Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 6760

भिंतीतून प्रकट झाले साईबाबा

thumbnail 1531477936662
thumbnail 1531477936662

शिर्डी | सध्या सोशल मिडियावर साई बाबांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत साई बाबा भिंतीतून प्रकट झाल्याचे दिसत आहे. ‘मी भक्तांचे रक्षण करण्यासाठी परत आलो आहे’ अशी कबुली सदर व्हिडिओत साईबाबांनी दिली आहे. सदर व्हिडीओ साईबाबांच्या व्दारकामाईतील समाधी गाभाऱ्यातील आहे. व्हिडीओ बघितल्यावर तो अत्यंत वास्तववादी असल्याचे दिसून येते आहे.

सदर घटना ज्यावेळी घडली त्यावेळी उपस्थित व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियात पोस्ट केला. काही वेळातच व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र आता या व्हिडिओमागील सत्य शिर्डीतील साईबाबा मंदिर समितीने समोर आणले आहे. “तो व्हिडिओ एक अफवा असून तो ट्रोल व्हिडीओ असल्याचे समितीने म्हटले आहे.

साईबाबांनी त्यांच्या जीवणकाळात अंधश्रद्धे वर कायम टीका केली होती. त्यांच्या बद्दल असा व्हिडीओ प्रसारित होणे ही एक प्रकारे अंधश्रद्धाच आह. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन साई बाबा मंदिर समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.

चंद्रकांतदादा अजून किती बळी घेणार

thumbnail 1531473446086
thumbnail 1531473446086

कल्याण |रस्त्यांवरील खड्यांमुळे होणार्या अपघातांची संख्या येत्या काही दिवसांत वाढली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्यांमधे गाडी गेल्याने ताबा सुटून अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला अाहे. त्यामुलळे ‘रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करणाऱ्या चंद्रकांत दादांना सामान्य माणसे प्रश्न विचारू लागली आहेत. ‘तुम्ही अजून किती जणांचे बळी घेतल्यावर खड्डे बुजवणार आहात’ असा सवाल राज्याचे सार्वजणीक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील याना जनता विचारत आहे.

आज सकाळीच कल्याणच्या गांधारी पुलावर कल्पेश जाधव या तरुणाची गाडी खड्ड्यात घसरली. मागून येणाऱ्या टेम्पोने त्याला चिरडले आहे. या महिन्यात कल्याण परिसरात घडलेली ही तिसरी घटना आहे. वारंवार होणार्या अपघातांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. गेल्या शनिवारी ७ जुलै रोजी मनीषा बोहिर यांची गाडी खड्ड्यात घसरल्याने मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या देहाला चिरडून टाकले होते. खड्ड्यामुळे अपघात होण्याची प्रकरणे फक्त कल्याण मध्ये घडत नसून राज्याच्या अनेक भागात असे अपघात घडत आहेत. खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तरी नेत्याने पुढे यावे असा सवाल प्रसार माध्यमांनी विचारला आहे.

नानार प्रकल्पाच्या विरोधावर शिवसेना ठाम, प्रचंड गदारोळात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब.

thumbnail 1531472777537
thumbnail 1531472777537

नागपूर | नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होऊ नये यासाठी कॉग्रेस,राष्ट्रवादी सहित शिवसेनेने दंड थोपटल्याने भाजपा एकटी पडली आहे. शिवसेना नानार प्रकल्पाच्या विरोधावर ठाम राहीली आहे. नानार प्रकल्पावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. नानार प्रकल्पावरुन विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडण्याचा आज तिसरा दिवस आहे.

‘कुणावर ही अन्याय अथवा बळजबरी केली जाणार नाही. सर्वाना विश्वासात घेतल्यावरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल’ असे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी नानार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत निवेदन दिताना म्हटले आहे. मात्र भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने यावेळी नानार प्रकल्पाच्या सरकारच्या भुमिकेला पाठिंबा दिला नाही. शिवसेनेचे नेते अनिल प्रभु यांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार भाषण केले. तसेच ‘नानार प्रकल्पाची जमीन अधिग्रहण करण्यात घोटाळा होत आह’ असा सणसणीत आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. सभागृहात माजलेला गोंधळ पाहता विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केले.

डोनाल्ड ट्रम्प उर्फ ‘तात्या’ प्रजासत्ताक दिनाला भारतात

thumbnail 1531459857074
thumbnail 1531459857074

दिल्ली | ट्रम्प तात्या या नावाने सोशल मिडियावर प्रसिद्ध असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदाच्या प्रसासत्ताक दिनी भारत दौर्यावर येणार आहेत. जगावर पाटीलकी गाजवू पाहणाऱ्या बलाढ्य महासत्तेच्या राष्ट्रध्यक्षांना भारताने आपल्या प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले आहे. वास्तविक पाहता हे निमंत्रण एप्रिल मध्ये देण्यात आले होते परंतु अद्याप यावर अमेरिकेकडून उत्तर देण्यात आलेले नाही. प्रसार माध्यमात या निमंत्रणाच्या चर्चा काल पासून सुरु झाल्या आहेत.

