Saturday, December 20, 2025
Home Blog Page 54

Pune Local Train : मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकल ट्रेन सुरु होणार? सरकारकडून आलं हे उत्तर

Pune Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Local Train। पुणे शहर आणि वाहतूक कोंडी हे कधीही न सुटलेलं कोड…. पुण्यात लोकसंख्या इतकी दाट आहे कि वाहतूक कोंडीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. मागच्या काही वर्षात पुण्यातील रस्त्यांचा कायापालट झाला आहे, अनेक नवीव उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. एवढच नव्हे तर मेट्रो रेल्वे सेवाही पुणेकरांच्या सेवेत आहेत. मात्र अजूनही पुणेकरांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच एकूण सर्व पार्श्वभूमीवर आता मुंबई प्रमाणेच पुणे शहरातही लोकल ट्रेन सुरु कराव्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात शिवतारेंनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना हि मागणी केली.

शिवतारे नेमकं काय म्हणाले? Pune Local Train

आपल्या भाषणात विजय शिवतारे म्हणाले, पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न महत्वाचा आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, आयटी सेक्टर, एमआयडीसी मध्ये मोठया प्रमाणात कामगार आणि कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर उपाय करावा. यासाठी पुणे शहरापासून राजेवाडी नीरा, जेजुरी, दौंड , फलटण लोकल सेवा (Pune Local Train) सुरु केली तर त्याच्यातून १० ते २० हजार कर्मचाऱ्यांसाठी चांगली सोय होईल, त्यामुळे हि लोकल सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वे विभागाला विंनती करावी. लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. या फेऱ्या वाढवल्या तरी वाहतुकीवर फरक पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे पुणे शहरातील रस्ते लहान आहे, ते मोठे करण्यासाठी मुंबई- ठाण्याप्रमाणे क्लस्टर योजना सुरू करावी.

विजय शिवतारे पुढे म्हणाले, पुण्यातील मुळा आणि मुठा नदीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे मुळा आणि मुठा नदीच्या पात्राच्या बाजूने मुंबई सारखीच लोकल ट्रेनची (Pune Local Train) सुव्यवस्था केली तर पुण्याच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वाहतूक सेवेवर मोठा फरक पडेल. सध्या पुण्यात मेट्रो सेवा आहे. पण मेट्रो स्टेशन आणि पीएमपीएमएलची कनेक्टीव्हिटी नाही. त्यामुळे प्रवास करताना गैर सोय होते, त्यामुळे पुणे मेट्रो स्टेशन पासून पीएमपीएमएल पर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवावी असं शिवतारे यावेळी म्हणाले. विजय शिवतारेंच्या यांच्या या सर्व मागण्यांवर सरकारकडून राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. या सर्व सूचना विचारात घेण्यात येतील असं माधुरी मिसाळ यांनी म्हंटल. त्यामुळे सरकार किती सकारात्मकता दाखवणार याकडे पुणेकरांच लक्ष्य असेल.

Maharashtra Bus Depot : 840 बस डेपोंचा कायापालट करणार; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Bus Depot

Maharashtra Bus Depot । येत्या दोन वर्षांमध्ये एसटीचा चेहरामोहरा बदलणार, महाराष्ट्र सरकार पुढील २ वर्षात २५,००० नवीन बसेस खरेदी करणार, तसेच ८४० बस डेपोंचे रूपांतर बस पोर्ट मध्ये करणार अशी मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा २ वर्षाचा प्लॅनच सांगून टाकला. राज्य वाहतूक व्यवस्थेबाबत परिषदेचे सदस्य अ‍ॅड अनिल परब, शशिकांत शिंदे, सदाभाऊ खोत आणि इतरांनी सुरू केलेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.

प्रताप सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुमारे १४,५०० बसेस आहेत, त्यापैकी बहुतेक बस या जुन्या आहेत. अशावेळी ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी, सरकार पुढील पाच वर्षांत २५,००० नवीन बसेस खरेदी करण्याची योजना आखत आहे. यामध्ये ५,१५० बस या इलेक्ट्रिक बस असतील. याव्यतिरिक्त, राज्यातील ८४० बस डेपो आधुनिक “बस पोर्ट” मध्ये रूपांतरित (Maharashtra Bus Depot) केले जातील. या अपग्रेडसाठी निविदा प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि ती पारदर्शक पद्धतीने केली जाईल, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले.

