पुणे | २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण आज रात्री पाहण्यास मिळणार आहे. रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण ३ वाजून ४९ मिनिटांनी संपणार आहे. तर ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे राहणार आहे. ग्रहणाचा कालावधी ४ तास एवढा राहणार आहे. या ग्रहणाचा कालावधी अधिक असल्याने हे २१ व्या शतकातील सगळ्यात मोठे ग्रहण असणार आहे.
पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण संपन्न होते. चंद्र पृथ्वी पासून एक लक्ष किलोमीटर दूर गेल्याने चंद्रग्रहणात चंद्र छोटा दिसणार आहे. देशाच्या सर्व ठिकाणी हे चंद्र ग्रहण दिसणार आहे.
२१ व्या शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज
गुरू पौर्णिमेनिमित्त गजबजली साई नगरी
शिर्डी | साई बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शिर्डी नगरीत गुरू पौर्णिमेचा उत्सव आज पहाटे सुरू झाला आहे. पहाटे साईंची पालखी वाजत गाजत द्वारकामाईमध्ये आणण्यात आली. समाधी मंदिरात सेज आरती झाली आणि गुरू पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली
दर गुरुवारी शिर्डीत साई पालखी सोहळा संपन्न होतो. साईबाबांच्या पावलांची प्रतिकृती साई बाबांचा फोटो पालखीत ठेवून शिर्डीच्या विशिष्ठ मार्गाने पालखी सोहळा व्दारकामाईमध्ये आणण्यात येतो. अनेक वर्षांची ही परंपरा असल्याचे सांगण्यात येते.
गुरु पौर्णिमेलाचा हा उत्सव पुढील तीन दिवस चालनार आहे. मुंबई पुणे नाशिक याच बरोबर राज्यातील अनेक शहरातून गुरू पौर्णिमेनिमित्त शिर्डीत पालख्या आणि दिंड्या दाखल झाल्या आहेत. दिंड्या दाखल झाल्याने शिर्डीला पंढरीचे रूप आले आहे.
सोनम वांगचुक आणि डॉ भरत वाटवाणी या भारतीयांना रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
टीम, HELLO महाराष्ट्र | आशियाचे नोबल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे पुरस्काराची घोषणा झाली आहे. २०१८ च्या मॅगसेसे पुरस्कार्थींमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ.भरत वाटवाणी यांना २०१८ साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
लडाखच्या डोंगराळ परदेशात आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा वापर करणारे थोर समाजसेवक सोनम वांगचुक आणि लहानग्या मनोरुग्ण बालकांचे डॉक्टरापेक्षा वडील भासणारे डॉ.भरत वाटवाणी या पुरस्काराची योग्य निवड असल्याचे सार्थपणे दाखवून देतात. पुरस्काराचे वितरण ३१ ऑगस्ट २०१८ रोजी होणार आहे.
आलिया भट साठी रणबीर कपूर झाला फोटोग्राफर
बल्गेरिया | आलिय भट आणि रणबीर कपूर सध्या बुल्गारिया मध्ये आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. बुल्गारियामध्ये चित्रित होत असलेल्या चित्रपटाची शूटिंग लांबत चालल्याने आलिया आणि रणबीर यांचे प्रियजन दुखावले आहेत. एवढया दूर चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटता येत नाही याची खंत त्यांनापण आहे. परवा अलियाची मैत्रीण आकांक्षा अलियाला भेटायला बुल्गारियाला गेली होती त्यावेळी अलियाला आपल्या मैत्रिणी सोबत फोटो काढायचा होता तेव्हा तिने रणबीर कपूरला फोटो काढायला संगितले. तो फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून अलियाने फोटो क्रेडीट रणबीर कपूरला दिले आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे ताजे ताजे फोटो सोशल मिडीयावर झळकू लागले आहेत. दोघांमध्ये वाढलेली जवळीक चर्चेचा विषय होत चालली आहे. आलिया आणि रणबीर करत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन महत्वाचा रोल करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल सर्वाना खूप उत्सुकता आहे.
चीन मध्ये भारतीय दूतावासा समोर झाला बॉम्बस्फोट
बीजिंग | चीनची राजधानी बीजिंगमध्ये आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट घडला आहे. हा बॉम्बस्फोट भारतीय दूतावासाच्या संरक्षक भीतीच्या आत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय दूतावासाच्या शेजरीच अमेरिकन दूतावास असल्याने अमेरिकी दूतावासात बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्याही जागतिक माध्यमातून प्रसारित होत आहेत.
एक व्यक्ती छोटासा बॉम्ब हातात घेऊन जात होता तो फुटू लागल्याने त्याने तो बॉम्ब भारतीय दूतावासाच्या भिंतीच्या आत टाकला. त्याच बरोबर या व्यक्तीस घटनास्थळी तात्काळ अटक करण्यात आली आहे. तसेच या बॉम्बस्फोट कसलीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना संगीतिली आहे.
इमरान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
इस्लामाबाद | पाकिस्तानच्या निवडणुका कमालीच्या तणावात पार पडल्या. पाकिस्तान मध्ये प्रचार दरम्यान बॉम्ब हल्ले होऊन लोक आणि नेते मृत्यू मुखी पडले तसेच मतदान वेळी ही बॉम्ब हल्ले घडवण्यात आले. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत.
इमरान खान यांच्या पार्टीने १२१ ठिकाणी विजय मिळवला असून नवाज शरीफ यांचा मुस्लिम लीग ५७ जागी विजयी झाला आहे. मुस्लिम लीग मधून पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघणारे आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार असणारे शहबाज शरीफ स्वतः निवडणूकित पराभूत झाले आहेत. माजी पंतप्रधान यांच्या बेनजीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो निवडणूक हारले आहेत.पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ३४ जागी उमेदवार निवडून आले आहेत.
आज लागलेल्या निकालावरून इमरान खान पंतप्रधान होणार यात आता निश्चिती झाली आहे. इमरान खान पाकिस्तान चे माजी क्रिकेटपटू आहेत.तसेच घटस्फोटित पत्नीचे आत्मवृत्त हा या निवडणूकित इमरान खान यांच्या विरोधातील प्रमुख मुद्दा बनला होता.
आज देशभर साजरा होतोय कारगिल विजय दिवस
श्रीनगर | २६ जुलै १९९९ रोजी करगिलच्या डोंगरावर तिरंगा फडकवण्यात आला आणि भारत कारगिल युद्धात विजयी झाला. कारगिल हा भारताचा १९४७ च्या भारत पाक युद्धा पासूनचा सीमावर्ती भाग आहे. या सीमेवर उंच उंच डोंगर असल्याने असुरक्षित सीमा म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. याच भागात पाकिस्तानी गुसखोरांनी हैदोस मांडला होता. गुसखोरांच्या पाठोपाठ पाकिस्तानी सैन्य या भागात शिरले आणि युद्धाला तोंड फुटले भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय नावाने सैनिकी कारवाही सुरू केली आणि २६ जुलै १९९९ रोजी विजय संपादित केला. कारगिलचे युद्ध जिंकण्यासाठी भारताच्या ५३० जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले तर १३६४ जवान जखमी झाले. पाकिस्तानची तुफान वाताहत होऊन दारुण पराभव झाला. कारगिल युद्धात पाकिस्तानचे तब्बल ३ हजार सैनिक ठार झाले होते.परंतु पाकिस्तानने या सत्यावर बोलायला कायम टाळले आणि हा मृत सैनिकांचा आकडा नेहमी नाकारला.
ऑपरेशन विजय राबवून भारताने विजय संपादित केला. तेव्हा पासून हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. आज सकाळीच कारगिल मधील विजयी स्मारकावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांनीही लष्कराच्या जवानांना विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
फडणवीस जात पाहून ड्युटी लावतात – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. त्याबरोबर राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोपाचा जोर वाढू लागला आहे. मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्यांची जात पाहून त्यांची ड्युटी लावतात. असा जातीवाद करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
आंदोलनाचा आज सातवा दिवस होता. नवी मुंबईत आंदोलकांच्या दगड फेकीत पोलीस अधिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ठाण्यात सायंकाळ पर्यंत आंदोलन सुरू होते. तिकडे जोगेश्वरीत लोकल ट्रेन रोखून धरण्यात आली होती. ठीक ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आहे.
दरम्यान मराठा आंदोलकांशी सरकार चर्चा करायला तयार आहे. त्यांनी चर्चेला यावे असे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवली, मराठा आंदोलनाला हिंसक वळण
मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कळंबोली येथे आज मराठा आंदोलकांनी पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते. तेव्हा कळंबोली येथे परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीवर आंदोलन कर्त्यांनी जबर दगडफेक केली. तसेच पोलीस अधिक्षकांची गाडी रस्त्यात पेटवली. यामधे कळंबोलीचे पोलिस अधिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. पोलिसांचीच गाडी पेटवली गेल्याने कळंबोली परिसरात दहशतीचे वातावरण निर्मान झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. आंदोलकांना पांगवण्यात आता पोलिसांना यश आले आहे.
मराठा आंदोलनाचा आज सातवा दिवस आह. राज्य सरकार कसल्याही प्रकारे मध्यस्ती करण्यास तयार नसल्याने आंदोलन चिगळत चालले आहे. तसेच राज्याचे मंत्री मराठा आंदोलकांच्या बद्दल बेछूट विधाने करत असल्याने आंदोलक अधिकच संतप्त होत चालले आहेत. सरकारने यासंदर्भात तोडगा काढावा असा सूर जनसमन्यातून उमटत आहे.
क्रिकेट वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
मुंबई | आयसीसी तर्फे भरवण्यात येणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हा वर्ल्डकप ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळला जाणार आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला सामना असणार आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात इंग्लंड पाचव्यांदा यजमान पद भूषवत आहे. तर भारत हा विजेते पदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीयांचे मुख्य आकर्षक असते ते म्हणजे भारत पाकिस्तान सामना कधी असणार आहे? तर भारत पाकिस्तान मध्ये १६ जूनला सामना रंगणार आहे.९ आणि ११ जुलैला सेमी फायनलचे डाव रंगणार आहेत. तर १४ जुलै रोजी लॉर्ड्स या ठिकाणी वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. वर्ल्डकपचे सामने जसजसे जवळ येतील तस तशी क्रिकेट प्रेमींची उत्कटता वाढत जाणार आहे.
भारत खेळणारे सामने.
जून |दक्षिण आफ्रिका (साउथेम्प्टन)
९जून |ऑस्ट्रेलिया ( ओवल )
१३जून | न्यूझीलंड ( नॉटिंघम )
१६जून | पाकिस्तान (मॅनचेस्टर)
२२जून | अफगाणिस्तान (साउथेम्प्टन)
२७जून |वेस्टइंडिज (मॅनचेस्टर)
३०जून | इंग्लंड (बर्मिंघम)
२जुलै | बांग्लादेश (बर्मिंघम)
६जुलै |श्रीलंका (लीड्स)
९जुलै | पहिली सेमिफाइनल (मॅनचेस्टर)
११जुलै | दूसरी सेमीफायनल (बर्मिंघम)
१४जुलै | फायनल (लॉर्ड्स)










