Monday, December 15, 2025
Home Blog Page 6728

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes
Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य
१.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात
२.टोमॅटो पल्प अर्धी वाटी
३.आले लसूण पेस्ट
४.हिरव्या मिरचीची पेस्ट
५.अर्धा वाटी दही
६.गरम मसाला
७.एक बारीक चिरलेला कांदा
८.चवी नुसार मीठ

कृती

एका कढईत फोडणीसाठी तेल घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.कांदा तेलात सोनेरी झाल्या नंतर त्यात आले लसूण पेस्ट घालावी. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन चमचे घालून नंतर टोमॅटो पल्प, दही आणि गरम मसाला घालावा. गाजर, काकडी, फ्लॉवर, कोबी, फरसबी, बटाटा या भाज्या स्वच्छ धुवून चिरून फोडणीच्या ग्रेव्हीत घालून घ्याव्या चवी नुसार मीठ घालून भाज्या चांगल्या शिजवाव्यात. भाज्या शिजल्या नंतर खिमा पराठे अथवा पुरी सोबत सर्व्ह करावा.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विध्यार्थी भारावले

upsc mpsc guidance
upsc mpsc guidance

पुणे | “ना आयुष्याची शाश्वती, ना कामाचा गौरव” ही थीम असलेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘कर्तव्य’ – civil services aspirants club व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकारी बोलावण्यात आले होते. प्रसाद अक्कनोरु व ज्योती प्रियासिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस अधिकारी प्रसाद अक्कनोरु यांनी स्पर्धा परिक्षेसाठी सुरवात व तयारी कशी करावी, कोणती पुस्तके, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या गोष्टीवर मोलाचे मार्गदर्शन केले. तर ज्योती प्रिया सिंग यांनी भारतीय सेवेमधील त्यांचे अनुभव व नवीन पिढीसमोरील आव्हाने या वर बोलताना विद्यार्थ्यांना कसे आपण संविधानाचे पालन करत देशाची सेवा करावी व खऱ्या अर्थाने जीवनात समाधानी राहावे व देशाबद्दलची, आपल्या समाजाची तसेच आई वडिलांची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने कार्य तत्पर राहावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फर्ग्युसन महाविदयलायचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी ‘कर्तव्य’टीम ला शुभेच्छा दिल्या. ह्या प्रेरणादायी कार्यकम यांची श्रृंखला अशीच चालू रहावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल दाभाडे याने केले तर सूत्रसंचालन अस्मिता या विद्यार्थीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

निनाम गावात बिबट्याची दहशत

satara news
satara news

सातारा | शहरापासून अवघ्या २२ की.मी. अंतरावर असलेल्या निनाम गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गावालगतच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने तळ ठोकला असून गावकर्‍यांमधे त्याची एकच दहशत पसरली आहे. निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत.

आत्ता पर्यंत बिबट्याने गावातील ४ कुत्री आणि दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. सध्या शेतीचे काम चालू असल्यामुळे गावकर्‍यांना कामात अडथळा येत आहे. चार दोघांना बिबट्या दिसल्याने गावकर्‍यांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे.

यासंबधी गावकर्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून गाव परिसरात वनविभागाकडून दोन वनरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी साफळा रचण्याच्या तयारीत आहे.

डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील आरोपी श्रीकांत पांगारकर ला २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी

Thumbnail
Thumbnail

मुंबई | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील संशयीत आरोपी श्रीकांत पांगारकर याला मुंबई कोर्टाने २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी सुनावली आहे. रविवारी संध्याकाळी पांगारकर याला एटीएस ने जालना येथून अटक केली होती. पांगारकर हे जालना चे शिवसेनेचे माजी नगरसेवक असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नालासोपारा येथून वैभव राऊत, शरद कोसळकर, सुधन्वा गोंधलेकर यांना यापूर्वी अटल करण्यात आली होती. नालासोपारा येथील तपासात पांगारकर यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन शनिवारी एटीएस पथकाने पांगारकर याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. पांगारकर याचे हिंदूत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला रविवारी एटीएस ने अटक केली.

