Saturday, December 20, 2025
Home Blog Page 53

Indian Railways Veg Meal Price : ट्रेनमध्ये जेवण कितीला मिळणार? रेल्वे मंत्रालयाने मेनूकार्डच दाखवलं

Indian Railways Veg Meal Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Veg Meal Price । भारतात रेल्वेचं जाळं सर्वात मोठं आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात थेट रेल्वे सेवा उपलब्ध असल्याने खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वच जण प्राधान्य देत असतात. आरामदायी आणि कमी खर्चात प्रवास होत असल्याने ट्रेनला तुडुंब गर्दी नेहमीच बघायला मिळते. अनेकदा प्रवाशांना रेल्वे पॅन्ट्री किंवा स्टॉपेज स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या विक्रेत्यांकडून अन्न घ्यावे लागते. मात्र हे अन्न किती रुपयांना मिळते हे तुम्हाला माहितेय का? चिंता करू नका, रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान, अनेक प्रवासी बाहेरचे अन्न खाऊन प्रवास पूर्ण करतात, कारण त्यांच्याकडे म्हणावे असे पर्याय नसतात. अशा परिस्थितीत, काही प्रवासी ट्रेन पॅन्ट्रीमधून अन्न किंवा प्लॅटफॉर्मवरून जेवण खरेदी (Indian Railways Veg Meal Price) करतात. बहुतेक प्रवाशांना रेल्वेच्या नियमांची माहिती नसते, म्हणजेच जेवण किती रुपयांना मिळते हे सुद्धा प्रवाशांना कधी कधी माहित नसत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने तुमच्या माहितीसाठी एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे रेल्वे मंत्रालयाची पोस्ट – Indian Railways Veg Meal Price

रेल्वे मंत्रालयानं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक माहिती शेअर केली आहे. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या व्हेज मीलची (स्टँडर्ड कॅसरोल) किंमत ७० रुपये आहे, तर ट्रेनमध्ये त्याची किंमत ८० रुपये आहे. रेल्वे मंत्रालयानं सांगितले की, व्हेज मीलच्या (स्टँडर्ड कॅसरोल) मेनूमध्ये साधा भात (१५० ग्रॅम), जाड डाळ किंवा सांबार (१५० ग्रॅम), दही (८० ग्रॅम), २ पराठे किंवा ४ रोट्या (१०० ग्रॅम), भाजी (१०० ग्रॅम) आणि लोणच्याचं एक पॅकेट (१२ ग्रॅम) यांचा समावेश आहे.

जर विक्रेत्यांनी जेवणाच्या किंमतीत किंवा मेनूमध्ये समाविष्ट असलेल्या अन्नाच्या प्रमाणात किंवा गुणवत्तेत काही चूक केली तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता किंवा सवाल करू शकता. एवढंच नव्हे तर रेल्वेचे हे मेनूकार्ड दाखवू शकता. तरीही, जर संबंधित विक्रेत्यांनी तुमची मागणी मान्य करण्यास नकार दिला तर तुम्ही रेल्वेच्या विहित तक्रार माध्यमांद्वारे तक्रार करू शकता.

Hostel Student Allowance : वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ; आता ‘इतके’ रुपये मिळणार

Hostel Student Allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hostel Student Allowance । आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये सरकार कडून वाढ करण्यात आली आहे. यामध्ये निर्वाह भत्ता, साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता यांसारख्या भत्त्याची रक्कम वाढवण्यात आली आहे. अदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली.

डॉ. अशोक वुईके म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावी राहून उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे, याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. सध्या एकूण 490 वसतिगृहे कार्यान्वित आहेत. या वसतिगृहांमध्ये इयत्ता 8 वी पासून पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास भत्ता, वेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके इ. साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्ता याकरिता एकरकमी रक्कम (Hostel Student Allowance) विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. दि २४ जून २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेनुसार आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना दरवाढ करण्यात येत आहे.

