Saturday, December 27, 2025
Home Blog Page 428

CM Annapurna Yojana | या महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत; जाणून घ्या नवी योजना

CM Annapurna Yojana

CM Annapurna Yojana | राज्य सरकारने राज्यातील सगळ्या नागरिकांचा विचार करून विविध योजना आणलेल्या आहेत. त्यातही महिलांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. या आधीच महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. अशातच आता महिलांसाठी सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले आहे. आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आत्तापर्यंत घरातील गॅस जोडणी ही पुरुष सदस्याच्या नावावर होती. त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता सरकारने या योजनेत बदल करून हा लाभ महिलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

काय आहे सरकारची अन्नपूर्णा योजना | CM Annapurna Yojana

सरकारच्या या नवीन अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जातात. या योजनेचा उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करता यावा. आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेता यावी हा आहे. आतापर्यंत घरातील गॅस कनेक्शन पुरुष सदस्याच्या नावावर होती. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ नव्हता. परंतु आता सरकारने या योजनेत बदल करून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेले कनेक्शन स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याची सुविधा केलेली आहे.

या योजनेचा उद्देश | CM Annapurna Yojana

सरकारने ही अन्नपूर्णा योजना काढलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच महिलांना आता स्वच्छ इंधनाचा वापर करता येईल. तसेच त्यांचे आरोग्य देखील सुधारेल. तसेच या निर्णयामुळे जास्तीत जास्त महिलांना या गॅस सिलेंडरचा लाभ होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक बचत देखील केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असलेली स्वतःच्या नावावर हस्तांतरित करावी. आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळेल.

Weather Update | विजांच्या कडकडाटासह राज्यातील ‘या’ भागांत पुढील 24 तासात होणार मुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रुद्र अवतार धारण केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देखील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे हा पाऊस 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस होणार आहे. तसेच या ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल, परंतु विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे राज्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे. पावसाचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. त्याचप्रमाणे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढ झालेली आहे. विदर्भापासून ते मुंबई पर्यंत देखील खूप जास्त तापमान वाढ झालेली दिसत आहे. परंतु आता परतीचा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडावा पसरणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 सेल्सिअस असणार आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Mumbai Underwater Till 2050 | 2050 पर्यंत संपूर्ण मुंबई समुद्रात बुडणार; धक्कादायक रिपोर्ट समोर

Mumbai Underwater Till 2050

Mumbai Underwater Till 2050 | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळ देखील आहे. ज्याला भेट देण्यासाठी अनेक लोकल लांब लांब वरून येत असतात. मुंबईला या स्वप्नांची नगरी देखील म्हंटले जाते. मुंबईत गेल्यानंतरच माणूस खऱ्या अर्थाने जीवन काय असते. हे जगायला शिकतो. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया , पॉईंट कुलाबा, शिवाजी पार्क तसेच सीएम सिटी स्टेशन यांसारखी अनेक ठिकाण आहे. जी मुंबईची शान आहेत. परंतु याच मुंबईकरांसाठी एक अत्यंत वाईट गोष्ट समोर आलेली आहे. ती म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार येत्या काही वर्षातच हे संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाणार आहे. अशी भीती वर्तवण्यात आलेली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे आता दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरचा बर्फ वितळायला लागलेला आहे. जर हा बर्फ वितळण्याचा वेग कायम राहिला, तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. आणि त्यामुळे 2050 पर्यंत मुंबई संपूर्ण पाण्याखाली जाईल, असा अंदाज कोडी-ऑर्डिनेटर डायनोसॉय या संस्थेने वर्तवलेला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कुलाबा मलबार हिल,दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर वर्सोवा हे समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकतात. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील बर्फ असाच वितळायला लागला तर मुंबईसाठी हा एक खूप मोठा धोका आहे. परंतु हा धोका केवळ मुंबईसाठीच नाही, तर मुंबई जवळील ठाणे, नवी मुंबईला देखील असणार आहे. त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी देखील वाढत आहे. ही वाढ जर अशीच राहिली तर मुंबई नक्कीच पाण्याखाली जाईल शिवाजी पार्कच्या परिसरात समुद्राचा पाणी यायला सुरुवात झालेली आहे. परंतु हे पाणी येण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आलेली आहे.

