Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 465

BSNL Recharge Plan | BSNL ने आणला 82 दिवसांचा सगळ्यात स्वस्त प्लॅन; मिळणार हे फायदे

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | यावर्षी अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात वाढ केलेली आहे. त्यानंतर अनेक लोकांचा कल हा सरकारी कंपनी बीएसएनएलकडे आहे. बीएसएनएलचे देखील आजकाल चांगले दिवस आलेले आहेत. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नागरिकांनी त्यांचे सिम हे बीएसएनएलमध्ये पोर्ट केलेले आहे. बीएसएनएल (BSNL Recharge Plan) ही अत्यंत कमी दरात नागरिकांना सेवा प्रदान करते. आता बीएसएनएलचे सगळेच ग्राहक bsnl 4g नेटवर्क कधी येणार आहे? याची वाट पाहत आहेत. परंतु आता या सगळ्या यूजरसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील काही महिन्यांमध्ये आता तुम्हाला बीएसएनएल 4G इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेता येणार आहे.

अनेक खाजगी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी यांच्याबद्दल चांगली स्पर्धा करत आहेत. बीएसएनएलचे सगळे रिचार्ज प्लॅन खूप स्वस्त आहेत. प्रीपेड प्लॅन्स एअरटेल, जिओ, आणि वोडाफोन आयडियापेक्षा देखील स्वस्त आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल BSNL कडे आहे. परंतु आता bsnl लवकरच त्यांची 4G सेवा सुरू करणार आहे. आता बीएसएनएलचा एक अत्यंत स्वस्त प्लॅन आपण जाणून घेऊया.

485 रुपयांचा प्लॅन | BSNL Recharge Plan

बीएसएनएल 485 रुपयांचा प्लॅन खूप लोकप्रिय आहे. या प्लॅनची वैधता 82 दिवसांची आहे. या मध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डाटा, अमर्यादित कॉलिंग असेल तर 100 एसएमएस फ्री मिळतात. त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड नेटवर्क मार्फत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंग यांचा देखील समावेश असतो.

अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की, बीएसएनएल 4G नेटवर्क आले, तर त्यासाठी 4G सिम कसे ऍक्टिव्ह करायचे. आता यासाठी तुम्हाला आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये बीएसएनएल चे सिम इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल रिस्टार्ट करा आणि नेटवर्क सिग्नलची वाट पहा. नेटवर्क सिग्नल मिळाल्यावर तुम्ही 1507 हा नंबर डायल करा. त्यानंतर तुमची माहिती सगळी तपासणी आणि तुमचे बीएसएनएल सिम सक्रिय होईल.

बीएसएनएलच्या नेटवर्क बाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे की, बीएसएनएलची सेवा लवकरच सुरू होणार आहे. पुढील वर्षी 4G कनेक्टिव्हिटी ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी आत्तापर्यंत तब्बल 22 हजार 500 मोबाईल टॉवर्स बसवलेले आहेत. आणि लवकरच ही संख्या एक लाखांच्या जवळपास पोहचणार आहे. त्यामुळे आता लवकरच ग्राहकांना 4G नेटवर्कचा अनुभव घेता येईल.

Amazon धमाका ! सुरु होतोय Great Indian Festival 2024 ; OnePlus 12, Poco X6 वर मोठी सूट

amazon

ग्राहक ज्या सेलची वर्षभर वाट पाहतात असा Amazon Great Indian Festival 2024 सुरु होत आहे. येत्या २० सप्टेंबर पासून या सेलला सुरुवात होणार असून यामध्ये अनेक वस्तूंवर धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. एक आठवड्यापूर्वी, Amazon India ने स्मार्टफोनची नावे देखील उघड केली होती जी आगामी सेल दरम्यान सवलतीत उपलब्ध होतील. प्लॅटफॉर्म आश्वासन देत आहे की OnePlus 12, Poco X6 आणि इतर डिव्हाइसेस ऑफरवर असतील. चला तर मग जाणून घेऊया…

Amazon ने त्याच्या Amazon Great Indian Festival 2024 सेल इव्हेंटसाठी टीझर पेज प्रकाशित केले आहे. ज्यानुसार OnePlus 11R, OnePlus 12, OnePlus 12R, OnePlus Nord CE 4 Lite, OnePlus Nord CE 4 आणि इतर मोबाइल्सवर सूट मिळेल. Realme Narzo 70 Pro आणि Realme GT 6T वर देखील सवलत मिळत असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय iQOO Z9s Pro, iQOO Z9, iQOO Z9 Lite, iQOO Neo 9 Pro, iQOO 12 आणि इतर स्मार्टफोन्स Amazon वर कमी किमतीत विकले जातील, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने दिलेल्यामाहितीनुसार . Galaxy S24 Ultra, Galaxy M15 आणि इतर काही सॅमसंग उपकरणांवर सूट दिली जाईल.

