Saturday, December 27, 2025
Home Blog Page 427

मुंबईकरांना मेट्रो -3 भावली ! पहिल्याच दिवशी 15 हजार प्रवाशांनी केला प्रवास

mumbai metro 3

मुंबईच्या धकाधकीत काल दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मुंबईकरांनी पहिल्या भूमिगत मेट्रोमधून सफर करीत आनंद घेतला. अगदी पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी मेट्रोला दमदार हजेरी लावली असून मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल 15 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. नव्या मेट्रोमुळे लोकलच्या धक्क्यापासून साहजिकच मुंबईकरांची सुटका होणार आहे. शिवाय रत्यावरील वाहनांची गर्दी सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे.

15 हजार प्रवाशांनी मेट्रोने केला प्रवास

पहिल्या दिवशी तब्बल 15 हजार 713 मुंबईकरांनी बीकेसी ते आरे या प्रवासमार्गावरून प्रवास केला. मेट्रो- 3 च्या पहिल्या टप्प्याच्या मार्गामुळे आता मुंबईकरांच्या सेवेत 59 किमी अंतराचे मेट्रो जाळे दाखल झाले आहे. मुंबई महानगरात जवळपास 337 किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे.

33.5 किमी लांबीची भूमिगत मेट्रो लाइन

मुंबई मेट्रो 3, ज्याला कुलाबा-वांद्रे-सीप्झ लाईन म्हणूनही ओळखले जाते, ही 33.5 किमी लांबीची भूमिगत मेट्रो लाइन आहे – यापैकी फक्त 12.44 किमीचा भाग लोकांसाठी खुला केला जाईल. हे ₹32,000 कोटींहून अधिक खर्च करून विकसित केले गेले आहे.

मेट्रो मार्गामध्ये 10 स्थानके

या मेट्रो मार्गामध्ये 10 स्थानके आहेत आरे, मरोळ नाका, CSMIA T1 (टर्मिनल 1), MIDC, SEEPZ, सहार रोड, CSMIA T2 (टर्मिनल 2), विद्यानगरी, धारावी आणि BKC. यातील नऊ स्थानके भूमिगत आहेत, तर आरे स्थानक हे या खंडातील एकमेव दर्जाचे (ग्राउंड) स्टेशन आहे.

85 किमी प्रतितास

एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर एकूण ९६ रोजच्या फेऱ्या केल्या जातील. प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये 2,000 प्रवासी बसू शकतात. 35 किमी प्रतितास या सरासरी धावण्याच्या गतीसह, लाईन कमाल 85 किमी प्रतितास वेगाने कार्य करण्यासाठी सेट आहे.

किती असेल भाडे ?

मुंबई मेट्रो लाइन 3 आठवड्याच्या दिवशी सकाळी 6:30 ते रात्री 10:30 पर्यंत आणि आठवड्याच्या शेवटी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 पर्यंत काम करेल. भाडे ₹10 ते ₹50 पर्यंत असेल. प्रवासी ॲपद्वारे किंवा प्रत्यक्ष काउंटरवर मेट्रोची तिकिटे खरेदी करू शकतात. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड देखील पुढील महिन्यापर्यंत शहरातील सर्व मेट्रो मार्गांवर वैध असेल.

गावखेड्यातील बस सेवेला मिळणार गती ; महामंडळाच्या ताफ्यात 2 वर्षांत 11,260 गाड्या येणार

ST buses

राज्यभरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये ST बसेसचा मोलाचा वाटा आहे. आजदेखील गावखेडी आणि वाड्यावस्त्यांवर ST ची सेवा पुरवली जाते. त्यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होत असतो. आता परिवहन महामंडळातील बसेसनी कात टाकायला सुरुवात केली असून ST च्या थंडगार आणि इलेकट्रीक बसेसचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे ST वर रुसलेला प्रवासी पुन्हा ST कडे वळू लागला आहे. अशातच आता येत्या दोन वर्षात 11,260 गाड्या येणार ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे.

