Saturday, December 27, 2025
Home Blog Page 420

Breast Cancer Awareness | जाणून घ्या स्तनांच्या कर्करोगाची कारणे; ही लक्षणे दिसता वेळीच सावध व्हा

Breast Cancer Awareness

Breast Cancer Awareness | आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अगदी लहान वयात देखील कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यातही स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. स्तनांचा पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशी वाढतात. आणि त्यानंतर स्तनांचा कर्करोग होत असतो. सध्या देशामध्ये स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग मोठ्या संख्येने पसरत आहे. यासाठी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. आतास्तनांचा कर्करोग नक्की कशामुळे होतो? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहे.

स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर सुरुवातीला काही हलकीशी लक्षणे दिसतात. किंवा अनेक वेळा ही लक्षणे दिसतही नाही. परंतु जर या रोगाचे वेळेवर निदान झाले, तर त्यावर चांगले उपचार घेता येऊ शकते. आणि तो बरा देखील होऊ शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीच्या डीएनए मध्ये बदल होतात. त्यावेळेस स्तनांचा कर्करोग होतो आणि अनेकदा आपल्याला याची कारणे माहिती नसतात. आता स्तनांचा कर्करोग कशामुळे होतो हे आपण जाणून घेणार आहोत.

वयाच्या 30 नंतर आई होणे | Breast Cancer Awareness

12 वर्षापूर्वी मासिक पाळी सुरू होणे, 30 वर्षांच्या वयानंतर तुमची पहिली गर्भधारणा होणे आणि स्तनपान न करणे यासारख्या घटकांमुळे तुमचा धोका वाढू शकतो.

जीवनशैली

जास्त वजन किंवा लठ्ठपणा, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या घटकांमुळे तुमचा धोका वाढू शकतो.

हार्मोन्स

पाच वर्षांहून अधिक काळ हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा काही गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने तुमचा धोका वाढू शकतो.

वय | Breast Cancer Awareness

स्तनाच्या कर्करोगाचा धोका वयाबरोबर वाढत जातो.

कौटुंबिक इतिहास

स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रथम-पदवी नातेवाईक असल्याने तुमचा धोका वाढतो.

मानसिक आघात

दीर्घकालीन प्रतिकूल भावनिक अनुभव स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलनावर परिणाम करू शकतात आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

Tulsi Water Benefits | तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराला होतात अनेक फायदे; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Tulsi Water Benefits

Tulsi Water Benefits | तुळशीचे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप धार्मिक महत्त्व आहे. या तुळशीची पूजा केली जाते. परंतु या तुळशीचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे होतात. तुळशी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे आपली पचन संस्था सुधारते, आपला ताणतराव कमी होतो. आणि त्वचा चमकदार दिसण्यासाठी देखील तुळस ही कारणीभूत ठरते. जर तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन केले, तर त्यातून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. तुम्ही जर तुळशीची पाने उकळून त्याचा चहा बनवला आणि किंवा रिकामी पोटी जरी तुळशीची पाने खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे पाणी (Tulsi Water Benefits) पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता आपण तुळशीची पाने खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कशाप्रकारे फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.

तुळशीचे पाणी तयार करण्याची पद्धत | Tulsi Water Benefits

सर्व प्रथम तुळशीची पाने नीट धुवून घ्या. आता एका भांड्यात २ कप पाणी घालून उकळा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात तुळशीची पाने टाका. आता 5-10 मिनिटे उकळू द्या, ते एका कपमध्ये घाला आणि प्या. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात मधही घालू शकता.

तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे | Tulsi Water Benefits

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळेल

तुळशीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो, जो संसर्गाशी लढण्यास मदत करतो. दररोज तुळशीचे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला आणि घसा सूज येण्यापासून आराम मिळतो आणि सर्दी-खोकला होण्याची शक्यताही कमी होते.

डिटॉक्स

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते आणि व्यक्ती निरोगी राहते.

हृदय आरोग्य | Tulsi Water Benefits

तुळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर पोषक तत्व चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्याचे पाणी रोज प्यायल्याने हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

पचनक्रिया निरोगी ठेवते

तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिकसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याचे रोज सेवन करणे पोटासाठी फायदेशीर आहे.

ताण कमी करते

तुळशीला ॲडाप्टोजेन मानले जाते, जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. याचे रोज सेवन केल्याने शरीर आणि मन शांत राहते.

त्वचेसाठी फायदेशीर

तुळशीमध्ये अँटीबैक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्यांपासून बचाव करण्यास मदत करतात. याच्या रोजच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते.