जे Xiaomi फोन विकत घेतात त्यांना Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 मध्ये यावर सूट देखील मिळणार आहे. यामध्ये Xiaomi 14 Civi, Redmi 13, Redmi Note 13, Xiaomi 14 आणि आणखी काही खास डिव्हाइसेसचा समावेश आहे. Tecno, Honor, Oppo आणि Vivo चे अनेक फोन देखील खरेदीसाठी उपलब्ध असतील.

मोबाईल ऍक्सेसरीजवर 80 टक्के सूट

  • ऍमेझॉन मोबाईल ऍक्सेसरीजवर 80 टक्के सूट देणार आहे. OnePlus Nord Buds 2r, Sony C700 आणि इतर सारखे वायरलेस TWS इयरफोन्स देखील Amazon Great Indian Festival 2024 सेल इव्हेंट दरम्यान सवलतीत मिळतील.
  • पॉवर बँक, चार्जर, चार्जिंग केबल्स आणि इतर उपकरणांवरही सूट असेल.
  • Amazon ने प्रकाशित केलेल्या टीझरनुसार, Amazon वर काही लॅपटॉप 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटवर देखील उपलब्ध असतील.

Motorola Edge 50 Neo भारतात लाँच: दमदार कॅमेरा, मजबूत रॅम अन बरंच काही…

Motorola Edge 50 Neo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आघाडीच्या मोबाईल निर्माता कंपन्यांमधील एक असलेल्या motorola भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Motorola Edge 50 Neo असं या मोबाईलचे नाव असून हा हँडसेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह बाजारात आला आहे. मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 4310mAh बॅटरी सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा अगदी बजेट मध्ये आहे. चला तर मग मोटोच्या या स्मार्टफोनबाबत संपूर्ण डिटेल्स आज आपण जाणून घेऊयात.

6.4 इंच डिस्प्ले –

Motorola Edge 50 Neo मध्ये 20Hz रिफ्रेश रेटसह 6.4 इंचाचा pOLED AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2800nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट बसवली असून मोटोचा हा मोबाईल Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईल वर 5 वर्षांसाठी सेक्युरिटी अपडेट आणि 5 OS अपग्रेड दिले आहेत.

कॅमेरा – Motorola Edge 50 Neo

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Edge 50 Neo मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP चा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी Motorola च्या या स्मार्टफोन मध्ये 4310mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 68W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 22,999 रुपये ठेवली आहे. हा मोबाईल Poinciana, Latte, Grisaille आणि Nautical Blue या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल.

ट्रकच्या मागे Use Dipper At Night असे का लिहिलेले असते? जाणून घ्या खरा अर्थ

Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण रस्त्यावर जाताना अनेक गाड्यांच्या मागे काही शब्द किंवा वाक्य लिहिलेले पाहत असतो. जे मोठे मोठे ट्रक असतात. त्यांच्या मागे काही वाक्य लिहिलेली असतात. याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो आणि ती एकच वाक्य अनेक ट्रकच्या मागे लिहिलेली पाहत असतो. जसे की यूज डीपर अट नाईट हे वाक्य अनेक ट्रकच्या मागे लिहिलेले असते. परंतु अनेकांना याचा अर्थ माहित नसतो. जे महामार्गावर ट्रक धावतात त्या ट्रकच्या मागे हे वाक्य लिहिलेले असते. या वाक्याचा जर आपण शब्दसः अर्थ घेतला तर रात्री गाडी चालवताना दिवे लावा असा होतो. गाड्यांमध्ये लावलेल्या हेड लॅम्पमध्ये डिप्पर लाईटचा देखील पर्याय दिलेला असतो. त्यामुळे फोकस डीपरच्या प्रकाशात वाढतो. याच्या मदतीने तुम्ही दूरच्या गोष्टी देखील सहज पाहू शकता. त्यामुळे ट्रकच्या मागे लिहिलेल्या या शब्दाचा अर्थ , रात्री गाडी चालवताना जेव्हा दूरच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात तेव्हा या डिपर लाईटचा वापर करा असा अर्थ अनेकांना वाटत असेल, परंतु या वाक्याचा डिपर लाईटशी काही संबंध नाही. आता हे वाक्य नक्की का लिहिले जाते हे आपण जाणून घेऊया.

