Saturday, December 27, 2025
Home Blog Page 423

Pune Metro : कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो ? जवळपास 70 टक्के काम पूर्ण

Hinjewadi-Shivaji Nagar

Pune Metro : पुण्यातील मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. नव्याने सुरु झालेल्या स्वारगेट मेट्रोला देखील प्रवाशांची पसंती मिळत असून 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान, पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 3.45 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुण्यातल्या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर स्वस्तात आणि वेगवान प्रवास म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसत आहेत. अशातच आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उदघाटन कधी होणार (Pune Metro) याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

कारण हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो हा पुढचा टप्पा असून हिंजवडी आयटी पार्क मध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा फायदा होणार आहे. हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी भागात कामासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरु झाल्यास ट्राफिक कमी होऊन पर्यायाने (Pune Metro) प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

कधी सुरु होणार हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो (Pune Metro)

सध्या शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3 मार्गाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गाचे किमान 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. पुढील वर्षी पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो सुरु (Pune Metro) होऊ शकते.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी माणगाव ते हिंजवडी मार्गे शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करत आहे. याचे 99 टक्के भूसंपादन पूर्ण आणि 70 टक्के काम पूर्ण (Pune Metro) झाल्याने, हा बहुप्रतीक्षित मार्ग एप्रिल 2025 पर्यंत खुला होईल असे दिसते. या मार्गाची एकूण लांबी 23.203 किमी असून, त्यावर 23 स्थानके असतील.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | बँकसीडींग अभावी 44 हजार बहिणीचे पैसे अडकले; बँकांबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आपले राज्य सरकार विविध योजना आणत असतात. आणि या योजनांमध्ये सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवलेले आहे. जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 हजार रुपये देण्याचे देखील त्यांनी सांगितले होते. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते जमा झाले होते. परंतु दिवाळी तोंडावर असताना सरकारने महिलांना पुन्हा एकदा बोनस गिफ्ट दिलेले आहे. ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये सरकारने दिवाळीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अनेक महिलांच्या खातात हे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत.

परंतु जुलै महिन्यात अर्ज करूनही अद्याप अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही. याचे कारण म्हणजे आधार सिडींग. अनेक महिलांच्या आधार सिडींग नसल्याने खात्यात पैसे आलेले नाही. गेल्या महिन्यापासून महिलांनी केवायसी आणि आधार सिडींगसाठी अर्ज केले होते. परंतु सर्वर डाऊनमुळे महिलांच्या शेडिंग होत नसल्याने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ चालू झालेला आहे. आणि यामुळे महिलांचे लाडके बहीण योजनेचे पैसे देखील खात्यात येत नाही.

अनेक महिलांचे लाडके बहिण योजनेचे (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) अर्ज स्वीकारले गेलेले आहेत. परंतु त्यांचे बँक खाते आधार कार्ड सीडींग नसल्यामुळे पैसे खात्यात येण्यास अडचणी होत आहेत. अनेक महिलांना 7500 हजार रुपये बँकेत जमा झाल्याचे मेसेज देखील येत आहेत. परंतु त्यांना ते काढता येत नाही. त्यामुळे बँकांमध्ये देखील महिलांची गर्दीला झालेली दिसत आहे. आणि बँकेतच वाद चालू झालेले आहे. अकोला जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेचे 4 लाख 43 हजार 388 अर्ज केले होते. त्यातील 4 लाख 35 हजार 857 महिला पात्र ठरलेल्या आहेत तर 1769 अर्ज बाद झालेले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी सरकारने अर्ज करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढून दिलेली होती. तसेच निकष देखील कमी केलेले होते. परंतु आता अर्ज करण्याची तारीख देखील संपलेली आहे.

Child Sale Crime | बाप रे ! 4 लाखांसाठी जन्मदात्या आईने विकले 2 महिन्याचे बाळ; डॉक्टरांसह 6 जण अटक

Child Sale Crime

Child Sale Crime | आपल्या समाजात दररोज काही ना काही प्रकार घडतच असतात. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तो म्हणजे एका लहान अडीच महिन्याच्या बाळाचा चार लाख रुपयांसाठी सौदा केलेला आहे. यासाठी बनावट कागदपत्र तयार केलेली आहे. आणि त्याच्या अडीच महिन्याच्या बालकाची चार लाख रुपयांसाठी विक्री केलेली आहे. आता या विक्री करणाऱ्या रॅकेटचा स्पर्धा फाश केलेला आहे. यासंदर्भात बाल संरक्षण शाखा आणि महिला ठाण्याच्या पोलिसांनी डॉक्टरांसह इतर सहा आरोपींना देखील अटक केली आहे.

