Saturday, December 27, 2025
Home Blog Page 425

PMGKAY : गरिबांचा दसरा गोड ! केंद्र सरकारकडून 4 वर्षे मिळणार मोफत धान्य, 17,082 कोटींची तरतूद

PMGKAY

PMGKAY : बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी उपक्रमांना मंजुरी दिली. यापैकी, मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदूळ पुरवठा सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, या उपक्रमासाठी ₹17,082 कोटी खर्च येणार आहे, जो संपूर्णपणे केंद्र सरकारकडून अर्थसहाय्यित आहे. विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

गरिबांसाठी मोफत तांदूळ वाटप

एप्रिल 2022 मध्ये, आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) मोफत तांदूळ उपक्रम टप्प्याटप्प्याने देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला, मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत हा उपक्रम तीन टप्प्यांत यशस्वीपणे राबविला गेला आहे.मोफत फोर्टिफाइड तांदळाच्या पुरवठ्यामुळे गरीबांमध्ये अशक्तपणा आणि अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता कमी होण्याचा महत्वपूर्ण उद्देश आहे.

कॅबिनेट बैठकीत याला मंजुरी

राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रस्ते विकास: 4,406 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह सीमावर्ती भागात 2,280 किमी रस्त्यांच्या बांधकामाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

नॅशनल मेरिटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स (NMHC) लोथल, गुजरात: या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता देखील मिळाली आहे आणि दोन टप्प्यात पूर्ण होईल. भारताचा समृद्ध सागरी वारसा प्रदर्शित करणे आणि जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) (2019-2021) नुसार, ॲनिमिया ही भारतातील एक प्रमुख आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे मुले, स्त्रिया आणि पुरुष सारखेच प्रभावित होतात. विशेषत: हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महत्त्वपूर्ण विजयानंतर, सरकारचा मजबूत तांदूळ उपक्रम महत्त्वाच्या वेळी आला आहे.

महाराष्ट्रसाठी विकासकामांची भेट

याशिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी महाराष्ट्रसाठी 7,600 कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट दिलीय. आज या योजनांची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पीएम मोदी यांनी 10 वैद्यकिय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले.

7 महत्वपूर्ण निर्णय

  • जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत PMGKAY अंतर्गत मोफत मजबूत तांदूळ पुरवठा सुरू ठेवणे .
  • उपक्रमाची किंमत: ₹17,082 कोटी, केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे निधी.
  • राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात ₹4,406 कोटी रुपये खर्चून 3 2,280 किमी रस्ते बांधले जाणार .
  • नॅशनल मेरिटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स (NMHC) लोथल, गुजरात येथे दोन टप्प्यात विकसित केले जाणार आहे.
  • फोर्टिफाइड तांदूळ वितरणाद्वारे अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे.
  • पीएम मोदींनी महाराष्ट्रात ₹ 7,600 कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.
  • महाराष्ट्रातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन.

CIDCO Lottery : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोच्या घरांची सोडत ? 15 घरांचे पर्याय देण्यात येणार

CIDCO Lottery Update

CIDCO Lottery : मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संस्था म्हणजे म्हाडा आणि सिडको… म्हाडासाठी 2030 घरांची सोडत आधीच जाहीर झाली आहे. मात्र सिडकोच्या लॉटरीची प्रतीक्षा ग्राहकांना लागून राहिली आहे. यापूर्वी 7 तारखेला सिडकोची लॉटरी जाहीर होणार असे सूतोवाच सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याकडून मिळाले होते. मात्र 7 तारखेला तर लॉटरी निघाली नाही. त्यामुळे वारंवार तारीख पुढे जात असल्यामुळे घर खरेदीदारांना प्रतीक्षा (CIDCO Lottery) लागून राहिली आहे.

असे असताना आता सोडत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यासाठी सिडको सज्ज झाल्याची माहिती आहे. त्याकरिता सिडकोकडून घर खरेदीदाराकडून सर्वप्रथम नोंदणी अर्ज मागविले जाणार आहेत. यामध्ये एकूण 67 हजार घरांपैकी 26 हजार घरांची सोडत (CIDCO Lottery) निघणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 11 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वाशी येथे महाराष्ट्र भवनच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडको घरांची सोडत काढण्याचा सिडकोचा निश्चय आहे. त्यादृष्टीने सिडकोचा मार्केटिंग विभाग व व्यवस्थापन विभाग घरांची सोडत काढण्यासाठी कार्यरत झाला असल्याची माहिती (CIDCO Lottery) आहे.

