Thursday, December 18, 2025
Home Blog Page 6757

आपणच शेतकर्यांचे नेते आहोत हे सिद्ध करण्यासाठीच दुध आंदोलन – सदाभाऊ खोत

thumbnail 15317471048171
thumbnail 15317471048171

नागपूर | राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन सुरू असतानाच कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना आंदोलनाची वास्तवता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लोकसभेची खासदारकी जिंकता यावी यासाठी छेडलेले हे आंदोलन असून या आंदोलनाचा जन्म खुर्चीच्या स्वार्थातून झाला आहे’ असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
‘मी हयातभर आंदोलन करत आलो आहे. आंदोलनाच्या दुधात पाणी किती आणि दूध किती या गोष्टीत मी तीस वर्षे घालवली आहेत’ असा चिमटा खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना काढला आहे. सरकार चर्चेला कायम तयार असून आपण चर्चेला यावे असे आवाहनही खोत यांनी यावेळी केले आहे.

भाजपला नाही सभागृहानेता

thumbnail 1531735381891
thumbnail 1531735381891

नवी दिल्ली| संसदेचे अधिवेशन दोन दिवसावर येऊन ठेपले असताना भाजपला राज्यसभेत सभागृहनेता नाही. १४ मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. तेव्हा पासून आजतागायत देशाचे अर्थमंत्री हंगामी आहेत. तर जेटली यांच्याकडे असणारे राज्यसभेचे सभागृहनेते पद रिक्त आहे.
कॉग्रेस संसदेच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. राज्यसभेत भाजपाचे सभागृह नेते जेटली नसल्याने या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायची तयारी कॉग्रेसने केली आहे. कारण बुद्धिप्रामाण्यवादी जेटली राज्यसभेत बाजू मांडू लागले की विरोधकांनाही ऐकून घ्यावे लागत असे. भाजपने ही हंगामी सभागृहनेता निवडी साठी हालचाली सुरू केल्या आहेत. विजय गोयल यांची जेष्ठता लक्षात घेता त्यांचे नाव चर्चेत होते परंतु विरोधकांचा प्रहार झेलण्यास ते यशस्वी ठरणार नाहीत म्हणून त्यांच्या जागी विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे नाव चर्चेत आहे. आज रात्री किंवा उद्या दुपार पर्यंत सभागृहनेते म्हणून रविशंकर प्रसाद यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने केले हात वर, निरव मोदीचा मामा मेहुल चोकसीला शोधण्यात इंटरपोल अपयशी

thumbnail 1531735426327
thumbnail 1531735426327

वॉशिंग्टन | पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारा निरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांचा तपास ईडी आणि सीबीआय करत आहेत. निरव मोदी हाँगकाँग मध्ये आणि मेहुल चोकसी वॉशिंग्टनमध्ये असल्याचे तपासातून पुढे आले होते. भारत अमेरिका हस्तांतरण करार १९९९ नुसार इंटरपोल द्वारे मेहुल चोकसीला हस्तांतरित करण्याची नोटीस भारताने पाठवली होती. त्यावर अमेरिकेने आज उत्तर दिले आहे. मेहुल चोकसीला आम्ही अमेरिकेत शोधण्याचा प्रयत्न केला परंतु भारताची नोटीस पोचण्या अगोदरच मेहुल चोकसीअमेरीकेतून पसार झाल्याची कबुली अमेरिकेने दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निरव मोदी आणि मेहुल चोकसी याने १३,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. या अफरा तफरीत निरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना अटकेची तलवार उभा राहिली होती. अशातच दोघेही हातावर तुरी ठेवून पसार झाले होते.
इंटरपोलने मेहुल चोकसीच्या बाबतीत हात वर केल्याने निरव मोदी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. या तयारीला या प्रसंगाने आणखी बळ मिळाले आहे.

दुधवाढ आंदोलनाचा मुंबईच्या दूध व्यवस्थेवर कसलाच परिणाम नाही

thumbnail 1531735528966
thumbnail 1531735528966

मुंबई | दूध दरासाठी पेटलेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या दूध पुरवठ्यावर कसलाही परिणाम झालेला नाही. मुंबई मधील दुधाचा पुरवठा आज दिवसभर सुरळीत चालू होता. विरार मध्ये होणारे अमूल दूधसंघाचे दूध संकलन आज बंद ठेवण्यात आले होते तसेच सौराष्ट्र एक्सप्रेसला जोडला जाणारा दुधाचा डबा जोडला गेला नाही. यामुळे उद्या मुंबईत दुधाची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुंबईत येणाऱ्या दूध टँकरला आता पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे.

गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची दिल्लीत बैठक

thumbnail 15317346717101
thumbnail 15317346717101

नवी दिल्ली | कॉग्रेसचे राज्यभेचे नेते गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत विरोधकांची बैठक होणार असल्याची माहीती आहे. १८ जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आजाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदर बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कॉग्रेसचे प्रमुख नेते आणि त्यांच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे शेवटून तिसरे अधिवेशन आहे. लोकमानसात कॉग्रेसच्या बाजूने मतजागृती करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे पाहिले जाते. तसेच पी.जे कुरियन राज्यसभेच्या उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्याने त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला कसे सामोरे जायचे या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दृष्टीने आज सकाळीच कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कॉग्रेस नेत्यांची एक बैठक पार पडली आहे. सामोहिक हत्या, शेतकऱ्यांच्या समस्या, बँकांचे भ्रष्टाचार आणि महिलांच्या अत्याचारात झालेली वाढ या विषयावर सरकारला घेरण्याची कॉग्रेस तयार करत आहे.