भत्त्यात किती रुपयांची वाढ- Hostel Student Allowance

निवास भत्ता – विभागीय स्तरावरील वसतिगृहांसाठी दर महिन्याचा निवास भत्ता 800 रुपये असून सुधारित भत्ता 1500 करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी 600 ऐवजी 1300, तर तालुकास्तरावरील वसतिगृहांसाठी 500 ऐवजी 1000 रुपये निवासी भत्त्यात दरवाढ करण्यात आली आहे. सध्या मुलींना 100 रुपये अतिरिक्त निर्वाह भत्ता देण्यात येतो, ज्यामध्ये आता वाढ करून तो 150 रुपये इतका करण्यात येत आहे. Hostel Student Allowance

बेडिंग साहित्य, शालेय स्टेशनरी, क्रमिक पुस्तके व इतर साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) — इ. 8 वी ते 10 वी साठी सध्याचा भत्ता 3200 रुपये आहे, मात्र आता सरकार कडून या भत्त्यात भरगोस वाढ करण्यात आली असून हाच भत्ता आता 4500 रुपये करण्यात आला आहे. 11वी, 12वी व पदविका अभ्यासक्रमासाठी 4000 ऐवजी 5000 रुपये, पदवी अभ्यासक्रमासाठी 4500 ऐवजी 5700 रुपये, तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 6000 ऐवजी 8000 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

आहार भत्ता (दरमहिना) — “अ”, “ब” आणि “क'” वर्गातील महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहांमध्ये सध्याचा आहार भत्ता 3500 असून तो 5000 रुपये करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील वसतिगृहांसाठी 3000 ऐवजी 4500 इतकी वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana june installment (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. खरं तर जून महिन्याचे १५०० रुपये कधी येणार याकडे मागील अनेक दिवसापासून राज्यातील महिला वर्ग वाट बघत आहे. महिना उलटूनही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होते. अखेर आजपासून जून महिन्याचे १५०० रुपये जमा होणार असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे अदिती तटकरे यांचं ट्विट ? Ladki Bahin Yojana

आदिती तटकरे यांनी याबाबत काल रात्री ट्विट करत म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

दरम्यान, ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला आहे अशा महिलांना वगळण्याचे काम सरकार कडून सुरु आहे. आत्तापर्यंत लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) वगळण्यात आलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा घरी चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. अशावेळी तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आधार लिंक्ड बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलेंस चेक करायचा आहे. किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.

Jalgaon Nanded New Railway Line : महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग; 174 KM अंतर, 17 स्थानके

Jalgaon Nanded New Railway Line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jalgaon Nanded New Railway Line । मागच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठा कायापालट झाला आहे. अनेक जिल्ह्यात नवीन रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे मार्ग उभारले जात आहेत. यामुळे राज्यातील वाहतूक आणि दळणवळणाला चांगली गती मिळाली आहे. आता आणखी एक नवा रेल्वे मार्ग आपल्या राज्याला मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग १७४ किलोमीटर लांबीचा असून तो जळगाव आणि जालना या २ जिल्ह्याना जोडेल. या नव्या रेल्वेमार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल.

या रेल्वेमार्गासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी राज्य सरकारने यापूर्वीच ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तर केंद्र सरकारने १० ऑगस्ट २०२४ रोजी यास मंजुरी दिली आहे. यापैकी जालना जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपये खर्च होतील. यातील चार हजार कोटी प्रत्यक्ष बांधकाम तर एक हजार कोटी रुपये भूसंपादनावर खर्च होतील. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा राहणार असून या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी (Jalgaon Nanded New Railway Line) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याआधीच एक महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बदनापूर तालुक्यातील दावळवाडी, खादगाव आणि नजीकपांगरी या तीन गावांमध्ये जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील मांडवा गावात जमिनीची मोजणी सुरू झाली आहे. यामुळे लवकरच तालुक्यातील सर्व गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण होणार आहे.

