Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 6756

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो आहे’ असे हरभजनने ट्विटमधे म्हटले आहे. क्रोएशिया आणि फ्रान्स यांच्यातील विश्वचशकासाठी खेळल्या जाणाऱ्या फायनल सामन्याच्या ठीक अगोदर हरभजन सिंगने हे ट्विट केले आहे.
क्रोएशियाने फायनल मध्ये मारलेली धकड ही जगाला अचंबित करून सोडणारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंग याने हे विधान केले आहे. हरभजनसिंग याने या मार्मिक विधानाच्या खाली #soch bdlo desh bdlega (सोच बदलो देश बदलेगा) हा हॅशटॅग वापरला आहे.

 

अमेझॉन आणि फ्लिपकार्ड यांचा बंबर सेल, किमतीत ८०% पर्यंत सूट

thumbnail 1531718895918
thumbnail 1531718895918

मुंबई |अमेझॉन आणि फ्लिफकार्ड वर आज मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. दुपारी १२ वाजता या ऑफर सुरू होणार आहेत. अमेझॉन आणि फ्लिफकार्ड यांनी बाजारावर आलेली मंदी पाहता हा मोठा निर्णय घ्यायचे ठरवले असल्याचे बोलले जाते. भारतात घडलेल्या आर्थिक घडामोडीची याला किनार आहे.
अमेझॉन आणि फ्लिफकार्ड ही ग्राहकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे बनली आहेत. दिवाळी, दसरा या सणांना मोठया ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित करण्याची कामगिरी अमेझॉन आणि फ्लिफकार्ड करत असतात. मोबाईल कपडे यापासून ते गाईच्या गौऱ्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनईल माध्यमावर मिळत असतात. आजची ऑफर पदरात पाडून घेण्यासाठी लाखो ग्राहक अमेझॉन आणि फ्लिफकार्डवर गर्दी करण्याची शक्यता आहे.

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

thumbnail 1531714590686
thumbnail 1531714590686

पंढरपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खाजदार राजू शेट्टी रात्री बारा वाजता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठलास अभिषेक घालण्यासाठी मागणी केली. परंतु वारकऱ्यांची दर्शनाची गर्दी पाहता हा अभिषेक नाकारण्यात आला. राजू शेट्टी यांनी नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे.

शिर्डीमध्ये मारुतीच्या मूर्तीला रात्री बारा वाजता दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. बीडमध्ये सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला आहे तर अष्टविनायकापैकी असलेल्या थेऊरच्या चिंतामणीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. साडेतीन पिठातील एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने अभिषेक घातला आहे तर अर्थपीठ असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगीच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून स्वाभिमानीच्या वणी येथील कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

thumbnail 1531712823674
thumbnail 1531712823674

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत.
तिरुपती बालाजी हे देशातील श्रीमंत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानास भेट देण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. तिरूपती बालाजीच्याप्रति देशातील तमाम लोकांची मोठी श्रद्धा आहे. बालाजी मंदिरात रोज लाखो भाविक दर्शन घेतात. विशेषतः श्रावण महिन्यात इथे मोठी गर्दी असते.

पुण्या-मुंबईचा दुध पुरवठा होणार खंडीत, दुध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

thumbnail 1531711946024
thumbnail 1531711946024

पुणे | दुधाला पाच रूपये दर वाढ देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी छेडलेल्या आंदोनलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुध दरवाढीच्या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाले असून पुण्या-मुंबई आदी शहरी भागातील दुध पुरवठा खंडीत करण्या पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राज्यात ठीक ठिकाणी दुधाची रसद तोडली जात असून येत्या दोन दिवसात शहरी भागात दुधाची मोठी टंचाई दिसून येणार आहे. गोवा आणि कर्नाटक राज्यात दुधाला ५ रुपये अनुदान सरकारच्या वतीने दिले जाते. ‘महाराष्ट्रातही दुधाला ५ रुपये अनुदान देण्यात यावे अथवा सरकारने दुधाचे दर तरी पाच रुपयाने वाढवावेत’ अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांनी केली आहे.

काल मध्यरात्री पासून आंदोलनाला तोंड फुटले असून पुणे येथे रात्री २ वाजता चार टॅन्कर फोडण्यात आले आहेत. तर बुलढण्यात अमर दूधसंघाचा दुधाचा टॅन्कर फोडला आहे. आज सकाळी सहाच्या दरम्यान पुण्याच्या हडपसरमध्ये सोनाई दुधाचे टॅन्कर माघारी पाठवण्यात आले आहेत. दुधाचे आंदोलन मिटले नाही तर राज्याच्या शहरी भागात दुधाची मोठी टंचाई निर्माण होणार आहे. आंदोलनाला उतारा म्हणून सरकार दूध टॅन्करला संरक्षण देणार असल्याचे समजते.

