Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 546

Viral Video | या व्यक्तीने चक्क अंतराळातून मारली उडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आवाक

Viral Video

Viral Video | सगळ्या लोकांना अंतराळाबद्दल खूप उत्सुकता असते. अंतराळात अनेक रहस्य दडलेली असतात. आणि त्याचा शोध अजूनही अनेक लोकांना लागलेला नाही. शास्त्रज्ञही वेगवेगळे रहस्य उघडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि अवकाशात सातत्याने संशोधन देखील सुरू आहे. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी इतर कोणत्या ग्रहावर आहे का? त्या ठिकाणी मानव वस्ती करू शकते का? याचे प्रयत्न देखील गेले अनेक वर्षापासून चालू झालेले आह परंतु आता यामध्येच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनेकांना उंचीची खूप भीती वाटते. अंतराळात लोक गेल्यावर जर तेथून त्यांनी पृथ्वीवर उडी घेतली तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु जगातील काही लोकांशी जोखीम देखील घेतलेली आहे. असाच एक व्हिडिओ युट्युबवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अंतराळातून उडी मारत आहे. हा व्हिडिओ 2012 सालचा आहे आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल व्हायला लागलेला आहे.

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने उडी घेतलेल्या या व्यक्तीचे नाव फेलिक्स असे आहे. खाली उडी मारताना फेलिक्सने विशिष्ट प्रकारचा एक सूट घातलेला आहे. ज्याच्या मदतीने त्यांनी खाली उडी मारलेली आहे. पृथ्वीच्या वातावरणातील आणखी एक खालचा थर असलेला प्रवास केलेला आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण इथे कार्यकर्ते विशेष म्हणजे इथे कोणी खाली उडी मारली, तर तो व्यक्ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली घेतला जातो हा व्हिडिओ 2022 सालचा आहे.

यावेळी आत्तापर्यंत 33000 पेक्षा जास्त लाईक आलेले आहे. आणि अनेकांनी कमेंट देखील केलेल्या आहे. एका युजरने लिहिलेले आहे की, “मला विश्वास बसत नाही की अंतराळातून पडल्यानंतर माणूस जिवंत राहू शकतो यामध्ये खूप मोठा धोका आहे माणूस जाड कातडीचा आहे आणि पोलादासारखा मजबूत आहे.”अशाप्रकारे अनेक लोक या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Kisan Credit Card | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खास भेट; मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज

Kisan Credit Card

Kisan Credit Card | 23 जुलै रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मोदी 3.0 या सरकारचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पमध्ये यावर्षी शेतकऱ्यांसाठी देखील अनेक आर्थिक तरतुदी केलेल्या आहेत. यावेळी आता शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी केंद्र सरकारकडून जवळपास 1.52 लाख कोटी रुपये खर्च केले जाहीर केलेले आहे. तसेच या अंतरिम बजेटमध्ये कृषी मंत्र्यांनी 1.47 लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे देखील सांगितलेले आहे. निर्मला सीतारामन यांनी या घोषणांपैकी किसान क्रेडिट कार्डची घोषणा ही सर्वात मोठी घोषणा आहे. त्यामुळे देशातील आणखी पाच राज्यातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

त्यामुळे आता शेतीचे काम हे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहेत. कृषी विभागात आता डिजिटलायजेशनचे देखील प्रमाण वाढत आहे. याबद्दलची माहिती कृषिमंत्र्यांनी दिलेली आहे निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे की, विविध डाळीच्या उत्पादनासाठी त्याचप्रमाणे योग्य आणि आर्थिक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कोळंबी शेतीसाठी काम करणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणानुसार आता आणखी पाच राज्यांमध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. हे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना कमी काळासाठी कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना आवश्यक असताना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पैसे लागतात. त्यामुळे ते किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कमी व्याजावर हे पैसे घेऊ शकतात. आणि पेरणी करू शकतात. या योजनेतून शेतकऱ्यांना 4% वार्षिक व्याजावर तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय | Kisan Credit Card

या बजेटमध्ये सरकारकडून पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्डची योजना सुरू केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे कोळंबी शेतीसाठी केंद्रीय प्रजनन केंद्राचा नेटवर्क स्थापन करण्याचे देखील माहिती दिलेली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी तसेच रोजगारात वाढ होण्यासाठी राष्ट्रीय संयुती स्थापन केली जाणार आहे
येत्या दोन वर्षात नैसर्गिक शेती करणाऱ्या एक कोटी शेतकऱ्यांना मदत देखील केली जाणार आहे.
देशातील जवळपास सहा कोटी शेतकरी त्यांच्या जमिनीची नोंद रजिस्ट्रीमध्ये नोंदवली जाणार आहे.

