Monday, December 22, 2025
Home Blog Page 555

भारतीय क्रिकेटचा कायापालट होणार; BCCI ची सर्वात मोठी घोषणा

News NCA By BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) एक महत्वाची आणि अभिमानाची बातमी आहे. देशात क्रिकेटला उपयुक्त अशा अनेक पायाभूत सुविधा असताना आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) आणखी एक मोठी घोषणा करत खेळाडूंना मोठं गिफ्ट दिले आहे. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी दिली आहे. पाऊस पडला तरी खेळाडू याठिकाणी सराव करू शकतील. या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटची उन्नती होणार असून खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहे.

BCCI ने फेब्रुवारी 2022 मध्ये बेंगळुरू विमानतळाजवळ एक नवीन NCA सुविधा बांधण्याची योजना आखली होती. आज दोन वर्षांनी ती तयार झालेली दिसते. जय शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल, बीसीसीआयची नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि लवकरच बेंगळुरूमध्ये ती खुली करण्यात येईल हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. नवीन NCA मध्ये ३ जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान, 45 सराव खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक प्रशिक्षण, रिकवरी आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील. हा उपक्रम आपल्या देशातील वर्तमान आणि भविष्यातील क्रिकेटपटूंना शक्य तितक्या चांगल्या वातावरणात त्यांचे कौशल्य विकसित करण्यास मदत करेल! असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला.

सध्याचे एनसीए (NCA) अकेडमी सुद्धा बंगळुरूमध्येच असून 2000 मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंह डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आली होती. माजी दिग्गज क्रिकेटपटू VVS लक्ष्मण हे या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. टीम इंडियाचा कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास तो बरा होण्यासाठी एनसीएकडे जातो.अत्याधुनिक सुविधा असल्याने या अकादमीचा भारतीय खेळाडूंना मोठा फायदा होत आहे. आता आणखी एक नवीन अकादमी स्थापन झाल्यानंतर याचा चांगला परिणाम क्रिकेटपटुंच्या भविष्यावर होणार असून भारतीय क्रिकेटचा आणखी कायापालट होण्यास मदत होणार आहे.

महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

7 projects maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पातून महायुती सरकारनं नेमकं काय साध्य केलं? तेच पाहुयात

सर्वात आधी समजून घेऊयात 7 प्रकल्प नेमके कोणते?

राज्यात ७ मोठ्या उद्योगांना महायुती सरकारने नुकतीच मंजूरी दिली. यात तब्बल ८१ हजार कोटी पेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होणार असून २० हजारांहून अधिकची रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावाही सरकारकडून केला जातोय…राज्याच्या कोकण, मराठवाडा व विदर्भ या तीन विभागांमध्ये हे उद्योग उभे राहणार असून या विभागांमध्ये एकदाच एवढी मोठी गुंतवणूक त्यांचा औद्योगिक अनुशेष भरून काढायला मदत करेल. विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत इलेक्ट्रिक व्हेइकल, सेमिकंडक्टर चिप्स, लिथियम बॅटरी, सोलार पी.व्ही. मॉडुल्स व इलेक्ट्रोलायझर, मदयार्क निर्मिती व फळांचा पल्प या प्रकलपांचा समावेश असल्याचं समजतंय…

आता पाहुयात विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय येणार ते?

विदर्भातील नागपूर येथे जवळपास ३३००० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रोजेक्टच्या माध्यमातून होण्याचा दावाय… यामध्ये आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलार पी. व्ही. मॉड्यूल्स व इलेक्ट्रोलायझरचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सुरू होणारय. यामध्ये ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक असेल… सोबतच लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प असून सुरू होणार असून यात तब्बल २५००० कोटी रुपये गुंतवणुकीतून ५ हजारांहून अधिकची रोजगार निर्मिती होणारय. तर परनॉर्ड रिकार्ड इंडिया लिमिटेड मार्फत डिस्टीलरीचा विशाल प्रकल्प बुटीबोरी येथे सुरू होणार असून यात १७८५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं समजतय… या सर्व उद्योग प्रकल्पातून विदर्भात जवळपास आठ हजारहून अधिक रोजगारांची निर्मिती होइल….

