Saturday, December 27, 2025
Home Blog Page 421

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची मुदतवाढ; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Mukhymantri Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्य सरकार अनेक योजना आणत आहेत. आणि महिलांना याचा जास्त फायदा देत आहे. अशातच राज्य सरकारने जुलै महिनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये ऍडव्हान्स मध्ये महिलांना मिळालेले आहेत.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ केलेली आहे. आणि आता अखेरची मुदतवाढ देखील सरकारकडून करण्यात आलेली आहे. या आधी सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ केली होती. परंतु आता काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारने 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी 15 ऑक्टोबर आधीच अर्ज 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत महिलांना या लाडके बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु यावेळी हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने न स्वीकारता अंगणवाडी सेविकांमार्फतच स्वीकारले जाणार आहेत.

सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) केलेली ही तिसरी मुदतवाढ आहे. या आधी सरकारने 15 जुलै पर्यंत मुदतवाढ केली होती. परंतु योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली. तरी देखील अनेक महिलांनी अर्ज केलेले नव्हते .त्यामुळे ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. आणि आता 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची मुदतवाल करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र ? | Mukhymantri Ladaki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना त्यांचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, उमेदवाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो हे कागदपत्र द्यावे.

अर्ज करताना कोणत्या अटी आहेत ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. तसेच जर महिन्याचा जन्म इतर राज्यात झालेला असेल, आणि तिचा पती जर महाराष्ट्रातील असेल, तरी देखील ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. तसेच अविवाहित घटस्फोटीत विधवा आणि महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच महिलेचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे असते.

Weather Update | पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज खरा; आणखी इतके दिवस कोसळणार पाऊस

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र विविध ठिकाणी पाऊस पडत आहेत. पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल अंदाज वर्तवला होता. आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या सायंकाळपासून पावसाला सुरुवात होणार होती. आणि त्या दिवसापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. 9 ऑक्टोबर रोजी सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, हिंगोली या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.

त्याचप्रमाणे पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. कालपासून उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडलेला आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. परंतु हा परतीचा पाऊस महाराष्ट्रात आणखी किती दिवस राहणार आहे? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

परतीच्या पाऊस (Weather Update) महाराष्ट्रात किती दिवस राहणार आहे. याबद्दलचा अंदाज देखील पंजाबरावांनी सांगितलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 9 ते 18 ऑक्टोबरदार पावसाची शक्यता आहे. या काळात दररोज हवामानामध्ये बदल होताना दिसणार आहे. तसेच हा परतीचा शेवटचा पाऊस असणार आहे. त्यामुळे पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे

या परतीच्या पावसाचा (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांना मात्र फायदा होणार आहे. या पावसामुळे गहू, हरभरा यांना चांगला ओलावा मिळणार आहे. आणि पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर होणार आहे. 9 ते 18 ऑक्टोबर दरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत मोठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 |नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. ती म्हणजे आता समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 219 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेेत. 10 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 11 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण एक महिना आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

या भरती अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक

पदसंख्या

या भरती अंतर्गत 219 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज शुल्क

ह्या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी भरावी लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली, तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज सुरू होण्याची तारीख

10 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ? | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू.
  • 11 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC Group A Bharti 2024 | MPSC अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

MPSC Group A Bharti 2024

MPSC Group A Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला आमच्या लेखांमधून नोकरीच्या विविध संधींची माहिती देत असतो. आज देखील आम्ही अशीच एक माहिती देणार आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Group A Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती नगर नियोजक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 4 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MPSC Group A Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नगर रचनाकार या पदाच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

नगर रचनाकार या पदाच्या एकूण 60 रिक्त जागा आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | MPSC Group A Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 394 रुपये अर्ज फी असणार आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांना 294 रुपये अर्ज फी असणार आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज सुरू होण्याची तारीख

15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज कसा करावा? | MPSC Group A Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • 4 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Homeguard Salary Hike | राज्यातील 55 हजार होमगार्डसाठी आनंदाची बातमी; मानधनात केली दुप्पटीने वाढ