हा प्रकार दावणे गेले येथील एम के मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे. यावेळी डॉक्टर भारती बालकाची आई काव्या तसेच ते बाळ विकत घेणारे दांपत्य जया आणि प्रशांतकुमार तसेच मध्यस्थी वादीराज यांना देखील अटक करण्यात आलेले आहे. आरोपींनी त्यांचा गुन्हा देखील कबुल केलेला आहे. आणि त्यांना न्यायालयीन कोठडी ठेवलेले आहे. तसेच या अडीच महिन्याच्या बाळाला बाल संगोपन केंद्रात नेण्यात आलेले आहे.

या प्रकरणाची माहिती चाइल्ड हेल्पलाइन वर्क कॉल करून एका निनामी व्यक्तिने दिली काव्याच्या एका बालकाची जयाने प्रशांत कुमार कुरडेकर यांना एम के मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर भारती आणि मध्यस्थी वारजेदार आणि यांच्यामार्फत विक्री केलेली आहे. या दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण शाखेच्या कविता आणि त्यांच्या पथकाने जया आणि प्रशांत कुमार यांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्या बाळाच्या जन्म दाखल्यासह इतर काही बनावट कागदपत्र देखील सापडले.

या कागदपत्रानुसार जया आणि प्रशांतने 26 ऑगस्ट रोजी या बालकाला जन्म दिल्याचे खोटे कागदपत्र तयार केलेले होते. त्यानंतर त्या कागदपत्राच्या आधारे रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता. त्या बाळाची विक्री झाल्याचे समोर आले. काव्या हीने काही दिवसापूर्वीच पतीपासून घटस्फोट घेतलेला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी तिने या बाळाला जन्म दिलेला आहे. नंतर तिने त्या मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे जया आणि प्रशांत यांच्या लग्नाला सात वर्षे झाले आणि सात वर्षानंतरही त्यांना मूलबाळ नाही. त्यावेळी त्यांनी डॉक्टर आणि मध्यस्थी यांच्यामार्फत चार लाख रुपयांना ते बालक विकत घेतले आहे असे माहिती समोर आली आहे.

या तपासानंतर आरोपींविरुद्ध अनेक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबद्दलची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रशांत यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्या मुलाची आई काव्या हिने सांगितले की, तिला त्या बाळाला सांभाळणे शक्य होत नसल्याने तिने तिच्या मर्जीने त्या मुलाची विक्री केलेली आहे.

Mhada Lottery 2024 : घराचं स्वप्न पूर्ण होणार ! कोकण मंडळासाठी म्हाडाची 12 हजार घरांची लॉटरी ; कुठे कराल अर्ज ?

mhada lottery pune 2024

Mhada Lottery 2024: मुंबई येथील म्हाडाची सोडत काही दिवसांपुर्वी जाहीर झाली आहे. त्यानंतर काल (10) तारखेला पुणे मंडळासाठी म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता कोकण वासियांकरिता आनंदाची बातमी असून म्हाडा कडून कोकण मंडळासाठी तब्बल 12 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. आज (11) रोजी दुपारी 12 वाजता 12 हजार 626 सदनिकांच्या विक्रीसाठी (Mhada Lottery 2024) म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गो-लाइव्ह कार्यक्रमातर्गंत सोडत जाहीर होणार आहे.

कोणत्या शहरांचा समावेश (Mhada Lottery 2024)

कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे शहर व जिल्हाा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे.

सदनिकांचे वाटप (Mhada Lottery 2024)

कोकण मंडळाच्या या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 9883 सदनिका
15 टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गंत 512 सदानिका
20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गंत एकूण 661 सदनिका
मंडळाच्या विखुरलेल्या 131 सदनिकांचाही समावेश आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (Mhada Lottery 2024)

दरम्यान, म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, प्रथम प्राधान्य योजनेंतर्गंत या घरांची विक्री करण्यात येणार आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृती आणि ताबा प्रक्रिया सुरू राहणार. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.

कुठे कराल अर्ज ? (Mhada Lottery 2024)

अर्जदारांना म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी https://lottery.mhada.gov.in आणि कोकण म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहेत.

