Saturday, December 27, 2025
Home Blog Page 418

84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह Jio ने लाँच केले 2 रिचार्ज प्लॅन

Jio Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात घेऊन आली आहे . हे प्लॅन यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहेत, या प्लॅनची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जिओचे हे रिचार्ज प्लॅन वोडाफोन आयडिया तसेच एअरटेलला मोठी टक्कर देऊ शकतात, तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर कंपनीने लाँच केलेल्या या नव्या रिचार्ज प्लॅनचे सर्व डिटेल्स आज आपण जाणून घेउयात.

84 दिवसांच्या प्रीपेड प्लॅन –

जिओने आपल्या ग्राहकांसाठी 84 दिवसांच्या कालावधीचा प्रीपेड प्लॅन घेऊन आले आहे. हा प्लॅन 1028 आणि 1029 रु चा असणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB डेटाचा समावेश असणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा आणि अनलिमिटेड 5G ऑफर मिळणार आहे .तसेच अमेझॉन प्राईम मेंबरशिप मिळतेय.

1028 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

जिओने 1028 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यामुळे युजर्सला एकूण 168GB डेटा मिळणार असून , खास गोष्ट म्हणजे यात 5G डेटा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना या सेवा सोयीस्कर ठरतील.

1029 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

याशिवाय 1029 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB डेली डेटा आहे. या प्लानचा कालावधी 84 दिवसांची असून , यात एकूण 168GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड 5G डेटा आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप उपलब्ध आहे. याचबरोबर , जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचा सुद्धा वापर करता येतो. जिओ युजर्ससाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो .

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | ‘या’ लाडक्या बहिणींना दिवाळीआधी मिळणार बोनस; खात्यात येणार 5500 रुपये

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून सरकारमार्फत राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. याचा फायदा राज्यातील अनेक नागरिकांना होत आहे. या आगामी निवडणुकीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारकडून महिलांसाठी योजना राबवल्या जात आहेत. यातीलच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तसेच दिवाळीला ऍडव्हान्समध्ये दोन महिन्याचे 3 हजार रुपये मिळणार आहे. तसेच याशिवाय काही महिलांना अतिरिक्त 2500 हजार रुपये देखील दिले जाणार आहे. आता या दिवाळी बोनस बद्दल आपण जाणून घेऊया.

आपल्या राज्यामध्ये महिलांचे आरोग्य पोषण आणि आर्थिक स्वावलंबन वाढण्यासाठी तसेच आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सुरू केलेली आहे. या आधीच महिलांना तीन हप्ते मिळालेले आहेत. परंतु या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची देखील घोषणा सरकारने केलेली आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात दिवाळी आधीच जमा केलेले आहे. परंतु काही महिलांना 2500 हजार रुपयांचे अतिरिक्त रक्कम देखील दिली जाणार आहे. म्हणजेच दिवाळी आदी महिलांना 5500 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु आता कोणाला मिळणार आहे? त्याच्या अटी काय आहेत? हे आपण जाणून घेऊया.या अतिरिक्त बोनसचा फायदा घेण्यासाठी महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतलेला असला पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ? | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ केलेली आहे. आता शेवटची मुदतवाढ 15 ऑक्टोबरपर्यंत सरकारने शेवटची मुदतवाढ केलेली आहे. परंतु यावेळी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला या योजनेच्या अर्जाचा झेरॉक्स मारून घ्यायचे आहे. तसेच तो अर्ज भरून त्याला लागणारी आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. त्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्याजवळील ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र किंवा महिला आणि बालकल्याण विभागाच्या ठिकाणावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची पावती घेऊ शकता.

Assembly Elections 2024 : मोठी बातमी ! राज्यात विधानसभा निवडणूका कधी आणि किती टप्प्यात होणार ?

Assembly Elections 2024

Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं दिसतंय. राज्यात कोणत्याही वेळेला विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होऊ शकते अशी स्थिती आहे. अशातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राने झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या दोन्ही विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक (Assembly Elections 2024 ) केव्हाही जाहीर केले जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुका या आठवड्यात जाहीर होऊ शकतात.