कोणकोणत्या सुविधा मिळणार? Maharashtra Bus Depot

ते पुढे म्हणाले, आधुनिकीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून, बस आणि डेपोच्या स्वच्छतेवर (Maharashtra Bus Depot) आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. प्रत्येक डेपोमध्ये ई-टॉयलेट, ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी गरम पाणी आणि कपडे धुण्याची सेवा यासारख्या सुविधा असतील अशी माहिती सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक यांनी यावेळी गुजरातच्या यशस्वी बस पोर्ट मॉडेलचा उल्लेख करत अशाच मॉडेलचा फायदा महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागांना होईल अशी आशा व्यक्त केली. सरनाईक यांच्या घोषणेमुळे एसटी विभागाचा कायापालट होईल, तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल. बस कर्मचाऱ्यानाही या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.

RBI New Rules : आता कर्ज फेडणं होणार सोप्प; RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI New Rules Floating Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन RBI New Rules। भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लाखो कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे गृहकर्ज, बिझनेस लोन किंवा अन्य कोणतेही कर्ज घेतलं असेल आणि ठरलेल्या कालावधीच्या आधीच ते फेडलं तर बँक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्री-पेमेंट दंड किंवा शुल्क आकारू शकणार नाही. यापूर्वी मुदतपूर्व कर्ज फेडल्यानंतर बँक काही चार्जेस आकारायची. परंतु आता 1 जानेवारी 2026 पासून आरबीआयचा नियम लागू होणार आहे. त्यामुळे जे कर्जदार लवकरात लवकर कर्ज फेडतील त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

१ जानेवारी २०२६ पासून, प्री-पेमेंटसाठी मंजूर केलेल्या फ्लोटिंग रेट कर्जावर कोणतेही प्री-पेमेंट शुल्क आकारले जाणार नाही. तसंच, लॉक-इन कालावधीची सक्ती देखील रद्द करण्यात आली आहे. हा नियम सर्व व्यावसायिक बँका (पेमेंट बँका वगळता), सहकारी बँका, एनबीएफसी आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू होईल. नव्या नियमानुसार, (RBI New Rules) 50 लाखांपर्यंतच्या कर्जावर देखील कोणतेही पूर्व-पेमेंट शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच काय तर लहान कर्जदारांना यामध्येही सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत बँका वेळेपूर्वी कर्ज फेडण्यासाठी मोठी फी आकारत होत्या, ज्यामुळे कर्जदारांचे आर्थिक गणित फिस्कटत होते. मात्र आता आरबीआयने प्री-पेमेंट दंड रद्द केल्याने लाखो कर्जदारांची आर्थिक बचत होणार आहे.

याबाबत आरबीआयने म्हटले आहे की त्यांच्या पर्यवेक्षी आढावामध्ये असे आढळून आले की वेगवेगळ्या संस्था कर्जांवर प्री-पेमेंट शुल्क आकारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत होत्या, ज्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची… कधी कधी यामुळे वाद सुद्धा झाल्याचे आढळून आलं. अनेक वेळा कंपन्या अशा अटी देखील जोडत होत्या जेणेकरून ग्राहक दुसऱ्या संस्थेकडून चांगला व्याजदर किंवा सेवा मिळविण्यासाठी स्थलांतर करू नयेत. या चिंता दूर करण्यासाठी आरबीआयने हे निर्देश जारी केले आहेत. (RBI New Rules)

नवीन नियम कोणत्या कर्जांवर लागू होईल? RBI New Rules

१) गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर बिगर-व्यवसाय कर्जे
२) लघु व्यवसायांना (MSEs) दिले जाणारे फ्लोटिंग रेट आधारित व्यवसाय कर्ज
३) कर्जाची रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे परतफेड केली तरीही ही सूट लागू होईल

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार, 3 जखमी

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg Accident । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नागपूरच्या दिशेला जाणारी एर्टीगा कार दुभाजकावर आदळली. यात ३ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री ९ वाजता वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात ? Samruddhi Mahamarg Accident

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्यावरून जयस्वाल कुटुंब हे मारुती सुझुकी एर्टिगा कारने उमरेडकडे जात होतं. या दरम्यान, वनोजाजवळ पोहोचले असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गावरील संरक्षक कठडे तोडून बाहेर गेली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या बाजूला लावलेले लोखंडी ग्रील कारमध्ये घुसले. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कार इतक्या वेगाने पलटी झाली कि या अपघातात वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चालक चेतन जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.