17 नवीन रेल्वे स्थानक निर्माण केली जाणार – Jalgaon Nanded New Railway Line

प्रशासनाने या प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. ड्रोन सर्वेक्षणाच्या मदतीने प्रशासनाकडून या प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनीची, शेतीची, फळबागांची, विहिरींची तसेच इतर मालमत्तांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या नव्या रेल्वेमार्गावर एकूण 17 नवीन रेल्वे स्थानक निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगाव, नागेवाडी, दिनागाव या स्थानकांचा समावेश असेल. तसेच 174 किलोमीटर लांबीच्या या मार्गात एकूण 130 छोटे पूल तयार होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ३ नद्यांवर मोठे पूल आणि ३ बोगदे उभारले जाणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत जळगावहून रेल्वेने जालनाकडे जाण्यासाठी मनमाडमार्गे फेऱ्याने जावे लागते, जळगाव-जालना व्हाया मनमाड ३३६ किलोमीटर अंतर आहे. परंतु नवीन जळगाव नांदेड रेल्वे मार्ग सुरु झाल्यास फक्त १७४ किलोमीटर एवढाच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

12,999 रुपयांत लाँच झाला 5G मोबाईल; 8GB रॅम, 6000mAh बॅटरी

Tecno Pova 7

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त 5G मोबाईल घेण्याच्या तयारीत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड Tecno ने भारतीय मार्केट मध्ये २ नवीन 5G मोबाईल लाँच केले आहेत. Tecno Pova 7 5G आणि Tecno Pova 7 Pro 5G असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. या दोन्ही मोबाईलच्या किमती इतर ब्रँड च्या तुलनेत कमी असल्या तरी त्यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात हे मोबाईल रेडमी, रिअलमी, poco सारख्या ब्रँडना टक्कर देतील.

Tecno Pova 7 चे स्पेसिफिकेशन:

Tecno Pova 7 मध्ये 6.78-इंचाचा HD+ रिझोल्यूशन आणि LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला 144Hz रिफ्रेश रेट आणि 900 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. टेक्नोहाच हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HiOS 15 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 7 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, हिरव्या आणि सोनेरी रंगात येतो.

Tecno Pova 7 Pro चे स्पेसिफिकेशन:

Tecno Pova 7 Pro मध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला 144Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. पाणी आणि स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी मोबाईलला IP64 रेटिंग देण्यात आलं आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. टेक्नोहाच हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित HiOS 15 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, पाठीमागील बाजूला 64MP Sony IMX682 प्रायमरी शूटर आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी समोर 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने मोबाईलला १ वर्षाचे ओएस अपडेट्स आणि २ वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. पॉवर साठी मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ३०W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 7 Pro 5G च्या ८GB RAM + १२८GB स्टोरेज मॉडेलची किंमत १६,९९९ रुपये आहे तर ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल ग्रे, गीक ब्लॅक आणि निऑन सायन रंगात उपलब्ध आहे. हे दोन्ही स्मार्टफोन १० जुलैपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.

Indian Railways Recruitment 2025 : 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

Indian Railways Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Recruitment 2025 10 वी १२ वी, आणि ITI उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागात तब्बल ६२३८ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यातील तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पदासाठी १८३ जागा तर तंत्रज्ञ ग्रेड III या पदासाठी ६०५५ जागा भरण्यात येतील. या भरतीसाठी 28 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? शुल्क किती आहेत? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शैक्षणिक पात्रता?

रेल्वे भरतीसाठी तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पदासाठी (Indian Railways Recruitment 2025) देशातील कोणत्याही विद्यापिठातून Diploma, किंवा B.Sc, BE/ B.Tech हि पदवी पास असलेल्या उमेदवाराला या परीक्षेसाठी बसला येईल… तर तंत्रज्ञ ग्रेड III या पदासाठी 10th, ITI, 12th वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पात्र ग्राह्य धरले जाईल.

वयोमर्यादा – Indian Railways Recruitment 2025

टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल पदासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे असले पाहिजे. तर टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांचे वय १८-३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल

वेतन किती?

तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पोस्टसाठी महिन्याला हे साधारणतः 29,200 हजार रुपये इतके वेतन असेल तर, तंत्रज्ञ ग्रेड II| या पदासाठी साधारणतः महिन्याला 19,900 हजार पगार मिळू शकतो.

परीक्षा शुल्क किती?

परीक्षेच्या शुल्काची रक्कम हि एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी) प्रवर्गातील उमेदवारांना असणार नाही तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क आहे. जर उमेदवार हा संगणक-आधारित चाचणी (सीबीटी) ला बसला असेल तर त्यांना शुल्क वजा करून त्यांना ४०० रुपये परत दिले जातील.

कशी असेल परीक्षा?

या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटाचा असून, ज्यामध्ये उमेदवारांना १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ३ गुण वजा केले जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी… Indian Railways Recruitment 2025

असा भरा अर्ज –

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट द्या.
आता वेबसाइटच्या होम पेजवरील RRB तंत्रज्ञ भरती लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमचे नाव आणि आवश्यक माहिती टाका.
ऑनलाइन शुल्क भरा.
आता आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

Mumbai Infrastructure : मेट्रो लाईन 3 बुलेट ट्रेन टर्मिनसला जोडणार; नवीन अंडरग्राऊंड बोगदा प्रस्तावित

Mumbai Infrastructure Underground Tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Infrastructure । मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्शर बाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील आगामी बुलेट ट्रेन टर्मिनलला (Bullet Train Terminal) सध्याच्या बीकेसी मेट्रो ३ स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी १.३ किमी लांबीचा अंडरग्राऊंड बोगदा उभारण्याची योजना सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा व्हावा, तसेच शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी राखता यावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे.टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

कसा असेल बोगदा? Mumbai Infrastructure

या नव्या अंडरग्राऊंड बोगद्यासाठी (Underground Tunnel) नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL), मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्यात १ जुलै रोजी एक बैठक झाली. १.३ किलोमीटर लांबीचा हा अंडरग्राऊंड बोगदा, हाय-स्पीड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवरून न जाता मुंबई मेट्रो लाईन ३ पर्यंत सहजपणे घेऊन जाईल. हा बोगदा पुश बॉक्स पद्धतीने जमिनीखाली १२ मीटर खोल बांधला जाईल आणि वाकोला नाल्याखालून जाईल. बीकेसी मेट्रो स्टेशनपासून आगामी बुलेट ट्रेन टर्मिनसपर्यंत सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोप्पा होईल. तसेच नवीन बोगद्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल, ऑटो आणि टॅक्सीसारख्या फीडर मोडवर जास्त अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. Mumbai Infrastructure

मेट्रो ३ चे बीकेसी स्टेशन वांद्रे-कुर्ला लिंक रोडवरील आयकर कार्यालय (ITO) जंक्शनवर आहे, तर बुलेट ट्रेन टर्मिनल जवळच असेल, परंतु सध्या थेट प्रवेशाचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना उतरावे लागेल, बाहेर पडावे लागेल आणि दुसऱ्या मेट्रो स्टेशनमध्ये पुन्हा प्रवेश करावा लागेल किंवा फीडर सेवा वापरावी लागतील, परंतु नव्या प्रस्तावित अंडरग्राऊंड बोगद्यामुळे हा त्रास वाचेल. बोगद्याचा मार्ग निश्चित झाला असला तरी, बांधकाम जबाबदारी, बजेट आणि अभियांत्रिकी तपशीलांबाबत विशिष्ट निर्णय प्रलंबित आहेत. हा बोगदा मुंबईच्या सीएसएमटी आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवर आढळणाऱ्या सबवेसारखा असण्याची शक्यता आहे. हा अंडरग्राऊंड बोगदा बांधण्यासाठी अंदाजे बजेट १०० कोटी ते १५० कोटी रुपये खर्च होऊ शकतो असं बोललं जातंय.

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; 2500 जागांसाठी भरती जाहीर

Bank of Baroda Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bank of Baroda Recruitment 2025 । पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशातील नामांकित बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल २५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती विविध राज्यात केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी यामध्ये ४८५ रिक्त पदे भरली जातील. या नोकरी साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे भरायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..

