Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 464

सरकारकडून कोकणवासीयांना भेट ; कोकण हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर

konkan greenfield highway

राज्यभरामध्ये मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड असे प्रकल्प सांगता येतील. मुंबई ते गोवा हे अंतर केवळ ६ तासांमध्ये कपता येणार आहे . कोकण हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाबाबतची रूपरेषा राज्य रस्ते महा विकास मंडळाने जाहीर केली आहे. चला जाणून घेऊया ..

पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली

कोकणच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुंबई गोवा महामार्ग गेली सतरा वर्ष रखडलेला आहे तर सागरी महामार्ग तीस वर्षांपासून रखडलेला आहे. सागरी महामार्गावर रखडलेल्या आगरदांडा, बाळकोट- रेवस आणि दाभोळ- जयगड या पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली आहे. या दोन महामार्गांची स्थिती अशी असताना आता कोकणवास यांना आणखी एका महामार्गाचे आमिष सरकारने दाखवले आहे.

68 हजार 720 कोटी खर्च अपेक्षित

या महामार्गाची लांबी 376 किलोमीटर असून या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च 68 हजार 720 कोटी इतका येणार आहे. तसेच हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असून दोन सर्विस रोड असणार आहेत. या महामार्गावर एकूण 41 बोगदे 51 मोठे ब्रिज आणि 68 ओवरपास असणार आहेत. तीनही महामार्ग एकमेकाला जोडले जाणार आहेत.

90 किलोमीटरचे अंतर होणार कमी

हा महामार्ग सर्वात जलद असेल आणि बारा तासावरून प्रवासाची वेळ ही सहा तासांवर येईल अशी घोषणा प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग याचे अंतर 460 km इतका आहे मात्र हा नवा महामार्ग 376 किलोमीटर लांबीचा असल्याने 90 किलोमीटरचा अंतर कमी होणार आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रमाणे हा महामार्ग अधिक सरळ असणार आहे.

अटल सेतूवरून अलिबाग शहाबाज इथे पहिला टप्पा आहे. तिथून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत हा महामार्ग जाणार आहे. महामार्गाच्या मार्गीका या सहा असून 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असेल. कोकणातील तालुक्यातील या महामार्गाचा प्रवास होईल. मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग या दोन महामार्गांच्या मधून जाणारा हा महामार्ग आहे. इंटरचेंज येथे वाहने प्रवेश करू शकतील तसेच बाहेर पडू शकतील

‘या’ भागातून जाणार मार्ग

अलिबाग ,शहाबाद, रोहा, घोसळे, माणगाव, मढेगाव, मंडणगड, केळवट, दापोली, वाकवली, गुहागरशहर, रत्नागिरी, गणपतीपुळे, राजापूर, भालवली, देवगड शहर, मालवण शहर ,कुडाळ, सावंतवाडी शहर, वेंगुर्ले बांदा येथून हा महामार्ग मार्गस्थ होणार आहेत 41 बोगदे 21 मोठे पूल आणि 50 छोटे पूल यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गासाठी 3792 हेक्टर जमिनीचा संपादन केले जाणार आहे यातील 146 हेक्टर वन जमीन आहे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे पर्यावरण विभागाच्या सूचना लक्षात घेऊन आलेखणात काही बदल करण्यात आले आहेत.

Mumbai-Pune Expressway : अडखळत नाही आता मुंबई – पुणे प्रवास होणार सुस्साट ! खुला होतोय नवा पूल

mumbai -pune expressway

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे राज्यात महत्वाची आहेत. त्यातही दररोज पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. या दोन्ही महत्वाच्या शहरांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई -पुणे महामार्ग. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच या मार्गावर प्रवाशांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता असे होणार नाही मुंबई – पुणे (Mumbai-Pune Expressway) प्रवास सुसाट होणार आहे.

ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेला येणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका खोली करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे.अशी माहिती एका मराठी माध्यमाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा थेट या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

एक वाहतुकीचा आणखी एक पर्याय (Mumbai-Pune Expressway)

ठाणे खाडी पूल प्रकल्पातील ही मार्गिका खुली झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडी पूल दोन याबरोबरच नवीन ठाणे खाडी पूल तीन चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या मार्गिकेमुळे मुंबई पुणे प्रवास हा कोंडीमुक्त मुक्त आणि सुसाट होणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही मार्गीका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल 3 च्या रूपाने आणखी एक वाहतुकीचा पर्याय नागरिकांना (Mumbai-Pune Expressway) खुला होणार आहे.