आता वेळ येते ते मराठवाड्याच्या वाट्याला काय? हे जाणून घेण्याची…

मराठवाड्यात या प्रकल्पातून तब्बल २७ हजार कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक होणार असल्याची माहिती मिळतेय… जे.एस.डब्लु. ग्रीन मोबईलीटी लि. कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीच्या उद्योगात छ. संभाजी नगर येथे २७ हजार कोटी एवढी गुंतवणूक करणार आहे यातून ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक असलेला हा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पात वर्षाला ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी वाहने आणि १ लाख व्यावसाईक वाहनांची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतंय…

यासोबतच कोकण आणि मुंबई विभागात ( Only For Text – कोकण आणि मुंबईच्या वाट्याला काय? ) जवळपास २१००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आर. आर. पी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मार्फत सेमी कंडक्टर चिप्सचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट तळोजा किंवा पनवेल मध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा हा महाराष्ट्रातील त्यामुळे पहिलाच प्रकल्प होऊ शकतो… यामध्ये दोन टप्यात प्रत्येकी १२००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू देखील करण्यात आलंय… रोजगार निर्मितीसाठीही या प्रकल्पांची मोठी मदत होणारय… फळ प्रक्रिया उद्योगांची मागणी कोकणातून नेहमीच होत असते.. म्हणूनच हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प कोकणातील रत्नागिरी मध्ये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय… १५०० कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार असून स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे…

थोडक्यात काय एकाच वेळी शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक आघाड्यांवर महायुती सरकार घोडदौड करतय. यातून शेतकरी, बेरोजगार तरुण, पुरुष, महिला अशा लार्ज स्केलवर विकास करण्यावर सध्या सरकार भर देतय…बाकी या मोठ्या गुंतवणुकीची प्रत्यक्ष ग्राउंडवरची अंमलबजावणी कशी आणि कधीपर्यंत अस्तित्वातील येईल? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल… या गुंतवणुकीबद्दल, आणि दारावर येऊन पोहोचलेल्या मोठ्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Vande Metro : देशातील पहिल्या Vande Metro चे यशस्वी टेस्टिंग; प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Vande Metro Testing

Vande Metro । मागील काही वर्षांत भारतीय रेल्वे विभागाचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा नवनवीन आणि अत्याधुनिक रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत आल्याने रेल्वे प्रवास अतिशय सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. त्यांतच आता देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन धावणार असून या रेल्वेचे यशस्वी टेस्टिंग पार पडलं आहे. मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त (CCRS) यांनी ICF, RDSO आणि दक्षिण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वंदे मेट्रो रेकचा स्पीड ट्रायल विल्लिवाक्कम आणि वालाजाह दरम्यान केला. यावेळी या रेल्वेचं स्पीड 130 किलोमीटर प्रतितास इतकं होते.

वंदे मेट्रोमध्ये 12 AC कोच- Vande Metro

जनक कुमार गर्ग, CCRS यांनी Vande Metro ट्रेनच्या पहिल्या रेकची पाहणी करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ला भेट दिली. ICF मध्ये तयार करण्यात आलेल्या या वंदे मेट्रो ट्रेन मध्ये 12 AC कोच आहेत. हि ट्रेन खास करून 150-200 किमी अंतराच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी बनवण्यात आली असून ताशी 110 किमी प्रतितास वेगाने धावू शकते असं म्हंटल जातंय. कमी अंतर असलेल्या कोणत्या २ मुख्य शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे मेट्रो ट्रेन अतिशय उपयुक्त ठरू शकते. विल्लिवाक्कम आणि वालाजाह दरम्यान जरी या वंदे मेट्रोचे टेस्टिंग झालं असलं तरी याच २ स्टेशनवर हि ट्रेन धावेल कि अन्य कोणत्या मार्गावर धावेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

CCRS ने ICF आणि ICF चे महाव्यवस्थापक यू.सुब्बा राव यांच्याशीही वंदे मेट्रो ट्रेनमधील तांत्रिक वैशिष्ट्ये आणि सुधारित प्रवासी सुविधांबद्दल चर्चा केली. वंदे मेट्रोमध्ये शहरवासीयांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारतप्रमाणेच वंदे मेट्रोचे ( Vande Metro) दरवाजे आपोआप उघडतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांना इतर गाड्यांपेक्षा जास्त सुविधा मिळणार आहेत.वंदे मेट्रो ट्रेनमध्ये वंदे भारत ट्रेनप्रमाणेच सुविधा असतील. त्याची वैशिष्ट्ये देखील वंदे भारत ट्रेन सारखी असतील. मात्र, त्यात पॅन्ट्री असणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे मेट्रो ट्रेन मध्ये एका डब्यात सुमारे 100 प्रवाशांना बसण्याची सोय असेल. याशिवाय 200 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. वंदे भारत मेट्रो ट्रेनची चाचणी पुढील काही दिवस अशीच सुरू राहणार आहे. येत्या 15 ऑगस्टपूर्वी देशातील हि पहिली वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