सदर अपघाताची (Samruddhi Mahamarg Accident) माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपस्थितीत असलेल्या लोकांनी जखमींना कारमधून बाहेर काढलं आणि वाशिमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर आता आठ दिवसही उलटत नाहीत तोपर्यंत समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झालाय. . समृद्धी महामार्गांवरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य सरकारने अनेक उपाय योजना करुनही अपघात काय कमी होण्याचे नाव घेईनात, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Hero Vida VX2 Electric Scooter : 59 हजारांत लाँच झाली Hero ची इलेक्ट्रिक स्कुटर; 92 KM रेंज

Hero Vida VX2 Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hero Vida VX2 Electric Scooter । देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. Hero Vida VX2 असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून कंपनीने VX2 Go आणि VX2 Plus अशा २ व्हेरियंट मध्ये हि स्कुटर लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही विडा पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. चला तर मग या स्कुटरची रेंज, फीचर्स, आणि किंमत याबाबत अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

बॅटरी आणि रेंज –

Vida VX2 Go मध्ये 2.2kWh ची बॅटरी बसवण्यात आली असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ती 92 किमी पर्यंत अंतर पार करू शकते, तर VX2 Plus मध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक दिला आहे. एकदा का हि बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि मग तुम्ही V १४२ किलोमीटर पर्यंत प्रवास आरामात करू शकाल. दोन्ही स्कूटरना रिमूव्हेबल बॅटरी दिल्या जात आहेत, ज्या बाहेर काढता येतात आणि घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून चार्ज करता येतात. कंपनीचा दावा आहे कि या दोन्ही बॅटरी 60 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकतात.

लुक आणि डिझाईन – Hero Vida VX2 Electric Scooter

या दोन्ही इलेक्ट्रिक स्कुटरचा (Hero Vida VX2 Electric Scooter) लूक आणि तिचे डिझाईन VIDA सारखीच आहे. स्कुटर ला लांब आणि आरामदायी सीट मिळतेय ज्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला कम्फर्ट फील मिळेल. २ लोक आरामात या सीटवर बसू शकतात. याशिवाय, यात एलईडी लाईट्स, स्पोर्टी लूक आणि असे अनेक बाह्य फीचर्स आहेत जे लोकांना आकर्षित करतात. स्कुटरची चाके १२ इंचाची असून चांगली ग्रीप पकडतात. हिरो च्या या इलेक्ट्रिक स्कुटरला ३३.२ लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं हेल्मेट व्यवस्थित ठेऊ शकता.

अन्य फीचर्स ?

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये (Hero Vida VX2 Electric Scooter) रिमोट इमोबिलायझेशन आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी, क्लाउड कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही या स्कूटर्सना तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता आणि राइड स्टॅटिस्टिक्स पाहू शकता. यामध्ये, तुम्हाला फर्मवेअर ओव्हर-द-एअर (FOTA) अपडेट्स देखील मिळतील. याशिवाय, VX2 Plus मध्ये ४.३-इंच TFT स्क्रीन आहे आणि VX2 Go मध्ये ४.३-इंच LCD स्क्रीन आहे.

किंमत किती?

Hero Vida VX2 Go च्या या नवीन स्कूटरची किंमत 99,490 रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र हि स्कुटर बॅटरी-अ‍ॅज-ए-सर्व्हिस (BaaS) सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत लाँच करण्यात आल्याने या स्कूटरची किंमत फक्त 59,490 रुपये असेल. तर Hero Vida VX2 Plus ची किंमत १०९९९० रुपये असून BaaS अंतर्गत हि इलेक्ट्रिक स्कुटर 64,990 रुपयांत खरेदी करता येईल. BaaS पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यामध्ये, तुम्हाला बॅटरी खरेदी करण्याची गरज नाही, तर तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता आणि ही सेवा फक्त ९६ पैसे प्रति किलोमीटरपासून सुरू होईल. BaaS पॅकेजच्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, जर बॅटरी ७०% पेक्षा कमी काम करत असेल तर ती फ्री मध्ये बदलली सुद्धा जाईल.

Nagpur Gondia Expressway : समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार!! नागपूर- गोंदिया प्रवास निम्म्यावर येणार

Nagpur Gondia Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Gondia Expressway। मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार होणार आहे. आता हा महामार्ग थेट गोंदिया जिल्ह्याला जोडला जाणार आहे. हा नवा एक्सप्रेस वे १६३ किलोमीटरचा असून यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (MSRDC ) अंदाजे २१,६७० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नव्या एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते गोंदिया हा प्रवास निम्म्यावर येणार आहे. सध्या नागपूरहून गोंदियाला जाण्यासाठी ३:३० तास वेळ लागतात कारण या मार्गावरील शहरे आणि गावांमध्ये वाहतूक कोंडी आणि वेग मर्यादा आहेत. मात्र आता अवघ्या २ ते अडीच तासांत हे अंतर पार करता येणार आहे.

