Saturday, December 13, 2025
Home Blog Page 6757

रणनितीकार प्रशांत किशोर महानिवडणुकीला राहणार भाजपाच्या तंबूत

thumbnail 1531546900478e0a5ae
thumbnail 1531546900478e0a5ae

टीम HELLO महाराष्ट्र | आपल्या निवडणूक नियोजन कौशल्याने देशाचे लक्ष वेधून घेतलेले प्रशांत किशोर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सोबत राहणार आहेत. मधल्या काळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना प्रशांत किशोर यांचे महत्व समजले आहे. म्हणून त्यांच्याशी जुळवून घेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्याची तयारी भाजपने केली आहे.

२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या रणनीती चा आविष्कार दाखवला. नंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी दमदार कारागिरी केली आणि पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. असे म्हणतात की २०१४ ची निवडणूक झाल्यावर प्रशांत किशोर यांनी भाजपाचे मोठे पद मागितले होते आणि यातूनच अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद झाले. भाजप आणि प्रशांत किशोर यांच्या वादाची परिणीती म्हणून बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार यांचा हात धरला. प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर भाजपची मदार आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात याकाही दिवसात बैठक पार पडली असून यात प्रशांत किशोर यांनी युवकांचे संघटन मजबूत करा असा सल्ला भाजपला दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोशल मीडियात विरोध वाढत आहे म्हणून आता सोशल मीडियात सक्रिय होण्यास ही प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. प्रशांत किशोर यांचे भाजपला महत्व कळले असल्याने येत्या काळात भाजपच्या महत्वाच्या पदावर प्रशांत किशोर दिसले तर नवल न वाटावे.

सुरज शेंडगे

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होणार – अमित शहा

thumbnail 1531542796292
thumbnail 1531542796292

हैद्राबाद | निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा नेहमीच तापू लागतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिराच्या दृष्टीने सूचक विधान केले आहे. ‘२०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरू झालेले असेल’ असे विधान करुन शहा यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
तेलंगणा राज्याच्या भाजपा एककाची संघटनात्मक बैठक घेण्यासाठी अमित शहा काल हैदराबादमध्ये आले होते. ही बैठक तेलंगणाच्या राज्य पक्ष कार्यालयात पार पडल्याची माहिती भाजपचे नेते पी शेखर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मागील काही दिवसात आदित्यनाथ यांनी राम मंदिरा बाबत असेच एक विधान केले होते. “जे राम मंदिराला विरोध करत होते तेच आता राम मंदिराच्या बाजूने बोलू लागले आहेत’, यामागे मोठे षड्यंत्र शिजत आहे” असे म्हणुन “राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते. येत्या काळात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राम मंदिर प्रश्न तापत जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत अंडी डजना मागे २० रुपयांनी महागली

thumbnail 1531541182009
thumbnail 1531541182009

मुंबई | लोकसंख्येने महाकाय असणारे मुंबई शहर दररोज ३७ लाख डजन अंडी पोटात ढकलते. मात्र आता अंड्यांचा भाव वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बरसत असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच त्याचा वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. परिणामी मुंबईत येणारी अंड्याची वाहने रोखली गेली आहेत. त्यामुळे ५५ रुपये डजन मिळणारी अंडी आता ७५ रुपये डजन या दराने मुंबईकरांना खरेदी करावी लागत आहेत.

मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापा – मुख्यमंत्री हरियाणा

thumbnail 15315197422651
thumbnail 15315197422651

चंदीगढ | आपल्या टिप्पणीने सतत विवादात राहणारे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हाएकदा वादात्मक विधान केले आहे. ‘मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापून टाका’ असे खट्टर यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे. मात्र कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बोटे तोडा याचा अर्थ सक्तीने वागा असे मला म्हणायचे होते असा निर्वाळा खट्टर यांनी यावेळी दिला आहे.
हरियाणा राज्यात बलात्कारावर नव्याने घेतलेले निर्णय लक्ष वेधणारे आहेत. ‘बलात्कारी व्यक्ती शिक्षा भोगून आल्यास कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही’, ‘कामाच्या ठिकाणी बलात्कार करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली जामिनावर बाहेर येता क्षणी दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात येईल’ असे महत्वाचे निर्णय खट्टर सरकारने घेतले आहेत.

उध्दव ठाकरेंची आज पुण्यात गुप्त बैठक

thumbnail 1531539923274
thumbnail 1531539923274

पुणे | शिवसेना २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष भाजपला जबर धक्का देण्याच्या पवित्र्यात असेलेल्या उद्धव ठाकरें यांनी त्यासंदर्भात पुण्यात गुप्त बैठकीचे आयोजन केले असल्याची समजत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे.