यामध्ये 5250 इलेक्ट्रिक बस चा समावेश आहे. यातील काही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर उरलेल्या गाड्या ह्या लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई सह राज्यातील एसटी बसची सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

तसे पाहायला गेल्यास एसटीच्या पूर्वी 18000 बस गाड्या होत्या. मात्र त्यातील काही गाड्या ह्या मोडकळीस आल्यामुळे, त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे रद्द करण्यात आल्या, भंगारात काढण्यात आल्या. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 14000 बसेस आहेत. मात्र आता यामध्ये आणखी गाड्यांची भर पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामंडळांना इलेक्ट्रिक बसेस सोबतच साध्या गाड्या वाढवण्यावर सुद्धा भर दिलाय. टप्प्याटप्प्याने राज्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यापैकी 60 बस आधीच एसटी मंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झाले आहेत. ई शिवनेरीच्या शंभर बस पैकी 86 बसेस ताफ्यात आहेत. तर उर्वरित बस काही दिवसात येणार आहेत. शिवाय डिझेलवर चालणाऱ्या 6000 गाड्या येणार आहेत. यातील 2200 बसची वर्क ऑर्डर झाली असून टप्प्याने बसेस ताब्यात येणार आहेत. याशिवाय 2500 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 1310 साध्या बस खाजगी भाड्याने घेणार असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत या गाड्या एसटीच्या ताब्यामध्ये येणार आहेत.

मुंबई-काजीपेट दरम्यान चालवली जाणार ‘उत्सव विशेष ट्रेन’; जाणून घ्या वेळापत्रक

utsav special train

भारतामध्ये सण आणि उत्सवांना अधिक महत्व आहे. मोठ्या उत्साहात भारतभरात सण साजरे केले जातात. सणासुदीच्या काळात अनेकजण आपल्या प्रियजनांच्या भेटी घेत असतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहिलेले लोक आवर्जून आपल्या गावाकडे येतात. या काळात रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवासी आधीच रिजर्वेशन करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा रेल्वेकडून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. आजच्या लेखात आपण याच संदर्भात माहिती घेणार आहोत.

मुंबईहून काजीपेटला जाण्यासाठी रेल्वेने खास सोय केली आहे. याच बाबतची माहिती आज या लेखात घेणार आहोत. मुंबई-काजीपेट दरम्यान विविध स्थानकांवर ही गाडी थांबे घेणार असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया https://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकता. किंवा NTES ॲप डाउनलोड करून या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेऊ शकता.

कसे असेल वेळापत्रक ?

07196 / 07195 दादर – काजीपेट साप्ताहिक विशेष (१० सेवा)

07196 साप्ताहिक विशेष गाडी दि. १७.१०.२०२४ ते २८.११.२०२४ पर्यंत दर गुरुवारी दादर येथून १५.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता काजीपेट येथे पोहोचेल. (५ सेवा) तर 07195 साप्ताहिक विशेष गाडी दि. १६.१०.२०२४ ते २७.११.२०२४ पर्यंत दर बुधवारी काजीपेट येथून १७.०५ वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (५ सेवा)

थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिंगमपेट जगित्याल.

07198 / 07197 दादर -काजीपेट साप्ताहिक विशेष – बल्लारशाह मार्गे (१६ सेवा)

07198 साप्ताहिक विशेष दि. १३.१०.२०२४ ते ०१.१२.२०२४ पर्यंत दर रविवारी दादर येथून १५.२५ वाजता सुटेल आणि काजीपेट येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. (८ सेवा) तर 07197 साप्ताहिक विशेष गाडी दि. १२.१०.२०२४ ते ३०.११.२०२४ पर्यंत दर शनिवारी काजीपेट येथून ११.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (८ सेवा)

थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिर्याल, पेड्डापल्ली आणि जम्मीकुंटा.

कशी असेल ट्रेन संरचना

या दोन्ही विशेष गाड्यांच्या संरचनेबद्दल सांगायचे झाल्यास या गाडीला २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ गार्ड्स ब्रेक व्हॅन. उपलब्ध असेल.

कसे कराल आरक्षण

उत्सव विशेष ट्रेन क्रमांक 07196 आणि 07198 सेवांचे बुकिंग विशेष शुल्कासह आरक्षण ०८.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच https://www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

ट्रेन सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी मिळवा कन्फर्म सीट, काय आहे तिकीट बुकिंगचा फंडा ?

confirm seat in train

भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. अशात जर सण -उत्सव असेल तर विचारूच नका. महिनाभर आधी प्रवाशांना बुकिंग करावे लागते. तर कुठे सीट उपलब्ध होते. भारतीय प्रवाशांची हेच गरज लक्षात घेता रेल्वेकडून देखील विविध सुविधा पुरवल्या जातात. सणासुदीच्या काळात तुम्हाला देखील ऐन वेळेला कन्फर्म तिकीट पाहिजे असेल तर काय करावे लागेल ?