Maharashtra News : महत्वाची बातमी ! भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (७) मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागाअंतर्गत महत्वपूर्ण असे १२ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादीमध्ये नवीन जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यामध्ये काही जातींना वगळण्यात देखील आले आहे. यामध्ये कोणत्या (Maharashtra News) जातींचा समावेश करण्यात आला आहे चला पाहूया…

ठेलारी (Maharashtra News)

राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या जमाती (क)’ यादीतील अ.क्र.२९ मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे.

केवट-तागवाले (Maharashtra News)

केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. १८२ मधील माळी, बागवान, राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे.

चूनेवाले

आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने इतर मागास वर्ग यादीतील अ.क्र.२६७ वर समावेश असलेल्या चुनारी (Maharashtra News) जातीसमोर चूनेवाला, चूनेवाले या जातींचा समावेश केला आहे.

हडगर

“हडगर” या जातीचा समावेश ‘विशेष मागास प्रवर्ग’ यादीतील अ.क्र. ३ (१) कोष्टी जातीची (Maharashtra News) तत्सम जात म्हणून समावेश करण्यात येत आहे.

वंजारी

वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) क्रमांक (३०) मध्ये समावेश करण्यात येत आहे.

भोयर

इतर मागास प्रवर्गातील अ.क्र. २२६ वरील “भोयर” या जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.

दरम्यान ठेलारी या जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे (Maharashtra News) धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबद्दल आभार व्यक्त केले.

Medicine Price | सरकारने घेतला मोठा निर्णय; जवळपास 70 औषधांच्या किमती होणार कमी

Medicine Price

Medicine Price | आजकाल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे औषधोपचारांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. परंतु आता या सगळ्यांमध्ये सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. ते म्हणजे आता अनेक औषधांच्या किमती कमी होणार आहेत. पेन किलर त्याचप्रमाणे एंटीबायोटिक्स यांच्या सहज जवळपास 70 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना अगदी स्वस्तामध्ये त्यांच्या आजारांवर उपचार होणार आहे.

नॅशनल फार्मासिटिकल प्राइज इन अथोरिटीने नुकत्याच झालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशात विकल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीमध्ये आता नियंत्रित करणे, आणि त्याचा वापर सामान्य लोकांमध्ये करून देणे हा उद्देश आहे. या बैठकीत जवळपास 70 औषधे आणि चार विशेष औषधांच्या किमती (Medicine Price) कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

दोन महिने पूर्वी म्हणजे जून महिन्यातच सरकारने अनेक आवश्यक औषधाच्या किमती (Medicine Price) कमी केल्या होत्या. परंतु आता एनपीपीएच्या 124 बैठकीत सामान्यना वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या आणि 8 विशेष औषधांच्या किमती देखील कमी केलेल्या आहेत. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टी विटामिन, मधुमे, हृदयाशी संबंधित असणाऱ्या अनेक औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरच्या आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषध देखील स्वस्त करण्यात आलेली आहेत.

सर्वसामान्यांना होणार फायदा | Medicine Price

अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी झाल्याने देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. अनेक गरीब लोकांना औषध उपचाराचा खर्च जास्त असल्याने आजारांवर उपचार घेता येत नाही. परंतु आता हे औषधे अगदी कमी दरात मिळाल्याने सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

Collagen | ‘या’ पदार्थांनी त्वरित वाढते कोलेजन; त्वचा दिसेल तरूण आणि सुंदर

Collagen

Collagen | आपली त्वचा अत्यंत सुंदर आणि निरोगी असावी. असे प्रत्येकाला वाटते. परंतु आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी कोलेजन खूप महत्त्वाचे आहे. हे एक प्रकारचे प्रथिन आहे. त्यामुळे त्वचेची रचना आणि ताकद लवचिकता राखण्यास मदत होते. त्वचेच्या मधल्या थराला डर्मीस असे म्हणतात. यामध्ये कोलेजन त्वचेच्या उतीने 70 ते 80 भाग बनवते. म्हणूनच कोलेजन (Collagen) त्वचेची लवचिकता टिकून ठेवण्यास आणि वृद्धत्व कमी करण्यास मदत करते.