Baba Siddiqui | बाबा सिद्दीकी यांची हत्या का करण्यात आली ? मोठे कारण आले समोर

Baba Siddiqui

Baba Siddiqui | राजकीय वर्तुळातून काल एक अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातील बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन लोकांना अटक देखील केलेली आहे. तसेच तिसरा आरोपी व्यक्ती कोण आहे? याचा शोध देखील पोलिसांकडून चालू आहे. अशातच आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. आणि यांच्या हत्यामागचे नक्की कारण काय असावं? याची संभाव्य माहिती समोर आलेली आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? | Baba Siddiqui

हाती आलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए या प्रकल्पाच्या वादातून असावी. अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. परंतु अजूनही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अधिकृत कुठल्याही व्यक्तीने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. परंतु अंदाज वर्तवल्याप्रमाणे सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाचा संदर्भ असावा अशी माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे पाहिले तर बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी देखील संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि आता पोलिसांनी ज्या दोन लोकांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही लक्ष शक्यता लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहे.

बाबा सिद्दिकी यांची हत्या कशी झाली?

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांच्यावर एकूण तीन लोकांनी गोळीबार केलेला आहे. यातील दोन लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एकाचे नाव करणैल तर दुसऱ्याचे नाव धर्मराज कश्यप आहेत यातील पहिला आरोपी करणैल सिंग हा हरियाणाचा आहे. तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा आहे. तसेच तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तिन्ही आरोपी रिक्षाने आले होते. तिघेजण बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांची वाट पाहत एका ठिकाणी थांबले होते. परंतु या हत्या प्रकरणात तिघां व्यतिरिक्त आणखी एक आरोपी असावा, असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. आणि हा चौथा आरोपी त्यांना मार्गदर्शन करत होता. असा संशय पोलिसांना आलेला आहे. आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास देखील कळता करत आहेत.

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui ) यांच्यावर मुस्लिम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचे पार्थिव मरीन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाणार आणि त्याचे साडेआठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. तसेच त्यांचे पार्थिव हे त्यांच्या बांद्रा येथील राहत्या घरी अंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मुस्लिम धर्मानुसार शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर बडा कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी केला जाईल.

Weather Update | राज्यात परतीचा पाऊस लांबला; आज या जिल्ह्यांत कोसळणार सरी

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाने चांगलं धुमाकूळ घातलेला आहे. अशातच हवामान विभागाने नवीन माहिती दिलेली आहे. त्या माहितीनुसार हा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आज कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

आज विदर्भात तसेच कोकण गोव्यात मध्य महाराष्ट्र देखील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, कोकण या भागांमध्ये देखील आज पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच गोव्यातील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडणार आहे त्याचप्रमाणे विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील मेघगर्जनेसस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस हवामान ढगाळ असणार आहे.

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळातील सर्वात महागडे घर 69 लाखांना ; कुठे आहे ठिकाण ?

mhada konkan

Mhada Lottery 2024 : म्हाडा कडून कोकण मंडळासाठी तब्बल 12 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. दिनांक (11) रोजी दुपारी 12 वाजता 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत जाहीर झाली आहे. त्यापैकी ठाण्यातील एका घराची किंमत समोर आली असून कोकण मंडळातील हे सर्वात महागडे घर असून त्याची किंमत 69 लाख आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे घर ठाण्यातील बाळकूम येथील असून त्याची किंमत 68 लाख 97 हजार 160 आहे. हे घर माध्यम उत्पन्न गटासाठी आहे. क्षेत्रफळ 67.6 चौरस मीटर आहे. याकरिता 15 हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. बाकी सर्व 11000 सदनिका विक्री अभावी पडून असलेल्या गृह प्रकल्पांमधील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या सोडतील सदनिका या मुख्य रेल्वे स्थानकापासून (Mhada Lottery 2024) दूरच्या अंतरावर आहेत या 11,187 सदनिकांची विक्री प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.

कोणत्या शहरांचा समावेश (Mhada Lottery 2024)

कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे शहर व जिल्हाा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे.

सदनिकांचे वाटप (Mhada Lottery 2024)

  • कोकण मंडळाच्या या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 सदनिका
  • 15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गंत 512 सदानिका
  • 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गंत एकूण 661 सदनिका
  • मंडळाच्या विखुरलेल्या 131 सदनिकांचाही समावेश आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (Mhada Lottery 2024)

दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, प्रथम प्राधान्य योजनेंतर्गंत या घरांची विक्री करण्यात येणार आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृती आणि ताबा प्रक्रिया सुरू राहणार. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.