पुणे -मुंबई मार्गिकेसाठी अद्याप प्रतीक्षाच

सध्याचा विचार करता मुंबई पुणे इथून प्रवास करायचा असेल तर दोन खाडी पूल सेवेत आहेत. मात्र वाहतूक कोंडी कमी करण्याच्या हेतून एमएसआरडीसीने ठाणे खाडीपूल ३ हा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे म्हणजेच मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुणे-मुंबईचा प्रवासा वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावे लागणार आहे. कारण उत्तरेकडील मार्गिकेचे म्हणजेच पुणे- मुंबई मार्गिकेचे काम अद्याप 75 टक्के पर्यंतच पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2024 च्या अखेरीस हे काम सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये ही मार्गिका देखील वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. पुणे मुंबई व्हाया ठाणे खाडीपूल ३ असा प्रवास (Mumbai-Pune Expressway) करण्यासाठी जानेवारी 25 ची वाट पाहावी लागणार आहे.

काय आहे प्रकल्प? (Mumbai-Pune Expressway)

ठाणे आणि भिवंडी दरम्यान असलेल्या खाडीवर या पुलाचे बांधकाम करण्यात येत असून या खाडीवर तीन पूल बांधण्यात येत आहेत. ठाणे ते भिवंडी दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या तीन पुलांचं काम 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच या पुलांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

मस्त ट्रिप प्लॅन करताय ? अहमदनगर जवळ आहे माथेरान पेक्षा सुंदर हिल स्टेशन, जाणून घ्या

ahamdanagar tourism

सध्या पावसाची रिमझिम थांबली असून राज्यातल्या अनेक भागात थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही कुठे विकेंड ला मस्त फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर आम्ही आजच्या लेखात एक लय भारी डेस्टिनेशन तुम्हाला सांगणार आहोत. लोणावळा , माथेरान अशा हिल स्टेशन्सला तुम्ही नेहमीच जात असाल मात्र अहमदनगर जिल्ह्यातील हे हिल स्टेशन अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिनाच आहे. चला जाणून घेउया या ठिकाणाबद्दल अधिक माहिती…

अहमदनगर हे महाराष्ट्रातलं एक अतिशय सुंदर आणि शानदार असं शहर आहे. अहमदनगर मधील हिल स्टेशन हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आम्ही बोलत आहोत अहमदनगर जवळ असलेल्या खंडाळा हिल स्टेशन बाबत. खंडाळा हिल स्टेशन हे त्याच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे.

पावसाळ्याच्या दिवसात तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गाहून काही कमी नाही. कारण इथला नजारा हा बघण्यासारखा असतो. ढग जमिनीवर येतात. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या रिमझिम धारा आणि हिरवे गार झालेले डोंगर त्यातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. या ठिकाणी हून प्रवाहित होणारे धबधबे अधिक प्रसिद्ध आहेत. या धबधब्याला भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात

तुम्हाला जर रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक मोकळा श्वास घ्यायचा असेल, शहरातल्या कोंदट वातावरणातून शुद्ध हवा घ्यायची असेल तर खंडाळा हिल स्टेशन उत्तम ठिकाण ठरेल. हे ठिकाण अहमदनगर पासून 182.2 किलोमीटर अंतरावर आहे.

Sachet Loan | Google Pay देणार ‘Sachet Loan’ ? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

Sachet Loan

Sachet Loan | आजकाल सगळेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. गुगल इंडिया देखील त्यांचे वेगवेगळे पॅकेज जाहीर करत असते. कर्ज घेण्याची एक नवीन सुविधा गुगल इंडियाने जारी केलेली आहे. याच्या मदतीने आता गुगल पे वरून तुम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आणि हे कर्ज तुम्ही केवळ 11 रुपयांपासून छोट्या हप्त्यांमध्ये देखील परत करू शकता. आता कर्ज घेण्याची ही नक्की कोणती पद्धत आहे? याला सॅशे लोन (Sachet Loan) असे म्हणतात. आता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

सॅशे लोन म्हणजे काय ? |Sachet Loan

सॅशे लोन हा एक लहान नॅनो क्रेडिटचा प्रकार आहे. तुम्ही या मार्फत अगदी लहान स्वरूपात कर्ज घेऊ शकता. त्याचा कालावधी देखील खूप कमी असतो. हे कर्ज तुम्हाला 10 हजार रुपयांपासून मिळू शकते. हे करतो तुम्हाला सात महिने ते बारा महिन्यांपर्यंत परत करायचे असते. हे लोन घेण्यासाठी तुम्हाला लोन ॲप डाऊनलोड करावे लागेल. किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून देखील तुम्हाला हे लोन मिळू शकते.

