Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5050

आता मोबाईल नंबरमध्ये जुडणार आणखी एक ‘अंक’; 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू

मुंबई । 1 जानेवारीपासून देशातील लँडलाईनवरून मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी कॉल धारकांना लवकरच नंबरच्या सुरुवातीस ‘0’ जोडावा लागणार आहे, असा प्रस्तावच दूरसंचार विभागाने मंजूर केला आहे. ट्रायने मोबाईलवर कॉल करण्यासाठी 0 जोडण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे शिफारस केली होती. अखेर ती शिफारस मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात मोबाइल फोनवरून कॉल करण्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. देशातील टेलिकॉम विभागाने दूरसंचार कंपन्यांना नवीन यंत्रणा राबविण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यास सांगितले आहे.

टेलिकॉम रेग्युलेटर नियामक ट्रायने लँडलाईनवरून मोबाईलवर कॉलसाठी ‘0’ समाविष्ट करण्याची केलेली शिफारस विभागाने मान्य केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) 29 मे 2020 ला लँडलाईनवरून कॉलसाठी मोबाईल नंबरपूर्वी ‘शून्य’ लावण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आल्यामुळे टेलिकॉम सर्व्हिस वापरकर्त्यांना अधिक नंबर तयार करण्याची सुविधा मिळू शकणार आहे.

लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याची पद्धत बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या असून, आता लँडलाइनवरून मोबाईलवर फोन करण्यासाठी आधी 0 जोडणे आवश्यक आहे. 20 नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार विभागाने ही माहिती दिली आहे. यामुळे मोबाइल आणि लँडलाईन सेवांसाठी पुरेसे नंबर नव्यानं तयार करणं सहजसोपं होणार आहे.

दूरसंचार कंपन्यांना सर्व लँडलाईन ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. ही सुविधा सध्या आपल्या प्रदेशाबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहितीसुद्धा दूरसंचार विभागाने दिली आहे. टेलिकॉम कंपन्यांना ही नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Prefix ‘0’ To Call Mobiles From Landlines From January 1)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Petrol Diesel Price Today: पेट्रोल डिझेलचे दर आज जाहीर, आज किती किंमत आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू केली आहे. सध्या बुधवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील पाच दिवसांपासून किंमतीत सातत्याने वाढ होत होती. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 81.59 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.41 रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलमध्ये 6 पैसे आणि डिझेलमध्ये 16 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे. इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे किती दर आहेत ते जाणून घेऊयात .

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या. 

> दिल्ली पेट्रोल 81.59 रुपये आणि डिझेल 71.41 रुपये प्रतिलिटर आहे.

> मुंबई पेट्रोलची किंमत 88.29 रुपये आणि डिझेल 77.90 रुपये प्रतिलिटर आहे.

> कोलकाता पेट्रोल 83.15 रुपये तर डिझेल 74.98 रुपये प्रतिलिटर आहे.

> चेन्नई पेट्रोल 84.64 रुपये आणि डिझेल 76.88 रुपये प्रतिलिटर आहे.

> नोएडा पेट्रोल 82.04 रुपये तर डिझेल 71.86 रुपये प्रतिलिटर आहे.

> लखनऊ पेट्रोल 81.96आणि डिझेल 71.80 रुपये प्रतिलिटर आहे.

> पटना पेट्रोल 84.20 आणि डिझेल 76.94 रुपये प्रतिलिटर आहे.

> चंडीगड पेट्रोल 78.56 रुपये आणि डिझेल 71.16 रुपये प्रतिलिटर आहे.

यामुळे वाढत आहेत किंमती
यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण झाल्यानंतर लोकांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा होती. परंतु लोकांना केंद्र सरकारकडून मोठा धक्का बसला. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली होती. यापूर्वी 2014 मध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर 9.48 रुपये आणि डिझेलवर 3.56 रुपये कर होता. नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 या काळात केंद्र सरकारने त्यात नऊ वेळा वाढ केली. या 15 आठवड्यांत पेट्रोलवरील शुल्क 11.77 रुपयांनी तर डिझेलवर 13.47 रुपयांनी वाढले आहे.