सेल्फीचा नाद अंगलट आला; युवती थेट दरीत कोसळली, पण पुढे जे झालं ते…

selfi girl fell into valley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल वरून सेल्फी (Selfie) काढणं हा आजकाल छंदच झाला आहे. कुठेही बाहेर गेलं तरी कोणत्या तरी एका स्पॉट वरून स्वतःचा सेल्फी काढण्यात आजकालच्या तरुणाईला खूपच मोठा आनंद मिळतो, कधी पाण्याच्या प्रवाहाजवळ उभा राहून सेल्फी काढला जातो, तर कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. मात्र हे करत असताना आसपासच्या परिस्थितीचे भान सुद्धा त्यांना नसते. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळली. मात्र तिचं दैव बलवत्तर म्हणून ती वाचली.

नेमकं काय घडलं?

सदर तरुणीचे नाव नसरीन अमीर कुरेशी (वय २९) असं आहे. ती पुण्यातील वारजे येथील असून पर्यटनासाठी तिच्या मित्रांसोबत साताऱ्यातील संगमनगरमध्ये आली होती. त्याचवेळी ठोसेघर रस्त्याला बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. पण सेल्फी काढण्याच्या नादात नसरीनचा पाय घसरला आणि ती १५० फूट खोल दरीत कोसळली. या तरुणीचं आयुष्य संपलं असचं अनेकांना वाटलं. मात्र तीच नशीब बलवत्तर म्हणून ती दरीत कोसळत असताना एका झाडाला अडकली आणि खाली पडण्यापासून वाचली.

यानंतर तिच्या मित्रांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. या ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावत नसरीनचे प्राण वाचवले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र नशीब चांगलं म्हणूनच ती वाचली अशी भावना आता व्यक्त होत आहे.

Socked Raisin Benefits | भिजवलेले मनुके खाल्ल्याने आरोग्याला होतात फायदे, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर

Socked Raisin Benefits

Socked Raisin Benefits | ड्रायफूट हे आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असतात. सगळ्याच ड्रायफ्रूट्समध्ये काही ना काही पोषणतत्वे आहेत. त्यातील मनुक्यांमध्ये तर खूप जास्त पोषकतत्वे असतात. मनुके हे दिसायला खूपच लहान असले, तरी त्यात अनेक पोषणतत्वे असतात. मनुक्यामध्ये (Socked Raisin Benefits) लोह, फायबर, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही अनेक आजारांशी लढू शकता. तुम्ही दररोज मनुके पाण्यात भिजून खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. चला तर आता जाणून घेऊया भिजवलेल्या मनुक्यांचा (Socked Raisin Benefits) तुमच्या आरोग्याला कशाप्रकारे फायदा होतो.

थकवा निघून जातो | Socked Raisin Benefits

मनुक्यांमध्ये लोह असते, जे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. हिमोग्लोबिन शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते, ज्यामुळे ऑक्सिजनची योग्य मात्रा प्रत्येक टिश्यूपर्यंत पोहोचते. त्यामुळे थकवा कमी होतो.

अशक्तपणा प्रतिबंध

ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे, ज्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होते. बेदाणे लोहाच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करतात आणि म्हणूनच ते खाल्ल्याने ॲनिमियापासून बचाव होतो. अशक्तपणा असला तरीही मनुका खाल्ल्याने लवकर आराम मिळतो.

बद्धकोष्ठता पासून आराम

मनुकामध्ये आहारातील फायबर असते, जे अन्न सहजपणे आतड्यांमधून जाण्यास मदत करते. असे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि तुमच्या आतड्यांचे आरोग्यही सुधारते. चांगले आतडे आरोग्य म्हणजे चांगले पचन आणि चांगले आरोग्य.

कर्करोग प्रतिबंध

मनुकामध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट आढळतात, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. ऑक्सिडेटिव्ह नुकसान पेशींचे नुकसान करते आणि कर्करोगाचा धोका वाढवते. त्यामुळे मनुका खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो.

हाडे मजबूत होतात

वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीत रोज मनुका खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत होतात. शिवाय, भिजवलेले मनुके खाल्ल्याने कॅल्शियमचे शोषण सोपे होते.

