मुंबई | धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. मराठा
आरक्षणाच्या आंदोलनात अटकेत असलेल्या तसेच गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींचे गुन्हे मागे घेण्याची मागणी या पत्रा द्वारे केली आहे. महाराष्ट्र भर आंदोलन तीव्र झाले असून अनेक ठिकाणी आंदोलकांची धर पकड सुरू झाली आहे. एका ठाणे शहरात ५० हुन अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान आज मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या सोबत मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सदाभाऊ खोत, आशिष शेलार हे नेते उपस्थित होते. मराठा आंदोलन तीव्र होत चालले आहे आपण लवकरात लवकर आयोगाचा अहवाल द्यावा अशी विनंती या नेत्यांनी अध्यक्षांना केले आहे.
धनंजय मुंडेंनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनेल – हेमा मालिनी
बांसवाडा (राजस्थान) | ‘मी जर ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते परंतु मुख्यमंत्री बनल्यानंतर स्वातंत्र्यावर बंधने येतात म्हणून मी हा निर्णय घेत नाही’ असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांनी केले आहे. हेमा मालिनी बांसवाडा येथे आल्या असता एका स्थानिक पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी असे विधान केले आहे.
हेमा मालिनी या भाजपच्या खासदार आहेत. त्या मथुरेतून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. हेमा मालिनी यांच्या उत्तराचा रोख उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाकडे होता. हेमा मालिनी या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्या आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून ही त्या ओळखल्या जातात.
आमदारांच्या राजीनाम्याची अफवा
मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. हर्षवर्धन जाधव (शिवसेना), भारत भालके (कॉग्रेस), राहुल अहिरे (भाजप), भाऊसाहेब चिकटगावकर (राष्ट्रवादी), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) या आमदारांनी राजीनामा दिल्याची बतावणी करण्यात येत आहे. परंतु फक्त हर्षवर्धन जाधव यांनीच राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. तसेच जाधव यांचा राजीनामा वैध ठरला आहे. बाकीच्या आमदारांनी राजीनाम्याची पत्रे काढली आहेत परंतु अध्यक्षाच्याकडे अद्याप राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे राजीनामे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मराठा आरक्षणासाठी आम्ही पदाचे राजीनामे देतो आहोत अशी बतावणी करून लोकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न आमदारांकडून केला जात आहे. हर्षवर्धन जाधव वगळता अन्य आमदारांनी राजीनामे दिल्याची अफवा असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील घडामोडींबद्दल सर्वात आधी अपडेट मिळवण्याकरता इथे क्लिक करा HELLO महाराष्ट्र
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी
नवी मुंबई | २५ जुलै रोजी नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी बंद पाळण्यात आला होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलकांनी दगडफेक केली होती. कोपरखैरना या ठिकाणी जमावाने केलेल्या दगडफेकीमधे रोहन तोडकर नवाचा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मराठा आरक्षणासाठी गेलेला हा तिसरा बळी आहे. सरकार ने मृताच्या कुटूंबियांना आर्थिक मदत दिल्या शिवाय रोहनवर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. रोहन तोडकर हा अवघ्या २१ वर्षाचा युवक आहे. जेजे रुग्णालयात उपचारा दरम्यान आज पहाटे त्याची प्राण ज्योत मालवली आहे.
जातीवाद जोपासून महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे काय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
पुणे | राज ठाकरे पुणे दौऱ्याला आले असून पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे बोलले जाते आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राष्ट्रीय पक्षांचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री असतात.त्यांना निर्णय घेताच येणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा दसाला लावू शकणार नाहीत असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण दूषित झाले असून लहानगी मुलं पण जातीवाचक बोलू लागली आहेत. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असा जातीवाद जोपासून महाराष्ट्राचा बिहार करण्याचा आहे का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
हरामखोर राजकारण्यांसाठी काकासाहेब शिंदे सारख्या गरिबांचे बळी जाता कामा नये. राजकारणाच्या भूलथापांना बळी पडू नका असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात भरलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. मागच्या महिन्यात उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या दौऱ्याला पुण्याला आले होते. तीच री राज ठाकरेंनी ओढली असून पक्ष बांधणीचा दौरा पुण्याला आणला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकाही केल्या आहेत.