अशा प्रकारे, आपण नवीनतम दर जाणून घेऊ शकता

तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईल ग्राहक RSP असे लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

चौकशा करा पण, याद राखा! महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे; राऊतांची भाजपला चेतावनी

मुंबई । सध्या देशात दबाव तंत्राचं राजकारण सुरू आहे. त्यामुळेच ईडी मार्फत चौकशा लावल्या जात आहे. जेवढ्या चौकश्या करायच्या त्या करा. आम्ही घाबरत नाही. पण महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांनी दिला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलं.

”ज्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने उद्योग करणे हा केंद्रीय सरकारला गुन्हा वाटतो का? असा सवाल करतानाच व्यवसाय-उद्योग करणाऱ्या मराठी माणसावर चौकशा लावाल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला. चौकशीला कुणीही घाबरत नाही. आता तुम्ही घाबरा. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत,” असा इशारा राऊत यांनी दिला.

नोटीशीची वाट पाहतोय
मला अजून नोटीस आली नाही. मला कधी नोटीस येते याची मी वाट पाहतो. सध्या व्होकल होणं आणि सत्य बोलणं गुन्हा ठरत आहे. त्यामुळे मला आणि अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीची (ED) नोटीस आली तर मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही, असं सांगतानाच केंद्र सरकारने आता 20 ते 25 वर्षांपूर्वीची जुनी थडगी उकरून काढण्याचं काम सुरू केलं आहे. त्यांचे हात मोहोजदडो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. तुम्हाला हव्या तेवढ्या चौकश्या करा. तुम्ही कितीही धाडी घाला. कितीही खोटी कागदपत्रं तयार करा. अशा चौकश्यांना आम्ही घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

पत्ते तुम्ही पिसताय, आम्ही डाव उलटवू
सध्या देशात सुडाचं आणि बिनबुडाचं राजकारण सुरू आहे. दबावतंत्राचं राजकारण सुरू आहे. आता तुम्ही पत्ते पिसताय पण लक्षात ठेवा डाव आम्ही जिंकू, असा इशाराही त्यांनी दिला.

120 नेत्यांची यादी देतो, मग करा चौकशा
राऊतांनी भाजपच्या 100 नेत्यांची यादी ईडीला द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुमच्या सर्व चौकश्या पूर्ण होऊ द्या. शंभरच काय 120 नेत्यांची यादी देतो. ईडी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे ही यादी पाठवतो. मग बघतो ईडी कुणाला चौकशीला बोलावते, असा पलटवारही त्यांनी केला. (shivsena leader sanjay raut slams bjp over ed enquiry)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

अरे येऊ देत! ईडीच्या नोटीसीची वाटचं पाहतोय? संजय राऊतांनी थोपटले दंड

मुंबई । ”मला अनेकांनी विचारलं ईडीची (ED) नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही” असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना केलं आहे. ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली, तर धक्का बसणार नाही” असंही संजय राऊत म्हणाले.

“चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, २०-२० वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदारो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

“प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्वतः खुलासा केला आहे, की ज्या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे, त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा काहीही संबंध नाही. मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना खतम करण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

युद्ध आमुचे पुन्हा सुरु! आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी

मुंबई । देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. आजपासून राज्यात या नियमांची अमंलबजावणी सुरु होणार आहे.

त्यानुसार आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी सुरु झाली आहे. याशिवाय दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परराज्यातून राज्यात प्रवेश करणार्यावर राज्य सरकार कडून काही निर्बंध लावण्यात आले असून आज पासून कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्ट वर तयारी सुरू झाली आहे.

तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट मुंबईवर असताना बीएमसीन ती परतवून लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. बस, रेल्वे आणि विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करणं बंधनकारक आहे. बीएमसीने स्टेशनवर टेस्टिंग कॅम्प उभारले आहेत. बोरिवली स्टेशनवर जयपूर एक्सप्रेसमधून आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

‘… तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’; अजित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

Ajit Dada

सातारा । आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराडला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

याशिवाय शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमचं सर्वांचं दैवत आहे आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केलेलं आहे, असंसुद्धा अजित पवार म्हणाले आहेत. ते 105 लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

दिग्गज काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं निधन

Ahmed Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते.

फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती.त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला ; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे पडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मला काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली होती. त्यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील नोटीस आली होती. हा सर्व प्रकार निषेधार्ह आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

विरोधी पक्षांच्या प्रमुख माणसांना टार्गेट केले जातेय. सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात केलेले आर्थिक भ्रष्टाचार दिसत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला.  देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा गैरवापर केला. आमच्याकडेही सत्ता होती पण आम्ही साम, दाम, दंड आणि संस्थांचा वापर केला नव्हता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन केले नसते तर आमचे राहिलेले नेतेही त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले असते. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शरद पवार, अजित पवार यांना ईडीची नोटीस दिली होती. ज्यांनी दिली त्यांनीच ती माघारी घेतली. राजकीय कारणाकरता हे सर्व चालले आहे, हे निषेधार्ह आहे. पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स अशा प्रकरणातील परदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक केलेली कागदपत्रे तुमच्याकडे पडलेली आहेत. त्यापैकी किती जणांवर कारवाई झाली, पोकळ घोषणाबाजी बास झाली, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

केंद्र सरकारने ‘या’ कायद्यांतर्गत घातली 43 चिनी अ‍ॅप्सवर बंदी, ते Uninstall कसे करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आज 43 चायना मोबाइल अ‍ॅप्स (India Ban Chinese Apps) वर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तक्रारीनुसार हे अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आणि त्यांच्यावर बंदी घातली. यापूर्वीही, लडाख सीमेवर चीनशी झालेल्या संघर्षानंतर मोदी सरकारने 150 हून अधिक अ‍ॅप्स बंद केले होते. TikTok Apps Likee, Shareit, Helo, UC Browser सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल आणि इंटरनेट युझर्सचे हित जपण्यासाठी आणि भारतीय सायबर स्पेसच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

या कायद्यानुसार केंद्र सरकार अ‍ॅप्स वर बंदी घालते
केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी कायदा) च्या कलम 69A च्या संबंधित तरतुदी आणि इंफॉर्मेशन टेक्‍नोलॉजी (प्रोसीजर अँड सेफगार्ड्स फॉर ब्‍लॉकिंग ऑफ एक्‍सेस ऑफ इंफॉर्मेशन बाय पब्लिक) रूल्‍स, 2009 च्या अंतर्गत 43 अ‍ॅप्स वर बंदी घातली आहे. हे कलम केंद्र सरकारला परदेशी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे अधिकार प्रदान करतात. ही अ‍ॅप्स भारताच्या संरक्षण, सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी हानिकारक मानली जात होती. बंदीनंतर आता हे अ‍ॅप्स मोबाईल आणि नॉन-मोबाइल बेस्ड इंटरनेट डिव्हाईसमध्ये वापरता येणार नाहीत. यापूर्वी 29 जून 2020 रोजी केंद्राने 29 जून 2020 रोजी चीनच्या 59 मोबाइल अ‍ॅप्स वर आणि 2 सप्टेंबर 2020 रोजी 118 वर बंदी घातली होती.

युझर्सचा डेटा चोरी करणे आणि पाठविणे हा भारतासाठी धोका आहे
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनच्या अ‍ॅप्स वर बंदी घातली आणि असे म्हटले की, अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेलले काही मोबाइल अ‍ॅप्सच्या दुरुपयोग केल्याच्या वृत्तानुसार, या अ‍ॅप्सने युझर्सचा (Users) डेटा चोरून भारताबाहेर असलेल्या अनधिकृत सर्व्हरकडे पाठविला. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस प्रतिकूल असलेल्या घटकांच्या वतीने हा डेटा गोळा करणे, तपासणे आणि प्रोफाइल करणे ही भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी धोका आहे. हे टाळण्यासाठी आपत्कालीन उपायांची आवश्यकता होती. त्याचबरोबर गृह मंत्रालयांतर्गत सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरनेही अशा अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

