१.अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत मागासवर्गीयांना आरक्षण नाही-सर्वोच्च न्यायालय
अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.सदरची याचिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली होती.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.
२.गणेशोत्सवा दरम्यान थर्माकोल वापरास बंदीच.मुंबई उच्च न्यायालय
थर्माकोल उत्पादक आणि सजावटीचे कलाकार यांनी गणेशोत्सवात थर्माकोल ची बंदी शिथिल करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने काल निकाल देत याचिका फेटाळली आहे.तसेच राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले आहे.
३.नवाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये अटक.
बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज या दोघांना काल रात्री लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे.नॅशनल अकॅण्टटेब्यालिटी ब्युरो आणि पाकिस्तानचे हंगामी सरकार यांनी ही अटक घडवून आणली आहे.
४.मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात आता घेऊन जाता येणार बाहेरील खाद्यपदार्थ.
अव्वाच्यासव्वा दर आकारून मल्टिफ्लेक्स मध्ये ग्राहकांची लूट केली जात होती.याच विषयावर काल विधान परिषदेत धनंजय मुंडेंनी लक्षवेधी सूचना मांडली या सूचनेला सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की १ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास चित्रपटगृहात मज्जाव केल्यास त्या चित्रपटगृहावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
५.दादा जे.पी.वासवानी यांच्यावर अंत्यसंस्कार.
आध्यत्मिक गुरू दादा जे.पी.वासवानी यांच्यावर काल सायंकाळी साडेसहा वाजता साधू वासवानी मिशनच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रसंगीं माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बातमी काल दिवसभराची
गजानन महाराजांची पालखी उस्मानाबाद शहरात
उस्नानाबाद | शेगाव चे संत गजानन महाराज यांची पालखी दर वर्षी पंढरपूरला जाते. गेल्या वर्षी पालखी सोबत चालत चाललेल्या हरीणामुळे पालखीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एरव्ही मराठवाड्यातून निघणाऱ्या संत एकनाथ महाराज आणि गजानन महाराज यांच्या पालख्या प्रसार माध्यमांच्या झोतात येत नाहीत.
संत गजाननमहाराजांची पालखी उस्मानाबाद मुक्कामी होती. एक दिवसाचा मुक्काम करुन आज पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे.
दिल्लीत पहिल्या पावसाचे आगमन
दिल्ली | राजधानीत अाज पहिल्यांदा मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले. उन्हाळा संपूण दीड महिना झाला तरी दिल्लीत पावसाचा पत्ता नव्हता. दिल्लीकर घामाने पुरते बेजार झाले होते. अशात आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने देशाची राजधानी थंडावली आहे.
मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या सखल भागात पाणी साठले आहे. शहरातील मिंटो पुला खाली पाणी साठल्याने त्यात एक बस बुडाल्याची घटना काल संध्याकाळी चारच्या सुमारास घडली आहे. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवेतील गरव्याने दिल्लीकर सुखावले आहेत.
संभाजी भिडे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने गोत्यात
नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते.
भिडे गुरुजीच्या या वक्तव्यावर पीसीपीएनडीटी समिती नेमण्यात आली होती. समितीने भिडे गुरुजींना पीसीपीएनडीटी कायद्याच्या सेक्शन २२ चे उल्लंघन केल्याने दोषी ठरवले आहे. समिती गुरुजींच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. दरम्यान विरोधकांनी भिडे गुरुजींना अटक करा अथवा विधिमंडळ चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.
तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेल – सुनिल तटकरे
नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी आज विधान परिषेदेत ‘..तर मी आत्महत्या करेन’ असे विधान केल्याने सभागृहात एकच गदारोळ उठला. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाला गुजराती भाषेतील पाने जोडली गेल्याचा आरोप तटकरे यांनी सत्ताधारी भाजपवर केला होता. परंतु चंद्रकांत पाटलांनी तो फेटाळून लावला. त्यावर बोलताना ‘मी सरकारवर केलेला आरोप खोटा निघाला तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन’ तटकरेंनी असे विधान केले.