म्हणुन मी पाकव्याप्त काश्मिरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसलो – नवजोतसिंग सिद्धू

Navjyot sing sidhhu
Navjyot sing sidhhu

दिल्ली | माजी क्रिकेटपटू आणि काॅग्रेस नेते नवजोतसिंग सिद्धू शनिवारी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपतविधी कार्यक्रमास उपस्थित राहीले होते. त्याबाबत आज सिद्धू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरन दिले आहे. पाकव्याप्त काश्मिरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी आपण का बसलो याचे स्पष्टीकरण सिद्धू यांनी यावेळी दिले आहे. ‘आपण एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणुन जेव्हा जातो तेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगीतलेल्या नुसार बसत असतो. इम्रान खान यांच्या शपतविधी कार्याक्रामात मला पाकव्याप्त काश्मिरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारी बसण्याचमस जागा देण्यात आल्याबे मी तिथे बसलो’ असे नवजोत सिद्धू यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान आर्मी चीफ बाज्वा यांना मिठी मारल्याचे स्पष्टीकरण ही सिद्धू यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले. आपण एकाच संस्कृतीशी जोडलेले आहोत आणि गुरुनाणकांच्या ५५० व्या प्रकाश पर्वा दिवशी आपण कर्तारपूर बाॅर्डर खूली करु असे पाकिस्तान आर्मी चीफ बाज्वा यांनी म्हटल्याचेही यावेळी नवजोतसिंग सिद्धू यांनी सांगितले.

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणुन निवड झाली. खान यांच्या शपतविधी कार्यक्रमास नवजोतसिंग सिद्धू उपस्थित राहीले होते. आज सिद्धू आत्तारी वाघा बाॅर्डर वरुन भारतात माघारी आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 

म्हणून नेहरू श्रेष्ठ ठरतात – सुरेश द्वादशीवार

suresh dwadashiwar
suresh dwadashiwar

सुनिल शेवरे, स्थानिक वार्ताहर

पुणे | देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सलग चौदा वर्ष सांभळत नेहरुंनी अठरा अठरा तास काम केले. विविध विचारप्रवाह उदयाला येत असताना जवाहर नेहरुंनी देश अखंड ठेवला म्हणुन नेहरु श्रेष्ठ ठरतात असे उद्गार जेष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी नेहरुंबद्दल बोलताना काढले. साधना साप्ताहिकाने आयोजित केलेल्या यदुनाथ थत्ते स्मृतीव्याख्यानमालेत ते बोलत होते.

१९४२ चं आंदोलन सुरु होतं, दुसरीकडे दुसऱ्या महायुद्धाची ठीणगी पेटली होती, सुभाषबाबू आणि नेहरूंचे काही प्रमाणात मतभेद जरी असले तरीही टोकाचे मनभेद नव्हते, सुभाष माझ्या लहानभावासारखा आहे, मी जर साम्यवादी विचारांच्या जवळ असतो तर मी सुभाष चा अनुयायी झालो असतो असे नेहरुंनी म्हटले होते असे मत यावेळी सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. नेहरुना लोकशाही हवी होती तर सुभाषबाबुना स्वातंत्र्यनंतर १० वर्षे साम्यवादी हुकुमशाही पद्धती हवी होती असेही ते यावेळी म्हणाले. तसेच जवाहरलाल नेहरुंनी तब्बल १४ वर्षे निस्वार्थपणे १८ – १८ तास काम केले, विविध विचारप्रवाहांना वाट करुन देताना नेहरूंनी देश अखंड ठेवला. स्वातंत्र्यानंतर देशाचे अखंडत्व टिकवण्यामधे नेहरु यशस्वी झाले म्हणून नेहरु श्रेष्ठ ठरतात असे गौरोदगार सुरेश द्वादशीवार यांनी यावेळी काढले.

यदुनाथ मोठ्या पठडीतला माणुस परंतु आपण त्याची तितकी कदर करु शकलो नाही अशी खंत ही द्वादशीवार यांनी यावेळी व्यक्त केली. यदुनाथ यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या घरी गेलो असताना पुस्तकांनी भरलेले घर पाहून आपण कसे आश्चर्यचकीत झालो होतो याची आठवण ही त्यांनी यावेळी सांगीतली. पुढे दरवर्षी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यास सर्वानी सढळ हातांनी साधना ला मदत करावे असे आवहन यावेळी करण्यात आले.