राज्यात किती टप्प्यात मतदान? (Assembly Elections 2024 )

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

दरम्यान राज्यातील बडे नेते शरद पवार यांनी देखील महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसात निवडणुका जाहीर होतील असे म्हटले आहे. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्य सरकारने घेतलेल्या 80 निर्णयावर टीका करताना शरद पवार यांनी सांगितले की,” महाराष्ट्राचा (Assembly Elections 2024 ) लौकिक वेगळा होता. उत्तम प्रशासन म्हणून लोक महाराष्ट्राकडे पाहत होते. आज लोकांनी यांची टिंगल करावी अशी स्थिती राज्यकर्त्यांनी केली आहे. सरकारनं किती निर्णय घेतले आणि त्यामधील किती निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबरोबरच शनिवारी अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीचे संकेत देत देत इयत्ता दोन-तीन दिवसात आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर निवडणुका होतील असे म्हंटले होते.

PM kisan FPO Yojana | केंद्र सरकराचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार आर्थिक मदत

PM kisan FPO Yojana

PM kisan FPO Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. ते वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या योजनेचा लाभ देशातील कितीतरी करोडो लोक घेतात.

सरकारच्या या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM kisan FPO Yojana ) नागरिकांना दरवर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. शेतीतील कामांसाठी हे पैसे उपयोगाला येतात. परंतु आता सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. सरकारने आता पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखांची मदत केली जाणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या पीएम किसान एफपीओ (PM kisan FPO Yojana ) योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत 11 शेतकऱ्यांच्या गटाला सरकारमार्फत शेती संबंधित स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचे नाव पीएम किसान फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असे आहे.

या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत करतात. या आर्थिक मदतीतून शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु या योजनेअंतर्गत कोणत्याही एका शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ मिळणार नाही. अकरा शेतकऱ्यांच्या गटाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शकता तुम्ही. पीएम केसांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळेल.

Lawrence Bishnoi : 700 शूटर्स, 11 राज्यात आतंक, परदेशात जाण्याचे आमिष ; NIA कडून बिश्नोई गॅंग बाबत धक्कादायक खुलासे

Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi : माजी मंत्री बाबा सिद्धकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंग ने घेतली आहे. यानंतर या गॅंग बद्दल मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या (NIA) ने देखील लॉरेन्स बिश्नोई गॅंग (Lawrence Bishnoi) बाबत मोठे खुलासे केले आहेत. NIA ने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गॅंग जवळ आत्ता जवळपास 700 शूटर आहेत. एवढेच नव्हे तर बिश्नोई गॅंग सुद्धा दाऊद इब्राहिम च्या पावलावर पाऊल टाकत आहे. NIA ने कमीत कमी 16 गँगस्टररांच्याविरुद्ध (युएपीए) च्या अंतर्गत चार्ज शीट फाईल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लॉरेन्स बिश्नई आणि गोल्डी बरार यांच्या देखील नावाचा समावेश आहे. या चार्ज शीट मध्ये दावा केला आहे की लॉरेन्स बिश्नोई गॅंग हे दाऊद इब्राहिम ची कंपनी डी कंपनीच्या मार्गावर पाऊल ठेवत पुढे चालत आहे.

NIA च्या चार्जशीट नुसार लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्यांचा आतंक पसरवण्याचा अंदाज हा दाऊद इब्राहिमच्या प्रमाणेच असून नव्वदीच्या दशकामध्ये दाऊद इब्राहिमची गॅंग सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात फैलावत होती. ड्रग्जची तस्करी करत दाऊद इब्राहिम ९०च्या दशकामध्ये आपलं नेटवर्क वाढवायला सुरू केली होती. त्यानंतर या गॅंग ने खंडणीचं काम सुरू केलं. आणि नंतर या गॅंगला ‘डी कंपनी’चे नाव देण्यात आलं. एवढेच नाही तर ही गॅंग पाकिस्तानच्या आतंकवादाशी सुद्धा जोडली गेली. आणि याच पद्धतीने बिश्नोई गॅंगने सुद्धा छोटे-मोठे अपराध करायला सुरुवात केली आणि नंतर याचं रूपांतर मोठ्या गॅंग मध्ये झालं.

बिश्नोई गॅंग मध्ये 700 शूटर (Lawrence Bishnoi)

NIA ने दिलेल्या चार्जशिट मधील खुलासानुसार बिश्नोई गॅंग मध्ये सत्विंदर सिंह उर्फ गोल्डी बरार हा ही गॅंग चालवत आहे. जो सध्या कॅनडा पोलिसांच्या बरोबरच इंडियन एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे. याच्याशिवाय बिश्नोई गॅंग मध्ये 700 शूटर आहेत ज्यामध्ये 300 पंजाब मधील आहेत. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटोज फेसबुक, इंस्टाग्राम, youtube वर शेअर केले जातात. बिष्णोईला कोर्टात घेऊन जात असलेला फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करून युवकांना या गॅंग मध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे.