कुठे कराल अर्ज ? (Mhada Lottery 2024)

अर्जदारांना म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी https://lottery.mhada.gov.in आणि कोकण म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहेत.

House Rent Rule: भाडेकरूचा घर सोडण्यास नकार ? घरमालक कुठे मागू शकतात दाद ?

rent house

House Rent Rule: हल्लीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक मनाली जाते. म्हणूनच हल्ली घरे बांधून ती भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढलेला दिसतो आहे. मात्र अनेकदा घर भाड्याने दिले की कित्येक महिने भाडेकरू भाडे देत नाहीत. वारंवार सांगूनही भाडे चुकवण्याचा प्रकार जर तुम्ही देखील अनुभवत असाल तर थांबा ! भाडे न देणाऱ्या तुमच्या भाडेकरू सोबत वाद घालू नका. आजच्या लेखात आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे वाद न घालता तुम्हाला तुमच्या घराचे भाडे मिळून जाईल (House Rent Rule). चला तर मग जाणून घेऊया…

भाडे करार

सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेंट ऍग्रिमेंट. या महत्वाच्या करारात स्वतः भाड्याची रक्कम, देय तारीख आणि न भरण्याचे परिणाम समाविष्ट आहेत का ? हे तपासून पहा. हा दस्तऐवज जमीन मालकाने केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईचा (House Rent Rule) आधार असतो. काळजीपूर्वक करार करा आणि सर्व अटी स्पष्टपणे करारात नमूद करा.

नोटीस द्या (House Rent Rule)

भाडेकरू ठरवलेल्या वेळेमध्ये घर भाडे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर रेंट एग्रीमेंट नुसार घर मालक भाडेकरू बरोबर कायदेशीर कारवाई करू शकतो. यासाठी घरमालक भाडेकरूच्या विरुद्ध इंडियन कॉन्ट्रॅक्ट 1872 अंतर्गत कायदेशीर (House Rent Rule) नोटीस पाठवू शकतो.

कुठे दाद मागावी? (House Rent Rule)

आपल्या मालमत्ताविषयक वाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात ‘स्टेट कॉम्पिटण्ट ऑथॉरिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. ही नियुक्ती रेंट कंट्रोल अॅक्टनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेकरूबाबत काहीही अडचण आल्यास मालकाने या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. इथे जर प्रश्न सुटला नाही तर तुम्ही न्यायालयातही दाद मागू शकता.

काय काळजी घ्यावी?

भाडेकरू आणि मालक यांच्यातील नाते पारदर्शक आणि कायदेशीर असणे आवश्यक आहे. घरमालक आणि भाडकरू दोघांनाही भविष्यात होणारा त्रास टाळायचा असेल तर भाडेकरार करणे आवश्यक आहे. करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी भाडेकरूविषयी (House Rent Rule) पूर्ण माहिती करून घ्यावी. पूर्वीच्या मालकाकडे भाडेकरुची चौकशी करून घेता येईल. भाडेकरूचा कायमस्वरूपी वैध पत्ता, ऑफिसचाही पत्ता आणि भाडेकरूने दिलेली सर्व कागदपत्रे पडताळून घ्या.

डिपॉझिट घ्यायला विसरू नका (House Rent Rule)

घर मालक आपले घर हे भाडेकरूच्या हातात देतो तेव्हा सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट पोटी काही रक्कम घेत असतो. समजा अशा परिस्थितीमध्ये भाडे करूने भाडे दिले नाहीत किंवा भाडेच द्यायचं नाही म्हंटले तर घर मालक भाडेकरूने दिलेल्या डिपॉझिट मधून घर भाड्याची रक्कम वजा करू शकतो.

सणासुदीच्या काळात Jioचे ग्राहकांना गिफ्ट ! 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत स्विगी आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप

Jio Prime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव नवीन ऑफर्स घेऊन येतात . सणासुदीच्या काळात त्यांनी नवीन प्रीपेड प्लान लॉन्च करून ग्राहकांना एक भेट दिली आहे. हा प्लॅन ग्राहकांच्या खर्चाचा विचार करून तयार केला असून, यामध्ये कमी खर्चात जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यांच्या या प्लॅनमध्ये 1028 रु आणि 1029 रुपयात कॉलिंग आणि डेटा सोबत अनेक सुविधाही मिळणार आहेत. हा प्लॅन ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

84 दिवसांची व्हॅलिडीटीमध्ये स्विगी वन लाइट मेंबरशिप

1028 रुपयेच्या प्रीपेड प्लानमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे . यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 168 GB डेटा असणार आहे. या प्लानमध्ये प्रत्येक दिवशी वापरकर्त्यांना 2 GB डेटा उपलब्ध होणार आहे . जर तुम्ही 5G नेटवर्क असलेल्या ठिकाणी राहात असाल तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल . रोजचा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5G इंटरनेट उपलब्ध होईल. यासोबत स्विगी वन लाइट मेंबरशिप मोफत मिळणार आहे . यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडही मिळणार आहे.