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केला पंढरपूरातून आंदोलनाचा श्रीगणेशा

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

https://platform.twitter.com/widgets.js

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

thumbnail 1531659688837
thumbnail 1531659688837

अमरावती | सरकारला वारंवार इशारा देऊन ही सरकारने दूध आंदोलकांच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही म्हणून राज्यातील प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
काल मध्यरात्रीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्यासाठी विविध क्लुत्या राबवल्या आहेत.अमरावती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजते या ठिकाणी दुधाचा टॅन्कर पेटवून दिला आहे. पोलिसांनी ठीक ठिकाणी बंदोबस्त ठेवला असला तरी असे हिंसक प्रकार टाळण्यात त्यांना अपयश येत आहे.
आंदोलन बेमुदत असल्याने पोलीस व्यवस्थेवर ताण येतो आहे. तरी पोलीस आणि राज्य राखीव दल परिस्थिती वर नजर ठेवून आहेत

बातमी काल दिवसभराची

thumbnail 1531627039246
thumbnail 1531627039246

१.पूर्वांचल एक्सप्रेस वे कोनशीला मोदींच्या हस्ते.
उत्तर प्रदेशाच्या अजमगड मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोन शीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेत परिवारवादाच्या विरोधात विकासवाद असा नारा दिला
२.राष्ट्रपतीनी केले राज्यसभेवर चार सदस्य नियुक्त.
संविधानातील तरतुदी नुसार १२सदस्य राज्य सभेवर नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.त्यापैकी चार रिक्त जागी काल राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा,राम शकल,मूर्तिकार रघुनाथ महापात्रा, या चौघांची नेमणूक केली आहे.
३.सिंहगड घाट रस्त्यावर कोसळली दरड.
काल सकाळी सिंहगडाच्या रस्त्यावर दरड कोसळली आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही.दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकी साठी सहा दिवस बंद ठेवण्यात आला आहे.
४.उद्धव ठाकरेंनी घेतली पुण्यात बैठक.
पुण्यासहित सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जिल्यातील पदाधिकाऱ्यासोबत पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधले.
५.तुकोबांच्या पालखीचे गोल रिंगण तर ज्ञानोबांच्या पालखीचे उभे रिंगण.
तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीत गोल रिंगण पार पडले तर ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचे उभे रिंगण चांदोबाच्या लिंबा जवळ पार पडले.तुकोबांचा सणसर तर ज्ञानोबांचा तरटगाव या ठिकाणी मुक्काम होता.

धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

thumbnail 1531622992908
thumbnail 1531622992908

बारामती | ‘धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.’ असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ‘या सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचेच नाही. जर द्यायचे असते तर धनगरांचे सर्वेक्षण आणि संशोधन टाटा इन्स्टिट्यूट ला का दिले ? असा सवाल पवार यांनी बारामतीत केला आहे.

शरद पवार यांनी धनगर समाजाला राज्यात आरक्षण देण्यासाठी धनगर समाजाचे नेते शिवाजीराव शेंडगे यांच्याशी चर्चा करून लगेच निर्णय घेतला होता. तशी तत्परता हे सरकार कधी दाखवणार असा प्रश्नही अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.

अहिल्या विकास प्रतिष्ठान आयोजित अहिल्या समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभात अजित पवार बोलत होते. ‘धनगरांना आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला दिल्लीत दिली जात नाहीत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत राज्य आणि केंद्र सरकार नेहमी टाळाटाळ करतात’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. दत्तात्रय भरण, पुणे जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