याशिवाय पण जर तुम्हाला कुठेतरी अचानक इमर्जन्सी जायचे असेल, तर तत्काळ तिकीट बुकिंग हाच एकमेव पर्याय आहे. तथापि, यासाठी देखील तुम्हाला बुकिंग 1 दिवस आधी करावे लागते. तत्काळ तिकीट मिळवणे तितके सोपे नाही, कारण तत्काळ विंडो उघडताच आणि सामान्य प्रवासी तत्काळ बुक करण्याचा प्रयत्न करतात, पुढच्या मिनिटात बुकिंग एजंट सर्व तत्काळ तिकिटे बुक करतात. इतकेच नाही तर प्रवाशांना सामान्य तिकिटांपेक्षा तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ साठी जास्त किंमत मोजावी लागते. अशा परिस्थितीत करायचे काय ?

असे मिळू शकेल कन्फर्म तिकीट

सध्याच्या तिकीट बुकिंगद्वारे तुम्ही शेवटच्या क्षणी ट्रेनमधील रिकाम्या सीटवर बसून सहज प्रवास करू शकता. हा रेल्वेचा नियम आहे ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनने प्रवास करण्यासाठी रेल्वेच्या IRCTC करंट बुकिंग सेवेचा आनंद घेऊ शकता.

ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी राहू नये यासाठी रेल्वेने चालू तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. ट्रेन सुटण्यापूर्वी करंट तिकिटे दिली जातात. ट्रेनमध्ये काही जागा रिकाम्या राहिल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. या जागा रिकाम्या राहू नयेत आणि ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी या जागा बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करंट तिकिट बुकिंग

करंट तिकिटांचे बुकिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येते. तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे तिकीट आरक्षण काउंटरवरून म्हणजे ट्रेन सुटण्याच्या 3-4 तास आधी तिकीट खिडकीवरून सध्याच्या रेल्वे तिकीटाची उपलब्धता सहज तपासू शकता. साधारणपणे, करंट तिकिटांचे बुकिंग ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी सुरू होते. ट्रेनमधील बर्थ रिकामा असेल तेव्हाच चालू तिकीट मिळते. आपत्कालीन परिस्थितीत हे तिकीट अतिशय उपयुक्त आहे. करंट तिकिटाची खास गोष्ट म्हणजे ट्रेन सुटण्याच्या 5-10 मिनिटे आधी तुम्ही ते बुक करू शकता. करंट तिकीट बुकिंग वेळेद्वारे कन्फर्म तिकीट मिळवणे तत्काळ तिकीट मिळवण्यापेक्षा सोपे आहे. करंट तिकिटाची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला ते सामान्य तिकिटापेक्षा 10-20 रुपयांनी स्वस्त मिळते.

दिलासादायक ! डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार

demu train pune

राज्यातलं दुसरं मोठं शहर म्हणून पुण्याचा उल्लेख केला जातो. नोकरी शिक्षण याकरिता पुण्यामध्ये येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यातच पुणे शहरापासून आजूबाजूच्या परिसरातून देखील लोक दररोज कामानिमित्त पुण्यात येत असतात. दौंड ते पुणे असा प्रवास हजारो प्रवाशांकडून केला जातो. याच प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. खरं तर दौंड ते हडपसर या मार्गावर डेमू ट्रेन धावते. आता ही ट्रेन पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे दौंड वरून पुण्यापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी ही ट्रेन केवळ हडपसर पर्यंतच धावत होती. त्यामुळे पुन्हा हडपसर वरून पुण्यामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. मात्र आता ही डेमू ट्रेन थेट पुण्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांनी डेमू ट्रेन हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर ही प्रवाशांची मागणी मान्य केली गेली आहे. त्यामुळे दौंड ते हडपसर ही डेमू ट्रेन आता पुणे रेल्वे स्थानकांपर्यंत धावणार आहे. याबाबतची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना कुल यांनी सांगितले की, दौंड स्थानकावरून सकाळी 6:10 वाजता सुटणारी 01522 डिझेल (DMU LOCAL) रेल्वे हडपसर (मुंढवा) पर्यंतच असल्याने हजारो विद्यार्थी, चाकरमानी, कर्मचारी व महिलांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. ही डेमू हडपसर ऐवजी पुणे स्टेशन पर्यंत नेण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी होती. आता 01522 रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी 6:05 वाजता सुटेल.आता 01522 रेल्वे ही गाडी दौंड स्टेशन वरून सकाळी 6:05 वाजता सुटेल.

याबाबत रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेच्या दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी दौंड रेल्वे स्टेशन येथे भेट दिली त्यावेळी केली होती, तसेच आपण याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. 01522 – दौंड – हडपसर डेमू पुण्यापर्यंत नेण्याची मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचेकडे दिल्ली येथे भेट घेऊन तसेच तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांचे दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने तसेच प्रवाशांच्यावतीने आभार मानतो. असे कुल म्हणाले.