यूज डीपर अट नाईट ही एक जनजागृती करणारी टॅगलाईन आहे. सरकारने तसेच स्वयंसेवी संस्थांनी काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सच्या सहकार्याने एक मोहीम सुरू केली आहे. आपणा सगळ्यांना माहीतच आहे की, टाटा मोटर्स ही आपल्या देशातील सर्वात मोठी ट्रक उत्पादक असणारी कंपनी आहे. देशातील महामार्गावर जे काही ट्रक धावत असतात. त्यातील बहुतांश ट्रक हे टाटा कंपनीचे असतात. त्यामुळे ट्रक चालकांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी टाटा मोटर्सने सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी ही एक नवीन मोहीम रागावलेली आहे आणि त्यासाठी ही टॅगलाईन तयार करण्यात आलेली आहे. .

या ट्रक ड्रायव्हरवर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलेले आहे. आणि त्यातून असे आढळून आले आहे की, देशातील असे कितीतरी ड्रायव्हर आहेत. जे लैंगिक संक्रमण रोग तसेच एड्सने ग्रस्त झालेले आहे. ट्रक ड्राइवर हे त्यांच्या कुटुंबापासून खूप काळ दूर असतात. अशावेळी ते अवैध मार्गाचा अवलंब करतात. आणि असुरक्षित शारीरिक संबंध ठेवतात. यावेळी योग्य सेफ्टीचा वापर होत नाही. यामुळे अनेक लैंगिक समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे सरकारने या ट्रॅक चालकांमध्ये जागृती पसरविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एड्स आणि STD यासारख्या आजारांशी लढण्यासाठी ही मोहीम चालवली जात आहे.

BSNL 4G Network | BSNL 4G नेटवर्क कधी लॉन्च होणार ? सरकारकडून आले मोठे अपडेट

BSNL 4G Network

BSNL 4G Network | यावर्षी अनेक लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केली आहे.यावर्षी जुलै महिन्यात एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केली. त्यामुळे त्यांचे अनेक ग्राहक नाराज झालेले होते. या कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये जवळपास 15 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्याचबरोबर सरकारी BSNL (BSNL 4G Network)ही कंपनी मात्र अत्यंत स्वस्त दरात त्यांच्या ग्राहकांना सेवा प्रदान करत असते. त्यामुळे BSNL कडे अनेक युजर्सचा कल केलेला आहे. आता याच संधीचा फायदा घेत बीएसएनएल त्यांचे 4G नेटवर्क वेगाने वाढण्याचे काम सुरू करत आहे. आता BSNL ची 4G सेवा कधी चालू होणार आहे? हे आपण जाणून घेऊया.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलेले आहे की, BSNL हे येत्या काही वर्षांमध्येच 4G नेटवर्क सविस्तर सर्वत्र करणार आहे. 2025 च्या मध्यापर्यंत BSNL चे जवळपास एक लाख नवीन 4G टॉवर्स बसवले जाणार आहेत. तसेच या देशातील 25000 गावे याद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये देखील दूरसंचार सुविधा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. अजूनही अनेक गावांमध्ये BSNL ची सुविधा उपलब्ध नाही. परंतु 2025 च्या मध्यापर्यंत सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

BSNL ने दिवाळी 2024 पर्यंत 75,000 4G साइट्स स्थापित करण्याची योजना आखली होती. परंतु आतापर्यंत फक्त 25,000 स्थापित केली आहेत. भारत स्वतःचे 4G नेटवर्क विकसित करण्यासाठी तयार आहेत. जिओने आपल्या 5G तंत्रज्ञानासह प्रगती केली आहे परंतु तरीही ती त्याच्या 4G पायाभूत सुविधांसाठी बाहेरील विक्रेत्यांवर अवलंबून आहे. स्वदेशी 4G विकासात आघाडीवर राहण्याचे BSNL चे उद्दिष्ट आहे आणि ते आधीच 5G ची चाचणी करत आहे. TCS, C-DoT आणि Tejas Networks च्या सहकार्याने, BSNL च्या 4G रोलआउटसाठी तांत्रिक आधार प्रदान करत आहे.