Homeguard Salary Hike

Homeguard Salary Hike | राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत. अशातच आता दसऱ्यानिमित्त सरकारने राज्यातील होमगार्ड्सला एक मोठे गिफ्ट दिलेले आहे. ते म्हणजे आता होमगार्डच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि हे होमगार्डचे मानधन देशातील सर्वात जास्त मानधन असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच विविध भत्तांची रक्कम देखील दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डची (Homeguard Salary Hike खूप मदत असते. परंतु त्यांचे मानधन खूपच कमी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या संदर्भात अनेक . लोकांनी आवाज देखील उठवलात्यानंतर होमगार्डच्या मानधनाबाबत काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु आज दसऱ्याच्या दिवशी होमगार्डच्या माध्यमातून दुप्पट वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1844970009388515563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1844970009388515563%7Ctwgr%5Ee443912addbe3bd8ee97e5ccb07874a03c5006d2%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fgood-news-for-maharashtra-homeguard-salary-almost-double-home-minister-devendra-fadnavis-announcement-ssd92

सरकारने केलेली ही वाढ 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करणार आहे. सुधारित भत्ते लागू करण्यासाठी 2024- 25 या वर्षाकरिता रुपये 552.7120 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास देखील मान्यता केलेली आहे. दरवर्षी 795.7120 कोटी रुपयांची तरतूद करण्यास देखील मान्यता दिलेली आहे.

राज्यातील होमगार्डचे (Homeguard Salary Hike) प्रतिदिन मानधन हे 570 रुपये एवढे होते. ते वाढून आता 1083 रुपये करण्यात आलेले आहे. आणि हे देशातील सर्वात जास्त मानधन आहे. तसेच इतर अनेक भत्त्यांमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचा उपहार भत्ता 100 रुपये होता. तो आता 200 रुपये करण्यात आलेला आहे. तसेच भोजन 100 रुपयावरून 250 रुपये एवढा करण्यात आलेला आहे.

सरकारने घेतलेले या निर्णयाचा जवळपास राज्यातील 55 हजार होम गार्डला याचा लाभ होणार आहे. सरकारने मागील महिन्यात सुमारे एक 11,2007 होमगार्ड ची भरती राबवली होती. आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची प्रशिक्षण करण्यात आलेले आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. आणि होमगार्डला दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.

डिजीलॉकर आणि Umang App चे एकत्रीकरण; एकाच ठिकाणी मिळणार अनेक सेवा

Digilocker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डीजीलॉकरच्या माध्यमातून आपल्याला अनेक फायदे मिळतात. आणि आता यात आणखी एका वैशिष्ट्याचा समावेश होणार आहे . कारण आता उमंग अॅप आणि डिजिलॉकर यांचे एकत्रिकरण होणार आहे. आणि यामध्ये आपल्याला नवीन वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहे. याबद्दलची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता युजर्सचा डीजीलॉकर द्वारे वैयक्तिक आणि अधिकृत कागदपत्रे तसेच अनेक सरकारी सेवांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. परंतु सध्या तुम्ही फक्त अँड्रॉइड यूजर इंटिग्रेशन करू शकतात. म्हणजे केवळ अँड्रॉइड युजर डिजिलॉकर मधील उमंग अॅप इंटिग्रेशनचा फायदा घेऊ शकतात. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये IOS साठी देखील हे येईल असे सांगण्यात आलेले आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रीय गव्हर्नमेंट विभागाने दिलेली आहे. आता डीजी लॉकर आणि उमंग ऍपच्या एकत्रित करण्यामुळे युजर एका प्लॅटफॉर्मवर आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रमाणपत्र, पेन्शन, उपयुक्तता, आरोग्य आणि प्रवास यासारख्या सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. ही सेवा आतापर्यंत केव्हा अँड्रॉइड युजर ऑफर केली जात होती. जर तुम्हाला इंटिग्रेशन मिळत नसेल तर तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता.

सगळ्यात आधी तुम्ही डीजीलॉकर ॲप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करून घ्या.
त्यानंतर अँड्रॉइड फोन मध्ये डीजी लॉकर हे ॲप उघडा
त्यानंतर डीजी लॉकरमधील उमंग आयकॉनवर टॅप करा.
यानंतर प्रॉम्प्ट केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर वरून उमंग ॲप इंस्टॉल करा.

डीजी लॉकर काय आहे?

डिजिटल लॉकर किंवा डीजी लॉकर हे एक प्रकारचे आभासी लॉकर आहे. यामध्ये तुम्ही तुमच कागदपत्र ऑनलाइन पद्धतीने ठेवू शकता. तुमचे कोणतेही सरकारी प्रमाणपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र पासपोर्ट इत्यादी डिजिलॉकर मध्ये साठवू शकता. तुम्ही एखाद्या कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर जर तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट घरी विसरले असेल, तर डिजिलॉकर मधील तुमचे डॉक्युमेंट हे ग्राह्य मानले जातात.

चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; महिलांना 4 तासांच्या जॉबमध्ये मिळणार 11 हजार रुपये पगार

Government scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्य सरकार हे विविध योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये ते महिलांना केंद्रस्थानी ठेवत आहेत. आणि वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. परंतु आता यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी आणखी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. त्या म्हणजे आता राज्य सरकार महिलांना पार्ट टाइम चार तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून थेट टाटा कंपनीमध्ये जॉब लागणार आहे. तसेच या द्वारे महिलांना एक वेळचं जेवण आणि नाश्ता देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता गरजू महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

दरवर्षी एक लाख मुलींना संरक्षणाचे शिक्षण देखील देण्यात येणार आहे. अशी चंद्रकांत पाटील यांनी दुसरी घोषणा केलेली आहे. या नंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

या योजनांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “दोन गोष्टी आहेत. आज 5000 मुलींना लाठी काठीचा प्रशिक्षण दिल्यानंतर मी एक लाख मुलींचं टार्गेट मारणारी घोषणा केली. या लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देणार आहे. हे मानधन घेऊन त्या मुली दिवसभर कॉलेज वगैरे करतील. आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवतील आता 27 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी 600 खेळाडूंवर आली आहे. त्यांना पारितोषिक मिळाले आहेत कोल्हापूरच्या तरुणांनी ती केलेली आहे
आणि आता कोल्हापूरच्या गल्लीबोलांमध्ये सर्वांचे हातात काठात असतात. त्यामुळे ही घोषणा केलेली आहे.”

त्याचप्रमाणे चार तासांचा पार्ट टाइम जॉब देण्याबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मत मांडलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “मी महिनाभर खूप इंडस्ट्री सोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1000 जॉब चे पार्ट टाइम निर्माण होणार आहेत. त्यासाठी दोन जणांना अपॉइंटमेंट लेटर देखील देणार आहोत. त्यासाठी जाहिरात देखील निघणार आहेत. तसेच अर्ज येतील आणि मुलाखती देखील होणार आहे. यावेळी 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळीच येणं जाणं फ्री हे तसेच एक वेळचा नाष्टा आणि जेवण देखील फ्री असणार आहे. या निमित्ताने रतन टाटा यांच्या समूहाने मला ही ऑफर दिल्यामुळे आता मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिन्याची थेट ताटामध्ये नोकरी लागणार आहे.”

Train Accident | तामिळनाडूमध्ये रेल्वेचा मोठा अपघात; 19 प्रवाशी गंभीर जखमी

Train Accident

Train Accident | दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच एक मोठा रेल्वेचा अपघात घडलेला आहे. तमिळनाडूमधील कावराई पेट्टई स्थानकाजवळ एक मोठा रेल्वेचा अपघात झालेला आहे. मैसूर दरभंगा बागमती एक्सप्रेस आणि एका स्थिर मालगाडीची टक्कर झाल्याने बागमती एक्सप्रेसचे जवळपास 12 ते 13 डबे रुळावरून घसरले आहेत. आणि एक मोठा अपघात (Train Accident ) झालेला आहे. या अपघातात 19 प्रवासी जखमी झालेले आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडलेली आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बागमती एक्सप्रेस म्हणजेच गाडी क्रमांक 12578 मैसूर वरून डिब्रूगढला जात होती. तेव्हा ती कावराईपट्टीई या स्थानकात प्रवेश करत होती. यावेळी गाडीला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी सिग्नल देण्यात आले होते. परंतु काही कारणांमुळे ट्रेन मुख्य मार्गाऐवजी लूक लाईन मध्ये घसरली. आणि 75 किलोमीटर प्रति तास वेगाने स्थिर असलेल्या मालगाडीला धडकली आणि त्यामुळे गाडीचे 12 – 13 डबे रुळावरून खाली घसरले.