राहुल गांधीचे तिहेरी तलाकच्या विरोधात महिला आरक्षणाचे अस्त्र

thumbnail 1531734003624
thumbnail 1531734003624

नवी दिल्ली | आजमगड येथील जाहीर सभेत मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्दयावर सणसणीत टीका केली होती. याला उतारा म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत आणावे त्यास आम्ही पाठिंबा देतो असे सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना महिला आरक्षणा संदर्भात पत्र लिहीले आहे. ‘लोकसभेच्या मान्सून अधिवेशनामधे सत्ताधारी भाजपने महिला आरक्षणाचे विधेयक पास करावे’ असे गांधी यांनी पत्रामधे म्हटले आहे. काँग्रेस भाजपाला त्यासाठी पुर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विट करुन नमुद केले आहे.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर कॉग्रेसची वाताहत करण्याची रणनीती भाजपने आखली असतानाच राहुल गांधींनी महिला आरक्षणाचा मुद्दा काढून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमधे महिलांना ३३ % आरक्षण मिळायला हवे आहे’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी मागील वर्षी मा.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून पाठींब्याची मदत मागीतली होती.

१९९६ साली देवेगौडा यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत सादर केले गेले होते. नंतर २०१० साली सदर विधेयक राज्यसभेत पास झाले. परंतु लोकसभेत ते अजून पास होऊ शकलेले नाही. संविधानाच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत समिती व नगर परिषदांमधे महिलांना ३३ % आरक्षण देण्यात आले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

राहुल गांधींचे महिला आरक्षण संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र

thumbnail 1531730520081
thumbnail 1531730520081

दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना महिला आरक्षणा संदर्भात पत्र लिहीले आहे. ‘लोकसभेच्या मान्सून अधिवेशनामधे सत्ताधारी भाजपने महिला आरक्षणाचे विधेयक पास करावे’ असे गांधी यांनी पत्रामधे म्हटले आहे. काँग्रेस भाजपाला त्यासाठी पुर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचेही राहुल गांधी यांनी ट्विट करुन नमुद केले आहे. पक्षीय राजकारणाला बाजूला सारुन महिला आरक्षणाचे विधेयक पास करणे महत्वाचे असल्याचे राहुल यांनी ट्विट मधे म्हटले आहे.

‘संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमधे महिलांना ३३ % आरक्षण मिळायला हवे आहे’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी मा.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून पाठींब्याची मदत मागीतली होती.

१९९६ साली देवेगौडा यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत सादर केले गेले होते. नंतर २०१० साली सदर विधेयक राज्यसभेत पास झाले. परंतु लोकसभेत ते अजून पास होऊ शकलेले नाही. संविधानाच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत समिती व नगर परिषदांमधे महिलांना ३३ % आरक्षण देण्यात आले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

मनसेचा नवी मुंबईत राडा, पी.डब्ल्यू.डी. च्या कार्यालयाची तोडफोड

thumbnail 15317283204732
thumbnail 15317283204732

नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबई येथील सार्वजणीक बांधकाम विभाग (पी.डब्ल्यू.डी.) कार्यालयाची तोडफोड केली आहे. रस्त्यावर असणार्या खड्ड्यांमुळे अपघातात मृत्युमुखी पडणार्यांच्या संख्येत या काही दिवसांत वाढ झाली आहे. या पार्श्वभुमीवर मनसेने हे आंदोलन केले आहे. पी.डब्ल्यू.डी. खाते रस्त्यांवरील खड्डे मुजवण्यासंदर्भात काही भुमिका घेणार आहे की नाही असा सवाल मनसेने यावेळी विचारला अाहे.

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो आहे’ असे हरभजनने ट्विटमधे म्हटले आहे. क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यातील विश्वचशकासाठी खेळल्या जाणाऱ्या फायनल सामन्याच्या ठीक अगोदर हरभजन सिंगने हे ट्विट केले आहे.
क्रोएशियाने फायनल मध्ये मारलेली धकड ही जगाला अचंबित करून सोडणारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंग याने हे विधान केले आहे. हरभजनसिंग याने या मार्मिक विधानाच्या खाली #soch bdlo desh bdlega (सोच बदलो देश बदलेगा) हा हॅशटॅग वापरला आहे.

 

अमेझॉन आणि फ्लिपकार्ड यांचा बंबर सेल, किमतीत ८०% पर्यंत सूट

thumbnail 1531718895918
thumbnail 1531718895918

मुंबई |अमेझॉन आणि फ्लिफकार्ड वर आज मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. दुपारी १२ वाजता या ऑफर सुरू होणार आहेत. अमेझॉन आणि फ्लिफकार्ड यांनी बाजारावर आलेली मंदी पाहता हा मोठा निर्णय घ्यायचे ठरवले असल्याचे बोलले जाते. भारतात घडलेल्या आर्थिक घडामोडीची याला किनार आहे.
अमेझॉन आणि फ्लिफकार्ड ही ग्राहकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे बनली आहेत. दिवाळी, दसरा या सणांना मोठया ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित करण्याची कामगिरी अमेझॉन आणि फ्लिफकार्ड करत असतात. मोबाईल कपडे यापासून ते गाईच्या गौऱ्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनईल माध्यमावर मिळत असतात. आजची ऑफर पदरात पाडून घेण्यासाठी लाखो ग्राहक अमेझॉन आणि फ्लिफकार्डवर गर्दी करण्याची शक्यता आहे.