Friday, December 19, 2025
Home Blog Page 6756

पुण्यात झाली दुधाची टंचाई, मुंबईची दूध सेवा सुरळीत

thumbnail 1531819019710
thumbnail 1531819019710

पुणे | दुधाच्या आंदोलनाने मोठा पेट घेतला असून त्याच्या झळा राज्यातील मोठ्या शहरांना बसत आहेत. पुण्यात आज दुधाची टंचाई जाणवत असल्याने नागरीकांची गैरसोय झाली आहे. तर मुंबईतील दुध पुरवठा सुरळीत झाल्याने दुध सेवा सुरळीत सुरु आहे.

पुण्याला होणारा दुधाचा पुरवठा काल ठीक ठिकाणी रोखला गेल्याने आज दूध सेवेत खंड येऊन दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात विशेष मागणी असणार्या चितळे दुधाचाही पुरवठा खंडित झाला आहे. तसेच पुण्यात सकाळी ९ वाजताच दुधाचा साठा समाप्त झाल्याचे चितळेच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
मुंबईत मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दूध पुरवठा सुरळीत आहे.नागरिकांना दुधाचा पुरवठा व्यवस्थित होत आहे.राज्याच्या इतर शहरात दुधाचा पुरवठा कमी होत असताना मुंबईत होत असलेला दुधाचा पुरवठा आंदोलनाचे अपयश अधोरेखित करत आहे.
दूध हे रोजच्या आहारातील महत्वाचा घटक असल्याने दुधाचा प्रश्न लवकर सुटावा असे जनसमान्यातून बोलले जाते आहे.दूध आंदोलनावर येत्या काळात जर तोडगा निघाला नाही तर मोठी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

वैद्यकीय शिक्षण प्रवेशाच्या लक्षवेधी वर विधान परिषदेत गदारोळ

thumbnail 1531818523858
thumbnail 1531818523858

नागपूर | वैद्यकीय शिक्षण प्रवेशावर आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवर बोलताना मराठवाड्यातील प्रवेशाच्या ७०/३० पॅटर्नचा उल्लेख झाला. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ७०/३० पॅटर्नवर लक्ष वेधले. चर्चा टोकाला भिडल्या मुळे विरोधक आमने सामने आले. शेवटी सभापतींच्या खुर्चीत असणारे माणिकराव ठाकरे यांनी विषय राखून ठेवत असल्याचे सांगत गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला.
मराठवाड्यात फक्त ६ वैद्यकीय शिक्षण महाविद्यालये असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच ७०/३० पॅटर्न १९८५ पासून राज्यात अस्तित्वात आहे. खरंतर या पेटर्नतेला जेव्हा सुरु झाला तेव्हाच विरोध करायला पाहिजे होता. आज हा विषय माध्यमात झळकल्याने आपण चर्चेला आणत असाल तर हे योग्य नाही’ असे महाजन म्हणताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे उत्तर देण्यासाठी सक्षम नाहीत त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन यावर निवेदन द्यावे असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करताच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनच हौद्यात येऊन गदारोळ करू लागले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळात सभापतींनी लक्षवेधी राखून ठेवल्याचे जाहीर केले.

शिव स्मारकावरून विधान सभेत अभूतपूर्व गदारोळ

thumbnail 1531817994196
thumbnail 1531817994196

नागपूर | विधान सभेत शिव स्मारकासंदर्भात निवेदन देते वेळी आज विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. शिवस्मारका मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची खर्च कमी करण्यासाठी घटवल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला आहे. जागतिक रेकॉर्ड मोडण्यासाठी पुतळ्याची उंची घटवून तलवारीची उंची वाढवण्यात येणार असल्याची नागरीकाट चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले.

मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देत असताना विरोधाकांनी गोंधळ माजवला. जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा देण्यात आल्या. तसेच अब्दुल सत्तारी (कॉग्रेस) आणि विजय भांबळे (राष्ट्रवादी) या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवला. विरोधकांनी सभात्याग करून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान मुख्यमंत्र्यानी विधानसभेत शिवस्मारका वरील निवेदनात, ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कसल्याही प्रकारे कमी केली जाणार नाही. समुद्राच्या वातावरणात अधिक काळ टिकेल अशा मूर्तीचे निर्माण करण्यात येणार आहे.’ अशी भुमिका स्पष्ट केली.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही

thumbnail 15318154037311
thumbnail 15318154037311

मुंबई | मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. लाखोंचे मोर्चे काढून ही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने आम्ही अशा आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे राघव गायकवाड यांनी माध्यमांनाशी बोलताना म्हटले आहे.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कसल्याच हालचाली करत नसल्याने मराठा समाजात सरकारबद्दल असंतोष आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने हा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुध आंदोलन ही पुर्णपणे अराजकीय चळवळ – खा. राजु शेट्टी

thumbnail 15317471048172
thumbnail 15317471048172

मुंबई | राज्यात दुध आंदोलन चांगलेच पेटले असून अनेक प्रमुख शहरांचा दुध पुरवठा रोखण्यात आंदोलन कर्त्यांना यश आले आहे. यापर्श्वभुमीवर काल राज्यकृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘दुध आंदोलन राजकीय स्वार्थापोटी आणि आपणच कसे शेतकर्यांचे खरे नेते आहोत हे दाखवण्याकरता केले जात आहे’ अशी टीका आंदोलकांवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजु शेट्टी यांनी ‘दुध आंदोलन ही पुर्णपणे अराजकिय चळवळ असून महाराष्ट्रभरातील शेतकर्यांचा आमच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे’ सांगीतले आहे.