समृद्धी महामार्गाचाच हा पुढचा टप्पा असल्याने तशाचपद्धतीची डिझाईन आणि सुविधा या महामार्गावर असेल. हा एक्सप्रेसवे जामठा जवळील वर्धा रोडवरील गवसी मानापूर गावातून सुरू होईल. येथे वर्धा रोड बाह्य रिंगरोडशी जोडलेला आहे. शिवमडका येथील समृद्धी महामार्गाचा स्टार्टींग पॉईंट या ठिकाणापासून फक्त ५ ते ६ किमी अंतरावर आहे. गावसी मानापूर ते गोंदिया शहराजवळील सावरी गावापर्यंत १४५ किमी अंतरावर हा एक्सप्रेस वे असेल. तेथून प्रवासी शहरात प्रवेश करू शकतील. त्या तुलनेत, भंडारा मार्गे सध्याचा महामार्ग मार्ग सुमारे १६१ किमी अंतरावर आहे. Nagpur Gondia Expressway

1600 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल- Nagpur Gondia Expressway

नागपूर ते गोंदिया मुख्य मार्गाव्यतिरिक्त, या प्रकल्पात तिरोडाला जोडणाऱ्या १४ किमी आणि गोंदियाजवळील ४ किमी बायपासचा समावेश आहे. त्यामुळे या एकूण प्रकल्पाचे अंतर १६३ किलोमीटर होईल. या रस्त्याच्या उभारणीसाठी एमएसआरडीसीला सुमारे १,६०० हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. यापैकी बहुतांश जमीन गोंदिया जिल्ह्यात येते, त्यानंतर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील जमिनीचे भूसंपादन करावं लागेल. सध्या या तिन्ही जिल्ह्यांमध्ये संयुक्तपणे जमीन मोजमाप सर्वेक्षण सुरू आहे आणि जुलैच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होताच, एमएसआरडीसी प्रकल्पासाठी निविदा जारी करेल. निविदा प्रक्रियेनंतर बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे, कंत्राटदारांना 30 महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

Prithviraj Chavan : महाराष्ट्र की दिल्ली? कोणत्या राजकारणात मन रमतंय? पृथ्वीराज बाबांनी थेटच सांगितलं

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन देशाच्या राजकारणात मला जायला आवडेल अशी इच्छा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. हॅलो महाराष्ट्राच्या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देशातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना सध्याच्या राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात काम करायला आवडेल कि दिल्लीच्या राजकारणात याबाबतही त्यांनी त्यांच्या मन कि बात बोलून दाखवली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याच्या राजकारणातून निवृत्त होऊन देशाच्या राजकारणात मला जायला आवडेल. मी बौद्धिकरित्या सक्रिय असणार आहे. माझं कराडशी नातं आहे. मी कराड मध्ये आहे. काँग्रेस म्हणून आम्ही येथील निवडणूका लढवणार आहोत. मात्र माझं बौद्धिक काम हे राष्ट्रीय पातळीवरचे असेल . गांधी कुटुंबात सर्व काँग्रेस पक्षाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. राहुल गांधींना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांची स्टाईल ऑफ लीडरशिप वेगळी आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्राच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना व्यक्त केले.

भाजपने बोगस मतांच्या आधारे विजय मिळवला –

दरम्यान, निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रियाच मोदींनी पारदर्शक न ठेवल्याने हि व्यवस्था निपक्षपाती राहिलेली नाही असा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चोरली का? या राहुल गांधी यांच्या लेखातील मुख्य मुद्दा समजून सांगितला. मागील ५ वर्षात ३१ लाख मतदार वाढले म्हणजे दर महिन्याला ५० हजार नवीन मतदार नोंदणी झाली. मात्र लोकसभा ते विधानसभा या ५ महिन्यांत ४१ लाख म्हणजे महिन्याला ९ लाख मते मते वाढली. भाजपने बोगस मतदान करून टार्गेट करून काही लोकांचा पराभव केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, EVM मशीनवर लोकांचा विश्वास नाही. जगातल्या लोकशाही देशांमध्ये सर्व प्रगत देश बेलेट पेपरचा वापर करत आहेत. जर्मन न्यायालयात EVM मशीनने निवडणूक घेणे हे बेकायदेशीर आहे असा निकाल लागला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड घोटाळा हेराफेरी झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत काही चांगले बदल झाले पाहिजेत कारण लोकांचा शेवटी निवडणूक प्रक्रियेवर विश्वास बसला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हॅलो महाराष्ट्रला दिलेल्या पॉडकास्ट मध्ये केले.