जकार्ता येथे आशियायी खेळांना धुमधडाक्यात सुरवात

Asian games
Asian games

जकार्ता | इंडोनेशिया येथील जकार्ता शहरात आजपासून १८ व्या आशियायी खेळांना सुरवात झाली. यानिमित्ताने जकार्ता येथील जी.बी.के. स्टेडीयम मधे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी सी.डब्लू.जी. सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा याला भारतीय ध्वज हातात घेऊन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान आशियायी खेळ सुरु राहणार आहेत.

जकार्ताचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी सदर कार्यक्रमाला मोटोरसायकल वरुन हजेरी लावली. त्यांच्या हटके एन्ट्री मुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंडोनेशियन गायक विया वालन यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाला सुरवात झाली. साधारण ६००० अॅथलेट आशियायी गेम्स मधे सहभागी होणार आहेत.

विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन संस्थेकडून २३ ते २६ ऑगस्ट पुणे आर्ट पुणे हार्ट चे आयोजन

Thumbnail
Thumbnail

पुणे | कलाक्षेत्रातील जुन्या व नव्या पिढिला जोडण्याबाबत पारंपरिक कलाविष्कारांचे जतन करण्याच्या उद्देशाने पुण्यात विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन च्या वतीने ‘आर्ट पुणे हार्ट पुणे’ या कलाउत्सवाचे आयोजन करण्यात अाले आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट असणार आहेत.

सदर कलाउत्सव २३ आॅगस्ट पासून २६ ऑगस्ट पर्यंत विनामूल्य असून सकाळी ९ ते सायं ८ पर्यंत पुणेकरांसाठी खुले राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर मुक्ता टिळक व नरेंद्र विचारे उपस्थित राहणार अाहेत. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक स्वप्निल नाईक, विजय महागुलकर, श्रीदेवी मल्कमोला, काजल फाकटकर, ओंकार चिले आदींनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज तर्फे २० ऑगस्ट पासून चक्री उपोषण आंदोलन

Thumbnail
Thumbnail

पुणे | मराठा क्रांति मोर्चाने महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठिकठिकाणी शिस्तप्रिय पद्धतिने आंदोलन केले. मात्र आॅगस्ट ९ रोजी झालेल्या पुणे येथील आंदोलानादरन्यान चाकण हिंसाचार प्रकरण घडले. यात बाह्यशक्तिनी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. चाकण येथील हिंसाचारात सामिल असलेल्या बाह्यशक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांच्याकडून करण्यात आली आहे. आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी राजेन्द्र कोंढरे शांताराम कुंजीर यांनी केली.

मराठा क्रांति मोर्चा, पुणे जिल्हा च्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे –

१) मराठा समाजास कायदेशीर आरक्षण मिळाले पाहिजे

२) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनीयमाच्या कायद्याचा सरास होणारा गैरवापरथांबवावा व योग्य ती दूरुस्ती करावी

३) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ति व शेतीमालास हमीभाव मिळावा

४) अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे

५) मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतिकरण व मराठा समाजाची , महामानवांची बदनामी थांबवणे

६) अल्पभूधारक शेतकरी व ६ लाखांपेक्षा उत्पन्न कमी असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात

७) प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहिर केलेले ५०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करावी.

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे निधन

Kofi annan un
Kofi annan un

घाना | संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि नोबेल विजेते कोफी अन्नान यांचे घाना येथे शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. जगात शांतता राखण्यासाठी अन्नान यांनी प्रयत्न केले. शांततेसाठी झटल्याबद्दल अन्नान यांना २००१ साली शांततेचे नोबेल पारितोषीक देऊन गौरवण्यात आले होते.

कोफी अन्नान यांचा जन्म घाना या देशात झाला. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस म्हणुन जबाबदारी पार पाडली. आपल्या कारकिर्दीमध्ये एड्स रोगाचा आफ्रिका खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी त्यांनी आतोनात परिश्रम केले. २००३ सालच्या अमेरिका व युनायटेड किंग्डम ह्यांनी केलेल्या इराकवरील हल्ल्याला अन्नान ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. २००३ साली भारत सरकारने अन्नानना इंदिरा गांधी पुरस्कारदेऊन गौरवले होते.