15 घरांचे पर्याय देण्यात येणार (CIDCO Lottery)

या सोडतीत ग्राहकाला आपल्या पसंतीचे घर निवडण्यासाठी 15 घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या पसंतीक्रमाला एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त होतील; त्या घरासाठी सोडत निघून विजेत्याला ते घर उपलब्ध होईल. त्यामुळे या घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत, पैसे भरण्याची मुदत, पसंतीच्या घरासाठी पर्याय निवडण्याची व सोडतीची मुदत आदींचे वेळापत्रक सिडको जाहिरातीत नमूद करणार आहे.

कोणत्या भागात मिळणार घरे ? (CIDCO Lottery)

या लॉटरी मध्ये 13 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यातील सर्वाधिक जवळपास 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. खांडेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. तसेच जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही.

Breakfast Skipping Side Effects | सकाळी नाश्ता न करणे आरोग्यासाठी धोकादायक; होऊ शकतात हे गंभीर आजार

Breakfast Skipping Side Effects

Breakfast Skipping Side Effects | आजकाल धावपळीच्या जगामध्ये माणूस खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. सकाळी कामाला जाण्याची घाई असते. त्यात सकाळी घरात सगळं आवरून जाताना अनेक वेळा लोक नाष्टाही करत नाही. आणि तसेच ऑफिसला जाताना आणि थेट दुपारी जेवतात. परंतु याचा तुमच्या आरोग्यावर मोठ्या परिणाम होतो. आणि तुम्हाला अनेक आजारांचा धोका वाढतो. कारण तुम्ही रात्री जेवलेले असता. त्यामुळे सकाळी उठून जेवणे खूप गरजेचे असते. अन्यथा तुमच्या शरीरातील ऍसिडचे प्रमाण वाढते. सुरुवातीला तुमच्या शरीराला खूप हळूहळू प्रॉब्लेम दिसतात. परंतु जर तुम्ही नाष्टा केला तर तुमच्या शरीराला ऊर्जा देखील मिळते आणि फिटनेस चांगला राहतो. आता जर तुम्ही सकाळी नाष्टा केला नाही तर तुमच्या आरोग्याला कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मधुमेह | Breakfast Skipping Side Effects

सकाळी नाश्ता न केल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. न्याहारी न केल्याने चक्कर येणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

प्रतिकारशक्ती कमकुवत होते

सकाळी नाश्ता न केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शरीरावर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. पोट जास्त वेळ उपाशी ठेवल्याने पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

लठ्ठपणा वाढतो

नाश्ता वगळल्याने लठ्ठपणा वेगाने वाढू शकतो. जे लोक न्याहारी सोडून दुपारचे जेवण थेट खातात, त्यांचे वजन झपाट्याने वाढते, यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणा हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

चयापचय मंद होते

नाश्ता न केल्याने चयापचय मंदावतो आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. मंद चयापचयमुळे, शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते आणि एखाद्याला अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वजनही वाढू शकते.

मायग्रेन

नाश्ता न केल्यामुळे अनेकांना मायग्रेन होऊ शकतो. जास्त वेळ उपाशी राहिल्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. यामुळे मायग्रेन देखील होऊ शकतो.

Richest Man In Pune : ‘ही’ आहे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; आलिशान घर,गाड्या आणि बरंच काही…

cyrus poonawalla

Richest Man In Pune : राज्यात सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या शहरांच्या यादीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. नोकरी, शिक्षण सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र पुणे त्याच्या श्रीमंतीसाठी सुद्धा ओळखले जाते. आता अशा या पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ? (Richest Man In Pune) याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहे.

पुण्यातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे. ‘सायरस पुनावाला’. काही दिवसांपूर्वी हुरून इंडिया कडून देशातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली होती. यातही सायरस यांचे नाव 4 थ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देशातील सर्वांचे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

कोरोना वरील लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे ते मालक आहेत. सायरस पूनावाला आणि कुटुंब 2.90 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या (Richest Man In Pune) चौथ्या क्रमांकावर आहेत.