भारतभर बिश्नोई गॅंगचा आतंक (Lawrence Bishnoi)

2021-22 मध्ये याच गँग कडून खंडणीच्या रूपात करोडो पैसे गोळा केले गेले आणि विदेशात पाठवले गेले. चार्ज शीट मध्ये सांगितले गेले आहे की बिश्नोई गॅंग हरियाणा, दिल्ली, राजस्थान येथील गॅंग सोबत लागेबांधे करून असतात. आता मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा आतंक हा संपूर्ण भारतात पसरला असून यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली राजस्थान आणि झारखंड यांचा समावेश आहे.

युवकांना दिले जाते परदेशात पाठवण्याचे आमिष

असा आरोप आहे की, बिष्णोई गॅंग अनेक युवकांना परदेशात पाठवण्याचे आमिष देतात. कॅनडासारख्या देशात आम्ही तुम्हाला पाठवू असे आमिष इथल्या युवकांना दिले जातं आणि त्यांचा वापर गुन्हेगारीसाठी (Lawrence Bishnoi) केला जातो. NIA ने सांगितलं की खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह रिंडा पाकिस्तानात बिश्नोई गँगच्या शूटर चा वापर गुन्हे घडवण्यासाठी केला जातो.

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेत या नियमांचे करा पालन; अन्यथा सरकार परत घेईल अनुदानाचे पैसे

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana | आपले केंद्र सरकार नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. ज्याचा फायदा देशातील सगळ्या नागरिकांना होत असतो. सरकारने मागील वर्षी प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ही केंद्र सरकारची सर्वात क्रांतिकारी योजना लॉन्च केली. मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 लॉंच केली. सरकारच्या या योजनेअंतर्गत गरजू लोकांना घर बांधण्यासाठी काही आर्थिक मदत केली जाते. ही सरकारची एक क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे. त्यामुळे गृह कर्जाची परतफेड करण्याचा खर्च देखील कमी होतो. परंतु या सबसिडीचा जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यांच्या काही अटींची पूर्तता केली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून सबसिडी काढून घेतली जाते.

अनुदान कधी परत करता येते? | Pradhan Mantri Awas Yojana

प्रधानमंत्री आवास योजनेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असा सरकारचा आग्रह आहे. परंतु, काही लोक हेतुपुरस्सर किंवा सक्तीने काही चुका करतात, ज्यामुळे क्रेडिट लिंक्ड सबसिडी काढून घेतली जाते.कर्ज घेणारी व्यक्ती बँकेला कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकत नसल्यास आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच NPA बनते. याचा अर्थ आता कर्जाची रक्कम परत मिळणार नाही हे बँकेने मान्य केले आहे. या स्थितीत क्रेडिट लिंक्ड सबसिडी परत जाते.

जर कोणत्याही लाभार्थ्याला आधीच क्रेडिट सबसिडी मिळाली असेल. त्यांनी बांधकामही सुरू केले. पण, काही कारणास्तव तो बांधकाम थांबवतो. या प्रकरणात, लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेली अनुदानाची रक्कम परत करावी लागेल. लाभार्थ्याने घराच्या वापराचे प्रमाणपत्र सादर केले नाही तरी, सरकार अनुदानाची रक्कम काढू शकते. हे प्रमाणपत्र कर्जाचा पहिला हप्ता वितरित केल्यापासून एक वर्ष ते 36 महिन्यांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

या गोष्टीही लक्षात ठेवा

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) कुटुंबाला एकच अनुदान मिळते.
  • कुटुंबात पती-पत्नी आणि अविवाहित मुले असतात.
  • अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावावर कोणतेही कायमस्वरूपी घर असू नये.
  • त्याला इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेतून गृहनिर्माण सहाय्य मिळालेले नसावे.
  • सबसिडी संपल्यावर काय होते?
  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थीच्या कर्ज खात्यात व्याज अनुदान आगाऊ दिले जाते. याचा अर्थ गृहकर्जाच्या सुरुवातीला ते जमा केले जाते. यामुळे प्रभावी गृहकर्जाची रक्कम आणि EMI कमी होते. सबसिडी संपल्यानंतर, लाभार्थीला मूळ व्याजदरावर परत जावे लागते, ज्यामुळे ईएमआय वाढतो.