२०१९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे आंदोलन आखण्यात आल्याचा टोला खोत यांनी नाव न घेता राजु शेट्टींवर लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी आपली बाजू मांडली आहे. शेतकर्यांचे हित साधने हाच या दुध आंदोलनाचा प्रमुख हेतु आहे असे शेट्टी यांनी म्हटले आहे. सत्ताधारी एन.डी.ए. ने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे मी एन.डी.ए मधे सहभागी होण्याची मुळीच शक्यता नाही असेही शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

भिडे पुन्हा बरळले, डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहील्याचा दावा

thumbnail 1531809610216
thumbnail 1531809610216

मुंबई | वादग्रस्त विधाने करुन सतत चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केले आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहील्याचा दावा भिडे यांनी केला आहे. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

न्युज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली’ असं संभाजी भिडे बरळले आहेत. ‘मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता’ असे स्वत: आंबेडकरांनीच लिहून ठेवले असल्याचेही भिडे यांनी म्हटले आहे. देश विदेशातील विद्यापिठांत मनुचा अभ्यास केला जातो असे म्हणुन भिडेंनी मनुचं कौतुक केले आहे.

शिवाय सदर मुलाखतीत संभाजी भिडेंनी कोरेगाव भोमावर भाष्य करतेवेळी मिलिंद एकबोटे वरिल सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. तर कोरेगाव भिमा येथील दंगल संभाजी ब्रिगेडनेच घडवून आणल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलीसांची दडपशाही

thumbnail 1531803414809
thumbnail 1531803414809

अहमदनगर | प्रलंबित मागण्यांसाठी पुण्याहून नाशिक आयुक्तालयावर निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी दडपशाही केली आहे. नाशिक अहमदनगर जिल्हा हद्दीत पोलिसांनी आदिवासी विद्यार्थी मोर्चा अडवला आहे. आदिवासी वसतिगृहे बंद करु नयेत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांची जेवणाची नवीन डि.बी.टी. पद्धत रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र ने आंदोलनाचा पवित्रा घेत आदिवासी विद्यार्थी शिक्षण संघर्ष मोर्चा काढला आहे. पुणे ते नाशिक आयुक्तालयावर निघालेल्या या मोर्चात शेकडो आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परंतू काल रात्री पोलीसांनी मोर्चातील विद्यार्थ्यांना नाशिककडे जाण्यास अटकाव केला आहे. विद्यार्थ्यांना पुणे पोलीस मुख्यालयात बळजबरी आणण्यात आले आहे असा आरोप विद्यार्थ्याकडून होत आहे.

राज्यभरातील आदिवासी वसतिगृहे बंद करण्याचा सरकारने घाट घातला आहे. सरकारची नवीन धोरणे आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणारी आहेत. अादिवासी विकास विभागाने ५ एप्रिल २०१८ रोजी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था डि.बी.टी. च्या माध्यमातून सुरु केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदिवासी विद्यार्थी विरोध करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर येत आहे. तसेच पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने सदर पद्धत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घालणारी आहे. असे म्हणत आदिवासी विद्यार्थी कृती समितीने सरकारच्या धोरणावर टिका केली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
1) शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वासतिगृहांसाठी सुरू केलेली भोजनाऐवजी थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धत तात्काळ रद्द करून वसतिगृहातच भोजन व्यवस्था सुरू करावी. (पूर्वीप्रमाणेच निवासाच्या जागी जेवण उपलब्ध व्हावे.)
2) वसतिगृहांसाठी असलेल्या इमारती शहराच्या मध्यवर्ती भागात असाव्यात व त्या सरकारी मालकीच्या असाव्यात.
3) ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या बोगस दाखले मिळविलेल्या लोकांविरोधात कारवाई करण्याच्या निकालाची त्वरित अंमलबजावणी करून खोटे दाखले काढल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
4) पेसा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील सरकारी नोकरीच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात.
5) SIT मार्फत विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी शिष्यवृत्ती त्वरित थांबवावी.
6) समांतर पदवी / पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देय असावी.
7) ‎वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करावे.( नसल्यास सहा महिन्यात सादर करण्याचे हमीपत्र लिहून घ्यावे.)
8 ) ‎गृहपाल हे वसतिगृहाच्या जवळ निवासास असणे बंधनकारक करावे.
9) ‎गृहपालांना दि. ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णय ‘आवगृ – २०११ /प्र/ क्र.१६९/का-१२ च्या परिशिष्ट – फ (१) नुसार कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करावे.
10) ‎महानगरपालिका वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात जाण्यासाठी पास मोफत देण्यात यावेत अथवा निर्वाह भत्यामध्ये वाढ करावी.
11) ‎विद्यार्थ्यांना वेळोवेळी आंदोलन/ उपोषण/ मोर्चे करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची तरतूद करावी.
12) ‎प्रत्येक वसतिगृहामध्ये विद्यार्थी क्षमतेनुसार सर्व सुविधांयुक्त संगणक कक्ष स्थापन करावेत.
13) ‎वसतिगृहातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत.
14) ‎न्यूक्लिअर बजेट अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना ह्या वसतिगृहांमध्येही राबविण्यात याव्यात.
15) ‎आदिवासी विकास विभागांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नामांकित स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी योजना निर्माण करण्यात यावी.
16) ‎प्रत्येक वसतिगृहात सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्यात यावे.
17) ‎महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ अदा करण्यात यावी.
18) ‎शासकीय वसतिगृह मांजरी फार्म, पुणे येथे असलेले गृहपाल श्री संतोष गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली व का केली याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
19) ‎वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता वाढवून त्यानुसार पदे मंजूर करून त्यांची भरती करण्यात यावी.

