Saturday, December 27, 2025
Home Blog Page 424

मुंबई-पुणे अंतर होणार कमी ; ‘या’ प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात

missing link project

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल उभा राहिलाय. या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालं असून लवकरच हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचणार आहे.

सध्याच्या घडीला पाहायला गेले तर मुंबई ते पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असते. रहदारी ही जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गावर लोणावळा घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार ? असा सवाल तुमच्या डोक्यात आला असेल तर हा प्रकल्प डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे एम एस आर डी सी चे नियोजन आहे. खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात येत आहेत. यातला सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किलोमीटर आहे. या दोन्ही बोगद्यांचा 98% काम पूर्ण झालय. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी आल्या होत्या. मात्र आता पावसाळा संपत आल्यामुळे या कामाने वेग धरला आहे.

250 किमी हवेचा देखील होणार नाही परिणाम

या प्रोजेक्ट बद्दल एक विशेष बाब म्हणजे खोपोलीत होणारा उंच केबल ब्रिजवर 250 किलोमीटर हवेचा देखील परिणाम होणार नाही. हा पूल अफकॉन्स या कंपनीकडून तयार केला जात असून या कंपनीचे डायरेक्टर यांनी एका मराठी माध्यमाला माहिती देताना सांगितलं की, ज्या भागात या पुलाची निर्मिती होत आहे त्या ठिकाणी 25 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहत असतात जास्तीत जास्त वाऱ्याचा वेग 50 किलोमीटर प्रतितास आहे. पुलावर शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने धावू शकतात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुलाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे या डिझाईनची विदेशात चाचणी करण्यात आलेली आहे. अधिक उंची आणि वेगवान वारे लक्षात घेऊन ही चाचणी करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी 250 किमी वेगाने वारी जरी वाहिले तरीही या काहीच होणार नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

खुशखबर ! पुणे महामंडळासाठी निघाली 6 हजार 294 घरांची लॉटरी ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज ?

mhada lottery

मुंबई म्हाडाची लॉटरी यापूर्वीच जाहीर झाली असून आता पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया या लॉटरीबाबत…

कधीपासून भरता येणार अर्ज

जर तुम्हाला या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वा. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. पुणे मंडळातर्फे सदनिका (Home) विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर, 2024 रोजी काढण्यात येणार आहे. दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात होणार असून नोंदणीकृत अर्जदार दिनांक 10 ऑक्टोबर, 2024 रोजी 12 वाजेपासूनच ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. 12 नोव्हेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेच भरणा करून शकणार आहेत.

30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार अर्जाची यादी

पुणे म्हाडा सोडतीसाठी 13 नोव्हेंबर,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिमतः 30 नोव्हेंबर रोजी सोदातीत सहभाग घेणार्‍या अर्जांची यादी म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांचा समावेश आहे.

मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. अशी सूचना म्हाडाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख

cabinet meeting shinde

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. या बैठकीत काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
.
पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत नेण्यात येत आहे, त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

मराठवाड्यातील समाज आहेत, गुजर समाज, लेवा पाटील समाज आहे, मोठ्या प्रमाणात गुजर समाजात गरिबी आहे. तसेच, लेवा पाटील समाज महामंडळ करण्यात आले आहे, त्या समाजात गरीब माणसे आहेत, त्यांना मदत करण्यासाठी महामंडळांचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्नसाठी प्रस्ताव

आज झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी 86 व्या वर्षी निधन झालं. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.उद्योगपती रतन टाटा यांना जो उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला होता, तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे, त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे.

काही महत्वपूर्ण निर्णय

  • सार्वजनिक बांधकाम – वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार,समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता,कात्रज कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव.
  • जलसंपदा विभाग – सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता
  • उच्च व तंत्र शिक्षण- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा, कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय,राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता.
  • महिला व बाल – राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार
  • ग्राम विकास- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ
  • नगर विकास- सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार
  • कृषि – केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार, मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरीक्त निधी,नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
  • महसूल- पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला,बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी,महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा,कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला, राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी
  • वने- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प
  • पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना
  • मृद व जलसंधारण- भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित
  • गृहनिर्माण- रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार
  • शालेय शिक्षण- मराठवाड्यातील शाळांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी,राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी,शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा
  • विधि व न्याय- न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग,नाशिकरोड, तूळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
  • आदिवासी विकास- शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी.
  • नगर विकास- देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला
  • अल्पसंख्याक विकास- मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ,मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ
  • गृह- पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा
  • मदत व पुनर्वसन- आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत
  • इतर मागास बहुजन कल्याण- शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे
  • कामगार- पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे
  • मृद व जलसंधारण -कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता
  • सार्वजनिक आरोग्य- सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा

China Hangzhou Building: कसं शक्य आहे ? एका इमारतीत वसलंय आख्ख शहर ; व्हायरल होतोय Video

China Hangzhou Building

China Hangzhou Building: आपल्याला माहितीच असेल की भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये आता जागाच शिल्लक नसल्यामुळे अनेक मजल्यांच्या टोलेजंग इमारती पाहायला मिळतात. दुसऱ्या देशांमध्ये देखील अशीच काहीशी स्थिती आहे.

भारताच्या पाठोपाठ चिनचा क्रमांक लागतो. पण तंत्रज्ञांच्या जोरावर अनेक अडचणींवर मत करण्याच्या बाबतीत चिन्यांची जगभरात खास ओळख आहे. कमी जागेवर मात करीत चिनी अभियंत्यांनी एका अफलातून इमारत तयार केली आहे. आणि या इमारतीत तब्बल 20 कुटुंबं राहतात. आपण असं म्हणू शकतो की एक मोठं शहरच या एका इमारतीत वसलेलं आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (China Hangzhou Building) होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक इमारत दाखवण्यात आली आहे. चीनच्या कियानजियांग सेंचुरी शहरातील रीजेंट इंटरनॅशनल बिल्डिंगमध्ये 20 हजार लोक राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे.एका मोठ्या शहराची लोकसंख्या चीनच्या रीजेंट इंटरनॅशनल बिल्डिंगमध्ये राहते, जी स्वतःमध्ये खूप वेगळी आहे. इमारतीची लांबी 675 फूट आहे. यात एकूण 39 मजले आहेत, जे इंग्रजी अक्षर S च्या (China Hangzhou Building) आकारात बनवले आहेत.

आश्चर्यकारक बाब म्हणजे राहण्याच्या सर्व सोयीसुविधाही या इमारतीत उपलब्ध आहेत. जसे-विशाल फूड कोर्ट, किराणा दुकान, सलून, नेल सलून, स्विमिंग पूल आणि कॅफे. म्हणजेच, अशी जागा जिथे मानवाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळत आहेत, ज्या राहण्यासाठी पुरेशा मानल्या जातात.

अजूनही 10 हजार लोक राहू शकतात (China Hangzhou Building)

इमारतीत राहणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण समुदाय म्हणतात. याठिकाणी 20 हजार लोक राहत असूनही अजूनही जागा रिकामी आहे. अहवालानुसार, येथे अजूनही 10 हजार लोक राहू शकतात. म्हणजेच येथे एकूण क्षमता 30 हजार आहे. @Rainmaker1973 नावाच्या X हँडलने व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याला आतापर्यंत सुमारे 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. प्रचंड निवासी इमारत पाहून जगभरातील लोक हैराण (China Hangzhou Building) झाले आहेत.

Ratan Tata Love Story : प्रेमात पडूनही अविवाहित राहिले रतन टाटा ; काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

ratan tata

Ratan Tata Love Story : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, परोपकारी,समाजसेवक आणि उत्तम व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी 86 व्या वर्षी निधन झालं. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मागे एक प्रेरणादायी जीवनाची कहाणी सोडणाऱ्या रतन टाटा यांचा व्यक्तिगत आयुष्य कसं होतं ? याबद्दल अनेक जणांना माहिती नाही. एवढी मोठी व्यक्ती असून देखील ते अविवाहित होते. त्यांनी लग्न का केलं नाही? असं नेमकं काय घडलं (Ratan Tata Love Story) ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला ? चला जाणून घेऊयात…

एका टीव्ही माध्यमाच्या जुन्या इंटरव्यू मध्ये माहिती देताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी आपल्या प्रेम कहानी बद्दल खुलासा केला होता. रतन टाटा प्रेमात तर पडले मात्र आजूबाजूची परिस्थिती अशी काही होती की प्रेम करून सुद्धा त्यांना लग्न (Ratan Tata Love Story) करता आलं नाही.