सुनिल तटकरेंनी सभागृहात सरकारला आत्हत्येची धमकी देताच विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. सभागृहात गदारोळ वाढत गेल्याने सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार
भोपाळ | एका मॉडेलच्या घरात शिरुन तिला दिवसभर ओलिस ठेवण्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात आज घडला. मॉडेल राहत असलेल्या घरात एक तरुण सकाळी नाट्यमयरित्या शिरला आणि त्याने चक्क पोलीसांना न जुमानता त्या माॅडेलला दिवसभर कैद करुन ठेवले. प्रसंगी त्याने फ्लॅटच्या गॅलरीतून गोळीबारही केला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
हाती आलेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील एका मॉडेलच्या घरी सकाळी माथेफिरू शिरला. त्याने घराची दारे खिडक्या लावून घेतली आणि मॉडेलला मारहान सुरु केली. मुलीचा आरडा ओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी पोलीसांना फोन लावला. पोलीस अपार्टमेंटखाली आल्यावर त्या माथेफीरुने फ्लॅटच्या गॅलरीतून पोलिसांवरही गोळीबार केला. पोलिसांनी अपार्टमेंटला चौहुबाजूने घेरले. काहीवेळासाठी अपार्टमेंटला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान या माथेफिरूने फ्लॅटमधून एक व्हिडिओ शुट केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला. मॉडेलची आणि त्याची मुंबईमधे ओळख झाल्याचे आणि मुंबईत दोघंही सोबत माँडेलिंग करत असल्याचे त्याने व्हिडिओमधून सांगीतले. मुंबईत असताना दोघांत घनिष्ठ संबंध होते मात्र पुढे मॉडेलने त्याला दगा दिल्याचंही त्याने व्हिडिओत सांगितलं. नंतर कॅमेऱ्यात रक्ताचे डाग दाखवून ती स्वत:च्या चुकांचे परिणाम भोगत असल्याचे तो माॅडेलला उद्देशून व्हिडिओत बोलत होता. हे सर्व प्रकरण एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला लाजवेल असेच चालू होते. आता पुढे काय होतंय अशी सर्वांनाच काळजी लागून राहीली होती. मात्र पोलिसांच्या हालचालींना यश आले आणि मोठा अनर्थ टळला. पोलीसांनी त्या तरुणाशी फोनवर संवाद साधला आणि त्याला गोड बोलून त्या तरुणीची सुटका करण्यास तयार केले. अखेर ७ वाजून ३५ मिनिटांनी या नाट्यास पूर्णविराम मिळाला.
शरद पवारांच्या बारामतीत तुकोबांचा मुक्काम, माऊलींनी नीरास्नान घेऊन गाठला लोणंद मुक्काम
बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आजच्या रात्री पालखी लोणंद मुक्कामी असून उद्या तरटगाव येथे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे.
दरम्यान तुकोबांची पालखी शरद पवारांच्या बारामती मध्ये दाखल झाली आहे. तुकोबांच्या पालखीचे काल बारामती तालुक्याच्या सीमेत प्रवेश करते वेळी जी.प.सदस्य रोहित पवार यांनी स्वागत केले.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांची उभी आणि गोल रिंगणे उद्या पासून सुरू होणार आहेत. पालखीतील रिंगण सोहळ्यामुळे वारीची उत्कटता वाढत जाणार आहे.
आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार
नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे.
पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी दरांचा खरपूरस समाचार घेतला होता. तसेच मनसेने मल्टिफ्लेक्सच्या विरोधात ‘खळखट्याक’ आंदोलन सूरु केले होते. सरकारच्या या निर्णयाचे सर्वसामान्य लोकांनी स्वागत केले आहे. मल्टिफ्लेक्स चित्रपटांच्या मुजोर धोरणाला अटकाव केल्याने लोक आनंदी आहेत.
प्रियांका चोपडा भारता बाहेर साजरा करणार वाढदिवस
मुंबई | प्रियांका चोपडा यंदा आपला वाढदिवस परदेशातच साजरा करणार आहे. १८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस असून बाॅयफ्रेंड निक सोबत न्यूयॉर्क येथे वाढदिवस साजरा करण्याचे प्रियांकाचे ठरवले आहे.
अलीकडच्या काही दिवसांपासून निक जोनस आणि प्रियांका चोपडा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाॅलिवुडमधे चर्चा सुरु आहे. निक जोनस हा प्रियांका चोपडा पेक्षा १० वर्षानी लहान आहे. काही दिवसापूर्वी प्रियांका न्यूयॉर्क ला गेली होती तिथं ती निक जोनसच्या घरच्यांना भेटली तसेच निकच्या परिवारासोबत सायकल चालवण्याचा आनंद घेतानाचे तिचे फोटो समोर आले होते.
प्रियंकाच्या वाढदिवसाच्या काळात निक व्यस्त असणार आहे म्हणून वाढदिवस साजरा करायला प्रियांका न्यूयॉर्कला जाणार आहे. मागील महिन्यात निक भारतात आला होता. प्रियंकाच्या आई मधु चोपडा यांना भेटून त्यांच्या सोबत जेवण घेतले होत. तसेच प्रियाका आणि निकने आकाश अंबानीच्या साखरपुड्यात जोडीने हजेरी लावली होती. प्रियांका चोपडा पुढच्या आठवड्यात ‘कमबैक’ चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. कमबैक चित्रपटाची शूटिंग संपल्यावर निक प्रियंकाला भेटायला येणार आहे.
समुद्र खवळला आणि नरिमन पॉईंटला बनला कचऱ्याचा ढीग
मुंबई | मागील सहा दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने मुंबईचे नाले रस्ते तुडूंब भरल्याने महानगरातील सगळा प्लॅस्टिक कचरा गोळा होऊन समुद्रात मिसळला होता. सोसाट्याच्या वार्याने आणि सतत बरसणार्या पावसामुळे अाज समुद्राने रौद्र रूप धारण केले होते. दुपारी समुद्राला अचानक भरती आली आणि नरिमन पॉइंटच्या रस्त्यावर अर्ध्या पर्यंत प्लॅस्टिक कचऱ्याचा ढीग उभा झाला. तसेच पाण्याने धोह निर्माण केले. पाण्याचा धोह आणि प्लॅस्टिकच्या ढिगाने महापालिका प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. आजच्या या नैसर्गिक प्रसंगाने देखील नकळत प्लॅस्टिक बंदी किती महत्वाची आहे| सांगितले आहे.