Amazon Prime ची मोफत मेंबरशिप

1029 रुपयेचा रिचार्ज प्लॅन 1028 रुपयेच्या प्लानप्रमाणेच सेवा देत आहे . या प्लानमध्ये ग्राहकांना Amazon Prime Lite ची मोफत मेंबरशिप मिळते. याशिवाय, 1028 रुपये प्लानप्रमाणेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. जर तुम्ही जास्त ऑर्डर वगैरे करत असाल, तर तुम्हाला 1028 रुपये प्लानचा विचार करावा लागेल, कारण त्यात स्विगी वन लाइट मेंबरशिप मोफत मिळते. पण जर तुम्हाला चित्रपट किंवा वेब सिरीज बघायला आवडत असेल, तर तुम्ही जिओच्या 1029 रुपये रिचार्ज केला पाहिजे. हे दोन्ही प्लॅन कमी खर्चात चांगल्या ऑफर्स देत आहेत.

नोव्हेंबर मध्ये भेट द्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला ; IRCTC ने सुरू केले विशेष टूर पॅकेज

mahakaleshwar mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) हि प्रवासी सेवा, केटरिंग, आणि पर्यटन सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांनी यंदा देखो अपना देश या उपक्रमांतर्गत एक आकर्षक टूर पॅकेज सादर केले आहे. हे पॅकेज पाच दिवसांचे असून, त्यामध्ये प्रवाशांना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळेल. हे टूर पॅकेज 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. हि टूर कमी, पैशामध्ये चांगल्या सेवा देणार आहे. यासाठी प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट

या टूर पॅकेजमध्ये उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, आणि इंदूर या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे . उज्जैन हे महाकालेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, तर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. महेश्वर हे आपल्या नर्मदा नदीच्या तीरावरच्या भव्य घाटांसाठी प्रसिद्ध आहे, आणि इंदूर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या टूरमध्ये प्रवाशांना राहण्याची आणि भोजनाची सोय मोफत मिळणार आहेत . यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या काळात कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. हि टूर 4 रात्री आणि 5 दिवसांची असणार आहे. प्रवाश्याना फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला हि टूर हैदराबादपासून सुरू होईल.

कमी तिकिटात उत्तम प्रवास

IRCTC च्या मध्य प्रदेश महादर्शन टूर पॅकेजसाठी, एकट्याने प्रवास केल्यास 35450 रुपये प्रति व्यक्ती घ्यावे लागतील . दोन लोकांसोबत प्रवास केल्यास 28950 रु प्रत्येक व्यक्तीला , तर तीन लोकांसाठी 27900 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी मोजावे लागतील . त्याचप्रमणे 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 21450 रु प्रति व्यक्ती असणार आहे आणि 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे भाडे 18950 रु प्रत्येक व्यक्तीसाठी असतील. तुम्ही कमी पैश्यात चांगला प्रवास करू शकता .

ट्रॅव्हल इन्शुरन्सची सोय आणि नोंदणी

या टूर पॅकेजमध्ये अनेकदा ट्रॅव्हल इन्शुरन्सची सोय देखील दिली जाते. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रवाशांना इन्शुरन्स कवच मिळते. हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे ते निश्चिंतपणे प्रवास करू शकतात. पॅकेजची नोंदणी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छुक प्रवाशांनी लवकर नोंदणी करून अपेक्षित आहे . त्याचबरोबर प्रवासी 8287932229 या क्रमांकावर कॉल करून टूर पॅकेज बुक करू शकतात.

एलन मस्कच्या नेतृत्वात टेस्लाने लाँच केला नवीन Optimus रोबोट

Optimus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने प्रगती होत असताना दिसत आहे. त्यातच टेस्ला Optimus मानव रोबोटची ओळख करून देत आहे. हा रोबोट घरगुती कामासोबतच पॅकेज वाहून नेहण्यासाठी वापरला जाऊ शकतो . या इनोवेशनमुळे आर्थिक उत्पादनात सुधारणा होईल . टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी नवीन इनोवेशनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये Robovan वाहनासोबतच Optimus मानव रोबोटसुद्धा लाँच करण्यात आला आहे. या रोबोटला दैनंदिन कामासाठी अतिशय महत्वाचे मानले जाणार आहे. हा रोबोट वेगवेगळ्या कामासाठी डिझाइन केला गेला आहे.