हृदयासाठी फायदेशीर | Socked Raisin Benefits

बीपी वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, पण मनुका ते टाळण्यास मदत करते. यामध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मनुका फायदेशीर आहे.

Weather Update | गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यात विविध ठिकाणी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 4ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर आज आपण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारे पाऊस (Weather Update) असणार आहे. हे जाणून घेऊया. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अनेक ठिकाणांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज रविवार आहे, त्यामुळे जर काही काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळा.

त्याचप्रमाणे आज पुण्यातील घाट माथ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केलेला आहे. पालघरमध्ये देखील आज अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे. यासोबतच सातारा घाटपाथ्यावर देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला देखील आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईमध्ये देखील आज पाऊस मुसळधार स्वरूपात हजेरी लावणार आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

त्याचप्रमाणे अहमदनगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हे जिल्हे सोडून इतर संपूर्ण राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भात आज वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

Pune News : तळेगाव -चाकण रस्त्यावर अवजड वाहनांच्या बंदीबाबत 24 तासांत निर्णय

Pune News : पुणे आणि ट्राफिक हे जणू समीकरणच झाले आहे. नागररोड, हिंजवडी, मुंढवा -केशवनगर ,तळेगाव चाकण रोड या भागात नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्राफिक जॅम च्या समस्येला तोंड दयावे लागते. म्हणूनच तळेगाव चाकण मार्गासाठी आमदार शेळके यांचे सहकारी गणेश थिटे नारायण मालपोटे व गोकुळ किरवे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भातील मागणीचा निवेदन दिल आमदार शेळके यांनी भ्रमणध्वनी द्वारे आयुक्तांशी चर्चा करून तळेगाव चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिलं त्याची तातडीने दखल घेत (Pune News) पोलीस आयुक्तांनी या संदर्भात 24 तासात निर्णय घेण्याचा आश्वासन शेळके यांनी दिले आहे.

मागच्या आठवड्यात तळेगाव स्टेशन (Pune News) येथील चौकात संजय दिसले या व्यवसायिकाचा कंटेनर खाली सापडून मृत्यू झाला. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अवजड वाहनांच्या प्रचंड वाहतुकीमुळे (Pune News) तळेगावकरांना अक्षरशः जीव मोठे घेऊन प्रवास करावा लागतोय. रस्त्याने चालताना आणि रस्ता ओलांडताना देखील जोखमीचे झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास तसेच चाकरमान्यांना ऑफिस व कारखान्यात पोहचायला देखील विलंब होत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी 24 तासात याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

तळेगाव मार्गे चाकण एमआयडीसी कडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे होत असलेले अपघात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात तळेगावकरांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रस्त्यावर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी (Pune News) करण्यात आली होती. पाच महिन्यांपूर्वी कोणतीही जाहीर सूचना न देता बंदि शिथिल करण्यात आली. सकाळी नऊ ते 11 संध्याकाळी पाच ते सात एवढ्या पुरतीच हि मर्यादित करण्यात आली. प्रत्यक्षात या कालावधीत देखील अवजड वाहनांची येजा सुरूच असल्यामुळे तळेगावकर नागरिक दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्यांना हैराण झाले आहेत.

Amazon Upcoming Sale | अमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मिळणार 80 % सूट; स्वातंत्र्य दिनानिमित्त भन्नाट ऑफर

Amazon Upcoming Sale

Amazon Upcoming Sale | स्वातंत्र्यदिन जवळ आलेला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या गोष्टींवर ऑफर्स देखील येत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर सेल चालू झालेला आहे. अशातच आता ॲमेझॉनने त्यांच्या नवीन सेलची घोषणा केलेली आहे. ॲमेझॉनचा हा नवीन सेल्स 6ऑगस्ट पासून चालू होणार आहे, तर 11 ऑगस्ट रोजी हा सेल संपणार आहे.

या सेलमध्ये ग्राहकांना टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट आणि कॅमेरा यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ॲमेझॉन कडून जवळपास 80% पर्यंत सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे मर्यादित वेळेमध्ये खरेदी करा. या ऑफर्सची वेळ चुकवू नका. ॲमेझॉनवर (Amazon Upcoming Sale) ही सध्या सगळ्यात मोठी डिल चालू झालेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक देखील खुश झालेले आहेत.