कोविड-19 वर लस (Richest Man In Pune)

सिरम इन्स्टिट्यूट कडून कोरोना विरोधात लस तयार केली गेली. याबद्दल सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे. सिरम चे सीईओ आणि सायरस पूनावाला यांचा मुलगा आदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कोविड-19 वर लस तयार केली. कोविशील्ड असे या लसीचं नाव होतं आणि भारतात ही लस सर्वाधिक प्रमाणात (Richest Man In Pune) वापरली गेली.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असा जर प्रश्न पडला असेल तर पोर्ट, एअरपोर्ट पासून सिमेंट, ग्रीन एनर्जी सेक्टर मध्ये काम करणारे उद्योगपती गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अशी यातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्येही ह्यांचं नाव सर्वात पुढे आहे. त्यांची संपत्ती ही 10.14 लाख कोटी इतकी आहे तर एचसीएल टेक्नॉलॉजी चे फाउंडेशन 3.14 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सिरम इन्स्टिट्यूट चे मालक सायरस पूनावाला हे या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर (Richest Man In Pune) आहेत.

Horticulture Scheme 2024 | छतावर बागकामासाठी सरकार करणार 7,500 रुपयांची मदत; अशाप्रकारे घ्या योजनेचा लाभ

Horticulture Scheme 2024

Horticulture Scheme 2024 | सरकारकडून विविध योजना आणल्या जातात. अशातच आता बागायत दारांसाठी देखील विविध उत्कृष्ट योजना सरकारकडून येत असतात. जेणेकरून त्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. यासाठीच आता बिहारच्या राज्य सरकारकडून बागायतदारांसाठी पॉट स्कीम चालू करण्यात आलेली आहे. ही योजना 2024 – 25 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बागायतदारांना छतावर लागवड करण्यासाठी 7500 रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाईल. सरकार ही योजना अशाच लोकांसाठी राबवत आहे. ज्यांच्या छतावर भरपूर मोकळी जागा आहे. आणि त्यांना बांधकाम करायची इच्छा आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे. आता या योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

या जिल्ह्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे | Horticulture Scheme 2024

बिहार कृषी विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॉट योजनेचा लाभ बिहारच्या पाटणा, गया, मुझफ्फरपूर आणि भागलपूरच्या शहरी भागात राहणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. 10,000 रुपयांच्या पॉटच्या युनिट किंमतीवर, सरकार या शेतकऱ्यांना 7,500 रुपयांपर्यंत सबसिडी देईल. जेणेकरून गमला योजनेंतर्गत बिहारचे शेतकरी शेतीत नावीन्य आणू शकतील आणि मर्यादित भागातही ताज्या भाज्या आणि फळे पिकवू शकतील.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्हालाही राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला बागायत संचालनालय, कृषी विभाग, बिहारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. याशिवाय शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते त्यांच्या जवळच्या कृषी विभागाकडून शासनाच्या या योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती मिळवून सहज अर्ज करू शकतात.

Copper Water Benefits | तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी आहे वरदान; होतात हे फायदे

Copper Water Benefits

Copper Water Benefits | आपल्या आरोग्यासाठी आपण चांगल्या सवयी आत्मसात करणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले आणि सकाळी उठून हे पाणी पिले, तर त्यामुळे तुमच्या आरोग्यास खूप जास्त फायदे होतात. त्याला कॉपर वॉटर बेनिफिट्स (Copper Water Benefits) असे म्हणतात. जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे नसेल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. तांब्याच्या संपर्कात असताना काही कण पाण्यात विरघळतात. ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. आता आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.

उच्च रक्तदाबावर फायदेशीरm| Copper Water Benefits

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो आणि उच्च रक्तदाबाची समस्याही दूर होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब सारख्या समस्यांनी त्रस्त असाल, तर तुम्ही दररोज सकाळच्या दिनचर्येचा भाग बनवू शकता.

वृद्धत्वाची प्रक्रिया मंद

वाढत्या वयाबरोबर शरीरातील इलास्टिन आणि कोलेजनचे उत्पादन कमी होऊ लागते, त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करायची असेल आणि तुमच्या वयानुसार तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल, तर तुम्ही या पाण्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकता.

वजन कमी करण्यास उपयुक्त

व्यस्त जीवनशैलीत, लोक बऱ्याचदा अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी लागू करतात, ज्यामुळे वजन वेगाने वाढते. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी समाविष्ट करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, तांब्याच्या संपर्कामुळे काही घटक पाण्यात विरघळतात जे आपल्या शरीरातील चयापचय गती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारते ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी सहज जळू लागते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात प्रभावी

तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तरीही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. होय, ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे आजारी पडण्याची वारंवारता कमी होते.