रतन टाटा अमेरिकेत राहत होते त्यावेळी ते लग्न करणार होते मात्र 1962 मध्ये भारत चीन संघर्ष पेटलेला होता आणि या परिस्थितीमुळे सगळं काही बदललं…टाटा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की, “जेव्हा मी अमेरिकेमध्ये काम करत होतो. तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. माझं लग्न न करण्याचं एकच कारण होतं कारण मी माझ्या आजीची तब्बेत ठीक नसल्यामुळे भारतात परतलो होतो आणि तिला माझ्या मागे यायचं होतं. मात्र भारत आणि चीन यामध्ये संघर्ष पेटला होता. त्यामुळे ती येऊ शकली नाही आणि शेवटी तिने एका अमेरिकी व्यक्तीबरोबर लग्न (Ratan Tata Love Story) केलं.

देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांचं लग्न झाले नाही. मात्र त्यांनी एका इंटरव्यू मध्ये स्वतः सांगितलं होतं की ते चार वेळा लग्न करणार होते मात्र काही कारणास्तव ते शक्य झालं नाही आणि शेवटपर्यंत त्यांचा लग्न झालंच (Ratan Tata Love Story) नाही.

Shaktipeeth Expressway : महायुती सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्टला’ ब्रेक ! स्वतः मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway : महायुती सरकारकडून अनेक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट राज्यामध्ये राबवले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड शिवाय गोवा ते नागपूर महामार्ग हा देखील महायुती सरकारच्या माध्यमातून साकारला जाणारा अतिशय महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो. मात्र या प्रोजेक्टला आता ब्रेक लागल्याची कबुली स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भवऱ्यात (Shaktipeeth Expressway) अडकला होता. त्यानंतर सरकारने महामार्गाच्या संपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. शक्तिपीठ महामार्ग बनवण्यासाठी राज्यातील 27000 हेक्टर जमिनी अधिकृत करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून राज्यभरातून याला तीव्र विरोध करण्यात आला त्यानंतर राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक लागला आहे. या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय झाला असं म्हणता येईल.

नको असणारा प्रकल्प लादणार नाही (Shaktipeeth Expressway)

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो. नको असणारा प्रकल्प तुमच्यावरील लादणार नाही असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. कोल्हापुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते यावेळी चित्रपटात प्रसिद्ध असलेला एक डायलॉग देखील बोलून (Shaktipeeth Expressway) दाखवला “एक बार मैने कमिटमेंट कर दिया तो मै खुदका भी नही सुनता हू” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं

दरम्यान यापूर्वी देखील कोल्हापुरातील एका कार्यक्रमात गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग विषयी भाष्य केलं होतं. यावेळी “12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ ला विरोध आहे त्यामुळे माझा देखील या (Shaktipeeth Expressway) महामार्गाला ठाम विरोध आहे हा महामार्ग होणार नाही” अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली होती.

टेक्नोने लाँच केला 10,000 रुपयांत Tecno Spark 30C 5G स्मार्टफोन

Tecno Spark 30C 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी किमतीत उत्तम फोन उपलब्ध होत असेल तर, ग्राहक त्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. टेक्नोने बाजारात नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Tecno Spark 30C 5G हा फोन फक्त ग्राहकांसाठी 10000 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच फोनवर 1000 रुपयांचा डिस्काउंड देखील मिळणार आहे. हा फोन ग्राहकांना मीडियाटेक चिपसेटसोबत मिळणार आहे. कमी शुल्कात ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. या फोनची स्पर्धा मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फोनशी होत असताना दिसून येत आहे. त्यामध्ये vivo T3x , iQOO Z9 आणि इंफिनिक्स हॉट 50 5G यांचा समावेश आहे.