thumbnail 1531591893067
thumbnail 1531591893067

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील

#रविवार_विशेष

पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या सर्वांचा कलंक लागला आहे. दोन देशांच्या वादात हा भूमीचा सुंदर तुकडा रुतून पडला आहे. तरीही कश्मीरमध्ये स्वतःची निसर्गदत्त धमक आहे जी या स्वर्गाला कोणत्याही परिस्थितीत नरक होऊ देत नाही. कश्मीरवर ही परिस्थिती का आली. कश्मीरची जमिनी स्थिती काय आहे. काश्मीरला या दलदलीतून बाहेर काढता येईल का. कसे काढता येईल या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ घेऊन जाण्याची क्षमता ए.एस.दुलत यांच्या काश्मीर-वाजपेयी पर्व या पुस्तकात आहे.
प्रस्तुत पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण या पुस्तकाचे लेखक ए.एस.दुलत हे भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW चे माजी महासंचालक होते. तसेच या आधी ते काश्मीर राज्याचे आय.बी.प्रमुख होते. पंतप्रधान वाजपेजी यांच्या काळात ते पंतप्रधानांचे काश्मीर विषयाचे सल्लागार म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांनी पुस्तकाममध्ये दिलेली उदाहरणे, वस्तुस्थिती ही अतिशय विश्वासार्ह आहे. प्रदीर्घ काळ काश्मीरमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भारतीय कंधार विमान अपहरण असो, माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती सईद यांच्या मुलीचे अपहरण असो वा कारगीलची लढाई असो अशा अवघड तणावग्रस्त वातावरणात जीथे आय.बी.च्या अधिकार्यांना वेचून वेचून ठार मारले जात होते. त्या काळात सगळे भारतीय प्रशासकीय अधिकारीही काश्मीर सोडून पळून जात होत. या काळातही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दुलत यांच्या मते काश्मीरींशी कायमस्वरुपी संवाद साधत राहणे हाच एकमेव उपाय आह. यामुळे सीमेपलिकडे गेलेल्या अनेक दहशतवाद्यांचं परिवर्तन घडून आलं आणि ते मुख्यप्रवाहात आले. परंतु दिल्लीत बसलेल्या नेत्यांना काश्मीरियतची नसलेली ओळख आणि गैरसमज आणि हवे असलेले जलद परिणाम यामुळे काश्मीरममध्ये भारत सरकार पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेलं नाही.
या पुस्तकात दुलत यांनी हुर्यत सारखे फुटीरतावादी, त्यांचे नेते त्यांना मिळणारी पाकिस्तानी मदत, काश्मीरमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस.आय. ची कार्यप्रणाली या विषयी पूर्ण माहीती देताना भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमधील संवाद-बैठकांसारखे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. दुलत यांचा दहशतवाद्यांपासून, फुटीरतावाद्यांपर्यंत सगळ्यांशी संवाद होता. काश्मीरचे लोकप्रिय नेते आणि मुख्यमंत्री फारुख अबदुल्लांशी तर त्यांची खास मैत्री होती. काश्मीरचे राजकारण हाही एक महत्वाचा विषय पुस्तकामध्ये सविस्तर आहे. यात पी.डी.पी. असो नॅशनल कॉनफरन्स या पक्षांची कार्यप्रणाली, त्यांचे नेते, त्यांचे छूपे अजेंडे या विषयी महत्वाची माहीती तर मिळतेच पण कशाप्रकारे फुटीरतावादी नेते भारताच्या बाजूने झुकल्या नंतर त्यांची हत्या होते याही भयावह रोमांचक घटना दुलत यांनी जवळून पाहून नमूद केल्या आहेत …
वाजपेजी आणि मुशर्फ यांनी कशा प्रकारे काश्मीरचा प्रश्न सोडवत आणला होता परंतु मनमोहन सिंग सरकारने ही संधी वाया घालवली यावरही त्यांनी उहापोह केला आहे.
दुलत यांनी स्वतः कशाप्रकारे दहशतवाद्यांशी बोलून त्यांना मुख्य प्रवाहात आणलेहेही वाचण्यासारखे आहे. यात शाबिर शहा, नईम कुरेशी, फिरदौस यांच्या सारखे बडे अतंकवादीही आहेत. तसेच इतके वर्षे भारतीय सैन्य तिथे आसल्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
काश्मीर प्रश्न भावनिक न होता अभ्यासायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कारण काश्मीरी माणूस हा अनेक वर्षे भारतीय सैन्य, फुटीरतावादी, दहशतवादी, पाकिस्तान यांच्यात पिचलेला आहे आणि वाजेपींचा संवादाचा उपक्रमच यावर कसा तोडगा काढू शकतो हे यातून समोर येते.

पुस्तक परीक्षक – प्रणव पाटील

(लेखक आय.एल.एस. लाॅ काॅलेज येथे वकीलीचे शिक्षण घेत असून आतंरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत)

काश्मीर – वाजपेयी पर्व
लेखक – ए.एस.दुलत
अनुवाद – चिंतामणी भिडे
इंद्रायणी प्रकाशन,पुणे
मूल्य – 375

भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

thumbnail 15315860054491
thumbnail 15315860054491

लखनऊ | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अझमगड येथे भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पायाभरणी केली. ३५४ कि.मी. लांबी असणारा हा महामार्ग लखनऊ ते गाजीपूर असा असणार आहे. पूर्वांचल दृतगती महामार्ग असे या महामार्गाला नाव देण्यात आले आहे.

महामार्गामुळे पूर्वेकडील वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे. लखनऊ ते गाजीपूर हे अंतर महामार्ग झाल्यानंतर ४ ते ५ तासात पार करणे शक्य होणार आहे. लखनऊ येथून सुरु होणारा हा महामार्ग फैजाबाद, अमेठी, आजमगढ, गाजीपूर आदी शहरांतून जाणार असून तो सहा पदरी असणार आहे. या दृतगती महामार्गाकरता साधारण १७ हजार कोटी इतका खर्च येणार आहे.