सामान्यतः त्वचा नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करते, परंतु जसजसे वय वाढते तसतसे त्याचे उत्पादन कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत जेव्हा त्वचेतील कोलेजनची पातळी कमी होते तेव्हा सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही पदार्थांच्या मदतीने तुमच्या त्वचेतील कोलेजनचे कमी होत जाणारे प्रमाण वाढवू शकता.

नट आणि बिया | Collagen

शरीरात नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नट आणि बियांचाही समावेश करू शकता. हेझलनट्स, बदाम, अक्रोड, सोया, कॅनोला, सूर्यफूल बिया आणि काजू मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करतात.

टोमॅटो

अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले टोमॅटो हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे आणि कोलेजन उत्पादन वाढवण्यास मदत करते. हे त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.

ॲव्होकॅडो

ॲव्होकॅडो, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध, आपल्या आरोग्यास अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. आरोग्यासोबतच ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्याचा आहारात समावेश केल्याने कोलेजनचे विघटन रोखण्यास मदत होते.

लिंबूवर्गीय फळे | Collagen

संत्री, द्राक्षे, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असते. तसेच कोलेजन शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते.

लसूण

लसूण, सामान्यतः मसाला म्हणून वापरला जातो, जवळजवळ प्रत्येक घरात वापरला जातो. त्यात सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि त्यात भरपूर झिंक असते, ज्यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

पालेभाज्या

काळे, पालक आणि ब्रोकोली यांसारखे क्लोरोफिलयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेजनची पातळी वाढते. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.

Phantom Vibration Syndrome | तुम्हीही फोनचा अतिवापर करता का? होऊ शकता फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचा बळी

Phantom Vibration Syndrome

Phantom Vibration Syndrome | आजकाल आपण कल्पना करून देखील शकत नाही. असे काही आजारालेले आहेत. त्यातील फँटम्स व्हायब्रेशन सिंड्रोम (Phantom Vibration Syndrome) हा आजार अनेकांना होत आहे. हा सेंटर बऱ्याच वेळा अशा लोकांमध्ये आढळतो. जे लोक फोन किंवा इतर जास्त प्रमाणात वापरला जातो. या स्थितीला सिंड्रोम म्हणत असले, तरी हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय आजार नाही. ही फक्त एक गोंधळात टाकणारी एक भावना आहे. जी बऱ्याच लोकांना होते. याबाबत न्यूरोलॉजिकल सल्लागार यांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता याच आजाराबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम का होतो? | Phantom Vibration Syndrome

सवय

आपल्या मेंदूला फोनवरून मिळणाऱ्या सूचना आणि कंपनांची सवय होते. मेंदू त्यांची अपेक्षा करायला शिकतो आणि काहीवेळा इतर संवेदनांना कंपने म्हणून प्रतिक्रिया देऊ लागतो.

चिंता

सतत ऑनलाइन राहणे हे व्यसनच आहे. हे व्यसन एक चिंता बनते आणि आपल्या संवेदना कंपनांच्या दिशेने सेट करण्यास सुरवात करते, हे विशेषतः खरे आहे जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कॉल किंवा संदेशाची वाट पाहत असतो.

पीव्हीएस किती व्यापक आहे?

संशोधनातून असे समोर आले आहे की, मोबाईल फोनचा जास्त वापर करणाऱ्यांपैकी 89% लोकांना कधीतरी फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमचा त्रास होतो.

फँटम कंपन सिंड्रोमचे तोटे

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमपासून कोणतेही नुकसान नाही, परंतु यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला वारंवार कंपन जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या फोनसोबत खूप वेळ घालवत आहात हे स्पष्ट आहे. ज्यामुळे तणाव आणि चिंता होऊ शकते. अप्रत्यक्षपणे, फोनचे व्यसन शारीरिकदृष्ट्या देखील हानिकारक आहे. दिवसभर बसून फोन वापरणे तुम्हाला लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या अनेक आजारांना बळी पडू शकते.

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम कसे नियंत्रित करावे? | Phantom Vibration Syndrome

फोनवर कमी वेळ घालवा

फोनपासून पूर्णपणे दूर राहणे शक्य नाही, परंतु त्याच्यासोबत कमी वेळ घालवणे पूर्णपणे शक्य आहे. संदेश तपासण्यासाठी वेळ सेट करा. यामुळे दिवसभर फोनमध्ये मग्न राहण्याची सवय हळूहळू कमी होईल.

