Thursday, December 18, 2025
Home Blog Page 47

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, या रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक; बातमी वाचूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Mega Block । मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने १३ जुलै रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेने ट्रॅक अलाइनमेंट, ओव्हरहेड वायर बसवणे आणि इतर संबंधित कामे यासारखी आवश्यक देखभालीची कामे करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी रविवार मेगा ब्लॉक लागू केला आहे. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील ठाणे आणि विद्याविहार दरम्यानच्या सेवांवर या ब्लॉकचा परिणाम होईल. डीआरएम मुंबई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोणकोणत्या रेल्वेगाड्या रद्द ? Mumbai Local Mega Block

पाचव्या मार्गावर, सकाळी ०८:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर सहाव्या मार्गावर, सकाळी ०८:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. याव्यतिरिक्त, कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही हार्बर मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक लागू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या सर्व डाउन सेवा रद्द राहतील. सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या सर्व सेवा देखील रद्द राहतील. मेगा ब्लॉक दरम्यान, (Mumbai Local Mega Block) सीएसएमटी, कुर्ला, पनवेल आणि वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे हे वेळापत्रक बघूनच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं.

दुसरीकडे, पश्चिम रेल्वे शनिवार आणि रविवारी मध्यरात्री सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी ००:३० ते ४:०० वाजेपर्यंत अप जलद आणि पाचव्या मार्गावर ३ तास ३० मिनिटांचा जम्बो ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेणार आहे. या ब्लॉक कालावधीत, अप जलद मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि माहीम दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेने असेही स्पष्ट केले आहे की रविवार, १३ जुलै २०२५ रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक राहणार नाही.

बच्चूभाऊंकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबाचे सांत्वन, तर दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र विमानतळ पाहणीत व्यस्त

bacchu kadu

अमरावती प्रतिनिधी । ‘शेतकऱ्याचा ७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेच्या माध्यमातून ‘प्रहार’चे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी चिरकुटा गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी राऊत व फुलवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी दिनेश राठोड या दोघांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबियांसोबत चर्चा करीत त्यांचे सांत्वन केले. पुढे तूपटाकळी गावात शेतीच्या बांधावर जाऊन कोळपणी करीत बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधला.

शेतकऱ्यांप्रती मनामध्ये कायम तळमळ असणाऱ्या बच्चू कडू यांच्या ‘७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेला शेतकऱ्याचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ नसून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी वेळ आहे. असला मुख्यमंत्री काय कामाचा, अशाला मुख्यमंत्री म्हणावं का? असा सवाल शेतकरीबांधव करू लागले आहेत.

बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आजचा सहावा दिवस असून बच्चू भाऊ शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. वृद्ध व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना ७/१२ कोरा कोरा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन देखील करीत आहेत.

अमरावती विभागात 257 तर यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत एकूण 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये यवतमाळ 178 शेतकऱ्यांसह आघाडीवर आहे. मागील सहा महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकर्याची यादी पाहिल्यास यामध्ये सव्वाअधिक यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा – १०१, यवतमाळ जिल्हा – १७८, अकोला जिल्हा – ९०, बुलढाणा जिल्हा – ९१, वाशिम जिल्हा – ६७ या जिल्ह्याचा समावेश आहे.

सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या व जिल्हे

अमरावती जिल्हा : ५,४७७
यवतमाळ जिल्हा : ६,३५१
अकोला जिल्हा : ३,२०७
वाशिम जिल्हा : २,१०७
बुलढाणा जिल्हा : ४,५३२

Pune Nashik Semi High Speed Train : पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा DPR पूर्ण

Pune Nashik Semi High Speed Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik Semi High Speed Train । प्रस्तावित पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे . मध्य रेल्वेने या कॉरिडॉरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम केला आहे. आता हा DPR रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला नक्कीच गती मिळणार आहे. पुणे आणि नाशिक हि दोन्ही शहरे औद्योगिक शहरे आहेत. दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही शहरांना जोडणारी थेट रेल्वे लाईन तयार व्हावी अशी मागणी होत आली आहे. अखेर या कामाला यश मिळताना दिसत आहे.