सांधेदुखीपासून आराम

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी देखील सांधेदुखीपासून मुक्त होण्यास खूप मदत करते. ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे ज्यामुळे संधिवात आणि संधिवात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो.

टनाना sss टनानाsss ! गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी; घराची किंमत ऐकून व्हाल अवाक

gaurav more

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपलं स्वतःचा हक्काचा घर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते मात्र त्यातल्या काहीच जणांची इच्छा पूर्ण होते. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांना म्हाडाची लॉटरी म्हणजे सुवर्णसंधी असते. या संधीचं सोनं करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. यामध्ये मग पत्रकार ते अगदी मोठमोठे कलाकार यांचा देखील समावेश असतो. यंदाच्या मुंबई म्हाडा लॉटरीसाठी 2030 घरांची निवड करण्यात आली होती. या घरांसाठी अनेकांनी पसंती दर्शवली होती. शिवाय तब्बल 13,4350 अर्ज म्हाडाला प्राप्त झाले होते. म्हाडाच्या एका घरासाठी तब्बल 27 कलाकारांनी अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे याला म्हाडाची लॉटरी लागली आहे.

अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांनी पवई येथील घरासाठी म्हाडा लॉटरीचा अर्ज भरला होता. पवई मधील म्हाडाच्या उच्च श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घराची किंमत जवळपास एक कोटी 76 लाख रुपये आहे.

कोणत्या कलाकारांना मिळाले घर?

मुंबईतल्या गोरेगाव येथील म्हाडाच्या घरासाठी तब्बल 27 कलाकारांनी अर्ज केला होता. त्यामध्ये बिग बॉस मराठी मधील एका पर्वाचा विजेता विशाल निकम, लेखक निर्माता निपुण धर्माधिकारी, अभिनेत्री गौतमी देशपांडे, नारायण शास्त्री, अभिनेत्री किशोरी विज, रोमा बाली, तनया मालजी, अनिता कुलकर्णी संचित चौधरी, शेखर नार्वेकर यांनी अर्ज केला होता. त्यामधील गोरेगाव चे घर हे गौतमी देशपांडे या अभिनेत्रीला मिळाले आहे, त्याचप्रमाणे कन्नमवार नगर मधील घर हे महाराष्ट्राचे हास्य जत्रा फिल्म अभिनेता निखिल बने यांना मिळाले आहे. तर कन्नमवार नगर मधील घराची किंमत ही 40 लाख रुपये असल्याची चर्चा आहे. मात्र गौतमीच्या गोरेगाव मधील घराची किंमत अद्याप समोर आलेली नाही. बिग बॉस विजेता फेम अभिनेता शिव ठाकरे आणि गौरव मोरे यांच्या घराचे विशेष चर्चा सध्या रंगली आहे.

Diesel Cars: भारतात डिझेल वाहने होणार बंद ; सरकारची ब्लूप्रिंट तयार, काय आहे कारण ?

Diesel Cars

Diesel Cars: सणासुदीच्या मुहूर्तावर जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही डिझेल वाहन खरेदी करू इच्छित असाल तर थांबा…कारण भारत सरकार डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही तर त्यासाठीची ब्लूप्रिंट देखील सरकारने तयार केली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे 2027 पासून डिझेल गाड्यांची विक्री (Diesel Cars) करता येणार नाही.

म्हणून डिझेल वाहनांवर बंदीचा निर्णय (Diesel Cars)

भारतातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढीमुळे वायू प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. हे लक्षात घेता, ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने 2027 पर्यंत सर्व डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे. डिझेल वाहने नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर हानिकारक पदार्थ उत्सर्जित करतात, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढते. त्यामुळे माती आणि पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे बनवत आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधाही (Diesel Cars) विकसित करत आहे.

कोणत्या शहरांत बंदी ? (Diesel Cars)

ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे आणि लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शहरांमध्येच सरकारचा हा प्रस्ताव लागू केला जाणार आहे. यासोबतच 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनेही या बंदीच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. ही बंदी पेट्रोलवर चालणाऱ्या काही वाहनांनाही लागू होऊ शकते.

जर तुम्ही डिझेल कार घेण्याचा विचार करत असाल, तर हे निर्बंध येत्या काळात लागू होऊ शकतात हे (Diesel Cars) लक्षात ठेवा. नुकतेच रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही डिझेल कार उत्पादकांना या गाड्यांचे उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे.

