Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6754

रणबीर कपूर वर ५० लाखाच्या फसवणुकीचा खटला दाखल

thumbnail 1532153821732
thumbnail 1532153821732

पुणे | रणबीर कपूर या सिनेकलाकारावर कल्याणी नगरच्या शीतल सूर्यवंशी यांनी ५० लाखाची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला आहे. पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हा खटला सुरू आहे.
कल्याणी नगरच्या ट्रॅप टॉवर मध्ये रणबीर कपूरचे अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट शीतल सूर्यवंशी यांना भाड्याने दिले आहे. भाडे २०१६ साली झाला आहे. पहिल्या वर्षी ४ लाख तर दुसऱ्या वर्षी ४ लाख २० हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते.परंतु रणबीर कपूर याने मुदतपूर्व भाडेकरार मोडला असल्याचा दावा शीतल सुर्यवंशी यांनी केला आहे. तसेच भाडे करारावेळी दिलेले २४ लाख ही अनामत रक्कम पण परत नदिल्याचे याचिकेत म्हटले आहे. रणबीर कपूर ने यावेळी भाडे करार मोडल्याने आपले कुटूंब बेघर झाले आहे त्यामुळे नुसकान भरपाई म्हणून ५०लाख मिळावे अशी मागणी शीतल सूर्यवंशी यांनी केले आहे.
रणबीर कपूर याने आपली भूमिका कोर्टात मांडली आहे त्यात त्याने असे म्हणले आहे की, दोन महिन्याचे भाडे तटवल्याने मी अनामत रक्कमेतून दोन महिन्याचे भाडे कापले आहे. तसेच मला भाडे करार मोडायचा नव्हता तर नव्याने त्यात काही किरकोळ बदल करायचे होते. कोर्टाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले आहे या खटल्याची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल

thumbnail 1532115425449
thumbnail 1532115425449

शनिवार विशेष

चित्रपट परिक्षण : लेथ जोशी

लेखक : अझीम अत्तार

माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही तोच उत्साह ठेवतो, हे माझ्यासारख्या चंचल आणि झटपट यश हवं असलेल्या तरुणाला नाही कळणार. किंबहुना मी बऱ्याचदा हा विचार करतो की आयुष्याच्या उमेदीच्या वर्षांत तेच ते काम करून कंटाळा बरं कसा आला नसेल, खासकरून जेव्हा मला दर २-३ वर्षांनी काहीतरी नवीन काम हवं असतं.

जेव्हा जेव्हा आमच्या घरात त्यांच्या कामाचा उल्लेख येतो, तेव्हा तेव्हा ते आम्हाला बड्या उमेदीने त्यांचं काम समजावून सांगतात. म्हणजे इंजिन वाॅल्व ला स्ट्रेटनिंग मशिन मध्ये ठेवल्यानंतर कसं त्याचं स्टेम आणि हेड, रोलर ने बरोबर शेप मध्ये येतात आणि तो तापलेला इंजिन वाॅल्व पुढच्या प्रोसेसिंगसाठी दुसऱ्या मशीन कडे पाठवला जातो. कुठल्या कुठल्या कंपनीकडून त्यांना आॅर्डर्स येतात आणि त्यांची मशीन किती भारी काम करते, हे सगळं ऐकताना मला दिनू आठवतो, “टेक्नॉलॉजी अशी अशी बदलतीए. कामं करायला लोक असे रोबोट बनवताहेत, जे बिघडले की स्वतःच स्वतःला रिपेअर करतील. आणि काये लेथ बिथ. ”