किती अंतर आहे – Pune Nashik Semi High Speed Train

नवीन डीपीआर नुसार, पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्ग हा (Pune Nashik Semi High Speed Train) सध्याच्या महामार्गाला समांतर असणार आहे तर शिर्डी पासून नाशिक पर्यंत नवीन महामार्ग निश्चित केला जाणार आहे. हा नवीन रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर अंतराचा असू शकतो. यातील पुणे ते अहिल्यानगर अंतर १२५ किलोमीटर तर अहिल्यानगर ते शिर्डी दरम्यानचे अंतर ८२ किलोमीटर आहे. हा नवीन २३५ किलोमीटरचा मार्ग पुणे आणि नाशिक दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे ४५ मिनिटांनी वाढवू शकतो, परंतु या रेल्वेमार्गात कोणताही अडथळा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या प्रस्तावित ‘सेमी हायप्सीड’ प्रकल्पाचा (Pune Nashik Semi High Speed Train) सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे. कागदोपत्री त्रुटी दूर करण्यात येत असून, दुरुस्तीअंती वरिष्ठांकडे हस्तांतरित करण्यात येईल. साधारणतः आठवडाभरात हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती मोहित सिंग, उपमुख्य अभियंता, मध्ये रेल्वे, पुणे विभाग यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे ते नाशिक सेमी -हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची अंदाजे किंमत १६,००० कोटी रुपये आहे आणि या मार्गावरून प्रतितास २०० किलोमीटर क्षमेतेने रेल्वे धावू शकतात. हा रेल्वे प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुणे ते नाशिक रेल्वे कॉरिडॉरमध्ये २४ स्थानके असतील, ज्यामध्ये १३ प्रमुख आणि ११ लहान स्थानकांचा समावेश आहे.

Air India Plane Crash Report : अहमदाबाद विमान अपघात कशामुळे झाला? धक्कादायक अहवाल समोर

Air India Plane Crash Report

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane Crash Report । अहमदाबाद विमान अपघात कसा झाला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरं तर या विमान अपघाताला १ महिना पूर्ण झाला आहे. मागील महिनाभरापासून या विमान अपघाताबाबत चौकशी आणि तपास सुरु होता. आता एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. विमानाच्या “ब्लॅक बॉक्स” रेकॉर्डरमधून ४९ तासांचा उड्डाण डेटा आणि अपघातातील दोन तासांचा कॉकपिट ऑडिओ डेटा काढण्यात आल्यानंतर याबाबतचा खुलासा झाला आहे.

नेमकं काय घडलं? Air India Plane Crash Report

अहवालानुसार, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच “०१ सेकंदाच्या अंतराने एकामागून एक RUN वरून CUTOFF स्थितीत बदलले गेले तेव्हा विमानाचा वेग १८० नॉट्सवर पोहोचला होता,” असे म्हटले आहे. कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, एका वैमानिकाला विचारताना ऐकू येते की त्याने कटऑफ का केला. दुसऱ्या वैमानिकाने मी कट ऑफ केलं नाही असं उत्तर दिले. काही वेळातच, स्विचेस जिथे असायला हवे होते तिथे परत आणण्यात आले आणि जेव्हा अपघात झाला (Air India Plane Crash Report) तेव्हा इंजिन पुन्हा पॉवर अप करण्याच्या प्रक्रियेत होते.

खरं तर ७८७ ड्रीमलायनर आणि इतर व्यावसायिक विमानांमध्ये एकाच इंजिनवर टेकऑफ पूर्ण करण्यासाठी पुरेशी पॉवर असते आणि वैमानिक त्यासाठी सज्ज सुद्धा असतात. परंतु दोन्ही दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झाल्याने वैमानिक काहीच करू शकला नाही. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही सेकंदांनी, वैमानिकाने “मेडे मेडे मेडे” असा कॉल दिला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने कॉल साइनबद्दल चौकशी केली. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तोपर्यंत विमान खाली कोसळलं. Air India Plane Crash Report

अहवालात हेच स्पष्ट झालं आहे की दोन्ही इंधन स्विच अचानक बंद होणे हे या विमान अपघाताचे मुख्य कारण आहे. एएआयबी टीममध्ये पायलट, अभियंते, मानसशास्त्रज्ञ आणि तज्ञांचा समावेश आहे. ते अजूनही जास्तीत जास्त पुराव्यांचे विश्लेषण करत आहेत.

IBPS PO Recruitment 2025 : बँकेत 5208 जागांसाठी मेगाभरती!! पात्रता काय? अर्ज कसा करायचा?

IBPS PO Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IBPS PO Recruitment 2025 । बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत तब्बल 5208 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. हि भरती वेगवगेळ्या बँकेसाठी जाहीर झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी झाली असून उमेदवारांकडून अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2025 आहे. या मेगाभरती साठी पात्रता काय आहे? पगार किती रुपये मिळेल आणि अर्ज कसा करायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कोणत्या पदासाठी भरती?

