पुणे | सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्याच्या पक्ष बांधणीसंबधी उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाणारवर शिवसेनेची भुमिका काय? असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही नानार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले. ‘शिवसेना कोकणच्या माणसांना मृत्यूच्या जबड्यात लोटणार नाही’ असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
पुण्यात शिवसेना कंकुवत आहे आणि मागील काळात माझे पुण्याकडे लक्ष नव्हते असे प्रामाणिकपणे ठाकरेंनी कबूल केले. पुण्यातून लोकसभेचा उमेदवार कोण असेल? असा सवाल करताच, ‘योग्य वेळ येताच योग्य व्यक्तीचे नाव जाहीर करू’ असे उद्धव यांनी सांगीतले. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी उद्धव ठाकरे करत असून त्याच अनुषंगाने त्यांच्या बैठकांना वेग आला आहे.
नानार प्रकल्प होणे शक्य नाही – उद्धव ठाकरे
विजय मल्ल्या सारखे स्मार्ट बना, मोदींच्या मंत्र्यांचा सल्ला
हैद्राबाद | विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी आसुसले असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील आदिवासी मंत्री जुएल उरांव यांनी मल्ल्याबाबत स्तुतीसुमने उधळली आहेत. हैदराबाद येथील आदिवादींच्या उद्योग सम्मेलनात बोलत असताना ‘मल्ल्या सारखे स्मार्ट बना’ असा सल्ला उरांव यांनी उपस्थितांना दिला आहे.
‘विजय मल्ल्याला बघा तो किती स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने पहिल्यांदा माहिती मिळवली. नंतर बँका आणि राजकारणी यांना प्रभावित केले. दारूच्या कंपन्या उघडल्य. विमानाची कंपनी काढल. आणि नंतर तो मोठा माणूस बनला’ असे जुएल उरांव यानी म्हटले आहे. आपणास कोणी रोखले आहे का माहिती घ्यायला? बँकांना प्रभावित करायला? उद्योग व्यवसाय उभारायला? असा सवालही उरांव यांनी यावेळी केला.
विजय मल्ल्याच्या भ्रष्ट वृत्तीबद्दल देशभर टिका होत असताना मोदी सरकार मधील या मंत्र्याच्या भाषणाने सगळ्यांच आवक केले आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागांवर लागली यांची वर्णी
नवी दिल्ली| राज्यसभेच्या रिक्त चार जागी राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ माहापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह यांची वर्णी लावली आहे.
कोण आहेत त्या चार व्यक्ती?
राकेश सिन्हा हे संघ विचार धारेचे आहेत. तसेच भाजपची आणि आरएसएस ची बाजू माध्यमात समर्थपणे मांडतात. सिन्हा यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ नावाचे हिंदी भाषेतील पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. सोनल मानसिंह या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. प्रतिष्ठेचा नाट्य संगीत अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच पद्मभूषण पद्मविभूषण या नागरी सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राम शकल हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शेतकरी नेते आहेत. शिवाय माहापात्रा ओडिसचे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या तिन्ही पुरस्काराने महापात्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रपती नियुक्त चार रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार याबद्दल बरेच तर्क वितर्क रंगवले जात होते. कपिल देव, माधुरी दिक्षित अशी नावे चर्चेत येत होती. परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्तांची नावे जाहीर केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद
पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार आहे.
शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचा किल्ला आणि पुण्यापासून अत्यंत जवळ असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची सिंहगडावर गर्दी असते. परंतु शनिवार – रविवार या सुट्टीच्या दिवशी दरड कोसळल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
तुकोबांचे आज काटेवाडीत गोल रिंगण, तर माऊलींचे लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण
बारामती | वारीतील उत्कंटा वाढवणारी बाब म्हणजे रिंगण. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार पडतात. दोन्ही रिंगणात घोड्यांच्या वेगवान हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. बारामती भागात धनगर समाज मोठया संख्येने असल्याने येथे मेंढरांच्या रिंगणांची परंपरा अनेक वर्षापासून पाळली जाते.