‘लेथ जोशी’ या ‘मंगेश जोशी’ दिग्दर्शित मराठी चित्रपटातील सरळमार्गी, मितभाषी जोशी (चित्तरंजन गिरी) एका छोट्या प्रोडक्शन कंपनीत काम करत असतात. दिनू (ओम भूतकर) हा त्यांचा हरहुन्नरी, इलेक्ट्रोनिक गॅझेट्सशी लिलया खेळणारा मुलगा. जोशींनी तब्बल ३५ वर्षे लेथ मशीन वर काम केलंय आणि आता अॅटोमेशन आल्यामुळे मालकाने त्यांचं Manual Production Workshop बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता घरी बसलेल्या जोशींना दुसरं काम शोधायची पाळी येते आणि लेथशिवाय दुसरं काही काम येत नसल्यामुळे आणि मुळात लेथ हाच प्रकार हळूहळू कालबाह्य होत असल्या कारणाने त्यांची कुचंबणा होते. जोशींची परिस्थिती तशी जेमतेमच. घरात मुलगा दिनू, आंधळी आई आणि बायको. बायको बाहेरून स्वयंपाकाच्या, फराळाच्या आॅर्डर्स घेऊन घराला हातभार लावत असते. चित्रपटात कुटुंबाचं आणि परस्परांतील नात्याचं अतिशय बारीक आणि नेमकं सादरीकरण करण्यात आलेलं आहे .

‘सेवा चौहान’ यांनी साकारलेली आंधळी आजी, जिला टीव्ही पाहण्याची (ऐकण्याची) खूप आवड आहे. तिचा सुनेवरती सारखा राग काढणं, देवाचा जप करणं, दिनूचं सारखं येता-जाता आपल्या आजीची चेष्टा करणं, आईची आपली आॅर्डर्स पूर्ण करायची रोजची धडपड, त्यांचं एकत्र बसून Serials पाहणं, मुलाचं आपल्या नकळत सिगारेट ओढणं, गाडी चालवायला शिकणं आणि हे कळाल्यावर आश्चर्यात पडलेला बाप. या साऱ्या गोष्टी त्या कुटुंबाची हलकीफुलकी वातावरण निर्मिती करतात.

परंतु चित्रपटाचा मुख्य आशय हा ‘बदल’ आहे. प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने होणारा बदल. मग ते काम असो, घर वा गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी. आणि हाच बदल जेव्हा वेगाने होतो आणि त्याला प्रगती हे नाव दिलं जातं, तेव्हा त्या बदलांशी जुळवून घेताना उडणारी तारांबळ. या सर्व गोष्टी लेथ जोशी चित्रपटात अतिशय प्रतिकात्मक पद्धतीने टिपल्या गेल्या आहेत.

मग ते कणीक मळण्याचं फुड प्रोसेसर असो, जपाचं मशीन असो, ग्रहशांतीला केलेलं चायनीज वा घेतलेली नवीन कार…आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना हाच नियम लागू होतो आणि माणूस नकळत या बदलांना सामावून घेतो .

या अविरत आणि महत्वाकांक्षेने धावणाऱ्या जगात ‘जोशी’ हे समाजाचा तो भाग अधोरेखित करतात, ज्याने आयुष्यभर एक ठराविक प्रकारचं काम केलंय आणि या क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगाच्या पावलावर पाऊल ठेवून धावणं त्यांना जमलं नाहीए. (असे जोशी आपल्याला काही तरुणांत पण दिसतात, ज्यांना उर फुटेस्तोवर धावायचं नाहीए किंवा जगाच्या वेगात बदलता येत नाहीए). पण मग त्यांना शिंदे साहेबांचं वाक्य चपखल बसतं, “कसंय जोशी, आजच्या काळात अपग्रेड होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर बाहेर फेकले जाऊ आपण”.

चित्रपटातील दिनू हा सर्व नवनिर्मितीतील आणि सळसळत्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतो, ज्यांचा वेळच मुळी नवनवीन गेझेट्स शिकण्यात आणि त्यांना अपग्रेड करण्यात जातो. या पिढीला जुन्या गोष्टींना कवटाळणे आणि एखाद्या ठिकाणी निवांत थांबणे, असल्या टाईमपास गोष्टींसाठी वेळच नाहीए. ती नेहमी नवीन च्या शोधात पळत राहते. आणि सौ. जोशी (अश्विनी गिरी) या त्या आहेत ज्यांना नवनवीन गोष्टींचं कुतूहल आणि आकर्षण आहे. मग त्या दैनंदिन वापरातल्या वस्तू असोत वा राहणीमान, ते नेहमी या बदलांकडे नकळत ओढले जातात .