Car Loan Interest Rate | कार लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; जाणून घ्या बँकेचे व्याजदर

Car Loan Interest Rate

Car Loan Interest Rate | प्रत्येक माणसाची आयुष्यात एक ड्रीम लिस्ट असते. आणि या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःची कार असणे. हे एक खूप मोठे स्वप्न असते. घरच्यांसोबत बाहेर जाताना वेळ घालवण्यासाठी आपली कार असावी. त्याचप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी कार खूप गरजेचे असते. परंतु कार घेणे सोपे नाही. पैशांचा विचार केला तर यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. आज काल अनेक बँका कार घेण्यासाठी कर्ज देत असतात. परंतु जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घेऊन कार घ्यायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून कार लोन हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. या कारणांचा कालावधी तीन ते पाच वर्षाचा असतो. परंतु हे कर्ज घेताना तुम्ही हे कर्ज लवकरात लवकर कसे फिटेल याचा विचार करा. कर्ज घेताना ते जास्त कालावधीसाठी घेऊ नका. कारण यामुळे व्याजाची रक्कम वाढत जाते. आणि त्यानंतर तुमच्यावर आर्थिक भर येतो. आता कर्ज घेताना कोणत्या बँकेचा व्याजदर किती आहे आणि प्रोसेसिंग फी किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

बँकेचा व्याजदर आणि प्रोसेसिंग फी | Car Loan Interest Rate

युनियन बँक ऑफ इंडिया | Car Loan Interest Rate

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार लोक घेणार असाल तर या बँकेचा व्याजदर हा 8.70% ते 10.45% एवढा आहे. त्याचप्रमाणे या बँकेची प्रोसेसिंग फि 1000 हजार रुपये एवढी आहे.

पंजाब नॅशनल बँक

कार लोन घेताना पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर हा 8.75 टक्के ते 10.6% एवढा आहे. तसेच या बँकेसाठी प्रोसेसिंग 1000 ते 15000 रुपये लागते.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत जर तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल, तर या बँकेचा व्यासदर 8.95% ते 12.70% एवढा आहे. तसेच 2 हजार रुपये ही या बँकेची प्रोसेसिंग फी आहे.

कॅनरा बँक

तुम्ही जर कॅनरा बँके अंतर्गत कार लोन घेत असाल तर या बँकेचा व्याजदर हा 8.70% ते 12.70% एवढा आहे. परंतु या बँकेला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी नाही.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया अंतर्गत जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर या बँकेसाठी तुम्हाला व्याजदर 85% ते 12.10% एवढे व्याजदर लागते. तसेच 1000 ते 5000 रुपये प्रोसेसिंग फी आहे.

एसबीआय बँक

एसबीआय बँक अंतर्गत जर तुम्ही कार लोन घेतले. तर यासाठी तुम्हाला 9.5% ते 10.10% एवढे व्याजदर मिळेल. तसेच या बँकेला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी नाही.

कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या | Car Loan Interest Rate

तुम्ही जर वरील बँकांमधून कर्ज घेतले तर त्याचा व्याजदर जास्त आहे. परंतु प्रोसेसिंग फी अगदीच कमी आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती आणि कार घेणे खरच गरजेचे आहे का? त्यानंतर तुमच्या इतर जीवनावर काय परिणाम करेल? या सगळ्याचा विचार करून कार खरेदी करा. कारण घेताना कर्जाचा कालावधी कमी ठेवा. नाहीतर तुम्हाला जास्त व्याजदर द्यावे लागेल.

Ayushman Bharat Yojana | आयुष्मान भारत योजनेचा विस्तार; वृद्धांचा समावेश होऊन ‘या’ आजारांचा होणार उपचार

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana | सरकार हे जनतेच्या प्रत्येक समस्येचा विचार करून त्यासाठी विविध योजना तसेच उपक्रम राबवत असतात. अनेक सामान्य तसेच अत्यल्प गटातील नागरिकांना वैद्यकीय सुविधांचा पुरवठा होत नाही. आणि तोच करण्यासाठी आता केंद्र सरकारने पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणली होती. आणि त्या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेअंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. आणि सरकारी याबद्दलच घोषणा देखील करणार आहे. या योजनेत सध्या काही निवडक आजारांवर उपचार करता येतो. परंतु आता या योजनेमध्ये काही असाध्य आणि इतर आजारांचा देखील समावेश होणार आहे.अल्झाईमर डिमेशिया तसेच इतर आजारांवर देखील या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणार आहे. सरकारने याबाबत अजून अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. परंतु लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांना देखील या योजनेमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या योजनेचा विस्ताराचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

माध्यमातून वृत्तानुसार आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या योजनेतील बदल करण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे अजून इतर व्याधी आजारांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात येणार आहे. वयोमानानुसार येणाऱ्या आजारपणांचा देखील समावेश असणार आहे. वय झाल्यानंतर लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर त्यांना योग्य उपचार घेता येत नाही. परंतु आता या आयुष्मान भारत योजनेमध्ये (Ayushman Bharat Yojana) या आजारांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत सध्या 25 आजारांचा समावेश आहे.