200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट

जर तुम्हाला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन खरेदी करायचा असेल, तर आता ॲमेझॉनवर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. यामध्ये तुम्हाला रेडमी नोट 5G स्मार्टफोन चांगल्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत 27 हजार 9999 एवढी आहे. एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनवर तुम्हाला 1400 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 26,599 रुपये एवढी होणार आहे.

विवो Y 58 5G फोनवर जबरदस्त फ्लॅट डिस्काउंट | Amazon Upcoming Sale

त्याचप्रमाणे तुम्हाला 20,000 रुपयांच्या किमतीमध्ये नवीन फोन घ्यायचा असेल तरी देखील तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे ॲमेझॉनच्या या खास डीलमध्ये 8 GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला एक vivo Y58 5G हा फोन ऑफरमध्ये आहे. हा फोन 1000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट तुम्ही खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे या फोनच्या खरेदीवर 975 रुपयांचा कॅशबॅक देखील तुम्हाला मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 18,100 रुपयांपर्यंत येईल.

8 जीबी रॅम असलेला फोन, किंमत 7 हजारांपेक्षा कमी

पोको सी 65 (4 जीबी रॅम, 128जीबी स्टोरेज) हा फोन तुम्ही ॲमेझॉनच्या सेलमध्ये केवळ 699 रुपयात खरेदी करू शकता. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 350 रुपयांची कॅशबॅक देखील दिला जातो. तसेच दमदार बँक डिस्काउंट देखील दिला जातो. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन तुम्हाला 6600 रुपयांना मिळतो. या फोनचा EMI 339 रुपयांपासून सुरू होतो. फोनमध्ये तुम्हाला 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देखील मिळेल. तसेच याचा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे

अनिल देशमुख, सचिन वाझेची नार्को टेस्ट करा; कोणी केली मागणी?

deshmukh vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे , देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा खळबळजनक आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. मात्रं सचिन वाझे याचा आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे असं प्रत्त्युत्तर अनिल देशमुख यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अनिल देशमुख आता सगळीकडे अडकले आहेत. म्हणून ते आता खोटे बोलत आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, आणि एसपी मुंढे या तिघांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. वाझेंना नोकरीवर घ्या सांगा असे सांगणारे उद्धव ठाकरे होते. वाझे वाझे काय करतात तो काय लादेन आहे का? असे उद्धव ठाकरे बोलले होते. आता वाझे बोलतात तर ते बोंबा मारतायत असं म्हणत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

काय आहे प्रकरण?

१०० कोटी वसुली प्रकरणावरून मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असताना आज अचानकच तुरुंगात असलेल्या सचिन वाझे या मुख्य आरोपीने जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे असं म्हणत सचिन वाझे याने बॉम्ब फोडला. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत हा आरोप फेटाळून लावला. मी चार, पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि वस्तूस्थिती जनतेसमोर आणली होती. कि कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मला प्रतिज्ञापत्र पाठवले होते आणि माझ्यावर दबाव आणला होता. हि परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली. त्यानंतर फडणवीस यांनी नवीन चाल खेळली आहे. सचिन वाझे जे काही बोलला ती फडणवीसांची चाल आहे असं अनिल देशमुख म्हणाले होते.

Samsung Galaxy F14 : अवघ्या 8999 रुपयांत Samsung ने लाँच केला परवडणारा मोबाईल

Samsung Galaxy F14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मोबाईल मार्केट मधील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने ग्राहकांना परवडेल अशा अतिशय कमी किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy F14 असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP मुख्य कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॅमसंगचाय या मोबाईलची किंमत अवघी 8999 असल्याने मध्यमवर्गीय ग्राहकाला सुद्धा तो चांगलाच परवडतोय. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy F14 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा IPS LCD फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर बसवण्यात आला असून सॅमसंगचा हा मोबाईल Android 14 वर आधारित OneUI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. हा फोन 4G LTE सपोर्टसह येतो. यामध्ये तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळणार नाही. सॅमसंगचा हा मोबाईल मूनलाइट सिल्व्हर आणि पेपरमिंट ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा – Samsung Galaxy F14

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy F14 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनला पॉवरसाठी 5000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे असून हि बॅटरी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, सुरक्षेसाठी साइड फिंगरप्रिंट सेंसर, ड्युअल सिमला सपोर्ट, ब्लूटूथ 5.1 आणि जीपीएस सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनीने यूजर्सना दोन वर्षासाठी OS अपग्रेड आणि चार वर्षांसाठी सुरक्षा पॅच अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.