भारतातील मुंबई आणि कोलकत्ता तील इतर अनेक शहरांना देखील समुद्राच्या पाण्यामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. मुंबई सोबत समुद्राच्या पाण्याखाली जाणाऱ्या शहरांमध्ये सुरत, ओडिसा, केरळ आणि तमिळनाडू यांसारख्या शहरांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आणि या समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या जवळपास दहा देशांच्या लोकसंख्येवर याचा परिणाम होणार आहे. आणि भारत या यादीत सगळ्यात वरच्या स्थानी आहे. केवळ भारतालाच नाही तर जगभरातील अनेक देशांना या समुद्राच्या पाण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे.

आतापर्यंत हवामानाच्या बदलामुळे जगातील पाच शहरे ही समुद्राच्या पाण्याखाली बुडालेली आहे. इजिप्तमधील थॉमीज, इटालियाचे बाया शहर, इंग्लंड मधील डरमेन्ट गाव जमाईकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिना मधील विला ही शहरे समुद्राच्या पाण्याखाली बुडालेली आहेत.

BSNL New Feature | BSNL यूजर्ससाठी मोठी बातमी ! स्पॅम कॉल टाळण्यासाठी कंपनीने लाँच केले नवे फीचर

BSNL New Feature

BSNL New Feature | यावर्षी रिलायन्स जिओ आणि एअरटेल तसेच Vi च्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये देखील नाराजी झाली आणि अनेक ग्राहक हे बीएसएनएलकडे वळाले. त्यामुळे बीएसएनएलला देखील खूप चांगला फायदा झालेला आहे. आता हेच नवीन आलेले ग्राहक टिकून ठेवण्यासाठी बीएसएनएल कंपनी ही नवनवीन योजना आणत असतात. आणि आज ग्राहकांना अगदी कमीत कमी किमतीमध्ये रिचार्ज प्लॅन देत असतात.

बीएसएनएल ही कंपनी सध्या त्यांच्या 4G नेटवर्क वर सातत्याने काम करत आहे. कंपनीने सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेर पर्यंत अनेक भागांमध्ये फोरजी नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी दिसून येईल. त्याचप्रमाणे स्पॅम कॉल टाळण्यासाठी देखील बीएसएनएलने एक नवीन सेवा सुरू केलेली आहे. यासाठी एक चांगला मार्ग त्यांनी अवलंबला आहे. आता जर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येत असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या एका नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची चांगली सेवा मिळेल. आता ही सेवा नक्की कशाप्रकारे असणार आहे. आणि कसा वापर करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ॲपच्या मदतीने तुम्ही तक्रार करू शकता | BSNL New Feature

बीएसएनएल युजर्स कंपनीच्या सेल्फकेअर ॲपच्या मदतीने सहजपणे तक्रारी नोंदवू शकतात. सध्या इतर कोणत्याही कंपनीकडे अशी सुविधा नाही. सेल्फकेअर ॲपच्या मदतीने तुम्ही स्पॅम संदेशांची तक्रार कशी करू शकता हे जाणून घेऊया

अशा प्रकारे सेल्फकेअर ॲप वापरू शकता

  • सर्वप्रथम तुमचा फोन BSNL Selfcare App उघडा.
  • आता तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्यात असलेल्या तीन ओळींच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि तक्रार आणि प्राधान्य पर्याय निवडावा लागेल.
  • नंतर उजवीकडे तीन-लाइन मेनू टॅप करा आणि अहवाल द्या.
  • आता तुम्हाला New Complaint वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा व्हॉईस कॉलमधील पर्याय निवडावा लागेल. आणि नंतर संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
  • शेवटी, तपशील भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई, पुण्यासह विविध स्थानकांमधून नागपूरसाठी धावणार विशेष गाड्या

nagpur special train

येत्या 14 ऑक्टोबर दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्यामुळे अख्या देशभरातून लोक यानिमित्ताने नागपूरला जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. या प्रवाशांसाठी आता रेल्वे कडून खास सोय करण्यात आलेली आहे. मुंबई आणि पुणेसह विविध स्थानकातून यासाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांसाठी महत्त्वाचा आणि प्रमुख दिवस आहे. या दिवशी बौद्ध बांधव नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देतात आणि तिथे जाऊन प्रार्थना करतात. याबरोबरच हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यामुळे नागपूर मध्ये अनेक लोक जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे कडून विशेष गाड्यांचा नियोजन करण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर

यात गाडी क्रमांक 01017 लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर ही अनारक्षित विशेष गाडी मुंबई येथून दि. 13 रात्री 2 वाजता सुटेल. तर 01018 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 13 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री 00.20 मिनीटांनी सुटेल.