Bussiness Idea | सणासुदीच्या काळात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दिवसाला होईल बंपर कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | अनेक लोक नोकरी करता करता एखादा छोटासा व्यवसाय देखील करत असतात. जेणेकरून त्यांना पार्ट टाइममध्ये खूप चांगली कमाई करता येईल. अनेक लोक हे कमी खर्चात जास्तीत जास्त कमाई होणारा व्यवसाय शोधत असतात. परंतु त्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला व्यवसायाच्या काही कल्पना घेऊन आलेला आहोत. ज्यामुळे तुम्हाला एक चांगला व्यवसाय करत येणार आहे. आज आम्ही तुम्हाला मोबाईल ॲक्सेसरीच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला अगदी कमी गुंतवणूक करता येते, परंतु यातून तुम्हाला खूप चांगले उत्पन्न मिळते. आज-काल मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक जण मोबाईल वापरत असतो. बाजारात देखील या गोष्टींना खूप मागणी असते. हा व्यवसाय (Bussiness Idea) तिन्ही ऋतूंमध्ये चालतो. म्हणजेच तुम्ही वर्षभर चांगली बंपर कमाई करू शकता.

अनेक लोक हे चार्जर, फोन, ब्लूटूथ फॅन,लाईट विविध प्रकारच्या केबल, लाइटिंग स्पीकर, मोबाईल स्टॅन्ड, कार्ड ट्रेडर्स साऊंडवर स्पीकर यांसारख्या अनेक गोष्टी मोबाईलसाठी विकत घेत असतात. आणि बाजारात देखील या उत्पादनांना खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही हा मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करून खूप चांगली कमाई करू शकता.

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय कसा सुरू करायचा? | Bussiness Idea

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करताना, आजकाल कोणत्या ॲक्सेसरीजचा जास्त ट्रेंड आहे ते शोधा. त्यानंतरच वस्तू खरेदी करा. एकाच वेळी अनेक वस्तू खरेदी करू नका. वेगवेगळ्या श्रेणीतील वस्तू खरेदी केल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होईल. त्यांना अनेक श्रेणीतील वस्तू पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत काही ग्राहक उत्पादन खरेदी करतील अशी शक्यता वाढेल. तुम्हाला हवे असल्यास सार्वजनिक ठिकाणी छोटे स्टॉल लावून किंवा सार्वजनिक परिसरात फिरून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. हा असा व्यवसाय आहे जो अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करता येतो.

मोबाईल ॲक्सेसरीजमधून कमाई

मोबाईल ॲक्सेसरीजचा व्यवसाय हा खूप चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायात खर्चाच्या 2-3 पट नफा सहज मिळू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू 12 रुपयांना विकत घेतली असेल तर तुम्ही ती 50 रुपयांना सहज विकू शकता. ग्राहकही ते आनंदाने खरेदी करेल. याशिवाय या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हवे असल्यास सुरुवातीला 5,000 रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुमची कमाई जसजशी वाढेल तसतशी त्यात तुमची गुंतवणूक वाढवा.

महत्वाची बातमी ! मुंबईत प्रवेश करणाऱ्या ‘या’ 5 टोलनाक्यांवर टोलमाफी

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यामध्ये जोरदार वाहू लागले आहेत अशातच महायुती सरकार आता मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. ‘लाडकी बहीण योजना’ असेल किंवा विविध प्रकल्पांचा उद्घाटन असेल महायुती सरकार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसोशीन प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच एक मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर टोल माफीचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला आहे. चला जाणून घेऊया…

हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी

राज्यामध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू होऊ शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा झाली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोणत्या टोलनाक्यांचा समावेश?

मुंबईमध्ये प्रवेशाचे जे टोलनाके आहेत त्यामध्ये आनंदनगर टोलनाका, दहिसर टोल नाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोल नाका आणि एरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश करण्यात आला असून या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

आज महायुती सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या अधि कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना अजेंडा दिला गेला नाही त्यामुळे ऐन त्यावेळी अनेक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नाहीतर बोजा जनतेवर माराल ..

दरम्यान टोलनाक्याच्या यांच्या प्रश्नावर नेहमी आग्रही भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाच्या टोलमाफीच्या निर्णयाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरू होता. त्याला यश मिळाले आहे उशिरा का होईना सरकारला सद्बुद्धी मिळाली हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाही तर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Air Travel | दिवाळीत विमान प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या तिकिटाचे नवे दर

Air Travel

Air Travel | दिवाळीचा सण अगदी तोंडावर आलेला आहे. जे लोक घरापासून लांब राहतात ते दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या घरी जात असतात. जर तुम्ही परदेशी राहत असाल आणि तुम्हाला विमानाने तुमच्या घरी जायचे असेल, तर आता ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी विमानाच्या प्रवास (Air Travel)भाड्यामध्ये जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी घसरण झालेली आहे. त्यामुळे विमानाचा प्रवास हा आता आधीपेक्षा अत्यंत स्वस्त झालेला आहे.