विश्रांती घ्या

फोन थोडा वेळ शांत होऊ द्या. फोनची गरज नसलेल्या गोष्टी करा, जसे की पुस्तक वाचा, फिरायला जा किंवा मित्रांना भेटा.

ध्यान करा | Phantom Vibration Syndrome

मन शांत करण्यासाठी ध्यान करा. ध्यान केल्याने केवळ चिंता आणि तणावासारख्या समस्या दूर होत नाहीत तर लक्ष आणि स्मरणशक्ती देखील वाढते.

फोनपासून दूर रहा

शक्य असल्यास, खिशाच्या ऐवजी तुमचा फोन तुमच्या बॅगमध्ये किंवा डेस्कमध्ये ठेवा. यामुळे फोन व्हायब्रेशन किंवा नोटिफिकेशन्सबाबत कोणताही गोंधळ होणार नाही.

मदत कधी आवश्यक आहे?

फोनच्या व्यसनामुळे आणि या सिंड्रोममुळे तुमचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर या लक्षणांवर आधारित उपचार, थेरपी किंवा जे काही शक्य असेल ते सुचवू शकतात आणि ही समस्या लवकरात लवकर बरा होण्यास मदत करू शकतात.

फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम का होतो आणि फोन कसा वापरावा याबद्दल जागरूकता वाढवून फँटम व्हायब्रेशन सिंड्रोमची लक्षणे सहजपणे कमी करता येतात. हे लक्षात ठेवा की कनेक्टिव्हिटी आणि फोनपासून दूर राहणे यामधील संतुलन निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Railway News : महत्वाची बातमी ! कोल्हापूर-सातारा दरम्यान 28 अनारक्षित विशेष गाड्या धावणार ; पहा वेळापत्रक

Railway News : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यातही कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. म्हणूनच या भागातील पूरस्थिती लक्षात घेता मध्य रेल्वेने कोल्हापूर ते सातारा दरम्यान 14 अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही (Railway News) गाड्यांना तात्पुरते थांबे देखील देण्यात आले आहेत.

कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 28 अनारक्षित विशेष गाड्या – कोल्हापूर ते सातारा दरम्यान 14 स्पेशल आणि 14 स्पेशल कोल्हापूर ते मिरज दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी (Railway News) करण्यासाठी चालवणार आहे.

कोल्हापूर- सातारा अनारक्षित विशेष (14 सेवा)

गाडी क्रमांक 01412 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 08.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.25 वाजता सातारा येथे पोहोचेल.गाडी क्रमांक 01411 अनारक्षित विशेष सातारा येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 14.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 18.35 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 5 स्लीपर क्लास आणि 7 सामान्य द्वितीय श्रेणीचे (Railway News) डब्बे असतील.

कुठे घेईल थांबे ? (Railway News)

वळिवडे, रुकडी, हातकणगले, जयसिंगपूर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नांद्रे, भिलावडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानी नगर, शेणोली, कराड, शिरवडे, मसूर, तारगाव, रहिमतपूर आणि कोरेगाव

कोल्हापूर- मिरज अनारक्षित स्पेशल (14 सेवा)

गाडी क्रमांक 01416 अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज 20.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 21.25 वाजता मिरजला पोहोचेल.गाडी क्रमांक ०१४१५ अनारक्षित स्पेशल मिरज येथून 07.08.2024 ते 13.08.2024 पर्यंत दररोज ०६.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.०५ वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाडीला 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 5 स्लीपर क्लास आणि 7 सामान्य द्वितीय श्रेणी चे डब्बे (Railway News) असतील.

कुठे घेईल थांबे ? (Railway News)

वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर

Maharashtra Government : झाड तोडल्यास होणार 50 हजारांचा दंड ; मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभाग यांच्या करिता हे निर्णय घेण्यात आले (Maharashtra Government) आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता झाड तोडल्यास एक हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल करण्याला आळा बसणार आहे . विनापरवाना जंगल तोडणाऱ्यांसाठी (Maharashtra Government) वन विभागाने हे मोठ पाऊल उचलले आहे. आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी वनविभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जर झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या दंडाची तरतूद असणारा शासन निर्णय लवकरच पारित होणार आहे.

