Saturday, December 13, 2025
Home Blog Page 6745

आसामला आले छावणीचे स्वरूप. ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी आज होणार जाहीर

Thumbnail 1532940412097
Thumbnail 1532940412097

गुवाहाटी | आसाम मधील बांगलादेशी घूसखोरी हा अनेक दशकापासून चालत आलेला प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ (एन.आर.सी.) ची स्थापना करण्यात आली आहे. एन.आर.सी. आपली पहिली यादी आज जाहीर करणार आहे. या संस्थेचा दावा आहे की एकट्या आसाम राज्यात ४० लाख घूसखोर आहेत.

२.८० कोटी लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये घूसखोरांची संख्या वाढत गेल्याने त्यावर तोडगा म्हणून एनअारसी ची स्थापना करण्यात आली होती. १९५१ साली आशा प्रकारची यादी पहिल्यांदा बनवण्यात आली होती. सध्या कार्यरत असलेल्या एनअारसी ने १९७१ हे साल मूल नागरिकत्वाचे प्रमाण मानले आहे. १९७१ पूर्वीचा आसाम रहिवासाचा पुरावा नागरिकांना समिती पुढे सादर करावा लागला आहे. त्यानुसार ही यादी बनवण्यात आली आहे. ३० ऑगस्ट पर्यंत ही यादी एनअारसी च्या विविध केंद्रावर प्रकाशित केली जाणार आहे. ज्यांच्या नागरिकत्वाची अडचण आहे त्यांनी आपले नागरिकत्व ३० ऑगस्ट पूर्वी समितीसमोर सादर करायचे आहे.
‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप’ ची यादी जाहीर होताच राज्यात हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याने राज्यात सीआरपीएफच्या २२० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आयुष्यात एकदा तरी पंढरी वारी करावी, नरेंद्र मोदींचे मन की बात मधून आवाहन

Thumbnail 1532849265444
Thumbnail 1532849265444

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात पंढरीच्या वारीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना हे आवाहन केले आहे. पंधरा दिवस अगोदोर पाई चालत जाऊन लोक चैतन्य परमात्मा विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि वेगळीच अनुभूती मिळवतात. जेव्हा जेव्हा तुम्ही विठ्ठलाचे दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला वेगळी अनुभूती येईल असे पंतप्रधान म्हणाले.
मोदींनी पंढरीच्या वारी बद्दल केलेला उल्लेखाने तमाम मराठी जणांनी आनंद व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी मागे ही अनेक वेळा विठ्ठला बद्दल उल्लेख केला आहे.२०१३ साली लोकसभेच्या निवडणुकीचा शंख फुंकण्यासाठी पुण्यात आल्यावर पालखी सोहळा सुरू होता त्यावेळी ही त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

भारत’ चित्रपटाला प्रियांका चोप्राची सोड चिठ्ठी

Thumbnail 1532849296425
Thumbnail 1532849296425

मुंबई | अली अब्बास जफर यांच्या भारत चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती तिने हा चित्रपट सोडल्याने बॉलिवूड जगतात खळबळ माजली आहे. भारत चित्रपटात सलमान खान सोबत प्रियांका चोप्रा अभिनय करणार होती परंतु तिने अचानक घेतलेल्या एक्सिट मुळे अनेकांनी भोवया उंचावल्या आहेत. अली अब्बास जफर यांनी आपल्या ट्विटर वरून या बातमीचा खुलासा केला त्याच बरोबर निक सोबत होऊ घातलेल्या लग्नामुळे प्रियांका चित्रपट सोडत असावी अशी पुष्टी देखील जोडली आहे.
बऱ्याच गोष्टी आत शिजत असतात त्या बाहेर काढता येत नाहीत म्हणून असे बाहेर पडण्याचे प्रकार घडतात.आम्ही केलेल्या जिंजीर चित्रपटात ही असे प्रसंग समोर आले होते. असे मत सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे. तर असे प्रसंग बॉलिवूड मध्ये कायम घडतात असे सलमान खान ने म्हटले आहे.
प्रियांकाच्या सोड चिठ्ठी नंतर तिच्या जागी कॅटरीना आणि क
जॅकलीनचे नाव चर्चेत आहे. भारत चित्रपटाचे निर्माते निखिल नमीत यांनी प्रियंकाच्या कृतीला ‘अनप्रोफेशनल’ म्हणले आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये नव्या पोलिस आयुक्तालयाची लगबग

Thumbnail 1532849329548
Thumbnail 1532849329548

पिंपरी चिंचवड | पुण्याच्या पोलीस आयुक्तालयावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नव्याने तयार करण्यार येणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात असलेला भाग हा ३० किलोमीटर पेक्षा अधिक होत असल्याने तसेच पोलीस प्रशासनाला अडथळा निर्माण होत असल्याने नव्या पोलीस आयुक्तालयास गृह खात्याने मान्यता दिली.
भारतीय पोलीस सेवेतील मकरंद रानडे यांची पिंपरी चिंचवडच्या पहिल्या पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली आहे. तर नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची उपायुक्त पदी निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड मधील महात्मा फुले शाळेचा भूखंड पोलीस आयुक्तालयासाठी आरक्षित करण्यात आला होता.आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात असून १५ ऑगस्ट रोजी आयुक्तालयाचे उदघाटन अपेक्षित आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, वाकड,भोसरी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी चिकली, दिघी, देहूरोड, आळंदी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण,सांगवी आशा १५ पोलिस स्टेशनचा समावेश नव्या आयुक्तालयात करण्यात येणार आहे.