Bhopal 90 Degree Bridge : उड्डाणपुलावर 90 अंशांचा टर्न!! मुख्यमंत्री संतापले; 8 जणांवर कारवाई

Bhopal 90 Degree Bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bhopal 90 Degree Bridge । भोपाळ मधील ९० अंशांचा टर्न असलेला रेल्वे ओव्हरब्रीज सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या पद्धतीने उड्डाणपुलाची बांधणी झाली आहे, त्यावरून हा पूल सोशल मीडियात गाजत आहे. या पुलाबाबत अनेक मिम्स सुद्धा व्हायरल झाले आहेत. या उड्डाणपुलावर ९० अंशाचा विचित्र टर्न असल्याने काही जणांची टीकेची झोड उठवली तर काहीही चेष्टा मस्करी केली. यानंतर आता मध्य प्रदेश सरकारने या उड्डाणपुलाच्या कामावर नाराजी व्यक्त करत आणि चुकीच्या बांधकामाची दखल घेत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत ८ अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकल्पाची चौकशीही केली जाणार आहे.

बांधकामात झालेल्या गंभीर निष्काळजीपणाची दखल- Bhopal 90 Degree Bridge

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ऐशबाग आरओबीच्या बांधकामात झालेल्या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेतली होती आणि चौकशीचे आदेश दिले. याबाबत मोहन यादव यांनी म्हंटल कि, या प्रकल्पासाठी बांधकाम एजन्सी आणि डिझाइन सल्लागार यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे आणि आरओबीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवालाच्या आधारे, ८ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन मुख्य अभियंत्यांसह सात अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. एका निवृत्त अधीक्षक अभियंत्याविरुद्ध विभागीय चौकशी केली जाईल तसेच उड्डाणपुलाची सुधारणा झाल्यानंतरच आरओबीचे उद्घाटन केले जाईल,”असं मोहन यादव यांनी म्हंटल.

पीडब्ल्यूडीचे अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई म्हणाले की, दोषपूर्ण डिझाइनसाठी अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात मुख्य अभियंता संजय खांडे आणि जीपी वर्मा, प्रभारी कार्यकारी अभियंता जावेद शकील, प्रभारी उपविभागीय अधिकारी रवी शुक्ला, उपअभियंता उमाशंकर मिश्रा, सहाय्यक अभियंता शानुल सक्सेना, प्रभारी कार्यकारी अभियंता शबाना रज्जाक आणि निवृत्त अधीक्षक अभियंता एमपी सिंह यांचा समावेश आहे.

महामाई बागेपासून ते पुष्पा नगर आणि स्टेशन परिसराला न्यू भोपाळशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला हा पूल खर तर (Bhopal 90 Degree Bridge) भोपाळमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बनवण्यात आला होता, पण बांधकामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा पूल चर्चेचा विषय बनला आहे. या पुलासाठी तब्बल १८ कोटी रुपयाचा खर्च झाला आहे.. या पुलामुळे ३ लाखांहून अधिक रहिवाशांचा प्रवास सोपा होईल असा अंदाज होता, मात्र चुकीच्या बांधकामामुळे हा पुलाचा नागरिकांना गैरसोयीचा ठरला आहे.

MHADA Lottery : फक्त 5 लाखांत घर खरेदीची संधी!! Mhada ची लॉटरी जाहीर

MHADA Lottery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Lottery । आपलं स्वतःच असं हक्काचं घर असावं असं सर्वानाच वाटते. खास करून शहरात असणाऱ्या नागरिकांना हक्काच्या घराची खूपच गरज असते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात घराच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे इच्छा असूनही घर खरेदी करणं सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर असते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही, कारण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत अवघ्या ५ लाख रुपयांत तुम्हाला घर मिळू शकते. मात्र अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांनाच ५ लाखात घर खरेदीची संधी असणार आहे.