2025 च्या मध्यात रोलआउट होईल | BSNL 4G Network

भारताला 4G आणि 5G च्या पलीकडे जायचे आहे आणि 6G तंत्रज्ञानात 10% जागतिक वाटा मिळवायचा आहे. BSNL चे 4G नेटवर्क 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, परंतु विलंबित लॉन्चमुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करणे कठीण होऊ शकते. बाजारात आपले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी कंपनीला स्पर्धात्मक किंमती आणि सेवा द्याव्या लागतील.

Prostate Cancer | पुरुषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सरचा धोका? अशाप्रकारे करा बचाव

Prostate Cancer

Prostate Cancer | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्याचप्रमाणे बैठे जीवनशैलीमुळे लोकांना आराम मिळत आहे. परंतु यामुळे अनेक शारीरिक व्याधी देखील वाढलेल्या आहे. आजकाल अनेक पुरुषांना शारीरिक तसेच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. परंतु पुरुष या गोष्टींबद्दल बोलणे टाळतात. परंतु पुढे जाऊन या समस्यांचे एका मोठ्या गंभीर आजारात रूपांतर होते. हाती आलेल्या एका अभ्यासानुसार पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे (Prostate Cancer) प्रमाण वेगाने वाढलेले आहे. परंतु यावर जर वेळीच काळजी घेतली, तर हा कॅन्सर आपल्याला टाळता येतो. आता प्रोस्टेट कॅन्सर टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊया.

निरोगी जीवन शैली | Prostate Cancer

पुरुषांचे वाढते वय हे प्रोस्टेट कॅन्सरचे खूप मोठे कारण आहे. वाढत्या वयासोब प्रोस्टेट मधील पेशींची वाढ कमी होते. आणि त्या जागी कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात. कॅन्सरचे प्रमाण वृद्ध पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. वयानुसार त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही एक निरोगी जीवनशैली अंगीकारणे खूप गरजेचे आहे.

निरोगी आहार

तुम्ही जर दररोज नियोगी आहार घेत असाल, तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश असणे खूप गरजेचे असते. तसेच अँटिऑक्सिडंट आणि फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचा देखील आहारात समाविष्ट करा. विशेषता माशांमध्ये असतात. त्याचा देखील तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तसेच विटामिन डी आणि कॅल्शियम देखील योग्य प्रमाणात घ्या.

नियमित व्यायाम करा

तुम्ही जर नियमित व्यायाम केला, तर अनेक आजारांना मागे टाकू शकता. तर नियमित व्यायाम केल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका देखील कमी होतो. तुमच्या शरीराची हालचाल झाल्यामुळे शरीरातील वजन नियंत्रणात राहते. आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. आठवड्यातून दोन दिवस तुम्ही जिममध्ये जाऊ शकतात. व्यायामामुळे तुमचे harmonal संतुलित राहते.

धूम्रपान करू नका

आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्याने अनेक लोक धूम्रपान आणि मद्यपानाचे जास्त सेवन करतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो तुमच्या शरीरात जर विषारी पदार्थांचे प्रमाण वाढले, तर कर्करोगाच्या पेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे तसेच मद्यपान जास्त केल्याने हार्मोनल असंतुलित होतात आणि अनेक रोगाचा समस्या उद्भवतात.

मानसिक आरोग्य आणि तणाव | Prostate Cancer

मानसिक आरोग्य तुम्ही नीट ठेवणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर भावनिक दृष्ट्या संतुलित नसाल, ताणतणावाने ग्रस्त असाल, तरी देखील तुमच्या शरीरात अनेक बदल होता. आणि तुम्ही स्वतःहून अनेक आजारांना आमंत्रण देता त्यामुळे शारीरिक आरोग्यसोबत मानसिक आरोग्याकडे देखील लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

Ganesh Visarjan 2024 : मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल; कोणते मार्ग बंद , कोणते सुरु ?

ganesh visarjan mumbai

Ganesh Visarjan 2024 : मुंबईतील विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. देशभरात उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाणार आहेत मुंबईतील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय विसर्जन मिरवणुकी देखील मोठ्या दिमाखात पार पाडल्या जातात. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे कोणतीही गैरसोयी होऊ नये याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले (Ganesh Visarjan 2024) आहेत. चला जाणून घेऊया…

‘हे’ मार्ग पूर्णपणे बंद राहतील

मिरवणूक विसर्जन सोहळ्याच्या वेळेमध्ये वाहतुकीसाठी काही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत यामध्ये लाखलाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, जे एस एस रोड, विठ्ठल भाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टॅंक रोड, पंडिता रमाबाईमार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग, नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग, महापालिका मार्ग, एस व्ही पी रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, जिना भाई मुलजी राठोड मार्ग या मार्गावर वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार आहे

याबरोबरच विसर्जन मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार असून दादर मधले ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसरकर रोड, एम बी राऊत रोड, टिळक ब्रिज, एस के बोले रोड आणि जुहू येथील देवळे रोड, जुहू तारा रोड या मार्गावर (Ganesh Visarjan 2024) वाहतुकीस पूर्णपणे बंदी राहणार आहे.