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी येथे थांबे असणार आहे.

नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष‌ गाडी

ट्रेन क्रमांक 01218 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष‌ गाडी 12 ऑक्टोंबर रोजी रात्री 10 वाजून 25 मिनीटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी एलटीटी मुंबई येथे 2 वाजून 35 मिनीटांनी पोहोचल. तर ट्रेन क्रमांक 01215 नागपूर-पुणे अनारक्षित विशेष ही गाडी नागपूर येथून रात्री 11 वाजता सुटेल तर पुणे येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

थांबे : सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे.

पुणे-नागपूर अतिजलद विशेष ट्रेन

ट्रेन क्रमांक 01216 पुणे-नागपूर अतिजलद विशेष ट्रेन 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

थांबे : अजनी, सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा येथे थांबा घेणार आहे. या सोबतच मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइनवर थांबे राहतील.

भुसावळ-नागपूर- नाशिक रोड

तर 01213 भुसावळ-नागपूर- नाशिक रोड ही मेमू विशेष ट्रेन 12 ऑक्टोंबर रोजी भुसावळ येथून पहाटे 4 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 12 वाजता पोहोचेल. तर 01214 ही मेमू विशेष 12 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथून रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. गाड्यांचे थांबे, वेळापत्रकासाठी भारती. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता येणार नवीन योजना; महिलांना मिळणार मोठी संधी

New scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारने या वर्षी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना त्यांनी दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्या देखील सांगितले. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. सरकारच्या या योजनेचे संपूर्ण राज्यभर कौतुक आहे. परंतु या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे आणि कर्जा दात्यांच्या पैशातूनच हे योजनेचे पैसे जात आहेत. अशी टीका विरोधकांनी केलेली आहे. त्यांना काम द्या अशी मागणी देखील विरोधकांनी केली. तरी देखील महायुती सरकारने या सगळ्याकडे अजिबात लक्ष न देता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवलेली आहे.

अशातच आता महिलांसाठी सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देणार आहेत. या उपक्रमा अंतर्गत जवळपास 5000 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.

सक्षम भगिनी योजनेची सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री योजना आणली. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. परंतु आता नवीन सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली जात आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा या योजनेचा मुख्य योजना आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळून देण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरातील महिलांनी तयार केलेले पदार्थ वस्तू ऑर्डर नुसार वितरकांपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची काम देखील केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना गरज वस्तू तयार करण्याची आणि कोणालाही त्रास न देता उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असे म्हणून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

Salary Advance Loan | सॅलरी ऍडव्हान्स लोन म्हणजे काय? आकारले जाते इतके व्याज; जाणून घ्या सविस्तर

Salary Advance Loan

Salary Advance Loan | अनेक वेळा माणसाला अत्यंत इमर्जन्सी परिस्थिती येते. आणि अशा परिस्थितीत आर्थिक गरज मिळणे खूप गरजेचे असते. अचानक एवढी मोठी पैशांची गरज लागल्याने आपण आपले मित्र किंवा नातेवाईकांकडून उसने पैसे घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे आपल्याला व्याज देखील भरावे लागते. परंतु त्यावेळी आपली गरज जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे आपण ते कर्ज घेण्यास तयार देखील होतो

आज काल लोकांचा वैयक्तिक कर्ज घेण्याकडे जास्त कल झालेला आहे. परंतु जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्हाला दर महिन्याला पगार मिळत असेल तर त्यावर तुम्हाला सॅलरी ॲडव्हान्स लोन (Salary Advance Loan) देखील मिळू शकते. परंतु आता हे सॅलरी ऍडव्हान्स लोन नक्की कसे आहे याचे तुम्हाला कसे फायदे होतात आणि किती व्याज आकारले जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक कंपन्या या अडचणीच्या काळात त्यांच्या कर्मचाऱ्यांना कर्जावर ऍडव्हान्स पगार देतात. परंतु आपण आता बँकेने दिलेल्या सॅलरी ॲडव्हान्स लोन बद्दल जाणून घेणार आहोत. या मध्ये बँका आणि इतर फायनान्स कंपन्या देखील तुम्हाला सॅलरी ऍडव्हान्स देऊ शकतात.