अडीच कोटी घरांवर तिरंगा (Maharashtra Government)

दरम्यान भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट पुढच्या आठवड्यात साजरा होणार आहे. त्यासाठी देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे. 9 ऑगस्ट पासून राज्यामध्ये हर घर तिरंग हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Government)

  • मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्त्वकांक्षी वैनगंगा -नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार. असे निर्णय घेण्यात आले.
  • गृहनिर्माण विभागांतर्गत आता प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आणि त्याच्या संबंधित धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
  • नगर विकास विभागाअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार आहे. कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली.
  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तसंच अनुसूचित जाती-जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार आहेत. (Maharashtra Government) या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदिवासी विभाग अंतर्गत घेण्यात आला.
  • वनविभाग अंतर्गत विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार रुपयांचा दंड होणार आहे. असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • उद्योग विभाग अंतर्गत महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबवणार असून पाच वर्षात 30000 कोटींचे उत्पन्न यातून मिळणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलं.
  • वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत कागल इथं आयुर्वेदिक महाविद्यालय, अजरा तालुक्यातील योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय बांधण्यात येणार.
  • विधी व न्याय विभाग अंतर्गत न्यायमूर्ती व मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घरकाम आणि (Maharashtra Government) वाहनचालक सेवा
  • महसूल विभाग अंतर्गत सेना कल्याण शिक्षण संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहकार विभागांतर्गत घेण्यात आला.
  • नऊ ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात (Maharashtra Government) राबवण्यात येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार. शिवाय 15 ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्या बाबतचा निर्णय घेण्यात आला.

West Central Railway Bharti 2024 | पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

West Central Railway Bharti 2024

West Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि त्यांना सरकारी नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला थेट पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत (West Central Railway Bharti 2024) नोकरी लागणार आहे. पश्चिम रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 3317 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 4 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | West Central Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 3317 जागा
  • वयोमर्यादा – 24 वर्ष
  • अर्ज शुल्क – 141 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2024

महत्त्वाची कागदपत्र

  • दहावीची गुणपत्रिका
  • बारावीची गुणपत्रिका
  • दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जात दाखला

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 4 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kitchen Tips : चपाती खाल्ल्याने होते पोट गच्च ? कणिक मळताना आवर्जून घाला ‘या’ गोष्टी

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये चपाती, भाकरी, फुलके हे आवर्जून बनवले जातात. मात्र अनेकदा चपाती ,पोळी, फुलके अशा गोष्टी खाल्ल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंद होत असल्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. अशा स्थितीत पोट विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, आंबट ढेकर येणे, मळमळ यासारख्या (Kitchen Tips) समस्या ही उद्भवतात.

जर आपण यावर वेळीच उपाय केले नाहीत तर फिशर किंवा मूळव्याध यासारख्या तक्रारी पुढे वाढू लागतात. मात्र आपण चपाती आपल्या आहारामधून अवॉइड करू इच्छितो नसाल तर चपातीची कणिक मळताना दोन गोष्टी त्यामध्ये तुम्ही घालू शकता जेणेकरून (Kitchen Tips) चपाती पचायला हलकी होते आणि त्यामुळे पोटाला कोणताही त्रास होत नाही चला तर मग जाणून घेऊया…

चपाती खाल्ल्यानंतर जर तुम्हाला बद्धकोष्ठता होत असेल किंवा पोटफुगीची समस्या होत असेल तर कणिक मळत असताना केवळ दोन गोष्टी मिक्स करा आणि त्यानंतर तुम्हाला ही समस्या होणार नाही. त्यामुळे चपाती ही पचायला हलकी होऊन (Kitchen Tips) जाईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या तुम्हाला येणार नाही.

ओट्स (Kitchen Tips)

ओट्स मध्ये फायबर, विटामिन बी, आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे संतुलित घटक असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय ओट्स मध्ये बीटा ग्लुकोज असते जे आतडे स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

ओवा (Kitchen Tips)

अगदी आपल्या पूर्वजांच्या काळापासून पोटाच्या समस्यांसाठी ओवा हा आवर्जून खाल्ला जातो. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कणिक मळताना त्यामध्ये ओवा घाला. ओव्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अंटीबॅक्टरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे आतडे निरोगी राहतात. शिवाय तुमच्या चपातीला एक छानशी चव सुद्धा मिळते. त्यामुळे नियमितपणे कणिक मळताना (Kitchen Tips) तुम्ही ओवा घालून चपात्या करू शकता.