हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Tourism App । महाराष्ट्रातील पर्यटकप्रेमी नेहमीच पुण्याला आपली पसंती देत असतात. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे बेस्ट शहर असल्याने पुण्याची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे पुण्याच्या आसपास असणारी अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची कायमच गर्दी बघायला मिळते. परंतु कधी कधी लांबून पुण्यात पर्यटनाला आलेल्या प्रवाशांना पुण्यात नेमकी कोणकोणती पर्यटनस्थळे आहेत? कुठे कस जायचं याबाबत बहुतेकदा माहितीच नसते… राहायचं कुठे? अन्न सेवा आणि इतर आवश्यक सुविधांबद्दल माहिती मिळविण्यासाठी अनेकदा लांबच्या पर्यटकांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पर्यटन फसते. परंतु आता यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटनाशी संबंधित सर्व माहिती एकाच मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये भरण्याची तयारी केली आहे. लवकरच हे अँप पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. या अँप मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असतील आणि पर्यटकांना त्याचा कसा फायदा होईल तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
तर पुण्यातील कोणालाही माहिती नसलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या अनेक पर्यटन स्थळांपासून ते त्याठिकाणी कसं जायचं? कोणत्या मार्गे जायचं? प्रवेश शुल्क किती आहे? त्याठिकाणी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. याची संपूर्ण माहिती या अँप मध्ये (Pune Tourism App) मिळेल. मागील कैच महिन्यात पर्यटनाच्या बाबतीत अनेक दुर्घटना घडल्यात.. मग तो कुंडमाळा पूल कोसळणे असो वा कोणी वाहून गेल्याची घटना असो… अशा प्रकारच्या घटनांमुळे निश्चितच पुण्याच्या पर्यटकनावर परिणाम होऊ शकतो. अशा घटनांमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळांवर चांगल्या पायाभूत सुविधा, गर्दी नियंत्रण आणि नियोजनाची आवश्यकता असल्याची गरज स्पष्ट झाली. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन नवीन पर्यटन अँप बनवणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच सुरक्षित पर्यटन कस होईल यासाठी हा प्रयत्न आहे.
काय काय सुविधा मिळणार ? Pune Tourism App
पुणे जिल्ह्यातील सर्व १३८ अधिकृतपणे मान्यताप्राप्त पर्यटन स्थळांची माहिती या अँप मध्ये (Pune Tourism App) मिळेल. यामध्ये प्राचीन गुहा, भव्य किल्ले, हिरवेगार गेटवे, पायवाट, हिल्स स्टेशन यांसारख्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या सर्व पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती या अँप मध्ये मिळेल. कोणत्या पर्यटन स्थळावर कस जायचं? वाहनांची सोय कशी आहे? सदर पर्यटन स्थळांवर तिकीट शुल्क आहे का? असेल तर किती रुपये आहे? तसेच सदर पर्यटन स्थळी साहसी आणि क्रीडा ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत याबाबतची माहिती पर्यटकांना या अँप मध्ये मिळेल.