सर्वात मोठे इनोवेशनं

इतर रोबोटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या रोबोटला डान्ससुद्धा करता येतो , त्यामुळे लोकांचे मोठ्याप्रमात मनोरंजन होणार आहे. . एलन मस्क यांनी रोबोटची प्रशंसा करताना म्हटले की, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे इनोवेशनं आहे . टेस्लाने अखेरीस लाखो युनिट्स तयार करेल. जिथे कोणतीही गरीब परिस्थिती नसेल. एलन मस्क यांच्या कडून ऑप्टिमस प्रोजेक्टची सुरूवात 2021 मध्ये करण्यात आली होती. 2022 मध्ये, टेस्लाच्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा होत आहे आणि मानवाकृती रोबोट म्हणून हे खूप पसंतीत येत आहे.

रोबोटची किंमत

टेस्ला कडून रोबोटची किंमत 20000 डॉलर आणि 30000 डॉलर दरम्यान ठेवण्यात आलेली आहे. या रोबोटची खासियत अशी की, हा तुमच्या बरोबर चालू शकतो आणि तुम्ही त्याला कोणतेही काम देऊ शकता. तसेच याच्या मदतीने घरगुती सर्व कामे केली जाऊ शकतात. लहान गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत हा रोबोट कार्य करेल . यामध्ये कप उचलण्यापासून ते लहान गिफ्ट बॅग उचलण्यापर्यँत सर्व काही समाविष्ट आहे. तुम्ही त्याच्यासोबत गेम देखील खेळू शकता . या सर्व गुणांमुळे लोकांना त्याबाबत उत्सुकता लागली आहे.

पाहिला का ? रंग बदलणारा सरडा नाही ‘स्मार्ट फोन’ ; Tecno Camon 30S लाँच

smart phone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक्नो आपल्या Camon सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे . या कंपनीने ग्लोबल मार्केटसाठी Tecno Camon 30S आणला आहे. या फोनमध्ये रंग बदल्याचे वैशिष्ट्य आहे. उन्हामध्ये गेल्यावर फोनचा रंग गडद निळा दिसतो, ज्यामुळे याला एक वेगळा अंदाज येतो . याशिवाय या फोनची बॅटरी अतिशय दमदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांचे आकर्षण वाढणार आहे. चला तर रंग बदलणाऱ्या फोनची खासियत जाणून घेऊयात .

Tecno Camo 30S फोनची वैशिष्ट्ये

फोनमध्ये 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले 120 हर्टजच्या रिफ्रेश रेट सपोर्टसोबत उपलब्ध आहे. तसेच त्यामध्ये 1300 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्लेवर गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन दिलेले आहे. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Helio G100 चिपसेट असून , ज्याला 256 जीबी पर्यंत स्टोरेज जोडलेले आहे. या फोनला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W च्या चार्जरने चार्ज होणार आहे. या फोनची अजून एक खासियत अशी कि , 50MP + 2MP कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 13MP चा सेंसर दिला आहे. यामुळे ग्राहक त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील . हा फोन 6GB+128GB आणि 8GB+256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. यात 8GB वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील आहे.

चार रंगात उपलब्ध

या फोनची खास गोष्ट म्हणजे यात रंग बदलणारा बॅक पॅनल आहे. जर तुम्ही हा फोन सूर्याच्या प्रकाशात घेऊन गेला तर प्रकाश पडल्यामुळे फोन गडद निळा दिसू लागतो. Tecno Camon 30S सध्या पाकिस्तानमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना तो चार रंगामध्ये उपलब्ध होणार असून , तो निळा ,गडद जांभळा , काळ्या , सोनेरी या रंगामध्ये मिळणार आहे.

किंमत

फोनचे अजून एक दमदार वैशिष्ट्य असे आहे कि तो फोन धुळीपासून आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP53 रेटिंग मिळणार आहे. यामध्ये डॉल्बी एटमॉस असलेले स्टीरियो स्पीकर आणि सुरक्षा म्हणून फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. याची किंमत पाकिस्तानमध्ये PKR 59999 म्हणजेच सुमारे 18000 रुपये आहे. भारतात सुद्धा हा फोन याच किमतीच्या आसपास उपलब्ध होईल.