कोणत्या पदासाठी भरती ?

बँक ऑफ बडोदाची हि नोकरभरती (Bank of Baroda Recruitment 2025) लोकल बँक ऑफिसर या पदासाठी होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार २४ जुलै २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइट: bankofbaroda.in वर अर्ज करू शकतात.

पात्रता काय? Bank of Baroda Recruitment 2025

पात्रता निकषांमध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, वयोमर्यादा, भाषा प्रवीणता आणि CIBIL स्कोअर यांसारख्या गोष्टी तपासल्या जातील. शैक्षणि पात्रतेबद्दल सांगायचं झाल्यास,

१) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी.

२) ज्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंट्ट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनियरिंग किंवा मेडिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असेल ते उमेदवार सुद्धा अर्ज करु शकतात.

३) या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

४) उमेदवाराने कमर्शियल बँक, रिजनल रुरल बँक, को-ऑपरेटिव्ह बँकेत काम केलेले असावे.

५) सदर उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.

अर्ज शुल्क –

सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय श्रेणीतील अर्जदारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, जमाती, अपंग, ईएसएम आणि महिला उमेदवारांना १७५ रुपये शुल्क लागू होते.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: bankofbaroda.in
उपलब्ध असलेल्या बँक ऑफ बडोदा LBO नोंदणी २०२५ लिंकवर क्लिक करा
नोंदणी पूर्ण करा आणि नंतर लॉगिन करा
आता अर्ज फॉर्म भरा (Bank of Baroda Recruitment 2025)
कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा
फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा.

Electric Bike : गियरवाली इलेक्ट्रिक बाईक!! 172KM रेंज, किंमत किती?

Electric Bike Matter Aera

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Bike । मागच्या काही वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा कायापालट झाला आहे. पेट्रोल गाड्यांची जागा इलेक्ट्रिक गाड्या घेऊ लागलेत. तुम्हीही इलेक्ट्रिक स्कुटर किंवा बाईक बघितली असेल किंवा चालवली असेल, परंतु आता मार्केट मध्ये गियरवाली इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली आहे. Matter Aera असं या इलेक्ट्रिक बाईकचे नाव असून ही देशातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाईक ठरली आहे. कंपनीचा असा दावा आहे कि, एकदा फुल्ल चार्ज केली कि हि इलेक्ट्रिक बाईक तब्बल १७२ किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते. बाईकचा लूक अतिशय आकर्षक असून तरुणाईला नक्कीच तिची भुरळ पडेल. कंपनीने या गिअर वाल्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1,93,826 रुपये ठेवली आहे. आज आपण या बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

लूक आणि डिझाईन – Electric Bike

Matter Aera लूक खूपच स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. यात LED लाईट्स, उत्तम फ्रंट आणि रियर लूक, आरामदायी सीट्स, एर्गोनॉमिक्स तसेच स्मार्ट ७-इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईक मध्ये ५ किलोवॅट क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. एकदा का ही बॅटरी पूर्णपणे चार्ज केली कि ती तब्बल १७२ किलोमीटर रेंज देते. यामध्ये लिक्विड-कूल्ड पॉवरट्रेन आहे, जी भारतीय रस्त्यांसाठी खूप चांगली मानली जाते. अवघ्या २.८ सेकंदात हि इलेक्ट्रिक बाईक ०-४० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.