सॅलरी ऍडव्हान्स लोन | Salary Advance Loan

सॅलरी ॲडव्हान्स लोन हे भारतातील लोकांसाठी उपलब्ध असलेला एक कर्जाचा प्रकार आहे. या कर्जावरील व्याजदराची गिनती ही मासिक किंवा दररोज देखील केली जाते. यासाठी वेगवेगळ्या बँकेच्या अटी आणि शर्ती वेगळेवेगळे असू शकतात. अडचणीच्या वेळेस सॅलरी ॲडव्हान्स लोन हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरते. कारण काही मिनिटात किंवा काही तासातच आपल्याला हे लोन मिळते. जर तुमच्यासाठी अत्यंत इमर्जन्सी आर्थिक परिस्थिती आली तर तुमच्यासाठी सॅलरी ॲडव्हान्स लोन हा खूप चांगला पर्याय आहे. आपल्या देशामध्ये अशा अनेक वित्तीय कंपन्या आणि बँक आहेत ज्या पगाराची आगाऊ कर्ज म्हणजे सॅलरी ॲडव्हान्स म्हणून देतात. परंतु हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. तसेच या अर्जासाठी बँकेत जाण्याची तुम्हाला गरज भासत नाही. तुम्ही अगदी घर बसल्या हे कर्ज मिळू शकता.

व्याज किती आकारले जाते ? | Salary Advance Loan

अर्ली सॅलरी, लोन टॅब तसेच कॅश कुमार क्विक क्रेडिट,फ्लेक्स सॅलरी आणि क्रेडिट बाजार या महत्त्वाच्या वित्तीय कंपन्या देखील तुम्हाला सॅलरी ॲडव्हान्स लोन देतात. यावर तुम्हाला दर महिन्याला 2.5% व्याज आकारले जाते. यातून तुम्हाला कमीत कमी 8 हजार रुपये ते जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची रक्कम कर्जाच्या स्वरूपात मिळते.

BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 2055 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एक मोठी भरती निघालेली आहे. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते परंतु त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. पण आता बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2055 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 4 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करायचे आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहो

पदाचे नाव | BMC Bharti 2024

मुंबई महानगरपालिके अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदाचा रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदाच्या 2055 रिक्त जागा आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्ष दरम्यान असते खूप गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कायदा अधिकारी, विधी विभाग, 3रा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख

04 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अर्ज कसा करावा | BMC Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

ONGC Bharti 2024 | ONGC अंतर्गत 2236 पदांसाठी भरती सुरु; अशाप्रकारे करा अर्ज

ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीच्या अशाच काही संधी घेऊन येणार आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. कारण आता तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदाच्या आहे. या पदाच्या एकूण 2236 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील हे अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 25 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ONGC Bharti 2024

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या 2236 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा? | ONGC Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 25 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत कधी ?

cidco new mumbai

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संस्था म्हणजे म्हाडा आणि सिडको. म्हाडासाठी 2030 घरांची सोडत आधीच जाहीर झाली आहे. मात्र सिडकोसाठी नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरच्या घरांची सोडत ही 7 ऑक्टोबरला होणार होती. यापूर्वी ही सोडत 2 ऑक्टोबरला निघणार होती तारीख बदलली असली तरी 7 ऑक्टोबरला देखील ही सोडत निघेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे. कारण आजच 7 तारीख असून दुपारी 4 वाजेपर्यंत तरी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही तारीख पुन्हा पुढे जाण्याची शक्यता आहे.

7 ऑक्टोबरला सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी सिडकोच्या घरांची सोडत होईल असं सांगितलं होतं. मात्र सोडती मधील ऑनलाईन प्रक्रियेत घरांची राखीव प्रवर्गाची वर्गवारी त्याचबरोबर इतर काही तांत्रिक काम अंतिम टप्प्यात आहेत असं असताना ही सोडत आठ ऑक्टोबर आधी व्हावी अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी ही सोडत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्या भागात मिळणार घरे ?

या लॉटरी मध्ये 13 हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यातील सर्वाधिक जवळपास 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. खांडेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. तसेच जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही.

घराच्या विक्रीसाठी एनओसीची आवश्यकता नाही

याबरोबरच महामंडळांना आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळनिर्मित घरांच्या विक्रीसाठी महामंडळ एनओसीची आवश्यकता आता भासणार नाही. याशिवाय इतर व्यक्तीला घर विक्री करत असताना द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लिजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचा होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घर विकण्यासाठी सिडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत होती. याशिवाय ही घरं विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत होते. मात्र नव्या निर्णयामुळे हा नियम रद्द करण्यात आल्याने सिडकोच्या गृहधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.