गुगल पेने देखील आता स्वतःचे लोन जारी केलेले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर देखील पोस्ट शेअर करून माहिती दिलेली आहे. हे लोन आता भारतात लॉन्च केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “व्यापाऱ्यांसोबतच्या आमच्या अनुभवाने आम्हाला शिकवले की त्यांना अनेकदा लहान कर्ज आणि अधिक सोयीस्कर परतफेड पर्यंतची आवश्यकता असते. आणि त्यांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही डीएम फायनान्ससोबत भागीदारी केलेली आहे गुगल पेवर 15 हजार रुपयांपर्यंत कमी कर्ज मिळेल आणि तेही तुम्हाला 11 रुपये इतक्या कमी हप्त्यांमध्ये परत करू शकता.”

कशाप्रकारे मिळणार सॅशे लोन ? |Sachet Loan

आता गुगल पेने फेडरल, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह या चार बँकांची भागीदारी केलेली आहे. ही सेवा गुगल पेद्वारे फक्त टीयर दोन शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता या कर्जासाठी कसा अर्ज करायचा हे आपण जाणून घेऊया.

सॅशे लोन कसे घ्यायचे ?

  • हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल पेपर बिझनेस हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही कर्ज या विभागात जाऊन ऑफर्स टॅबवर क्लिक करा.
  • कर्जाची रक्कम भरल्यानंतर तुम्ही तुमच्या साइटवर तरी डायरेक्ट केले जाईल.
  • त्यानंतर तुमची केवायसी होईल आणि काही सोप्या स्टेप केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल

कोल्हापूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु ; IT अभियंत्यांचा प्रवास होणार सुखकर

kop pune vande bharat

मागच्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. ही मागणी आता अखेर पूर्ण झाली असून कालपासून म्हणजेच 16 सप्टेंबर 2024 पासून कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. मूळ कोल्हापूरचे असलेले मात्र कामानिमित्त पुण्यात स्थियक झालेल्या हजारो IT मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. सध्या बाय रोड प्रवास करायचा झाल्यास कोल्हापूर -पुणे मार्गावर रस्त्याची कामे चालू असल्यामुळे पाच तासांच्या प्रवासाला 6 ते 7 तास लागतात. शिवाय या मार्गावर ट्राफिक जॅमची समस्या सुद्धा नित्याचीच झाली आहे. त्यामुळे जलद आणि आरामदायी प्रवास म्हणून ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा पर्याय अधिक महत्वाचा ठरणार आहे.

सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून या गाडीला ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवण्यात आला या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सिमुना हे देखील उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना खासदार महाडिक म्हणाले वंदे भारत आता कोल्हापूर ते पुण्यापर्यंत धावत असली तरी लवकरच मुंबईपर्यंत सुरू केली जाणार आहे करवीर बास यांनी उपस्थित रहावे यावेळी माझी नगरसेवक सत्यजित कदम भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सदस्य राहुल चिकोडेल रूपा राणी निकम आदी उपस्थित होते

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेस सोमवार गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणार आहे. तर दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी ही गाडी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून सुटणार आहे आणि ही गाडी संध्याकाळी सात वाजून 40 मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचणार आहे.

या स्थानकांवर घेईल थांबे

कोल्हापूर ते पुणे वंदे परत एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

आसनक्षमता

या गाडीला एकूण आठ डबे असून त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. पाच डब्यात प्रत्येकी 78 आसन क्षमता आहे. तर रेल्वे इंजिन जवळच्या दोन्ही डब्यांमध्ये प्रत्येकी 44 आसन क्षमता आहे. तर एक्झिक्यूटिव्ह क्लास साठी 52 आसन क्षमता आहे. एकूण आसन क्षमता 530 इतकी आहे

किती आहे तिकीट ?

कोल्हापूर पुणे आणि पुणे कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाबद्दल सांगायचं झाल्यास प्रति व्यक्ती ५६० रुपये व एक्झिक्यूटिव्ह क्लास साठी 1135 असे तिकीट दर आहेत. या तिकीट दरातच चहा जेवण आणि पाणी देखील उपलब्ध केलं जाणार आहे

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल 1356 आजारांवर मिळणार मोफत उपचार ; या व्यक्तींना होणार लाभ

Ayushman Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून देखील अनेक योजना राबवल्या जातात. याआधी आयुष्मान भारत योजना अमलात आणली आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना देखील अमलात आणली आहे. परंतु आता आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवली जाणार आहे. आणि यातून अनेक कुटुंबांना फायदा मिळणार आहे.