या योजनेत आता वयोवृद्धांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. वाढत्या वयानुसार येणाऱ्या आजारांवर उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात वयोवृद्धांच्या या आजारांवर जास्त लक्ष केंद्रित करता येणार आहेत. या योजनेत अशा अनेक आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान झाल्यावर आता या आजारांवर त्वरित उपचार मिळेल. यामध्ये स्ट्रोक हार्ड फेलियर, कॅन्सर, अल्झायमर यांसारख्या रोगांचा समावेश करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे आता आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) हेल्थ कार्ड 2025 पासून गुगल वॉलेटवर देखील मिळणार आहे. या योजनेचे फायदे डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत ही योजना चालू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गुगल सोबत या कामासाठी हात मिळवणी केलेली आहे.

HDFC Bank | दिवाळीआधी HDFC बँकेच्या ग्राहकांना धक्का; बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर

HDFC Bank

HDFC Bank | आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही नेहमीच बँकेबद्दलच्या अनेक नियम बदलत असते. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. अशातच आता रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली 7 ऑक्टोबरपासून एक आजपासून एक बैठक चालू झालेली असून, ही बैठक 9 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यामुळे चलन विषयक धोरण समितीच्या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. अमेरिकन पेट्रोल रिझल्ट व्याजदरात कपात केली आहे. आणि त्यानंतर भारतातही रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता आरबीआय कडून दिलासा मिळण्याआधी एचडीएफसी बँकेने त्यांच्या कर्ज दारात वाढ करण्यात किंवा निर्णय घेतलेला आहे.

एचडीएफसी (HDFC Bank )बँकेने त्यांच्या कर्जाचे दर 5 बेस पॉइंट पर्यंत वाढवलेले आहेत. त्यामुळे आता एचडीएफसी बँकेचे MCLR व्याजदर आता 9.10 ते 9.45 टक्के एवढे झालेले आहे. हे दर 7 ऑक्टोबर पासूनच लागू झालेले आहेत. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेने आता त्यांच्या सहा महिन्यांनी तीन वर्षाच्या कालावधीचा कर्जासाठी देखील व्याजदर वाढवलेले आहेत. हे व्याजदर पाच BPSअसणे वाढवलेले आहेत.

तसेच इतर मुदतीच्या कर्जावरील व्याजदर कायम राहणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. हा व्याजदर आता 9.10 आणि एका महिन्यासाठी 9.15 टक्के झालेला आहे तसेच तीन महिन्याच्या कालावधीसाठी MCLR हा 9.40 टक्क्यांवर 9.45 टक्के करण्यात आलेला आहे. त्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हा MCLR 9.30% करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 9.45% आहे तर दोन वर्षासाठी हा MCLR 9.40% होता तो आता 9.45% करण्यात आलेला आहे तर तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा MCLR 9.50% करण्यात आलेला आहे.

MCLR म्हणजे काय ? | HDFC Bank

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट हा एक किमान व्याजदर आहे. ज्यावर कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. हा भारतीय रिझर्व बँकेने सेट केलेला एक बेंच मार्क आहे. जो बँकांना गृह कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज घेण्यास ठरवण्यासाठी मदत करतो.

HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 | कोस्ट गार्ड क्षेत्र मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

HQ Coast Guard Mumbai Bharti 2024

HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक मुख्य संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटीएस, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 36 जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 12 ऑक्टोबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची अधिक सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | HQ Coast Guard Mumbai Bharti 2024

इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटीएस, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 36 रिक्त जागा आहेत त्या आणि त्या भरण्यासाठी अर्ज करायचे आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भारती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

द कमांडर कोस्ट गार्ड रिजन पश्चिम वरळी सी फेस p.o. वरळी कॉलनी मुंबई 400030

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही दिलेल्या कागदपत्रासोबत अर्ज भरायचा आहे.
  • 12 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
    या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Konkan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी, भरल्या जाणार इतक्या जागा

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024| नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कारण आता कोकण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 190 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. त्याप्रमाणे 2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Konkan Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या एकूण 190 रिक्त जागा आहेत.

अर्ज पद्धती

भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे BE किंवा B. TECH शिक्षण झाले असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा | Konkan Railway Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
2 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.