मराठा आंदोलनाचे १ऑगस्टला जेल भरो

Thumbnail 1532792248483
Thumbnail 1532792248483

मुंबई | राज्यभर एवढी आंदोलने करून पण सरकारला जर आमची मागणी गांभीर्याने घ्यायची नसेल तर आता आम्ही जेल भरो करणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाची मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यानी माफी मागावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे.
आरक्षणासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. या वक्तव्याचा मराठा आंदोलकांमध्ये संताप आहे. दरम्यान मराठा आरक्षण प्रक्रिया पूर्ण केल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही यावर सर्व राजकीय पक्षांचे एकमत झाले आहे.
मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासाठी हे जेलभरो आंदोलन करणार असल्याचे मराठा आंदोलकांनी सांगितले आहे.

मुलांवर लैगिक अत्याचार करणारा मौलवीला अटक

Thumbnail 1532784930534
Thumbnail 1532784930534

पुणे | मदर्शामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर मदर्शातीलच मौलवीने लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघड झाला आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करून मुलांनी जर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मौलवी देत होता. अखेर मुलांनी धाडस करून भारती विद्यापीठ पोलीस चौकीत मौलवी विरोधात फिर्याद दिली. मौलवीला पोलिसांनी अटक केले आहे. सदर प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला आहे. या मौलवीची शिकार आणखी मुले झाली आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकारा बद्दल सर्व स्तरातून निंदा केली जात आहे.

मराठा आरक्षणावर मुख्यामंत्र्यांची सर्व पक्षीय बैठक

Thumbnail 1532784509985
Thumbnail 1532784509985

मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर अजित पवार यांनी “कोर्टात टीकेल असे मराठा आरक्षण देण्यात यावे तसेच भाजप नेत्यांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबतची बेताल वक्तव्य थांबवावीत” असे सुचित केले.

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, विनोद तावड़े, सुधीर मूनगंटीवार, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, शरद रणपिसे , अनिल परब , कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते

मराठ्यांना आरक्षण देण्यावर मुंबईत सर्व पक्षीय बैठक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thumbnail 1532783008122
Thumbnail 1532783008122

मुंबई | मराठा आरक्षणावर राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सदर बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण देण्यावर सर्व पक्षाचे एकमत झाले आहे. मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यातसाठी अध्यक्षांना विनंती करणे, मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावणे या मुद्द्यावर सर्व पक्षीयांचे एकमत झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तामिळनाडू राज्याच्या धरतीवर आरक्षण देण्यासाठी तो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावे लागते. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक दृष्टया मागास असल्याचे आयोगाला सिद्ध करायचे आहे. जेणेकरून आरक्षण कोर्टात टिकेल असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ज्या निरापराध व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी पोलिस महानिरीक्षकांना निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पाणीपुरीवर आली बंदी

Thumbnail 1532769089363 2
Thumbnail 1532769089363 2

बडोदा | पाणीपुरी लोकांच्या पसंतीला उतरलेला पदार्थ. रत्यावर, बागेबाहेर कोठेही फेरफटका मारायला गेले की पाणीपुरी आपल्याला भेटतेच. आपणाला ही ती खाल्ल्या वाचून राहवत नाही. परंतु याच पाणीपुरी विक्रीवर बडोद्याच्या पालिकाप्रशासनाने बंदी घातली आहे. सध्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव शहरभर पसरला आहे. यावर प्रतिबंध म्हणून हा निर्णय घेतला आहे असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

आंबोली घाटात दुर्घटना ३३जण जागीच ठार.

Thumbnail 1532770799008
Thumbnail 1532770799008

आंबोली | कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस आंबोली घाटामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात ३३ लोक जागीच ठार झाले असून फक्त एका व्यक्तीस जीवित वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. चालका सहित गाडीत ३४ लोक बसलेले होते. पावसाळ्यात आंबोली घाटात दुसर प्रकाश असतो त्यातून असे अपघात उदभवतात.
कोल्हापूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबोली घाट लागतो. घाट २० किमीचा असून गाडी कोसळलेली दरी तब्बल १२०० मीटरची आहे. घाट घनदाट झाडीने घेरलेला असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. मृत व्यक्ती पैकी संदीप झगडे, संदीप भोसले, प्रशांत भांबडी, सुनील कदम ही चार नावे समोर आली आहेत.
स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माध्यमांना ही बातमी कळवली आहे. आंबोली घाटात सतत आशा घटना घडत असतात असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे. घाटातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.