चित्रपटातील चित्रीकरणाचा वेळ, हा अभ्यासाचा अजून एक विषय. जेव्हा जेव्हा जोशी आणि त्यांचं पूर्वापार चालत आलेलं राहणीमान याभोवती कॅमेरा फिरतो, तो खूप संथ असतो. याउलट जेव्हा जेव्हा दिनू पडद्यावर येतो आणि काळानुरूप बदललेल्या गोष्टी येतात, तेव्हा तेव्हा कॅमेरा पटपट फिरतो. जुनं आणि नवीन, पूर्वापार चालत आलेलं आणि जगाच्या वेगानुसार अपग्रेड झालेलं यांतला विरोधाभास आपल्याला प्रत्येक फ्रेम मधून स्पष्ट दिसतो .

आणि जोशींची हतबलता अजूनच केविलवाणी आणि खरी वाटते जेव्हा त्यांचा सहकारी म्हणतो , “बास झालं जोशी . या जगाच्या वेगाशी आपला निभाव नाही लागणार आता”.

चित्रपटात संगीताचा वापर तसा कमी आहे, मात्र आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा आवाज चपखलपणे वापरून परिणामकारक मांडणी झाली आहे. ‘चित्तरंजन गिरी’ हे पूर्ण चित्रपटभर शांत, संयत, गंभीर वावरतात . त्यांची हळू चालणारी सायकल त्यांच्या आयुष्यातला संथपणा दर्शवते .

परंतु नेहमी गंभीर असणाऱ्या जोशींबद्दल जेव्हा त्यांचे मालक “हे आमचे लेथ जोशी. कलाकार आहेत कलाकार” असं म्हणतात. तेव्हा आपल्या जोशी आडनावासोबत लावलेलं लेथ त्यांना सर्व दुःख विसरायला लावतं, त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं निर्मळ हास्य पूर्ण चित्रपटभर पुरून उरतं आणि त्यांची सायकल वेगाने धावू लागते.

अझिम अत्तार

(लेखक चित्रपट अभ्यासक असून साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत)

गोतस्करीच्या संशया वरून एकाची हत्या

thumbnail 1532164666464
thumbnail 1532164666464

रामगड (राजस्थान)| गाईची तस्करी करत असल्याच्या संशयावरून राजस्थान मधील रामगड जवळील लालवंडी गावात जमावाने एका व्यक्तीची हत्या केली आहे. अकबर खान असे मृताचे नाव असून तो हरियाणा राज्यातील कोलगावचा रहिवाशी आहे. दोन गाई घेऊन जात असताना गोरक्षकांच्या जमावाने त्याच्या वर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्या पासून देशात गोरक्षकांचा सुळसुळाट माजला आहे. देशात आजपर्यंत गोतस्करीच्या संशयावरून ५० हुन अधिक हत्या झाल्या आहेत.
दरम्यान राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल आणि पीडितास योग्य न्याय मिळवून दिला जाईल असे म्हटले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

जीवे मारण्याची धमकी देऊन भाजप नगरसेवकाने केला बलात्कार

thumbnail 1532161037670
thumbnail 1532161037670

नाशिक | भाजपा नगरसेवक धीरज दिंगम्बर पाते याने एका तरुणीला धमकावून तिच्या वर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार वणी येथे घडला आहे. संबंधित तरुणी ही वणी मध्ये बारावीचे शिक्षण घेत असताना धीरज तिच्या मागे लागला. ती कॉलेज ला जात असताना तिचा पाठलाग करू लागला. काही दिवसाने दोघांमध्ये मैत्री जुळली आणि याच मैत्रीचा गैरफायदा धीरजने घेतला. त्याने एके दिवशी तिला एका मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि वारंवार तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.
मुलीच्या नावाने खोटे मतदान कार्ड आणि फेक फेसबुक अकाउंट काढून तो वापरु लागला. हा सगळा प्रकार मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी त्याच्याकडे मतदान ओळखपत्र आणि फेसबुक अकाउंटचा पासवर्ड मागितला असता तो देण्यासाठी त्याने मुलीच्या आई वडिलांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. धीरज पाते या आरोपीवर पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