बैठकीत मिलिंद नॉर्वेकर, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणूक स्वबळावर लिलया पेलण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जाते आहे.

बातमी काल दिवसभराची

thumbnail 15314482651911
thumbnail 15314482651911

१.अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत मागासवर्गीयांना आरक्षण नाही-सर्वोच्च न्यायालय
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.सदरची याचिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली होती.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.
२.गणेशोत्सवा दरम्यान थर्माकोल वापरास बंदीच.मुंबई उच्च न्यायालय
थर्माकोल उत्पादक आणि सजावटीचे कलाकार यांनी गणेशोत्सवात थर्माकोल ची बंदी शिथिल करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने काल निकाल देत याचिका फेटाळली आहे.तसेच राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले आहे.
३.नवाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये अटक.
बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज या दोघांना काल रात्री लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.नॅशनल अकॅण्टटेब्यालिटी ब्युरो आणि पाकिस्तानचे हंगामी सरकार यांनी ही अटक घडवून आणली आहे.
४.मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात आता घेऊन जाता येणार बाहेरील खाद्यपदार्थ.
अव्वाच्यासव्वा दर आकारून मल्टिफ्लेक्स मध्ये ग्राहकांची लूट केली जात होती.याच विषयावर काल विधान परिषदेत धनंजय मुंडेंनी लक्षवेधी सूचना मांडली या सूचनेला सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की १ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास चित्रपटगृहात मज्जाव केल्यास त्या चित्रपटगृहावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
५.दादा जे.पी.वासवानी यांच्यावर अंत्यसंस्कार.
आध्यत्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांच्यावर काल सायंकाळी साडेसहा वाजता साधू वासवानी मिशनच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगीं माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

गजानन महाराजांची पालखी उस्मानाबाद शहरात

thumbnail 1531520761344
thumbnail 1531520761344

उस्नानाबाद | शेगाव चे संत गजानन महाराज यांची पालखी दर वर्षी पंढरपूरला जाते. गेल्या वर्षी पालखी सोबत चालत चाललेल्या हरीणामुळे पालखीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एरव्ही मराठवाड्यातून निघणाऱ्या संत एकनाथ महाराज आणि गजानन महाराज यांच्या पालख्या प्रसार माध्यमांच्या झोतात येत नाहीत.
संत गजाननमहाराजांची पालखी उस्मानाबाद मुक्कामी होती. एक दिवसाचा मुक्काम करुन आज पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.

दिल्लीत पहिल्या पावसाचे आगमन

thumbnail 15315203621038
thumbnail 15315203621038

दिल्ली | राजधानीत अाज पहिल्यांदा मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले. उन्हाळा संपूण दीड महिना झाला तरी दिल्लीत पावसाचा पत्ता नव्हता. दिल्लीकर घामाने पुरते बेजार झाले होते. अशात आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने देशाची राजधानी थंडावली आहे.
मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या सखल भागात पाणी साठले आहे. शहरातील मिंटो पुला खाली पाणी साठल्याने त्यात एक बस बुडाल्याची घटना काल संध्याकाळी चारच्या सुमारास घडली आहे. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवेतील गरव्याने दिल्लीकर सुखावले आहेत.

संभाजी भिडे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने गोत्यात

thumbnail 1531518713276
thumbnail 1531518713276

नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते.
भिडे गुरुजीच्या या वक्तव्यावर पीसीपीएनडीटी समिती नेमण्यात आली होती. समितीने भिडे गुरुजींना पीसीपीएनडीटी कायद्याच्या सेक्शन २२ चे उल्लंघन केल्याने दोषी ठरवले आहे. समिती गुरुजींच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. दरम्यान विरोधकांनी भिडे गुरुजींना अटक करा अथवा विधिमंडळ चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.

तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेल – सुनिल तटकरे

thumbnail 1531501710143
thumbnail 1531501710143

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी आज विधान परिषेदेत ‘..तर मी आत्महत्या करेन’ असे विधान केल्याने सभागृहात एकच गदारोळ उठला. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाला गुजराती भाषेतील पाने जोडली गेल्याचा आरोप तटकरे यांनी सत्त‍ाधारी भाजपवर केला होता. परंतु चंद्रकांत पाटलांनी तो फेटाळून लावला. त्यावर बोलताना ‘मी सरकारवर केलेला आरोप खोटा निघाला तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन’ तटकरेंनी असे विधान केले.
सुनिल तटकरेंनी सभागृहात सरकारला आत्हत्येची धमकी देताच विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. सभागृहात गदारोळ वाढत गेल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.