100 पेक्षा अधिक व्यक्ती पुलावर नकोत

कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक पुलांवरून विसर्जन मिरवणुका जात असताना सुरक्षा व्यवस्थेला अधिक महत्त्व दिले गेले असून पुलांवर 100 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र न जमाव्यात याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच जुने आणि धोकादायक पोलांवर विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.

…अन्यथा होणार कारवाई (Ganesh Visarjan 2024)

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी संबंधित सुरक्षेच्या निर्देशांचा पालन करावे असे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक व्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांमुळे विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. (Ganesh Visarjan 2024) यामुळे वाहतूक आणि सुरक्षेच्या संबंधितांना आवश्यक अडचणी टाळता येतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Namo Bharat Rapid Rail : वंदे मेट्रोचे नाव बदलले, आता नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाणार

Namo Bharat Rapid Rail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रथमच भारतात लाँच झालेल्या वंदे मेट्रोचे नाव बदल्यात आलं आहे. रेल्वे विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. आता हि रेल्वे नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) म्हणून ओळखली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथे वंदे भारत मेट्रोचे उद्घाटन केले. तत्पूर्वी या रेल्वेच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. आता वंदे भारत मेट्रो ट्रेन नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाईल. हि ट्रेन भुज-अहमदाबाद मार्गावर धावेल.

नमो भारत रॅपिड रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केलं जाईल तसेच पारंपारिक गाड्यांना वेगवान पर्याय देणे आणि शहरातील व्यस्त मार्गावरील गर्दी कमी करण्यात येईल. नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अंतर्गत हा प्रकल्प डेव्हलप करण्यात आला आहे. या नव्या नमो भारत रॅपिड रेलमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद तर घेता येईलच आणि त्यांचा वेळ वाचण्यास सुद्धा मदत होईल.

कस आहे वेळापत्रक – Namo Bharat Rapid Rail

दरम्यान, अहमदाबाद आणि भुज या शहरांदरम्यान धावणारी नमो भारत रॅपिड रेल आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. ट्रेन क्रमांक 94801 असलेली अहमदाबाद-भुज नमो भारत रॅपिड रेल अहमदाबादहून शनिवार वगळता दररोज 17:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23:10 वाजता भुजला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ९४८०२ भुज-अहमदाबाद वंदे मेट्रो भुज येथून रविवार वगळता दररोज ०५.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी अहमदाबादला १०.५० वाजता पोहोचेल. या रेल्वेला साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवड, समखियाली, भचौ, गांधीधाम आणि अंजार स्थानकावर थांबा मिळेल.

काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये-

नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) मध्ये 12 वातानुकूलित डबे, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे, मॉड्यूलर इंटीरियर, एलईडी लाइटिंग, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशनसह शौचालये आणि मार्ग नकाशे आहेत. तसेच पॅनोरॅमिक खिडक्या, सीसीटीव्ही, फोन चार्जिंग सुविधा आणि अलार्म सिस्टम आणि एरोसोल आधारित अग्निशामक प्रणालीसह स्वयंचलित धूर/आग शोधण्याची सुविधा यांसारखी आधुनिक वैशिष्टये या रेल्वेमध्ये पाहायला मिळतात.

Expressway : अटल सेतूवरून थेट बंगळुरू गाठता येणार ; गडकरींनी सांगितला नव्या महामार्गाचा प्लॅन

Expressway : देशभरात रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राज्यातील दोन महत्वाची शहरं पुणे आणि मुंबई या शहरांना राज्यातील इतर शहरांशी जोडण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मोठ्या शहरांच्या दृष्टीने पुणे -मुंबई एक्सप्रेसवे आणि पुणे -बंगळुरू हायवे हे दोन्ही मार्ग अतिशय महत्वाचे आहेत. मात्र अनेकदा या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते बंगळुरू नवा महामार्ग बांधण्याचा सरकारचा प्लॅन (Expressway) असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

पुणे बेंगलोर हायवेवर देखील तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याच वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. याच बाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान दिली आहे. मुंबई ते बेंगळूर या मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने नवीन हायवे बनवण्याचे ठरवलं असून त्याचा टेंडर हि निघाल्याची (Expressway) घोषणा गडकरी यांनी केली आहे.