भाजपला पडली तीन मत कमी

thumbnail 1532153799540
thumbnail 1532153799540

नवी दिल्ली | काल मोदी सरकारवर अविश्वासाचा ठरवा मांडण्यात आला होता. तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या ठरावाला कॉग्रेसने आणि युपीएनी पाठिंबा दिला होता. या ठरावावर भाजपच्या विरोधात १२६मते पडली तर भाजपच्या बाजूने ३२५मते पडली आहेत. भाजपाच्या बाजूने पडलेली ही मते उपस्थित सदस्य संख्येच्या (४५१) दोन तृतीयांश ( २/३) आहेत अर्थात मोदी सरकारने लोकसभेचा विश्वास विशेष बहुमताने कमावला आहे.बहुमताचा आकडा एवढा विराट असला तरी मोदींच्या बाजूने ३२८ मते पडणार होती पण तीन मते कुठे भटकली याचा तपास अद्याप लागला नाही.
भाजपला भाजपची २७१ अण्णा द्रमुकची ३७ मते एलजेपी ची ६ मते, शिरोमणी अकाली दलची ४मते, अपना दलची २ मते मतजेडीयूची २ मते तर आरएलएसपीची २ मिळाली आहेत तसेच नागा पीपुल फ्रंट, नेशनल पीपुल पार्टी, सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी यांची प्रत्येकी एक मते भाजपला मिळाली आहेत. या सगळ्यांची बेरीज ३२८ होते परंतु मोदी सरकारला ३२५ मते पडली आहेत. याचा अर्थ तीन मते फुटली आहेत.

रामदास आठवलेंनी दिला मोदी सरकारला कवितेतून पाठिंबा | लोकसभा Live

thumbnail 1532103280956
thumbnail 1532103280956

दिल्ली | केंन्द्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. अविश्वास ठरावासंदर्भात लोकसभेमधे आपले मत मांड रामदास आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितेतून केली. रामदास आठवलेंच्या कवितेने नेहमी प्रमाणे लोकांना हसवण्याचे काम केले.
“कॉग्रेसको सत्ता मिली है पचपन साल
इस लिये उनके पास है बहुत माल”
कवी-रामदास आठवले.
नरेंद्र मोदी आमचे विराट कोलही असून राहुल गांधींनी किती जरी चांगली बॅटिंग केली असली तरी नरेंद्र मोदी तुमचा क्लिन बोल्ड उडवणार आहेत असा सूचक इशारा आठवले यांनी दिला.
मोदी सरकार ओबीसी आणि दलित आदिवासीच्या हिताचे काम करत आहे.आपण उगाच दलित आदिवासींच्या बाबतीत राजकार करू नये असे रामदास आठवले म्हणाले.

फ्रान्सच्या अध्यक्षांसंबंधित केलेले वक्तव्य राहुल गांधींना पडले महागात

thumbnail 1532101040683
thumbnail 1532101040683

नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीं यांनी आज लोकसभेत भाजपा सरकारच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. भाषण करतेवेळी राहुल यांनी राफेर कराराबद्दल तिखट शब्दात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु राफेर करारावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आता उजेडात येत आहे.
राहुल गांधींच्या भाषणाची वर्दी फ्रान्स पर्यंत गेली असून राहुल यांनी केलेले आरोप खुद्द फ्रान्सने फेटाळले आहे. राफेर करार मोदी सरकार सोबत झाला नसून तो मनमोहनसिंग सरकारशी झाला असल्याचा निर्वाळा फ्रान्स सरकार कडून करण्यात आला आहे.

राफेर विमान खरेदीची किंमत मोदींच्या दबावाने वाढवली असल्याचे राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते. त्यावर निर्मला सीतारामन यांनी सभागृहाला स्पष्टीकरण ही दिले होते. मोदी सरकारच्या काळात कोणताही राफेल करार झाला नाही असा निर्वाळा निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. तोच सूर फ्रान्स सरकारने आळवल्याने राहुल गांधी तोंडावर आपटले आहेत.