विमान प्रवासात घसरण का झाली | Air Travel

हाती आलेल्या माहितीनुसार तेलाच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे. त्यामुळे विमानाचे भाडे देखील कमी करण्यात आलेले आहे. आता कोणत्या मार्गावर किती भाडे असणार आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत प्रवासासाठी विमान भाडे हे 20 ते 25 टक्क्यांनी कमी झालेले आहे. या किमती 30 दिवसांच्या आगाऊ खरेदी तारखेवर सरासरी एक मार्ग भाड्यासाठी आहेत 2023 चा कालावधी 10 ते 16 नोव्हेंबर आहे तर यावर्षी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा आहे. या विमान प्रवासाच्या भाड्यात 20 ते 25 टक्क्यांनी घसरण झाल्यामुळे आता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे.

कोणत्या मार्गावर किती भाडे झाले कमी? | Air Travel

यामध्ये बंगळुरू कलकत्ता फ्लाईटचे विमान भाडे हे 38 टक्क्यांनी कमी झालेले आहे. ते केवळ 6300 रुपये एवढे झालेले आहे. जे मागील वर्षी 10, 195 रुपये एवढे होते त्याचप्रमाणे चेन्नई कोलकत्ता या मार्गावरील तिकिटाचे दर हे 36 टक्क्यांनी कमी झाले होते. मागील वर्षी ही किंमत 8725 रुपये होती, तर यावर्षी केवळ 5604 रुपये एवढी आहे.

मुंबई ते दिल्ली फ्लाईटच्या विमान भाड्यामध्ये 34 टक्क्यांनी घसरून झालेली आहे. मागील वर्षी हे विमान भाडे 8788 रुपये एवढे होते. ते आता 5762 रुपये एवढे झालेले आहे. त्याचप्रमाणे दिल्ली उदयपूर मार्गावरील तिकिटांचे दर हे 11296 रुपये एवढे होते. ते आता 7469 रुपये झालेले आहे म्हणजेच. या दरामध्ये 34 टक्क्यांनी घसरन झालेली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली कोलकत्ता हैदराबाद दिल्ली आणि दिल्ली श्रीनगर या मार्गावरील विमान भाड्यात 32 टक्क्यांनी घसरण झालेली आहे.

यंदा शाळांना दिवाळीच्या फक्त 14 सुट्ट्या मिळणार; वर्षातील अजून किती सुट्ट्या शिल्लक?

School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सध्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सगळ्या शाळांमध्ये चालू आहे. ही परीक्षा जवळपास 27 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. आणि 28 ऑक्टोबर नंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. या सुट्ट्या त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत. पण 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा या 11 नोव्हेंबर पासून सुरू होईल. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीत फक्त 23 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनानुसार 27 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या सत्राची परीक्षा पूर्ण करण्याची आदेश दिले होते. त्यामुळे सध्या अनेक शाळांमध्ये परीक्षा देखील सुरू आहे. काही शाळांच्या परीक्षा या पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक सराव या सगळ्या परीक्षा 27 ऑक्टोबर पर्यंत संपणार असल्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदार होणार असल्याने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांना मतदानाचे महत्त्व देखील पटवून देण्यास सांगितलेले आहे.

दहावी आणि बोर्ड बारावीची बोर्डाची परीक्षा

दिवाळी संपली की दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला विद्यार्थी लागत असतात. या वर्षी बारावीच्या बोर्डाची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान चालणार आहे. तर 24 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होईल तसेच दहावीच्या बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तर 27 मार्च रोजी संपणार आहे तसेच तीन ते 20 फेब्रुवारी दरम्यान त्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे.

या वर्षातील उर्वरित सुट्ट्या

यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या 28 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर असणार आहेत. तसेच 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे. 25 डिसेंबर रोजी की ख्रिसमस आहे 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री, 14 मार्च धुलीवंदन, 19 मार्च जी रंगपंचमी, 30 मार्च रोजी गुढीपाडवा, 6 एप्रिल रोजी रामनवमी, 10 एप्रिल रोजी महावीर जयंती, 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 18 एप्रिल गुड फ्रायडे, 1 मे महाराष्ट्र दिन, 2 मे ते 14 जून उन्हाळ्याच्या सुट्ट्या एवढ्या सुट्ट्या इथून पुढे शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.