या एकत्रितपणे राबविलेल्या योजनेचा प्रत्येक कुटुंबातील रुग्णास फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 1356 हजारांवर तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे. घरात जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. देशातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अनेक योजना आणत असतात. यातीलच ही योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा. तसेच त्यांना मोफत आरोग्य उपचार मिळावेत. या हेतूने ही आयुष्मान भारत योजना सुरू केलेली आहे. परंतु या वर्षी सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो. ज्या व्यक्तींकडे पिवळे, केशरी, शुभ्र रेशन कार्ड आहे. त्या व्यक्ती आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 52 रुग्णालयात मोफत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील ऑनलाइन सेवा केंद्रातून आयुष्मान कार्ड काढून घेऊ शकता. त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये आपण जर पाहिले, तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात गेल्या वर्षभरात 1000 पेक्षा जास्त रुग्णांनी मोफत उपचार घेतलेला आहे. या योजनेमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत नाही. तसेच त्यांची बचत देखील होते.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 82 गावांमध्ये आरोग्य केंद्र आहेत, तर 431 गावांमध्ये उपकेंद्र देखील राबवण्यात आलेली आहे. याशिवाय 12 दवाखाने आहेत. आपले सरकार हे नेहमीच राज्यातील जनतेला प्राधान्य देतात. त्यातही जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळावी. तसेच शिक्षण मिळावे. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न सरकार नेहमीच करत आहे. आता सरकारने महात्मा ज्योतिबा जेव्हा आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे केल्याने या योजनेचा अनेक लोकांना फायदा होणार आहे.

Lava Blaze 3 5g | Lava Blaze 3 5G भारतात झाला लॉन्च; 50MP कॅमेरासह मिळणार 5,000mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत

Lava Blaze 3 5g

Lava Blaze 3 5g | आजकाल मोबाईल ही लोकांची एक गरज झाली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नवनवीन फोनची क्रेझ देखील आजकाल वाढलेली दिसत आहे. अशातच आता तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता बाजारात एक नवीन फोन लॉन्च झालेला आहे. टेक कंपनी Lava ने नवीन लो बजेट सेगमेंट स्मार्टफोन ‘Blaze 3 5G’ 9Lava Blaze 3 5g )लॉन्च केला आहे. Lava Blaze 3 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल. याशिवाय, 6.56 इंच HD+ डिस्प्ले, 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आणि 6GB + 128GB स्टोरेज देखील दिले गेले आहे.

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दोन रंग दिले आहे. ग्लास ब्लू आणि ग्लास गोल्ड रंगामध्ये हे स्मार्टफोन उलपब्ध आहेत. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आहे. 18 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून हा फोन तुम्हाला विकत घेता येऊ शकतो. Lava Blaze 3 मध्ये काचेची रचना आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल प्रदान केला आहे, ज्यामध्ये फ्लॅशलाइटसाठी VIBE रिंग लाइट प्रदान केला आहे. फ्रंट पॅनलबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना पंच होल नॉच आणि फ्लॅट स्क्रीन मिळेल.

Lava Blaze 3 5G

डिस्प्ले |Lava Blaze 3 5g

Lava Blaze 3 5G फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.56 इंच HD + डिस्प्ले मिळवू शकतो. स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1600 nits पीक ब्राइटनेस असेल.

कॅमेरा

लावाच्या नवीन फोनमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा मिळत आहे.

बॅटरी

पॉवर बॅकअपसाठी, Lava Blaze 3 स्मार्टफोनमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

OS आणि प्रोसेसर

लावाच्या आगामी फोन Lava Blaze 3 5G मध्ये कंपनीने Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा MediaTek Dimension 6300 प्रोसेसर प्रदान केला आहे.

कनेक्टिव्हिटी |Lava Blaze 3 5g

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्टसह मूलभूत कनेक्टिव्हिटी आहे.

Indian Railways | इतक्या वयापर्यंत ट्रेनमध्ये मुले करू शकतात मोफत प्रवास; जाणून घ्या नियम

Indian Railways

Indian Railways | भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. रेल्वेमधून दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना त्यांच्या ठिकाणाहून इतर कोणत्याही ठिकाणी सहज प्रवास करण्यासाठी ट्रेन मिळू शकतील याची खात्री करण्यासाठी, भारतीय रेल्वेने देशभरात एक मोठे नेटवर्क तयार केले आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये केली जाते. हे नेटवर्क देशाच्या सीमावर्ती भागांना मोठ्या महानगरांशी जोडते.

भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांच्या प्रवासासाठी अनेक नियम केले आहेत. जे लोक भारतीय ट्रेनमध्ये प्रवास करतात त्यांना माहित आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करताना लहान मुलांसाठी तिकीट काढण्याची गरज नाही. मात्र, ठराविक वयोमर्यादेपर्यंतची मुलेच ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात. तुम्हाला माहित आहे का की कोणत्या वयापर्यंतची मुले ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात?

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार 1 ते 4 वर्षे वयोगटातील मुले ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात. या मुलांसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण शुल्क नाही. तसेच ज्या मुलांचे वय 5 ते 12 वर्षे आहे त्यांनी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. परंतु जर तुम्ही 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी जागा घेतली नाही, तर तुम्हाला त्यांच्यासाठी अर्धे तिकीट खरेदी करावे लागेल.

जर तुम्ही मुलासाठी कन्फर्म सीट बुक केली तर तुम्हाला तिकीटाची संपूर्ण रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही भारतीय ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही भारतीय गाड्यांमध्ये तुमच्यासोबत ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करू शकत नाही. याशिवाय रात्री ट्रेनने प्रवास करताना तुम्ही मोठ्याने बोलू शकत नाही. यांसारखे अनेक नियम तुम्हाला रेल्वेने प्रवास करताना पाळावे लागतात.

Central Coalfields Recruitment | परीक्षा न देता मिळणार थेट सरकारी नोकरी, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Central Coalfields Recruitment

Central Coalfields Recruitment | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आम्ही नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण ccl म्हणजे सेंट्रल कोडफील्डमध्ये (Central Coalfields Recruitment) नोकरीचे भन्नाट संधी आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 1180 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.या नोकरी भरतीसाठी 26 ऑगस्ट पासूनच अर्जापर्यंत सुरू झालेली आहे. तसेच 21 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा त्या भरतीची सविस्तर माहिती आपण भरून घेऊया.

पदाचे नाव |Central Coalfields Recruitment

सेंट्रल कोलफील्ड यांच्या अंतर्गत अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा आहे.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत तब्बल 1180 रिक्त पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्ड करून दहावी पास असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईट वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भरती प्रक्रिया

या परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसिसवर या भरतीसाठी निवड केली जाणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

26 ऑगस्ट 2024 पासून या भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा |Central Coalfields Recruitment

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 21 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख काढलेल्या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? सरकारने दिली मोठी अपडेट

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana

Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana | महाराष्ट्र राज्याने नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेची खूप जास्त चर्चा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकारमार्फत 15000 रुपये दर महिन्याला दिले जाते. या योजनेमध्ये पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. जुलैमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतु अजूनही काही महिलांना हे पैसे मिळालेले नाही. किंवा काही महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबतच महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे.

आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अर्ज भरले आहेत. त्यांना सप्टेंबर महिन्यात नक्कीच पैसे दिले जाणार आहे. ज्या महिन्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे. त्या महिलांना देखील लवकरच पैसे मिळणार आहे. अजूनही लाडकी बहिण योजनेच्या (Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana) अर्जांची छाननी सुरू आहे.

दोन कोटींपेक्षा जास्त महिला पात्र | Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाख अर्ज आलेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत दोन कोटींपेक्षा अधिक महिना पात्र ठरतील, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख याआधी 31 ऑगस्ट ही होती. परंतु अनेक महिलांना याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे या योजनेच्या कालावधी वाढून 30 सप्टेंबर एवढा करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हा सरकारचा खरा उद्देश आहे. त्यामुळे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेले आहेत. आणि अजूनही त्यांना पैसे आलेले नाहीत. त्यांना तीन महिन्याचे मिळून सगळ्या पैसे सप्टेंबर महिन्यात येणार आहेत. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

त्याचप्रमाणे या संवादात आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांची सुरक्षा करणे हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र महिलांसाठीची योजना हा एक वेगळा भाग आहे. महिलांना सुरक्षितता देणे हा दुसरा भाग आहे. महिला भगिनी सुरक्षित राहावे ही सर्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांश बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे वेळोवेळी याची मागणी करत आहोत.