सदर भरती हि प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या बँकेत किती जागा? IBPS PO Recruitment 2025

बँक ऑफ बडोदा – १०००
बँक ऑफ इंडिया – ७००
बँक ऑफ महाराष्ट्र – १०००
कॅनरा बँक – १०००
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ५००
इंडियन बँक – NR
इंडियन ओव्हरसीज बँक – ४५०
पंजाब नॅशनल बँक – २००
पंजाब अँड सिंध बँक – ३५८
युको बँक – NR
युनिअन बँक ऑफ इंडिया – NR

शैक्षणिक पात्रता:

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे मूलभूत संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

IBPS PO साठी अर्ज करण्यासाठी किमान वय 20 वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. म्हणजेच काय तर उमेदवारांचा जन्म 02.07.1995 पूर्वी किंवा 01.07.2005 नंतर झालेला नसावा. IBPS PO Recruitment 2025

अर्ज शुल्क-

SC, ST आणि PwBD श्रेणींसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. तर इतर श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये भरावे लागतील. तुम्ही UPI, नेटबँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सारख्या ऑनलाइन पद्धतीने पैसे भरू शकता.

असा करा अर्ज?

सर्वात आधी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या (IBPS PO Recruitment 2025)
होमपेजवरील “CRP PO/MT-XIII” भरती लिंकवर क्लिक करा.
“New Registration” वर क्लिक करा आणि तुमचे नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी सारखे डिटेल्स भरा.
आता तुम्हाला दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा — दिलेल्या तपशीलांनुसार फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र.
डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी काळजीपूर्वक त्याची तपासणी करा.
अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

200 औषधे स्वस्त होणार; रुग्णांना सर्वात मोठा दिलासा

Medicine Price Cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅन्सर किंवा HIV सारख्या जीवघेण्या रोगाचे निदान असणाऱ्या रुग्णांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. एका सरकारी पॅनेलने सुमारे २०० आवश्यक औषधांवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्याची शिफारस केली आहे. तर काही कर्करोगाच्या औषधांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचे म्हटले आहे.जर ही शिफारस लागू केली गेली तर या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात आणि उपचार स्वस्त होऊ शकतात. त्यामुळे दवाखान्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

औषधांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि भारतात आरोग्यसेवा स्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते. विशेषतः कर्करोग, क्षयरोग, मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. पॅनेलने सल्ला दिला आहे की जर त्यांच्यावर लावण्यात येणारा कर कमी केला तर कंपन्यांना हि सर्व औषधें स्वस्त मिळतील आणि रुग्णांना त्याचा थेट फायदा मिळेल. तसेच, भारतात औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांचा खर्च देखील कमी होईल. भारत अजूनही अनेक आवश्यक औषधे आणि त्यांच्या कच्च्या मालासाठी चीनसारख्या देशांवर अवलंबून आहे. जेव्हा या गोष्टी परदेशातून आयात केल्या जातात तेव्हा त्यावर आयात शुल्क आकारले जाते, ज्यामुळे औषध महाग होते. परंतु नवीन शिफारसी नुसार औषधांचे दर कमी केले तर सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होईल, आरोग्यसेवा बळकट होईल आणि लोकांना स्वस्त औषधे मिळू शकतील.

कोणकोणत्या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात ?

या रिपोर्टनुसार, दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे जी अनेकदा सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतात. ज्या औषधांच्या किमती कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास २०० औषधें आहेत. यातील ७४ औषधे अशी आहेत ज्यावर ५% कस्टम ड्युटी आकारण्यात आली आहे, तर ६९ औषधे आहेत ज्यावर पूर्णपणे सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ५६ औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देण्याचेही सांगण्यात आले आहे. पॅनेलने स्पाइनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी, सिस्टिक फायब्रोसिस, गौचर रोग, फॅब्री रोग, लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर आणि आनुवंशिक एंजाइम कमतरता यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यापैकी एका डोसची किंमत लाखोंमध्ये असते. यामुळेच बहुतेक लोक ती खरेदी करू शकत नाहीत. या यादीत झोलजेन्स्मा, स्पिनराझा, एव्हरीस्डी, सेरेझाइम आणि तख्झायरो सारख्या औषधांचाही समावेश आहे. ही सर्व औषधे खूप महाग आहेत त्यामुळे भारतीय रुग्णांना ती खरेदी करणे शक्य होत नाही.