Viral Video | महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांकडून वर्गातच करून घेतला बॉडी मसाज; पाहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे माहिती देणारे असतात. तर काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. परंतु सध्या एक वेगळाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ (Viral Video) राजस्थानच्या जयपुरमधील आहे. या ठिकाणी एका सरकारी शाळेतील शिक्षकेने विद्यार्थ्यांकडून तिच्या पायाची मालिश करून घेतलेली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आणि त्या शिक्षिकेवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक महिला शिक्षिका वर्गात जमिनीवर उलटी झोपलेली आहे. तसेच एक विद्यार्थी त्या शिक्षिकेच्या पायावर उभे राहून तिच्या पायाची मालिश करून देत आहे. तर दुसरा विद्यार्थी तिथे उभा राहून मालिश करणाऱ्या विद्यार्थी खाली पडू नये म्हणून त्याला आधार देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना खूप धक्का बसलेला आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापका अंजू चौधरी यांनी देखील त्यांचे वक्तव्य दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना या गोष्टीबद्दल काहीच माहित नव्हते त्यांनी सांगितले की, शिक्षिकेची तब्येत बिघडली असावी आणि तिने मुलांना मदत करण्यास सांगितले असावे .परंतु या प्रकरणात त्या महिला शिक्षिकेवर कारवाई करावी असे म्हणण्यात आलेले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनावर मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणी त्या शिक्षिकेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या वायरल व्हिडिओमुळे आता शिक्षकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांसोबत प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेले आहे.

MPSC Group B Bharti 2024 | MPSC गट-ब अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

MPSC Group B Bharti 2024

MPSC Group B Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत झालेला आहे. अनेक लोक हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. तर त्याच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब (MPSC Group B Bharti 2024)यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक” या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 480 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | MPSC Group B Bharti 2024

या भरती अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 480 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण | MPSC Group B Bharti 2024

या भरती अंतर्गत जर तुमचे निवड झाली, तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

  • खुला वर्ग – रु. 719/-
  • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 449/-

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

14 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | MPSC Group B Bharti 2024

4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा | MPSC Group B Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळण्यास सुरुवात; चेक करा तुमचे नाव

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. आणि त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे देखील आलेले आहेत. त्यानंतर राज्यातील 65 वर्षे वय तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवलेली आहे.या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी कोल्हापूर मधून करण्यात आलेला आहे.

सरकार सह्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत (Mukhyamantri Vayoshri Yojana ) पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना 3 हजार रुपये देण्यात आलेले आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाख 23 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत. यातील कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या पैशातून त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करता याव्यात. तसेच मन स्वस्थ केंद्र इत्यादी शिबिरामध्ये सहभागी होता यावे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांनी या वयोश्री योजनेची सुरुवात केलेली आहे. आणि राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ? | Mukhyamantri Vayoshri Yojana

ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या साठीच केंद्र सरकारच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग दुर्बल, ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक सहाय्यतेसाठी उपकरणे आणण्यासाठी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेची पात्रता आणि निकष

या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांची 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या व्यक्तीचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त आहे गरजेचे आहे. आधार कार्ड नसल्यास ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळख कागदपत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे एक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. या योजनेत एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असणार आहे.

पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून आलेले तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेले उपकरणे देत असे. मन स्वस्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र हे 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त तसेच समाज कल्याण विभागाकडे द्यायचे आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र तसेच इतर अन्य कागदपत्रे देणे गरजेचे आहे.

Weather Update | आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; पुढील 4 दिवस पावसाचे वातावरण कायम

Weather Update

Weather Update | सध्या संपूर्ण देशात नवरात्रीची धामधूम सुरू झालेली आहे. दसरा देखील अगदी तोंडावर आलेला आहे. आणि अशातच संपूर्ण राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस झालेला आहे तसेच रात्री नऊ वाजल्यापासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि पाणी देखील साठलेले आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे.

त्याचप्रमाणे आता दसरा आलेला आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी मुंबईसह इतर अनेक राज्यांमध्ये राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा असतो. परंतु आता या दसरा मेळाव्यावर पावसाचे संकट आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आझाद मैदानावर दसरा मेळावा घेणार आहे. परंतु आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांच्या या कार्यक्रमावर देखील त्याचा परिणाम होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यतः कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग मराठवाडा या भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे. त्याचप्रमाणे ठाणे, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, दादर, वरळी, अंधेरी, वांद्रे या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आणि पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने आज 11 ऑक्टोबर रोजी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह पूर्व उपनगर, नवी मुंबई, रायगड यांसारख्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

मालवण समुद्रावर रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या बायोल्युमिनेसन्सचा चमत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रकिनारा म्हटलं की, लोकांना भारावून टाकणाऱ्या कोकणाची आठवण होते. कोकणाला 720 किमी चा समुद्र किनारा लाभलेला असून , तेथे अनेक समुद्र आहेत . त्यामुळे बरेच पर्यटक कोकणाला भेट देताना दिसतात. रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र पाहणाऱ्यांची गर्दी प्रचंड आहे. पण असाच अनुभव जर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर मिळत असेल तर लांब जाण्याची गरज नाही . मालवणमध्ये काही वेळा रात्रीच्या वेळेस हे अद्भुत दृश्य पाहायला मिळते. पाण्याच्या लाटांमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाण्यात हात घातल्यामुळे पाण्याभोवती निळसर प्रकाश निर्माण होतो, जणू काही समुद्र चमकत आहे. हा अनुभव पर्यटकांसाठी आनंद देणारा क्षण ठरतो . तर आज आपण कोणते समुद्र अंधारात चमकतात हे पाहणार आहोत.

