जात आहे. ते 400 फूट (121 मीटर) उंच असून त्याचा वेग 27000 किमी प्रति तास आहे .

रॉकेटला री-यूजेबिलिटी उपलब्ध

स्पेसएक्सने केलेली चाचणी खूपच धाडसी आणि अत्यंत यशस्वी मनाली जाते. कारण रॉकेटने कोणत्याही विस्फोटाशिवाय आपली पूर्ण उड्डाण प्रक्रिया पूर्ण केली. हे स्टारशिप रॉकेटचे महत्वाचे परीक्षण होते. याआधी जून 2024 मध्ये झालेल्या चाचणीत सुद्धा चांगले यश मिळाले होते . यामुळे भविष्यातील अंतराळ प्रवासासाठी मोठी प्रगती ठरेल ,असे म्हटले जात आहे. स्टारशिपच्या अनेक विशेषतांपैकी एक म्हणजे त्याची री-यूजेबिलिटी , म्हणजेच रॉकेट फेल झाल्यानंतरही त्याचा पुन्हा वापर करता येऊ शकतो . हे रॉकेट 150 टन वजन घेऊन जाऊ शकते आणि त्याची वेगमर्यादा सुमारे 27000 किमी प्रति तास आहे, ज्यामुळे ते अंतराळ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नासाकडून स्टारशिप रॉकेट्सची ऑर्डर

मार्च 2024 मध्ये झालेल्या एका परीक्षणामध्ये, रॉकेट रीएंट्रीच्या वेळी त्याच्याशी संपर्क तुटला होता आणि रॉकेट यशस्वीरीत्या परत येऊ शकले नव्हते. त्यावेळी स्पेसएक्सने तांत्रिक समस्यांमुळे हे घडल्याचे सांगितले होते. तसेच दुसऱ्या परीक्षणात स्टेज सेपरेशनच्या अडचणींमुळेही ते यशस्वी होऊ शकले नव्हते. पण आता स्टारशिप रॉकेट 33 मीथेन-फ्यूल इंजिन्ससह सुसज्ज असून , त्यामुळे हे जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट बनले आहे. एलन मस्क यांचे या रॉकेटसाठी मोठे योगदान आहे. याचा वापर लोकांना चंद्र आणि मंगळावर पाठवण्यासाठी करू शकतात . नासा ने या दशकाच्या अखेरीस चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्यासाठी स्पेसएक्सकडून दोन स्टारशिप रॉकेट्सचे ऑर्डर दिले आहेत.

विमाधारकांसाठी नवीन आव्हान ; LIC ने एनरोलमेंट प्लॅनमध्ये केले बदल

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसीने ( भारतीय जीवन विमा निगम ) त्यांच्या नवीन एनरोलमेंट प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. 1 ऑक्टोबर 2024 रोजी लोकांना पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी वय 55 वर्षांवरून 50 वर्षे केले आहे . या निर्णयामुळे 50 वर्षांवरच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्याची संधी कमी झाली असून , विमा काढणाऱ्या लोकांसाठी नवीन आव्हान आहे. त्याचसोबत कंपनीच्या 6 नोंदणी योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

जोखीम कमी करण्यासाठी निर्णय

50 वर्षांच्या वयानंतर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणून कंपनीने जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एलआयसीने प्रीमियम दरांमध्ये सुमारे 10 % वाढ केली आहे . त्यामुळे पॉलिसीधारकांना अधिक आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. सरेंडर व्हॅल्यूच्या बदलामुळे पॉलिसीधारकांना योजनेतून बाहेर पडल्यावर मिळणाऱ्या रकमेत कमी होऊ शकते . त्याचा परिमाण वृद्ध लोकांवर होऊ शकतो . कारण या निर्णयाचा परिमाण थेट विमा संरक्षणावर होईल.

एनरोलमेंट प्लॅन-914 संरक्षण कवच

एलआयसीच्या नवीन एनरोलमेंट प्लॅन-914 मध्ये संरक्षण कवच आणि बचतीची योजना आहे. याचा फायदा पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या वेळी कुटुंबाला भक्कम राहण्यास मदत करते . मुदत पूर्ण झाल्यावर त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. नवीन जीवन आनंद आणि जीवन लक्ष्य योजनांमध्ये विम्याची रक्कम 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये केली आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या नोंदणीच्या योजनांमध्ये 6 ते 7 टक्के वाढ केली आहे . तसेच कंपनीच्या 6 योजनांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सिंगल प्रीमियम योजना , नवीन जीवन आनंद, जीवन लक्ष्य, जीवन लाभ, आणि अमृतबाल यांचा समावेश असून , हे नवीन नियम सुमारे 32 विमा उत्पादनांना लागू होणार आहेत.

Maharashtra Assembly Election | आज दुपारपासूनच आचार संहिता लागू; निवडणुकीच्या तारखाही होणार जाहीर

Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी चाललेली दिसत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) आचारसंहिता कधी लागू होणार आहे. याबाबतची उत्सुकता सगळ्याच नागरिकांमध्ये आहे. परंतु केंद्र निवडणुकीची निवडणूक आयोगाचा हा निर्णय असणार आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते बाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे.

ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आज मंगळवारी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दुपारी साडेतीन वाजता एक पत्रकार परिषद देखील बोलवली आहे. आणि त्यानंतरच राज्यात आचारसंहिता लागणार आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखा देखील जाहीर केल्या जाणार आहे. यासोबत झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा देखील आज जाहीर होणार आहेत.

यावर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये पुन्हा एकदा सरकार कोण चालवेल. याबाबतची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजल्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. आणि आता कोणत्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.