Infinix Hot 60 5G+ : 10,499 रुपयांत लाँच झाला 6GB रॅमवाला मोबाईल

Infinix Hot 60 5G+

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Infinix Hot 60 5G+। तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि जास्तीत जास्त फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कमी पैशात मोबाईल लाँच करणारी प्रसिद्ध कंपनी Infinix भारतीय मार्केट मध्ये आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Hot 60 5G+ असं या स्मार्टफोनचे नाव असून या मोबाईलची किंमत फक्त 10,499 रुपये आहे. किंमत कमी असली तरी यामध्ये देण्यात आलेले फीचर्स मात्र दमदार आहेत. भारतीय बाजारात हा मोबाईल LAVA, POCO ITEL यांसारख्या ब्रँडना थेट टक्कर देऊ शकतो. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

Infinix Hot 60 5G+ ची लांबी 166 मिमी, रुंदी 76.8 जाडी 7.8 मिमी आणि वजन 193 ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. IMG BXM-8-256 GPU सह ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7020 6nm प्रोसेसर बसवण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवू शकता. इनफिनिक्सचा हा मोबाईल IP64 रेटिंगसह येतो ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून त्याला कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Infinix Hot 60 5G+

मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Infinix Hot 60 5G+ मध्ये पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलला 5200mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये यामध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.4, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक, FM रेडिओ आणि USB टाइप C 2.0 पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

nfinix Hot 60 5G+ च्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे. हा मोबाईल काळा, हिरवा आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. येत्या 17 जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, इन्फिनिक्स इंडिया ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. सर्व बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळू शकते.

भाजप आमदाराच्या पत्नीचा बच्चू कडूंना पाठिंबा!! म्हणाल्या, विषय शेतकऱ्याचा आहे

BACHHU KADU PRIYA SHINDE

अमरावती प्रतिनिधी । ‘शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा’ हि पदयात्रा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे. पदयात्रेच्या आजच्या सहाव्या दिवशी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वृद्ध व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू भाऊ भावुक झाल्याचे देखील पहायला मिळाले. शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढे धानोरा गावात पदयात्रा आली असता आर्णी केळापूर मतदारसंघाचे भाजप राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या यात्रेचे स्वागत केले. यावेळी भाजप आमदाराची पत्नी असले तरी मला स्वतःच मत आहे. विषय शेतकऱ्याचा असल्याने बच्चूभाऊंच्या ७/१२ कोरा यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी आले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून भर पावसातही हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन बच्चू कडू यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला आक्रमकपणे सुरुवात केली आहे. ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.

आज सहाव्या दिवशी पदयात्रा तिवरी तुपटाकळी येथून मार्गस्त होत असताना तरोडा येथे बच्चू कडू यांनी एका शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. तसेच बच्चू भाऊंसोबत संवाद साधताना शेतकऱ्याने त्यांचं तोंड भरून कौतुक करत पाठ थोपटली व कष्टकरी शेतकरी सदैव पाठीशी उभा आहे “आता थांबायचं नाय,” असे सांगितले. त्या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्यानंतर बच्चू भाऊ देखील भावुक झाले. त्यांनी शेतकऱ्याला थेट वाकून नमस्कार केला.

बच्चू कडू यांच्या आवाहनानंतर त्यांनी काढलेल्या सातबारा कोरा कोरा यात्राला ठिकठिकाणी गावागावातून वृद्ध, तरुण महिला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या सभांना शेतकरी, महिला मोठ्या संख्येने हजेरी सहभागी होत आहेत

Indian Railways : AI रोखणार रेल्वे अपघात; नवीन सिस्टीम कसं काम करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । आपल्या भारतात रेल्वेचं जाळं मोठं आहे . देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर आपण रेल्वेने जातो. कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास होत असल्याने रेल्वे प्रवासाला मोठी गर्दी बघायला मिळते. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र मागील काही वर्षात घडलेल्या विविध रेल्वे अपघातामुळे रेल्वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. यावर उपाय करण्यासाठी रेल्वे विभागाने आता AI ची मदत घेण्याचं ठरवलं आहे.

कसं काम करणार ? Indian Railways

रेल्वेची सेवा कार्यक्षमता सुधारण्यासाठी (Indian Railways) आणि रोलिंग स्टॉकची देखभाल ऑटोमॅटिक करण्यासाठी, भारतीय रेल्वे (IR) ने मशीन व्हिजन बेस्ड इन्स्पेक्शन सिस्टम (MVIS) बसवण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. एमव्हीआयएस हे रस्त्याच्या कडेला तैनात केलेले एक आधुनिक, एआय/एमएल-आधारित तंत्रज्ञान आहे. हि सिस्टीम धावत्या ट्रेनच्या अंडर-गियरचे HD फोटो काढते आणि कोणतेही लटकलेले, सैल किंवा गहाळ पार्ट ऑटोमॅटिक शोधते. जर काही दोष किंवा तांत्रिक बिघाड आढळला तर ही सिस्टीम रिअल-टाइम अलर्ट पाठवते. MVIS च्या अंमलबजावणीमुळे रेल्वे डब्यांची झीज आणि नुकसान यासाठी मशीन-आधारित तपासणी शक्य होईल. तसेच यामुळे मॅन्युअल तपासणीतील चुका दूर होतील.