फोनची वैशिष्टे

या फोनचा डिस्प्ले ग्राहकांना भारावून टाकणारा आहे. तो 6.67 इंच HD+ Dot-In असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा आहे. या फोनमध्ये मीडिया टेक डिमेन्सिटी 6300 5G प्रोसेसरचा वापर केला आहे. याचा फ्रंट कॅमेरा हा डुअल LED फ्लॅशसह उपलब्ध असून , तो 8 MP चा आहे. मुख्य कॅमेरा 48 MP सोनीचा IMX582 आहे. हा फोन जलद गतीने चार्जिंग होण्यासाठी त्यामध्ये 5000 mAh बॅटरी 18W चार्जिंगसह ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याची डिझाईन ग्राहकांना आवडेल अशी आहे. धुळीपासून आणि पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनची निर्मिती केली आहे. त्याचसोबत IR ब्लास्टर, 3.5 मिमी हेडफोन जैक, NFC आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहे.

किंमत

प्रत्येक फोनची किंमत रॅमवर अवलंबून असते . टेक्नो स्पार्क 30C 5G च्या 4GB रॅम किंवा 64GB स्टोरेजच्या फोनची किंमत 9999 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 10499 रुपये आहे. फ्लिपकार्टवर हा फोन घेतल्यास त्यावर ग्राहकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. काही ठराविक कार्डवरून फोन ऑर्डर केल्यास त्यावरही बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना 8,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

भारतीय रेल्वेने कडून 150 हुन अधिक स्टेशन्सवर नवरात्री स्पेशल थाळी सेवा सुरू

navratri thali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचे जाळे प्रचंड पसरले आहे. त्यामध्ये लोकांना नेहमी चांगल्या सेवा दिल्या जातात. कमी खर्चात जास्त प्रवास करायचं म्हटले कि लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. ऑक्टोबर म्हटले कि नवरात्रीचा उत्सव , या काळात अनेक भक्त मंदिरांना भेट देतात .तसेच नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास करतात. पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांना अन्न आणि पेयाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचाच उपाय म्हणून भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष पाऊल उचलले आहे. नवरात्रीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्नाची अडचण होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने 150 हून अधिक स्टेशन नवरात्री स्पेशल थाळी ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पौष्टिक आणि हलके अन्न मिळणार

या थाळीत प्रवाशांना साबुदाणा खिचडी, बटाट्याचे पदार्थ , फराळाचा लाडू आणि इतर पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लोकांना पौष्टिक आणि हलके अन्न मिळावे यासाठी तेल , लसूण , मसाला नसलेले पदार्थ दिले जाणार आहेत. याचे वैशिष्ट म्हणजे हि सेवा नऊ दिवस सुरु रहाणार आहे. यामुळे नवरात्रीच्या या विशेष योजनेचा लाभ घेऊन प्रवासी त्यांच्या प्रवासात आनंदाने घालवू शकतात.

प्रमुख स्टेशनचा समावेश

हि सेवा प्रवाशांना विशेष स्थानकावर देण्यात येणार आहे. त्यामध्ये मुंबई सेंट्रल, दिल्ली जंक्शन, सूरत, जयपूर, लखनौ, पाटणा जंक्शन,लुधियाना, दुर्ग, चेन्नई सेंट्रल, सिकंदराबाद,अमरावती, हैदराबाद, तिरुपती, जालंधर सिटी,उदयपूर सिटी, बंगळुरू कॅन्ट ,नवी दिल्ली ,ठाणे ,पुणे ,मंगलोर सेंट्रल स्टेशन अशा अनेक ठिकाणांचा समावेश असणार आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑर्डरची सुविधा

भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑर्डर करण्याची सुविधा देखील दिली आहे . प्रवाशांना त्यांचा PNR नंबर IRCTC अ‍ॅपवर किंवा IRCTC ई-कॅटरिंग वेबसाइटवर टाकून सहजपणे थाळी बुक करता येईल. प्रवाशांना त्यांच्या आहारातील धार्मिक आणि सांस्कृतिक गरजांची काळजी घेत सेवा दिल्या जाणार आहेत. त्यांच्या आवडीनुसार आहार उपलब्ध होणार आहे.

तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला महासागर ; आता महासागराची संख्या 6 होईल ?

ocean

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आत एक नव्या महासागराचा शोध लावला आहे, जो इतर सर्व महासागरांपेक्षा तीन पट मोठा आहे. हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला आहे. उत्तर पश्चिम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या मेंटलमध्ये या महासागराचा शोध घेतला आहे. पृथ्वीवर सध्या पाच महासागरांचा समावेश आहे. या नवीन शोधामुळे महासागराची संख्या सहा होईल का हा महत्वाचा प्रश्न उपलब्ध झाला आहे. हा शोध वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा मानला गेला आहे.

कसा शोधला हा महासागर

वैज्ञानिकांनी सीस्मोग्राफचा वापर करून हा महासागर शोधला. अमेरिकेच्या विविध भागांमध्ये सीस्मोग्राफचे जाळे पसरवण्यात आले होते. सीस्मोग्राफच्या मदतीने पृथ्वीच्या आतल्या ढाच्याबद्दल माहिती मिळते. 500 पेक्षा जास्त भूकंपांच्या झटक्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हे लक्षात आले की एका विशिष्ट ठिकाणी मेंटलमधून जाणाऱ्या लहरींची गती कमी होत आहे . यामुळे त्यांना समजले की त्या ठिकाणी खडकांच्या आत पाणी अडकलेले आहे.

महासागर म्हटले जाणार का ?

पृथ्वीवर प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्कटिक महासागर, अंटार्कटिक महासागर (दक्षिणी महासागर) असे पाच महासागर आहेत. या शोधामुळे यांची संख्या सहा होणार का त्यावर वैज्ञानिक म्हणतात कि , या ठिकाणाला महासागर म्हटले जाणार नाही , कारण हे पाणी क्रिस्टलच्या आत अडकलेले आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हे पाणी पृथ्वीवरील महासागरांच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे. जर हे पाणी पृष्ठभागावर आले असते, तर पृथ्वीवर केवळ उंच पर्वत दिसले असते आणि समुद्र कमी प्रमाणात अस्तित्वात असते.

पृथ्वीवरील तीन स्तर

पृथ्वीवर तीन स्तर आढळतात, त्याला परत किंवा थर असेही म्हटले जाते . पहिला थर क्रस्ट असून, हा सर्वात वरचा पातळ परत आहे . ज्यावर आपण चालतो. या थरात माती, पाणी, पर्वत, नद्या, महासागर, आणि जीवसृष्टी असते. पृथ्वीच्या क्रस्टमध्ये खूपच कमी जाडी असते, पण याच्यावर आपलं संपूर्ण जीवन आहे. क्रस्टखाली मॅन्टल आहे, जी खनिज पदार्थांनी बनलेली असते. या थरात तांबड्या रंगाचं गरम लाव्हारस असतो, जो हलत असतो. मॅन्टल पृथ्वीच्या आतल्या कोअरपर्यंत पसरलेली आहे. सर्वात खालचा थर , जो दोन भागांमध्ये विभागलेली आहे. बाहेरील कोअर आणि आतील कोअर. बाहेरील कोअर द्रव पदार्थांपासून बनलेली असते आणि खूपच गरम असते. यामध्ये इतकी उष्णता असते की कोणताही पदार्थ घन रूपात राहू शकत नाही. आतील कोअरमध्ये उष्णता अधिक आहे. त्यामुळे गाभ्यात कोणतेही ठोस पदार्थ अस्तित्वात राहू शकत नाहीत.

पुण्यातील निमगाव खंडोबा मंदिराचा होणार विकास ; 24 एकर शासकीय जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग

nimgaon khndoba mandir

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून विविध निर्णय घेतले जात आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्याच्या महसूल व वन विभागाने काल दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदिराचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी येथील परिसरातील शंभर कोटी रुपये किमतीची 24 एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.

निमगाव खंडोबा मंदिरासाठी राज्य आणि बाहेरच्या राज्यातून सुद्धा अनेक भाविक भक्त याठिकाणी येत असतात. हीच बाब लक्षात घेऊन मंदीर देवस्थान परिसराचा रोपवे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या महसूल व वन विभागाने काल दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक 135 मधील 14 हे. 40 आर. गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे. जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरू करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे.

या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील 24 एकर शासकीय गायरान जमिन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला.