नवी दिल्ली | मराठा समाज आपला आक्रोश आंदोलनातून मांडत आहेत तर भाजपचे नेते त्यांना चेतावणी देत आहेत. यातून अंदोलनाचा भडका उडत आहे. सत्तेवर येताना आम्ही दोन महिण्यात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तेव्हा न्यायालय दिसत नव्हते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजवले आहेत. भार झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
कालच शरद पवार यांनी आंदोलन भडकण्याला सरकार दोषी असल्याचे म्हणले होते तसेच सरकारने यावर लवकरत लवकर तोडगा काढावा अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल असे शरद पवार म्हणाले होते त्याच धाग्याला पकडून सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री पदाचा भार झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे
हार्दिक पटेल यांना सुनावली २ वर्षाची शिक्षा
विसनगर (गुजरात) | पाटीदार समाजाच्या आरक्षणाची मागणी करत जनआंदोलन उभा करणारा हार्दिक पटेल दंगल भडकवणे या प्रकरणात गुन्हेगार ठरला आहे. २०१५ साली केलेल्या आंदोलना दरम्यान मेहसाणा विसनगर येथे दंगल उसळली होती. त्यावेळी भाजपचे आमदार ऋषिकेष पटेल यांच्या संपर्क कार्यालयाची जाळफोळ करण्यात आली होती. याचाच खटला विसनगर कोर्टात सुरू होता. विसनगर कोर्टाने हार्दिक पटेल यास दोन वर्षाचा करावासासहित ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
पाटीदार समाजाला राज्याच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. आंदोलन हिंसक झाल्याने वित्तीय नुसकान झाले होते. पाटीदार समाजाचा नेता असलेल्या हार्दिक पटेलला भाजपा दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही हार्दिक नेहमी सत्ताधारी भाजपवर टीका करत असतो. सदर खटल्यातील अन्य १४ आरोपींना पुराव्या अभावी मुक्त करत असल्याचे न्यायालयाने घोषित केले तर लजित पटेल आणि ए.के.पटेल यांना हार्दिक पटेल यांच्या समवेत न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक
मुंबई | मराठा आरक्षणाचे लोन महाराष्ट्र भर पसरले असून आज मुंबई येथे मराठा समाजाने चक्का जाम आंदोलन केले. सकाळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर लोकल रोखून आंदोलन करणयात आले तर वाशीमध्ये मोठया प्रमाणात रस्त्यावर चक्का जाम करून मराठा समाजाने असंतोष दर्शवला आहे.
मराठा आंदोलकांनी आज मुंबईकरांनी रस्त्यावर पडू नये असा इशारा दिला होता. तरीही जे मुंबईकर रस्त्यावर आले त्यांचा मार्ग आंदोलकांनी रोखला. बस रिक्षा मोठया प्रमाणावर फोडण्यात आल्या आहेत. नवी मुंबई मधील ठिय्या आंदोलन आद्यप ही सुरूच आहे.
मराठा आंदोलना बाबत सरकार कसलीच भूमिका घेत नसल्याने आंदोलक हिंसक कार्यवाहि करत आहेत. तसेच सरकार आषाढी महापूजा प्रकरणा पासून आंदोलकांच्या बाबतीत उदासीन आहे.
सुप्रिया सुळेंनी केला रेल्वे मंत्र्यांना सवाल |लोकसभा Live
नवी दिल्ली | लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात सुप्रिया सुळे यांनी आज रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारला. रेल्वे मंत्रालयाने आदर्श स्टेशन योजने अंतर्गत माझ्या मतदारसंघात नीरा स्टेशन निवडले आहे परंतु त्या ठिकाणी कसलाच निधी उपलब्ध झाला नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आदर्श रेल्वे स्थानक योजनेसाठी केलेली निधीची तरतूद अत्यंत अल्प आहे यात येत्या काळात दुरुस्ती करून पुढील काही दिवसात ही रेल्वे स्थानक चकचकीत झालेली दिसतील असे सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर पियुष गोयल उत्तरा दाखल म्हणले.
आणि योगी आदित्यनाथ ठरले पहिले मुख्यमंत्री
हाथरस (उ.प्रदेश) |१९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी अवघ्या १६ महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेट देणारे योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. वाचायला ऐकायला विशेष वाटत असले तरी ही बाब सत्य आहे की,आजपर्यंत कोणतेच मुख्यमंत्री पूर्ण राज्याचा दौरा करू शकले नव्हते.
७५ जिल्हे असलेल्या उत्तर प्रदेशाचा विस्तार अवाढव्य आहे. विस्तारीत प्रदेश असल्याने विकासाच्या कामात बरेच अडथळे येतात म्हणून उत्तर प्रदेश हे राज्य मागास राहिले आहे. मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो आहे असे योगी वारंवार सांगत असतात. याचाच प्रत्येय त्यांच्या राज्य व्यापी दौऱ्यातून आला आहे. योगींच्या महादौऱ्याची सांगता हाथरस जिल्ह्यात झाली आहे.
राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न ?
नवी दिल्ली | लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अशी लक्षवेधी सूचना खा.धनंजय महाडिक यांनी लोकसभेत मांडली आहे. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर रान तापत असताना शाहू महाराजांनी आरक्षणाची गरज शंभर वर्षा पूर्वी ओळखली होती असे महाडीक यावेळी लोकसभेत बोलताना म्हणाले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ही शाहू महाराजांनी मदत केली असल्याचा उल्लेख धनंजय महाडिक यांनी लक्षवेधी सुचना मांडताना केला आहे.
काय असते लक्षवेधी सूचना?
लक्षवेधी सूचना म्हणजे संविधानाने संसद सदस्याला दिलेले महत्वाचे आयुक आहे. लक्षवेधी सुचने द्वारे संसद सदस्य देशातील कोणत्याही महत्वाच्या विषयावर सरकारचे लक्षवेधू शकतो. संसद सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेची सरकारला गंभीर दखल घ्यावी लागते. संसदीय कामकाजाचा नियम ३७७ नुसार लक्षवेधीचा अधिकार संसद सदस्यांना प्रधान करण्यात आला आहे. तसेच लक्षवेधी सूचना मांडल्या बरोबर लगेच उत्तर द्यायला सरकार बांधील नसते.
सैराट आणि धडक मधील महत्वाचे बदल
मुंबई : सैराटच्या रूपाने मराठी चित्रपटाने १०० कोटी रुपयांची कमाई गाठली होती. नागराज मंजुळे याचा सैराटचा हिंदी रिमेक नुकताच प्रदर्शीत झाला आहे. धडक नावाने प्रदर्शित झालेल्या सैराटच्या रिमेकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. श्रीदेवींची थोरली मुलगी जान्हवी कपूर धडल मधे मुख्यनायिकेच्या भुमिकेत आहे.
सैराट आणि धडक मधे नक्की कोणते मुलभूत बदल आहेत?
१. सैराटचा प्रसंग महाराष्ट्रात घडतोय असे चित्रपट दाखवतो तर धडकचा प्रसंग राजस्थान मधील असल्याचे दाखवण्यात आले आहे. हाच बदल महत्वाचा आहे जो की दिगदर्शकाची बिजनेस ट्रॅटेजी मानला जातो आहे.
२. सच्च्या प्रेमावर आधारित असलेला सैराट खूपच सरळ आणि निथळ प्रेम दर्शवणारा चित्रपट होता. तसेच तो परिवारासोबत बघण्यासारखा चित्रपट होता. याउलट धडक या चित्रपटात अनेक वेळा किसिंगचा सिन चित्रित केला आहे.
३. सैराट मधील आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे कोणत्याही सिनेपार्श्वभूमी शिवाय चित्रपटात आले होते. या उलट जानवी कपूर आणि ईशान खट्टर यांना सिनेपार्श्वभूमी आहे.
४. सैराट हा सिम्पल ट्रीटमेंट वर बनवलेला चित्रपट होता. याउलट धडक चित्रपटाला स्पेशल ट्रिटमेंट दिली गेली आहे.
५. सैराट आणि धडकच्या बजेटमध्ये जमीन अस्मानाचा फरक बघायला मिळतो आहे. सैराटचे बजेट ४ कोटी होते तर धडकचे बजेट ७० कोटी रुपये होते.
६. सैराट आणि धडक असा नावात ही बदल करण्यात आला आहे. सैराट १७४ मिनिटांचा चित्रपट आहे तर तीच कहाणी धडक चित्रपटात१३७ मिनिटांत दाखवण्यात आली आहे. या बदला शिवाय महाराष्ट्र चित्रपटाची मोठी बाजारपेठ आहे हे लक्षात ठेवून कहाणीतील काही सिन बदलण्यात आले आहेत. जेणे करून मराठी सैराट बघितलेल्या प्रेक्षकांना चित्रपट बोर होऊ नये.
पन्नास मराठा आंदोलकांना पिंपरी चिंचवडमध्ये अटक
पिंपरी चिंचवड | वीर चाफेकर बंधूंच्या स्मृती संग्रहालयाच्या भूमी पूजनाला मुख्यमंत्री आज पिंपरी चिंचवड मध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये आणि आल्यास कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा क्रांन्ति मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल दिला होता. मराठा आरक्षणासंदर्भात कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने ठोक आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासही आंदोलकांनी अटकाव केला होता. वारकऱ्यांच्या सुरक्षते साठी मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे येत महापुजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न चिगळत चालला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक तीव्र पवित्र्यात आहेत. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे म्हणून यावर लवकरात लवकर तोडगा निघावा असा सूर जनमानसातून उमटत आहे.
राहुल गांधींच्या समर्थकांची फ्लेक्सनीती
मुंबई | शुक्रवारी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर भाषण केल्यानंतर एक ऐतिहासिक कृती राहुल गांधी यांनी केली. ते मोदींच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी मोदींना मिठी मारली. या घटनेबद्दल माध्यमात तसेच राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उत आला असताना मुंबई कॉग्रेसने त्यांच्या भाषणातील एक वाक्य ठळक करून फ्लेक्सवर छापले आहे. राहुल गांधींच्या पाठींब्यात हे फ्लेक्स झळकवण्यात आले आहेत.
शुक्रवारी अविश्वासाच्या ठरावावर बोलताना “तुम्ही माझ्या वर टीका केली तरी चालेल मला शहजादा म्हणलं तरी चालेल.मला पप्पू म्हणले तरी चालेल.तुम्ही असे म्हणले तरी माझ्या मनात तुमच्या बद्दल प्रेमच राहील. कारण मी कॉग्रेस आहे.” असे राहुल गांधी म्हणाले होते.
मोदींना उद्देशून बोलताना, तुमच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार आहे. राग आहे, द्वेष आहे पण माझ्या मनात तुमच्या बद्दल फक्त प्रेम आहे आणि मी प्रेमानेच जिंकणार आहे” असेही राहुल गांधी म्हणाले होते. नेमका याच भाषणाचा धागा पकडून मुंबई कॉग्रेसने राहुल गांधींच्या समर्थनार्थ फ्लेक्स झळकवले आहेत. नरेंद्र मोदींना मिठी मारणे हा सुद्धा राजकिय डाव होता असे मत राजकिय वर्तुळात व्यक्त केले जाते आहे.
मुख्यमंत्र्यांनी महापूजेस येऊ नये – आ.भारत भालके
पंढरपूर | मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येण्यास मज्जाव केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला येऊन दाखवावे असा इशाराच आंदोलकांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी म्हणले आहे की, “पंढरपूर ची वारी म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आहे.या वारीला वादाचे गालबोट लागू नये तसेच येथील कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापुजेला उपस्थित राहू नये.”
दरम्यान मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेपासून रोखणे योग्य नाही.आरक्षण सोडून इतर सर्व मागण्या मराठा समाजाच्या मान्य केल्या आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाचे आंदोलक आक्रमक झाले असून राज्यभर विविध मार्गाने आंदोलक असंतोष नोंदवत आहेत. आता आंदोलकांचीही पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे.