रेल्वे बोर्डाचे संचालक सुमित कुमार आणि DFCCIL चे GGM जवाहर लाल यांनी रेल भवन नवी दिल्ली येथे औपचारिकपणे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत, DFCCIL चार MVI युनिट्सची खरेदी, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंगसाठी जबाबदार असेल. भारतीय रेल्वे विभागात अशा प्रकारची AI सिस्टीम प्रथमच वापरली जाणार आहे. या नव्या AI तंत्रज्ञानामुळे रेल्वे सुरक्षितता वाढेल, आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल अशी आशा आहे. हा उपक्रम रेल्वे इकोसिस्टममध्ये आधुनिक, इंटेलिजन्स सिस्टीम सादर करण्याच्या IR च्या व्यापक उद्दिष्टाशी देखील सुसंगत आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने भविष्यात तयार असलेल्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीत रेल्वे सुरक्षेत डिजिटल परिवर्तनासाठी नवीन मार्ग उघडले जातील,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Pune Real Estate : पुणे मेट्रोमुळे रिअल इस्टेटला बळ; मालमत्तेच्या किमती 30-35 टक्क्यांनी वाढल्या

Pune Real Estate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Real Estate। पुणे हे शिक्षण आणि विड्याचे माहेरघर तर आहेच. परंतु नोकरदार वर्गासाठी सुद्धा अतिशय छान असं शहर आहे. पुण्यात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या, आयटी कंपन्या असल्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात नोकरीसाठी लोक येतात. साहजिकच, पुण्यातील लोकसंख्या वाढली… वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ लागल्याने पुण्यात मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी हि मेट्रो ऐटीत धावतेय. मेट्रो सेवेमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न थोडापार का होईना मिटला आहे. तर दुसरीकडे याच मेट्रो मुळे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला चांगलीच गती आली आहे. मेट्रो स्थानकांच्या शेजारील मालमत्तेच्या किमती तब्बल ३०-३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

1 ते 2 कोटींच्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात – Pune Real Estate

पुणे मेट्रोच्या विकासामुळे रिअल इस्टेस्ट क्षेत्राला जणू सोन्याच्या खाणीचे रूप (Pune Real Estate) आलं आहे. क्रेडाई पुणेच्या मते, २०२१ पासून, हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, ताथवडे आणि औंध सारख्या भागात प्रीमियम घरांच्या विक्रीत ३००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. खास करून १ ते २ कोटींच्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे, रावेत, मोशी आणि पिंपळे सौदागर यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये परवडणाऱ्या आणि मध्यम श्रेणीतील घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. लोक या भागात फक्त घरे खरेदी करत नाहीत, तर नंतर भाड्याने देण्यासाठी त्यात गुंतवणूक करत आहेत. तर दुसरीकडे बरेच भाडेकरू सुद्धा आता मेट्रो स्टेशनजवळील घरांची मागणी करतात.

ज्यांनी पूर्वी घर खरेदी करण्याचा विचार केला नव्हता ते देखील आता मेट्रो कॉरिडॉरभोवती घर खरेदी करू पाहतायत. पुणे मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याने आणि मालमत्तेची मागणी वाढल्याने पुण्यातील मालमत्तांचे दर (Pune Real Estate) प्रति चौरस फूट अंदाजे २५-३०% ने वाढले आहेत. बाणेर, औंध, बावधन आणि कल्याणी नगर सारख्या प्रीमियम भागात तर या रेट आणखी उच्चांक गाठला आहे. या परिसरातील मालमत्तेत ३५-४०% वाढ झाली आहे. दुसरीकडे, मोशी, रावेत आणि वाघोली सारख्या काहीशा कमी विकसित भागात २०-२५% ने वाढ झाली आहे. मेट्रो स्टेशनच्या जवळ असणे हेच या सर्व किमती वाढण्याचे आणि किमतींमध्ये फरक करण्याचे एक महत्त्वाचे कारण बनले आहे. मेट्रो स्थानकापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या मालमत्तांच्या किमतीत वार्षिक १०-२५% वाढ होत आहे, ज्यामुळे घर खरेदीदार आणि डेव्हलपर्स दोघांनाही त्यांचे आकर्षण दिसून येते.