कसा असेल नवा महामार्ग ?

नव्या महामार्गाबद्दल माहिती देताना गडकरींनी सांगितले की, अटल सेतू वरून उतरल्यानंतर तेथून थेट 14 लेन चा नवीन हायवे पुण्याच्या रिंग रोडला जोडण्यात येईल. मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम पुढच्या सहा महिन्यात करायचे ठरवले आहे. या प्रकल्पाचे टेंडर ही निघालं असून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेसवे ची 50% वाहतूक त्या रोडवरून जाईल. अटल सेतू वरून तुम्ही नव्या पुणे एक्सप्रेसला लागले तर तिथून पुण्याच्या रिंग रोडला येणार आणि तिथून थेट बंगळुरूला जाणार. पुढे हाच रोड पुणे औरंगाबादला जोडला (Expressway) जाणार त्यामुळे पुण्याच्या आत मध्ये अडकणार नाही असे गडकरींनी सांगितलं.

गडकरींनी सांगितला अनुभव (Expressway)

यावेळी बोलताना गडकरींनी आपल्या कुटुंबासोबत घडलेला वाहतूक कोंडीचा प्रसंगही सांगितला. ते म्हणाले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला त्यावेळेस पुढचे 50 वर्ष आता काही समस्या नाही असं आम्ही म्हणायचो. मात्र ” आज माझा मुलगा आणि पत्नी पुण्याला येत होते नागपूरहून पुण्याला नीट पोहोचलो पण लोणावळ्यात एक तास अडकलो होतो.” असे ते म्हणाले. मात्र बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे. असे ते म्हणाले.

जुन्या चुका महाविकास आघाडीच्या अंगलटी येणार?

Maha Vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तस तस राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच गरम होऊ लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्व सत्ताधारी महायुती असा थेट सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीवरून दोन्हीकडून खडाजंगी पाहायला मिळते. आरोप- प्रत्यारोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली आहे. खास करून विरोधात असलेली महाविकास आघाडी सत्ताधार्यांना वेगवेगळ्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतील रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन केलं होते. निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण व्हावे, यासाठी महाविकास आघाडी आरक्षण आणि इतर मुद्दे उपस्थित करून भाजपविरोधी आणि स्वतःला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेचा असा विश्वास आहे की काँग्रेसने महाराष्ट्राच्या हिताला कधीही प्राधान्य दिले नाही आणि राज्यातील महान व्यक्तींचा अपमान केला आहे.

सध्या जरी महाविकास आघाडी महाराष्ट्र धर्माचा दाखला देत महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असली तरी महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांची जुनी वक्तव्ये बघितली तर जुन्या चुका महाविकास आघाडीच्या अंगलती येऊ शकतात असं बोललं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने यापूर्वी विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी महाराजांना ‘विश्वासघाती दरोडेखोर’ म्हटले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश आणि बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले आहे. शिवाय, यापूर्वी मुंबई महाराष्ट्राला देण्यासही पक्षाने विरोध केला आहे.

शरद पवार यांनीही शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला विरोध केला आहे, तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आणि तत्कालीन महाविकास आघडी सरकारने अमरावती आणि दर्यापूरमध्ये त्यांचे पुतळे हटवले. कर्नाटकात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले असून संजय राऊत यांनी त्यांच्या वंशावर प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पाठीमागच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशावळीवर प्रश्न उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्य केले आहे.

संभाजीराजे यांच्या वंशावळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची रक्त तपासणी करावी असे सुचविले. MVA नेत्यांवर किल्ल्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांना आश्रय देण्याचा आणि वक्फ बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर जमीन हडप करण्यास समर्थन केल्याचा आरोप आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी औरंगजेब आणि अफझलखानाची प्रशंसा केली आणि दावा केला की शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच महान होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा औरंगजेब आणि मुघलांचे कौतुक करताना म्हटले की त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला नाही. मुघलांपासून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा हा अनादर होता. हि सर्व जुनी वक्तव्ये महाविकास आघाडीवरच बुमरँग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.