RBI MPS Meeting | EMI कमी होणार का ? RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय

RBI MPS Meeting

RBI MPS Meeting | रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नेहमीच वेगवेगळे बदल करत असते. अशातच आता आरबीआयच्या पतधोरण बैठकीचा आज म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. या वेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी रेपोदराबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. यावेळी देखील त्यांनी रेपो दरात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये शेवटचा रेपो दर बदलला होता. हे दर 0.25 टक्क्यांनी वाढून 6.5% केलेले होते. आणि हे तेव्हापासून रेपोदर स्थिर राहिलेला आहे.

रेपोदर म्हणजे काय | RBI MPS Meeting

जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता आणि व्याजासह त्याची परतफेड देखील करता येते. त्याचप्रमाणे सार्वजनिक खाजगी आणि व्यवसायिक क्षेत्रातील बँकांना देखील त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर बँकांकडून किंवा आरबीआयकडून कर्ज घेणे गरजेचे असते.

यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडिया या बँकांना व्याजदराने कर्ज देते. आणि त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दर कमी झाला की सर्वसामान्य जनतांना दिलासा मिळतो. तर रेपोज दर वाढला तर सर्वसामान्यांना आर्थिक भार वाढतो. रेपो दर वाढला की, बँकांना देखील जास्त व्याजदराने कर्ज मिळते आणि सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होते.

जीवा महागाई खूप जास्त असते. तेव्हा आरबीआय अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह हा कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते. सहसा रेपोदरामध्ये 0. 50 किंवा त्यापेक्षा कमी दराने वाढ केली जाते. परंतु जेव्हा अर्थव्यवस्था जास्त वाईट टप्प्यातून जाते. तेव्हा पुनर्प्राप्तीसाठी पैशांचा प्रवाह वाढवावा लागतो. अशावेळी आरबीआय ही रेपोदर कमी करते. आणि गरज नसेल तर तसा स्थिर ठेवते.

सध्या महागाईत देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि बाजारातील मालाची मागणी देखील कमी होत आहे. याचा समतोल राखण्यासाठी रिझर्व्ह बँक बैठक घेत असते. यावेळी आरबीआयच्या सहा सदस्य टीमने पॉलिसी रेट मधील बदलाबाबत मौद्रिक धोरण बैठकीद्वारे चर्चा केलेली आहे.

पाटबंधारे प्रकल्पाला मिळणार मृत प्रकल्पग्रस्तांचे वारस ; अशाप्रकारे होणार नोंदणी

महाराष्ट्रातील महायुती सरकार आल्यापासून अनेक नवनवीन बदल होताना दिसत आहे. अधिक प्रकल्पाची तसेच योजनांची वाढ होत आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने पाटबंधारे प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित केलेल्या आहेत. आणि या जमिनी ऐवजी शेतकऱ्यांना रोख रक्कम दिली जाते किंवा त्यांना पर्यायी जमीन दिली जाते.

परंतु या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन घेताना काही मृत झालेल्या शेतकऱ्यांमुळे त्यांचे काही वारस असतील. त्यांना सरकारच्या माध्यमातून मोबदला मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत आहे. यातील सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे या प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त वारस लागत आहेत. आणि यामुळेच यातील एखादा वारस नियमानुसार पर्यायी जमिनीचे 65 टक्के मूल्य भरतो आणि त्याला जमिनीचा मोबदला आपल्या नावावर करून घेतो परंतु इतर वारसांना या बदल्यात काहीही मिळत नाही.

त्यामुळे आता या अशा प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पामध्ये ज्यांना जमिनी दिले आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना मोबदला म्हणून रोख रक्कम किंवा वेगळी जमीन दिली जात आहे परंतु प्रकल्पग्रस्ताचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या वारसांना जमिनीचा मोबदला देता यावा यासाठी मृत प्रकल्पग्रस्तांचे वारसा या नावाने जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यात आलेला आहे. यामुळे आता जमीन वाटपाचे काम रखडले आहे आणि त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

समजा जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याला एकापेक्षा जास्त वारस असतील परंतु त्या वारसांमध्ये वाद असतील तर कायद्याचे वारसाचे पत्र दिवाणी न्यायालयातून मिळावावे लागणार आहे आणि यामुळे न्यायालयात जाण्याचा खर्च आणि वेळ देखील वाचणार आहे. जर एकापेक्षा जास्त वारस असल्या तर वारसांपैकी एखादा वारसा नियमानुसार पर्यायी जमिनीचे 65 टक्के मूल्य भरून जमिनीचा मोबदला आपल्या नावावर करून घेऊ शकतो.