आणि भर लोकसभेत राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी | लोकसभा Live

thumbnail 1532078422537
thumbnail 1532078422537

नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. लोकसभेत अविश्वासाच्या ठरावावरील भाषणात राहुल गांधींनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी उपरोधकपणे संघ आणि भाजपाला उद्देशून, ‘हिंदू धर्म काय असतो हे तुम्ही मला शिकवले, महादेव कोण आहे हे तुम्ही मला शिकवले, राम कोण आहे हे तुम्ही मला शिकवले’ असे उद्गार काढले. तुम्ही मला शिव्या द्या, मला पप्पू म्हणा, मी तुमचा द्वेष करणार नाही. मी तुमच्यामधील द्वेषाला बाहेर काढून त्याला प्रेमात परिवर्तित करेन. माझ्या मनात तुमच्या बद्दल फक्त प्रेम आहे’ असे म्हणून राहुल यांनी भाषण संपवले. थेट पंतप्रधानांचे आसन गाठून पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी मिठी मारली.
राहुल गांधींनी केलेले घणाघाती भाषणाने विरोधकांना चेव चढला होता परंतु भाषणानंतर केलेल्या बालिश वृत्तीने सगळेच निराश झाले. कॉग्रेसच्या सदस्यांनी नाईलाजाने राहुल गांधींसाठी बाक वाजवले.

प्रधानमंत्री मेरे आख मे आँख डालकर बात नही कर सकते – राहुल गांधी

thumbnail 1532076454961
thumbnail 1532076454961

लोकसभा Live| मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावरुन सध्या लोकसभेत गदारोळ सुरू आहे. काँग्रराेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सणसणीत सुरुवात करत थेट पंतप्रधान नरेंन्द्र मोदींना फटकारले आहे. १५ लाख रुपये देण्याचे काय झाले? दोन कोटी रोजगार द्यायचे काय झाले? असे सवाल करत राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

संरक्षण खात्यात हेलिकॉप्टर खरेदीत सावळा गोंधळ असल्याचा आरोप राहुल गांधीं यांनी सरकारवर करताच भाजपा खासदारांनी गदारोळ माजवला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन स्पष्टीकरण देण्यासाठी उठू लागल्या तेवढ्यात सभापतींनी राहुल गांधींच्या नंतर तुम्हाला संधी दिली जाईल असे सांगितले.
आपल्या भाषणामुळे गदारोळ माजला म्हणून राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर आनंद साफ दिसत होता. त्याच क्षणी राहुल गांधीनी पंतप्रधाना उद्देशून बोलण्यास सुरुवात केली. “प्रधानमंत्री मेरे आख मे आख डालकर बात नही कर सकते” असे राहुल गांधी म्हणाले आणि खुद्द मोदी पण खदखदून हसू लागले. राहुल गांधी म्हणाले “प्रधानमंत्री आप चोकीदार नही है, आप तो भागीदार है।” असे गांधी म्हणताच सभागृहात पुन्हा गदारोळ माजला.

सभागृहातील गदारोळ पाहून सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.तहकूबी नंतर लोकसभा भरली आणि राहुल गांधी पुन्हा तडाखेबाज भाषण देऊ लागले.

अगर आज राहुल गांधी बिना पढे, बिना गलती करे १५ मिनिटं भी बोलेंगे तो धरती हिलेगी – परेश रावल

thumbnail 1532070136254
thumbnail 1532070136254

दिल्ली | ‘राहुल गांधी आज न अडखळता, कागद हातात न घेता, काहीही चूक न करता १५ मिनिटे जरी बोलले तरी भुकंप येईल’ असे बाॅलिवुड अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी म्हटले आहे. ‘धरती सिर्फ हिलेगीही नही, नाचेगी भी’ असे रावल यांनी म्हटले आहे.

आज लोकसभेत भाजप सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यापर्श्वभुमीवर परेल रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सदर विधान केले अाहे. आजच्या अविश्वास ठरावासंदर्भात भाजपने #BhukampAneWalaHai (भुकंप आने वाला है) असा हॅशटॅग वापरला आहे. यातून आज लोकसभेत भाजप बहुमत सिद्ध करण्यामधे यशस्वी होणार आहे आणि काँग्रेसचा पराभव होऊन भुकंप येणार आहे असे सुचित करायचे आहे.

https://platform.twitter.com/widgets.js