मालवण बायोल्युमिनेसेंटसाठी प्रसिद्ध

अंधारात चमकणाऱ्या समुद्रामध्ये केरळमधील वर्कला समुद्र किनारा ,अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीच, गोव्यातील पालोलेम बीच आणि महाराष्ट्रातील मालवणमधील तारकर्ली आणि देवबाग या समुद्रकिनाऱ्यांवर असाच नजारा पाहण्यास मिळतो . रात्रीच्या वेळेस हे समुद्र निळ्या-हिरव्या उजेडाने अगदी पर्यटकांना भारावून टाकतात. रात्री ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या या अद्भूत समुद्रात जणू तारेच अवतरले आहेत असे वाटते. मालवणमध्ये देखील असाच अनुभव मिळतो . हा समुद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून , सिंधुदुर्गला 120 किमी समुद्र लाभलेला आहे . मालवण समुद्रकिनारा सूर्यास्त आणि बायोल्युमिनेसेंट पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे रात्रीच्या वेळी अनेक पर्यटक बोटीतून सफर करताना दिसतात.

एक वैज्ञानिक कारण

मालवणातील समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या दृश्याला एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन . या फायटोप्लँक्टनचे प्रकाश उत्सर्जन हा एक निसर्गाचा चमत्कार आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी समुद्राचे पाणी चमकू लागते. ज्यात काही सूक्ष्मजीव स्वतःहून प्रकाश उत्पन्न करतात. हे सूक्ष्मजीव त्यांच्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे प्रकाश निर्माण करतात. जेव्हा या जीवांना समुद्राच्या लाटांमुळे किंवा पाण्याच्या हालचालींमुळे त्रास होतो, तेव्हा ते हा प्रकाश उत्सर्जित करतात. ही हालचाल जेव्हा जास्त प्रमाणात होते, तेव्हा अधिक बायोल्युमिनेसन्स तयार होतो, त्यामुळे पाण्याला चमकदार निळसर रंग येतो.

दृश्य कधी पाहण्यास मिळते

  • हे दृश्य प्रामुख्याने पावसाळ्यानंतर किंवा काही विशिष्ट हंगामात दिसते. यासाठी योग्य वातावरण आणि पाण्यातील फायटोप्लँक्टनचे प्रमाण महत्त्वाचे असते.
  • मालवण आणि इतर कोकणातील किनारे यासाठी प्रसिध्द आहेत. योग्य हंगामात या नैसर्गिक चमत्काराचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असते .
  • बायोल्युमिनेसन्स हे पर्यावरणातील एक अनोखे रसायनिक आणि जैविक प्रक्रिया असून, समुद्राच्या निसर्गसौंदर्यात भर घालताना दिसून येते .

Samrudhi Highway: समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाला मान्यता

Samrudhi Highway

Samrudhi Highway: महायुती सरकारचा महत्वपूर्ण रस्ते प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग.. समृद्धी महामार्ग आता जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये जवळपास 80 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाबाबतचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीमध्ये समृद्धी महामार्गाला (Samrudhi Highway) जोडणाऱ्या जालना ते नांदेड दुर्गती महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई-नांदेड 12 तासांचा प्रवास निम्म्यावर

याद्वारे शहरातील 226 किलोमीटरचे अंतर 179. ८ किलोमीटर एवढे कमी होईल. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा बारा तासांचा प्रवास निम्म्यावर येणार आहे. याबरोबरच परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यातून हा द्रुतगती मार्ग जाणार असून प्रस्तावित जालना नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडले जाणे अपेक्षित (Samrudhi Highway) आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची जोडण्यासाठी अतिरिक्त कनेक्टर आणि प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.जालना नांदेड ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा असाच एक कनेक्टर आहे जो नांदेड हिंगोली परभणी आणि जालना जिल्हाना राज्याची राजधानी मुंबई आणि पुढे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी प्रदान (Samrudhi Highway) करेल.

हा एक्सप्रेस वे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना येथून सुरू होतो आणि जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून नैऋत्यकडे जातो आणि नांदेड -देगलूर- तेलंगणा एन एच 161 वर संपतो. हा सहा लेनचा एक्सप्रेसवे डिझाईन वेग 120 किलोमीटर प्रति तास असेल आणि शंभर मीटर उजवीकडे असेल. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे (Samrudhi Highway) हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या बांधकामासाठी वीस मीटर जागेची तरतूद देखील या मार्गासाठी करण्यात आली आहे.