कोणत्या शहरात किती घरे ? MHADA Lottery

म्हाडाच्या लॉटरी (MHADA Lottery)अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. नाशिकबाबत सांगायचं झाल्यास, नाशिकमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 12.68 लाख ते 13.55 लाख रुपयांत घरे उपलब्ध असणार आहेत. ही घरे वडाळा शिवारमधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत. तसेच अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध असून त्यांची किंमत 11.94 लाख ते 15.31 लाख रुपये असणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेदी येथे 5.48 लाख रुपयांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील घरांबाबत सांगायचं झाल्यास, त्याठिकाणी 1351 घरे उपलब्ध आहेत. हि घरे प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा योजनेंतर्गत (MHADA Lottery) उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1148 घरे आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजना अंतर्गत 164 घरे उपलब्ध आहेत. तर 20% सर्वसमावेशक योजनेच्या माध्यमातून 39 घरांची खरेदी करता येईल. यामध्ये नक्षत्रवाडीमध्ये 1056 घरे असून त्यांची किंमत 15.30 लाख रुपये आहे. तर चिखलठाणामध्ये 158 घरे उपलब्ध त्याची किंमत 27 लाख रुपये आहे. देवळाई येथे 14 घरे असून त्यांची किंमत 13.19 लाख ते 16.19 लाख रुपये आहे. आनंद पार्कमध्ये 18 घरे असून ती 4.85 लाख ते 6.27 लाख रुपयांना उपलब्ध आहेत, तर चिखलठाणा येथे आणखी 6 घरे 34 लाख रुपयांना आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये 92 घरे असून त्याची किंमत 10.65 लाख रुपये आहेत.

Swiggy 99 Store : फक्त 99 रुपयांत जेवण; Swiggy ने सुरु केली नवी सर्व्हिस

Swiggy 99 Store

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Swiggy 99 Store । ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप Swiggy ने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. स्विगीने ‘९९ स्टोअर’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून कंपनी फक्त ९९ रुपयांमध्ये सिंगल सर्व्ह मील देणार आहे. Swiggy ही सुविधा देशभरातील १७५ हून अधिक शहरांमध्ये सुरु केली आहे. कमी किमतीत जेवण करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी स्वीगीने ही खास सेवा सुरु केली आहे. अवघ्या ९९ रुपयांत घरपोच जेवण मिळत असल्याने आता ऑनलाईनअन्न ऑर्डर करणे आणखी स्वस्त होणार आहे.

कोणकोणत्या शहरात सुरु झाले Swiggy 99 store ?

Swiggy 99 Store देशभरातील १७५ मोठ्या शहरात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, पुणे, चेन्नई, लखनऊ, वडोदरा सारख्या शहरांचा समावेश आहे. ९९ स्टोअरमध्ये ग्राहकांना ९९ रुपयांपर्यंत किमतीचे रेडी-टू-ईट डिशेस मिळतील अशी माहिती कंपनीने दिली आहे. हे डिशेस ताज्या ऑर्डरवर तयार केले जातील. अवघ्या ९९ रुपयांमध्ये ग्राहकांना रोल, बिर्याणी, नूडल्स, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, बर्गर, पिझ्झा आणि केक अशा अनेक चमचमीत पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठी ही चांगलीच मेजवानी ठरेल.

स्विगीच्या फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी म्हंटल कि, जेवणाची किंमत कमी असल्याचा अर्थ असा नाही कि तुमच्याकडे जेवण ऑर्डर करण्यासाठी कमी पर्याय असतील, उलट आम्ही रेस्टॉरंट पार्टनर्स आणि आमच्या डिलिव्हरी फ्लीटसोबत मिळून दररोज परवडणारे आणि चांगल्या दर्जाचे पदार्थ कसे बनवता येतील यावर काम केलं आहे. त्यामुळे ९९ रुपयांत जेवण हे फक्त किमतीचा प्रश्न नाही तर एक आश्वासन आहे असं रोहित कपूर यांनी म्हंटल.

अशी करा ऑर्डर?

सर्वात आधी Swiggy अँप ओपन करा.
यानंतर Food च्या पर्यायावर क्लीक करा.
येथे तुम्हाला Swiggy 99 Store चा पर्याय मिळेल.
ता तुम्हाला या सेगमेंटमध्ये येणारे सर्व पर्याय दिसू लागतील.
कंपनी इकोसेव्हर मोडसह मोफत डिलिव्हरी देत ​​आहे.
येथे तुम्ही ९९ रुपयांत काय ऑर्डर करायचे ते ठरवू शकता.