बारावीचं शिक्षण महाराष्ट्रात झालं असेल तरच मिळणार वैद्यकीय शाखेला प्रवेश
मुंबई | वैद्यकिय शाखेला प्रवेश घेण्याकरता आता विद्यार्थी महाराष्ट्रातच बारावी पास असण्याची अट घालण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयात वैद्यकीय शाखेला प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्याचे करावी बारावीचे शिक्षण राज्यातच पुर्ण होणे गरजेचे असल्याची नोटीस राज्य सरकारने मागे काढली होती. परंतू शासनाच्या या नियमाला काही पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने त्यावर स्टे आणण्यात आला होता. आज न्यायालयाने त्यासंदर्भात निकाल दिला आहे. सुनावनी मधे राज्य सरकारने केलेल्या नियमाची उच्च न्यायालयाने पाठराखण केली आहे.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशा संदर्भात ७०/३० चा वाद सुरू असतानाच उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात विधान परिषदेत वैद्यकीय शिक्षण प्रवेशावर वादळी चर्चा झाली होती.
२१ व्या शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज
पुणे | २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण आज रात्री पाहण्यास मिळणार आहे. रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण ३ वाजून ४९ मिनिटांनी संपणार आहे. तर ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे राहणार आहे. ग्रहणाचा कालावधी ४ तास एवढा राहणार आहे. या ग्रहणाचा कालावधी अधिक असल्याने हे २१ व्या शतकातील सगळ्यात मोठे ग्रहण असणार आहे.
पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण संपन्न होते. चंद्र पृथ्वी पासून एक लक्ष किलोमीटर दूर गेल्याने चंद्रग्रहणात चंद्र छोटा दिसणार आहे. देशाच्या सर्व ठिकाणी हे चंद्र ग्रहण दिसणार आहे.
गुरू पौर्णिमेनिमित्त गजबजली साई नगरी
शिर्डी | साई बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डी नगरीत गुरू पौर्णिमेचा उत्सव आज पहाटे सुरू झाला आहे. पहाटे साईंची पालखी वाजत गाजत द्वारकामाईमध्ये आणण्यात आली. समाधी मंदिरात सेज आरती झाली आणि गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली
दर गुरुवारी शिर्डीत साई पालखी सोहळा संपन्न होतो. साईबाबांच्या पावलांची प्रतिकृती साई बाबांचा फोटो पालखीत ठेवून शिर्डीच्या विशिष्ठ मार्गाने पालखी सोहळा व्दारकामाईमध्ये आणण्यात येतो. अनेक वर्षांची ही परंपरा असल्याचे सांगण्यात येते.
गुरु पौर्णिमेलाचा हा उत्सव पुढील तीन दिवस चालनार आहे. मुंबई पुणे नाशिक याच बरोबर राज्यातील अनेक शहरातून गुरू पौर्णिमेनिमित्त शिर्डीत पालख्या आणि दिंड्या दाखल झाल्या आहेत. दिंड्या दाखल झाल्याने शिर्डीला पंढरीचे रूप आले आहे.
सोनम वांगचुक आणि डॉ भरत वाटवाणी या भारतीयांना रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
टीम, HELLO महाराष्ट्र | आशियाचे नोबल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे पुरस्काराची घोषणा झाली आहे. २०१८ च्या मॅगसेसे पुरस्कार्थींमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ.भरत वाटवाणी यांना २०१८ साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
लडाखच्या डोंगराळ परदेशात आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा वापर करणारे थोर समाजसेवक सोनम वांगचुक आणि लहानग्या मनोरुग्ण बालकांचे डॉक्टरापेक्षा वडील भासणारे डॉ.भरत वाटवाणी या पुरस्काराची योग्य निवड असल्याचे सार्थपणे दाखवून देतात. पुरस्काराचे वितरण ३१ ऑगस्ट २०१८ रोजी होणार आहे.
आलिया भट साठी रणबीर कपूर झाला फोटोग्राफर
बल्गेरिया | आलिय भट आणि रणबीर कपूर सध्या बुल्गारिया मध्ये आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. बुल्गारियामध्ये चित्रित होत असलेल्या चित्रपटाची शूटिंग लांबत चालल्याने आलिया आणि रणबीर यांचे प्रियजन दुखावले आहेत. एवढया दूर चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटता येत नाही याची खंत त्यांनापण आहे. परवा अलियाची मैत्रीण आकांक्षा अलियाला भेटायला बुल्गारियाला गेली होती त्यावेळी अलियाला आपल्या मैत्रिणी सोबत फोटो काढायचा होता तेव्हा तिने रणबीर कपूरला फोटो काढायला संगितले. तो फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून अलियाने फोटो क्रेडीट रणबीर कपूरला दिले आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे ताजे ताजे फोटो सोशल मिडीयावर झळकू लागले आहेत. दोघांमध्ये वाढलेली जवळीक चर्चेचा विषय होत चालली आहे. आलिया आणि रणबीर करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन महत्वाचा रोल करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल सर्वाना खूप उत्सुकता आहे.