तमिळनाडूमध्ये झालेल्या या मोठ्या अपघातानंतर (Train Accident ) तेथील मुख्यमंत्री एम के स्टाईलहे त्वरित तेथे आले होते. आणि मदत कार्य त्यांनी सुरू केलेले आहे. यासाठी त्यांनी एक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्याची देखील नियुक्ती करण्यात केलेली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की, या या अपघातामध्ये सहा डबे रुळावरून घसरले आहेत. आणि दोन डब्यांना आग लागलेली आहे. तसेच या अपघातात 19 प्रवासी जखमी झालेले आहेत. इतर 3 लोकांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातात (Train Accident ) जे प्रवासी जखमी झालेले आहे. त्यांना सरकारी स्टेनली मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल केलेले आहे .तसेच या दोघांच्या प्रकृतीवर सातत्याने डॉक्टर लक्ष ठेवून आहे. तर उर्वरित 13 जखमी प्रवाशांना पोननेरी सरकारी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. त्याचप्रमाणे या गाडीतील 1300 प्रवाशांना सुरक्षित रित्या बाहेर काढलेले आहे. त्यानंतर यातील काही प्रवाशांची व्यवस्था लग्न हॉलमध्ये करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी त्यांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा देखील पुरविण्यात आलेल्या आहेत. परंतु अजूनही या दुर्घटनेचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी कोण कोणती हानी झालेली आहे. या गोष्टींचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय; मदरसातील शिक्षकांच्या पगारात केली वाढ

Politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्त्वाचे आणि नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आकर्षित करण्याचा आणि मत मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू झालेला आहे. अशातच आता राज्य सरकारने मुस्लिम आणि अल्पसंख्यांक गटांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. ते म्हणजे आता राज्यातील मदरसांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पगारांमध्ये राज्य सरकारने तीन पट वाढ करण्याची घोषणा केलेली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना मुस्लिम बांधवांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या पगारांमध्ये तीन पट वाढ करण्यात आलेली आहे. मदर्सांमध्ये शिकवणाऱ्या डीएड पदवी असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा पगार हा 6000 रुपये होता. तो आता 16 हजार रुपये करण्यात आलेला आहे. तसेच बीएड पदवी असलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार हा 8000 होता. तो आता 18000 करण्यासाठी सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

राज्य सरकारने मुस्लिम बांधवांसाठी हा एक मोठा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद चालू झालेला आहे.bत्यामुळे आता विधानसभा निवडणुका पूर्वी महाराष्ट्र सरकार मुस्लिम कार्डचा वापर करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यांचे आरोप भाजपने फेटाळून लावलेले आहे. शिक्षण ही आमची पहिली पहिले प्राधान्य आहे. शिक्षण देणारी कुठल्याही संस्था कुठल्याही धर्माची असो त्यात आम्ही भेद करत नाही. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता मदारासांमधील शिक्षक देखील खूप आनंदी आहे. पगार वाढ झाल्याने त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल असा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. परंतु विरोधी पक्षातून मात्र महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय आता विधानसभा निवडणुकीसाठी किती फायदेशीर ठरणार आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बाईपण भारी देवा ! गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी साडी नेसण्याची मुभा

mahila police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना वर्दी घातल्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. याच त्रासामुळे अनेक महिला पोलिसांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. काही दिवसापूर्वी डीजीपी कार्यालयाने गर्भवती महिलांसाठी गणवेशात सूट देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता, जो प्रलंबित होता. त्याचाच सरकारने पाठपुरावा केला आहे .अखेर , बुधवारी सरकारने गर्भवती महिला पोलिसांना गणवेशाऐवजी साडी नेसण्याची मुभा देणारा शासन निर्णय जाहीर केला आहे . या निर्णयामुळे महिला पोलिस कर्मचाऱ्यांची दिलासा मिळणार आहे.

प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक

गर्भवती महिला पोलिसांना गर्भधारणेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच साडी नेसण्याची परवानगी दिली जाईल. ही सवलत केवळ गर्भधारणेच्या काळातच लागू असणार आहे, तसेच काही काळ या सुटीचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयामुळे महिला पोलिसांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेता येईल.महिला पोलिसांसाठी हा निर्णय निश्चितच महत्वाचा ठरणार आहे.

आरोग्यावर होणारा परिणाम कमी

गर्भधारणेदरम्यान महिलांना गणवेश आणि बेल्ट घालणे अवघड जात असल्याने त्यांची गैरसोय होते . गर्भवती स्त्रियांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते .बेल्ट घातल्याने पोटावर दाब येतो, ज्यामुळे गर्भावर आणि महिलांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे आता महिला पोलिस कर्मचारी अधिक सुरक्षितपणे आणि आरामात आपली जबाबदारी पार पाडू शकतील. या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम कमी होईल.