आज तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मुक्कामी येणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर काटेवाडीच्या रणावरे कुटूंबियाकडून धोतराच्या पाय घड्या अंतरण्यात येणार आहेत. पायघड्या अंथरण्याची परंपरा रणावरे कुटूंबियांच्या चार पिढयां पासून पाळली जात आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा असा उत्सव साकार होत असताना तिकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तरटगाव या ठिकाणी लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण पार पडणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान
औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने अजब कारभार केला आहे. नापास विद्यार्थ्यांनी पदवी करता अर्ज केला असता चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठीय पदवी प्रदान केली आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुंबईच्या समुद्राला आज येणार सर्वात मोठी भरती
मुंबई | अगोदरच पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईकरांच्या समस्येत आणखी एक भर पडली आहे. आज दुपारी एक वाजता समुद्राला तीव्र भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटा पाच मीटर येवढ्या मोठ्या उंचीवर उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमावस्येला समुद्राला भरती येत असते. काल अमावस्या होती तरीही समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्याचे समजते. कालचमुंबईच्या नरिमन पॉईंटवर उसळलेल्या लाटामुळे भर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले होते.
रणनितीकार प्रशांत किशोर महानिवडणुकीला राहणार भाजपाच्या तंबूत
टीम HELLO महाराष्ट्र | आपल्या निवडणूक नियोजन कौशल्याने देशाचे लक्ष वेधून घेतलेले प्रशांत किशोर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सोबत राहणार आहेत. मधल्या काळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना प्रशांत किशोर यांचे महत्व समजले आहे. म्हणून त्यांच्याशी जुळवून घेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याची तयारी भाजपने केली आहे.
२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीती चा आविष्कार दाखवला. नंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी दमदार कारागिरी केली आणि पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. असे म्हणतात की २०१४ ची निवडणूक झाल्यावर प्रशांत किशोर यांनी भाजपाचे मोठे पद मागितले होते आणि यातूनच अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाले. भाजप आणि प्रशांत किशोर यांच्या वादाची परिणीती म्हणून बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांचा हात धरला. प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर भाजपची मदार आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात याकाही दिवसात बैठक पार पडली असून यात प्रशांत किशोर यांनी युवकांचे संघटन मजबूत करा असा सल्ला भाजपला दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोशल मीडियात विरोध वाढत आहे म्हणून आता सोशल मीडियात सक्रिय होण्यास ही प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. प्रशांत किशोर यांचे भाजपला महत्व कळले असल्याने येत्या काळात भाजपच्या महत्वाच्या पदावर प्रशांत किशोर दिसले तर नवल न वाटावे.
सुरज शेंडगे
२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होणार – अमित शहा
हैद्राबाद | निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा नेहमीच तापू लागतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिराच्या दृष्टीने सूचक विधान केले आहे. ‘२०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरू झालेले असेल’ असे विधान करुन शहा यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
तेलंगणा राज्याच्या भाजपा एककाची संघटनात्मक बैठक घेण्यासाठी अमित शहा काल हैदराबादमध्ये आले होते. ही बैठक तेलंगणाच्या राज्य पक्ष कार्यालयात पार पडल्याची माहिती भाजपचे नेते पी शेखर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसात आदित्यनाथ यांनी राम मंदिरा बाबत असेच एक विधान केले होते. “जे राम मंदिराला विरोध करत होते तेच आता राम मंदिराच्या बाजूने बोलू लागले आहेत’, यामागे मोठे षड्यंत्र शिजत आहे” असे म्हणुन “राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. येत्या काळात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राम मंदिर प्रश्न तापत जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत अंडी डजना मागे २० रुपयांनी महागली
मुंबई | लोकसंख्येने महाकाय असणारे मुंबई शहर दररोज ३७ लाख डजन अंडी पोटात ढकलते. मात्र आता अंड्यांचा भाव वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बरसत असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच त्याचा वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. परिणामी मुंबईत येणारी अंड्याची वाहने रोखली गेली आहेत. त्यामुळे ५५ रुपये डजन मिळणारी अंडी आता ७५ रुपये डजन या दराने मुंबईकरांना खरेदी करावी लागत आहेत.