मॅटर एरा इलेक्ट्रिक (Electric Bike) बाईकमध्ये ४ रायडिंग मोड उपलब्ध आहेत. ज्यामध्ये इको, सिटी, स्पोर्ट आणि पार्क असिस्ट मोडचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे मोड वापरू शकता. याशिवाय, ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल सस्पेंशन सिस्टम, स्मार्ट पार्किंग असिस्ट या बाईकची रायडींग आणखी छान वाटते. या बाईकमध्ये स्मार्ट की आणि मॅटरव्हर्स मोबाईल अॅप्लिकेशन आहे. ही बाईक रिमोटली लॉक/अनलॉक करता येते. याशिवाय, त्यात लाईव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग सुविधा देखील देण्यात आली आहे.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो गाडीच्या किमतीचा, तर Matter Aera इलेक्ट्रिक बाईकची किंमत १,९३,८२६ रुपये आहे. बाईक आणि बॅटरीवर ३ वर्षांपर्यंत किंवा ४५,००० किलोमीटर पर्यंत वॉरंटी देण्यात येत आहे. तुम्ही ४ रंगात हि इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता.

Hatke News : चक्क नदीवरील पुलाचा वाढदिवस!! अनोख्या कृतीची राज्यभर चर्चा

Hatke News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hatke News। वाढदिवस हा आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण…. कोण मित्राचा वाढदिवस साजरा करतो, कोणी प्राण्याचा वाढदिवस साजरा करतो पण तुम्ही कधी ऐकलं आहे का? कि एका पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय? होय हे खरं आहे.. आणि थोडाथोडका नव्हे तर तब्बल १८० वा वाढदिवस…. मित्रानो, सातारा जिल्हातील वडूथ गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे पुलाचा १८०वा वाढदिवस साजरा केला आहे. या अनोख्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

काय आहे कारण? Hatke News

सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे पुलाला यंदा १८० वर्ष पूर्ण झाली. मराठाकालीन कालखंडात छत्रपती शहाजीराजे यांनी हा पूल बांधला होता. 30 जून 1845 साली जनतेसाठी खुला करण्यात आला होता असे, पुलावरील दगडावर स्पष्ट उल्लेख केला आहे. कृष्णा नदीवर वसललेया या मुलामुळे हजारो नागरिकांचा प्रवास हा सुरक्षित आणि सुखरूप होतो. त्यामुळे या पुलाची किंमत इथल्या स्थानिकांनाच अधिक माहित… पंरतु गेल्या अनेक वर्षापासून हा पूल वाहतुकीसाठी धोक्याचा बनला आहे, पण याची प्रशासन काही दाखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी पुलाचा वाढदिवसच साजरा करून एकप्रकारे अनोख्या पद्धतीने (Hatke News) आंदोलन केले आहे.

सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम मराठाकालीन कालखंडात पूर्ण आहे.,पुलाची उभारणी ३० जून १८४५ साली झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल १८० वर्षांपासून हा पूल वडूथ-आरळे गावकऱ्यांच्या सेवेत आहे. इतक्या मोठ्या कालावधीत या पुलावर अनेक नैसर्गिक संकटे ओढावली. पुलाला भगदाड पडले, खड्डे पडले तरीदेखील मलमपट्टी वगळता प्रशासनाने अन्य काहीही केले नाही. भविष्यातील धोका ओळखून ग्रामस्थांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने उंबरठे झिजवले, आंदोलने केली; मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे वडूथ-आरळे ग्रामस्थांनी एकत्र येत या पुलाचा चक्क १८०वा वाढदिवस नुकताच साजरा करून प्रसासानाला जाग यावी म्हणून असा पद्धतीने आंदोलन केले आहे. अगदी पुलावरील कोनशिलेला हार घालून आलेल्या नागरिकांना कंदी पेढेही एकमेकांना भरविण्यात आले. पुलाच्या या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर (Hatke News) नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

या पुलावरून वाहनांची मोठी गर्दी असते. सातारा ते लोणंद हि दोन शहर याच रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुलावरून वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड होत असते. वाढे फाटापासून व वाढे गावातून पावसाचे येणारे पाणी पुलावरच येत असते. सध्या वाढे येथील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सरपंच आराळे, उपसरपंच सुहास साबळे, भाजप युवा सचिव मदन साबळे, महेश साबळे, अभिजित साबळे ग्रा.पं सदस्य, साईराज कदम, रोहित गायकवाड, राजेंद्र कदम यांच्यासह अनेकांनी केली.