बंदी घातलेल्या 43 मोबाइल अ‍ॅप्सची संपूर्ण लिस्ट

AliSuppliers Mobile App
Alibaba Workbench
AliExpress – Smarter Shopping, Better Living
Alipay Cashier
Lalamove India – Delivery App
Drive with Lalamove India
Snack Video
CamCard – Business Card Reader
CamCard – BCR (Western)
Soul- Follow the soul to find you
Chinese Social – Free Online Dating Video App & Chat
Date in Asia – Dating & Chat For Asian Singles
WeDate-Dating App
Free dating app-Singol, start your date!
Adore App
TrulyChinese – Chinese Dating App
TrulyAsian – Asian Dating App
ChinaLove: dating app for Chinese singles
DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online
AsianDate: find Asian singles
FlirtWish: chat with singles
Guys Only Dating: Gay Chat
Tubit: Live Streams
WeWorkChina
First Love Live- super hot live beauties live online
Rela – Lesbian Social Network
Cashier Wallet
MangoTV
MGTV-HunanTV official TV APP
WeTV – TV version
WeTV – Cdrama, Kdrama&More
WeTV Lite
Lucky Live-Live Video Streaming App
Taobao Live
DingTalk
Identity V
Isoland 2: Ashes of Time
BoxStar (Early Access)
Heroes Evolved
Happy Fish
Jellipop Match-Decorate your dream island!
Munchkin Match: magic home building
Conquista Online II

चीनी अ‍ॅप्स अशाप्रकारे अन-इंस्‍टॉल, डिसेबल किंवा डिलीट केले जाऊ शकतात
आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील हे प्रतिबंधित केलेले अ‍ॅप्स असतील आणि आपण ते काढू इच्छित असाल तर या अ‍ॅप्स ला काही सेकंद दाबून अनइन्स्टॉल करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर हा पर्याय ड्रॅग आणि ड्रॉप करा. यानंतर आपल्या स्मार्टफोनवरून हे अ‍ॅप्स पूर्णपणे काढून टाकले जाईल. तथापि, काही अ‍ॅप्स सिस्टममध्ये इंटीग्रेटेड असतात, त्यामुळे त्या हटविल्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण त्यांना डिसेबल (Disable) करू शकता. ते डिसेबल करण्यासाठी फोनच्या सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्स या ऑप्शनवर क्लिक करा. येथे आपण आपल्याला मोबाइल फोनमधील सर्व अ‍ॅप्स दिसतील. यामध्ये प्रतिबंधित केलेले अ‍ॅप्स डिसेबल किंवा हटविले जाऊ शकतात. अन-इंस्‍टॉल करण्याचा पर्याय आढळल्यास, त्यावर टॅप करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शेअर बाजाराने नोंदविला नवा विक्रम: सेन्सेक्स 445 तर निफ्टी 128 अंकांनी वाढले, गुंतवणूकदारांनी केली 1.51 लाख कोटींची कमाई

नवी दिल्ली । परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजार नव्या शिखरावर पोहोचले आहेत. बीएसईचा -30 समभाग असलेला सेन्सेक्स 445 अंकांनी वाढून 44523 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा -50 समभागांचा प्रमुख निर्देशांक असलेला एनएसई निफ्टी 128 अंकांच्या वाढीसह पहिल्यांदाच 13000 च्या वर बंद झाला. बँक, फायनान्स शेअर्समध्येही बरीच खरेदी झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑटो शेअरलाही वेग आला आहे. ऑटो इंडेक्स 19 महिन्यांच्या उंचीवर पोहोचला आहे. त्याच वेळी रिअल्टी आणि FMCG शेअर्सही परत आले आहेत.

शेअर बाजारात गती का वाढली ?
एस्कॉर्ट सिक्युरिटीचे संशोधन प्रमुख आसिफ इक्बाल यांनी न्यूज 18 हिंदीला सांगितले की, शेअर बाजारातील वाढीमागील कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी करणे. तसेच कोरोना लसबद्दल चांगली बातमी बाजारात उत्साह आणण्यास कारणीभूत ठरली. यामुळे जगभरात आर्थिक रिकव्हरीची आशा वाढली आहे.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे ?
जेफरीजने अ‍ॅक्सिस बँकेवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि 610 ते 700 रुपयांपर्यंतचे लक्ष्य निश्चित केले आहे. ते म्हणतात की, आर्थिक वर्ष 2022 पासून कमाईत सुधारणा होईल. तथापि, DBS-LVB च्या विलीनीकरणामुळे स्पर्धा वाढेल.

जेफरीजने आयसीआयसीआय बँकेवर खरेदीचे मत दिले आहे आणि शेअर 530 रुपयांवरून 570 रुपयांवर आणला आहे. ते म्हणतात की, व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष 2022 पासून क्रेडिट कॉस्ट सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. कर्जाच्या वाढीस आधार देण्यासाठी बॅंकेला चांगले भांडवल आणि कॅश मिळेल. CLSA ने एचडीएफसी बँकेवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि 1515 ते 1700 रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते म्हणतात की, बँकिंग क्षेत्राच्या टॉप पिक मध्ये त्यांचा समावेश आहे.

बॅंकेचे कलेक्शन स्थिर राहिले आहे, याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला नाही, असे बॉंडवर प्रसिद्ध झालेल्या अहवालात जेफरीज यांनी म्हटले आहे. व्यवस्थापनाने 5 वर्षात SME आणि गृहनिर्माण क्षेत्रात विविधता आणण्याची योजना आखली आहे.

शेअर बाजाराची तेजी , सोन्याची घसरण
स्थानिक वायदे बाजाराच्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव 49,000 रुपयांच्या खाली आला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे कॉमेक्सवर सोन्याचे मूल्य 4 महिन्यांच्या नीचांकावर आहे. कॉमेक्सवरील सोन्याचे मूल्य 1,825 डॉलरच्या पातळी जवळ आहे. AstraZeneca च्या लसीच्या वृत्तामुळे सध्या बाजारावर दबाव आला आहे. अमेरिकन डॉलरच्या वसुलीमुळे सोनं कमकुवत झाले आहे. डॉलरने 3 महिन्यांच्या नीचांकी वरून सुधारणा केली आहे. अमेरिकेच्या चांगल्या आर्थिक डेटामुळेही बाजारात कमकुवतपणा निर्माण झाला आहे.

लसीच्या वृत्तांमुळे शेअर बाजार आनंदी
Pfizer नंतर, मॉडर्ना, आता ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या कोरोना व्हॅक्सीन-कोवीशील्डची अंतिम टप्प्यातील चाचणी समोर आली आहेत. या लसीच्या चाचण्या दोन प्रकारे घेण्यात आल्या. पहिल्यांदा 62% कार्यक्षमता पाहिली, तर दुसर्‍याने 90% पेक्षा जास्त कार्य पाहिले. सरासरी, प्रभावीपणा सुमारे 70% होती. ही बातमी संपूर्ण जगासाठी उत्साहवर्धक आहे, ती भारतासाठी खूप खास आहे.

कोवीशील्ड किंवा AZD1222 ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि त्याची कंपनी व्हॅक्सीटेक यांनी बनविली आहे. चिम्पांझीमध्ये सर्दीसाठी कारणीभूत असलेला विषाणू (एडेनोव्हायरस) कमकुवत करण्यासाठी वापरली जातात. यामध्ये SARS-CoV-2 ही नोव्हल कोरोना विषाणूची जेनेटिक मटेरियल आहे. या लसीकरणाद्वारे सरफेस स्पाइक प्रोटीन तयार होतात आणि ती SARS-CoV-2 विरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती बनवते. जेणेकरून भविष्यात नोव्हल कोरोना विषाणूचा हल्ला झाला तर शरीर त्यास तीव्र प्रतिसाद देऊ शकेल.

भारतासाठी याचा अर्थ काय आहे
भारतातील ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचा पुणे येथील आदर्श पूनावाला येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) शी उत्पादन करार आहे. SII भारतात या लसीच्या 3 टप्प्यातील चाचणी घेत आहे. त्याचा निकाल जानेवारी-फेब्रुवारी 2021 पर्यंत अपेक्षित आहे.

नीती आयोगाचे सदस्य आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सीन एडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष विनोद पॉल यांनी शनिवारी सांगितले की, जर अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी यूकेमध्ये आपत्कालीन मंजुरी मागितली आणि ती मिळाली तर कोवीशील्डला भारतात 3 टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच मान्यता मिळते.

पॉल यांच्या म्हणण्यानुसार, जर यूकेमध्ये मान्यता दिली गेली, आणि पुढच्या वर्षाच्या सुरूवातीच्या काळात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) SII ला तातडीची मंजुरी दिली तरी प्रायोरिटी ग्रुप्सना लसीकरण करणे सुरू होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.