हॉटेलच्या आड सुरू होते हुक्का पार्लर

thumbnail 1531771280463
thumbnail 1531771280463

जळगाव | शहरातील एका उच्चभ्रू हाॅटेल मधे बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या बाहेरील बाजूस विरळ लोक वस्तीत हे हॉटेल असून हॉटेलच्या नावाखाली या ठिकाणी हुक्का पार्लर सुरु असल्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात माजी महापौरांचा मुलगा दोषी आढळला आहे.

जळगावच्या माजी महापौर आशा कोल्हे यांचा मुलगा रितेश कोल्हे याला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य वीस जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी छापे टाकले त्या वेळी हे हुक्का पिताना आढळले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पकडलेल्या लोकांमध्ये उच्चभ्रू वर्गातील तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.

आणि मोदींना रुग्णालयात हुंदका फुटला

thumbnail 1531750566458
thumbnail 1531750566458

मिदनापुर | पश्चिम बंगाल मधील मिदनापुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमधे मंडप कोसळून २४ जण जखमी झाले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीमधे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता मोदींचे भाषण सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

नरेंन्द्र मोदींच्या सभेसाठी उभाण्यात आलेला मंडप मोदींचे भाषण सुरु असताना अचानक कोसळला आणि त्यामधे भाषण एकण्यासाठी आलेले २४ जण जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता जखमीची स्थिती पाहून त्यांना दुःखाने हुंदका फुटला. रुग्णालयात रुग्णांना धीर देऊन मोदी दिल्लीकडे रवाना झाले. “मी मिदनापूरच्या सभेत सर्व जखमी लोकांना लवकर बरे होण्याची कामना करते. राज्य सरकार त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देईल.” असे प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे.

मोदींनी मंडपावर चढलेल्या युवकांना खाली उतरण्यासाठी सांगितले होते.तसेच मोदींचे भाषण सुरू असतानाच मंडप कोसळल्याने सभेच्या ठिकाणी गोंधळ मजला होता.

या झेंड्यावर भारतात येणार बंदी

thumbnail 15317476359991
thumbnail 15317476359991

नवी दिल्ली | शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. रिझवी यांनी चंद्र आणि चांदणी असलेल्या झेंड्यावर बंदी घालावी असा दावा दाखल खटल्यातून केला आहे. कारण या झेंड्याचा आणि इस्लाम धर्माचा काहीच संबंध नाही असे रिझवी यांनी कोर्टात सांगितले आहे. सरकारशी सल्ला मसलत करून सरकारची बाजू न्यायालयात मांडावी असे निर्देश सरकारी वकील तुषार मेहता यांना न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या खंडपीठाने दिले आहेत.
प्रेशीत मुहम्मद पैगंबर जेव्हा मक्केला गेले तेव्हा त्यांच्या हातात पांढरा ध्वज होता. मधल्या काळात मुस्लीम सैन्याचे अनेक रंगाचे झेंडे अस्तित्वात आले परंतु चांदणी चंद्र असलेल्या हिरव्या झेंड्याचे अस्तित्व १९०६ पर्यंत नव्हते असा दावा रिझवी यांच्या कडून करण्यात आला आहे. १९०६ साली मुस्लिम लीगने या ध्वजाची निर्मिती केली.
मुस्लिम वस्त्यात घरावर हा झेंडा लावला जातो त्यामुळे हिंदू लोक या झेंड्याला पाकिस्तानचा झेंडा समजतात आणि दोन्ही धर्मात शत्रुत्वाची भावना वाढीस लागते म्हणून या झेंड्यावर बंदी घालण्यात यावी असे रिझवी यांनी न्यायालयात म्हणले आहे.