यापूर्वी अमिरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २०१५ सालच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते. डोनाल्ड ट्रप यांनी जर निमंत्रण स्वीकारले तर भारतीय परराष्ट्र धोरणाचा तो मोठा विजय असेल. तसेच भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा वाढवण्यासाठी हा पाहुणचार उपयोगी ठरणार आहे. ट्रप तात्या या लाडक्या नावाने महाराष्ट्राच्या सोशल मीडियात प्रसिद्ध असणारे डोनाल्ड ट्रम्प जर भारतात आले तर महाराष्ट्रातील सोशल मीडियाला उधाण येणार आहे हे मात्र नक्की आहे.

बातमी काल दिवसभराची

thumbnail 1531448265191
thumbnail 1531448265191

टीम HELLO महाराष्ट्र |

१. समलिंगी संबंधांसंदर्भातील आयपीसीचे कलम ३७७ नुसार शारिरीक संबंध ठेवणे गुन्हा मानण्याचे रद्द केल्यावरच समलिंगीना समाजात बरोबरीचे स्थान मिळेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे.

२.नानार प्रकल्पालवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब.प्रकल्प रद्द झाल्या शिवाय आम्ही कामकाज होऊ देणार नाही असा विरोधकांचा सरकारला इशारा.

३.विधी महाविद्यालयांचे प्रवेश यंदाही उशिरा. पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टल तर तिसरी गुणवत्ता यादी १०ऑक्टोंबरला आणि ५ नोव्हेंबर पर्यंत चालणार प्रवेश प्रक्रिया.

४. सिंधी समाजाचे धर्मगुरू आणि साधू वासवानी मिशन चे संस्थापक दादा जे पी वासवानी यांचे पुण्यात वयाच्या ९९ व्या वर्षी निधन.

५.अबगणिस्तान च्या उत्तर भागात कुंडुझ शहरात झालेल्या दहशदवादी हल्ल्यात ४०जवान आणि पाच पोलीस ठार.

जयंत सिन्हा यांनी दिले राहुल गांधींना ओपन चॅलेंच

thumbnail 1531447391630
thumbnail 1531447391630

दिल्ली | केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हांवर वार केला होता. बीफ विक्रेत्याला मारहाण करुन ठार करणार्यांना सिन्हा यांनी हार घालून गौरवल्याबद्दल राहुल गांधींनी निषेध नोंदवला होता. हॉर्वर्ड यूनिवर्सिटीचा माजी विद्यार्थी असलेल्या जयंत सिन्हा यांच्या विरोधात दाखल केलेल्या ऑनलाईन खटल्याला आपले समर्थन द्या असे आवाहनही राहुल गांधींनी यावेळी केले होते.

झारखंड मधील रामगड शहरात २९ जून २०१७ रोजीअलीमुद्दीन अंसारी नावाच्या बीफ मटण विक्रेत्यास गोमांस विक्रीच्या संशयातून ११ इसमांनी बेदम मारले होते. त्यात त्या बीफ मटण विक्रेत्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील ११ पैकी ८ लोकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अर्ज मंजूर झाल्याने त्यांची जामिनावर सुटका झाली आणि याच सुटलेल्या ८ लोकांना जयंत सिन्हांनी हार घालून गौरवले. या कथित प्रकारावर जयंत सिन्हा यांच्यावर सोशल मीडिया तसेच राजकीय वर्तुळात प्रचंड टीका झाली. या टीकेचा समाचार घेण्याच्या दृष्टीने जयंत सिन्हांनी राहुल गांधींना चर्चेचे ओपन चॅलेंच दिले आहे. ‘राहुल गांधींनी माझ्या शिक्षणाचा उल्लेख करून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली आहे त्यामुळे राहुल गांधीने माझ्याशी चर्चा करून माझे मुद्दे खोडून काढावे’ असे जयंत सिन्हा म्हणाले आहेत.

नितीश कुमार यांच्याशी आमचं अतूट नातं – अमित शहा

thumbnail 1531404679398
thumbnail 1531404679398

पटना |देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीचे वारे वाहू लागले अाहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. २०१९ च्या निवडणुकांची व्युहरचणा करण्यासाठी शहा दौर्यावर आहेत. दरम्यान शहा यांनी संघटन बांधनीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश राज्य भाजपला दिले आहेत. नितीश कुमार आणि अमित शहांची आजची भेट यासंदर्भात महत्वपूर्ण ठरली आहे. पटना येथे झालेल्या बैठकीत भाजप आणि जदयु यांच्यात युतीची रणनिती ठरवण्याबद्दल विस्तृत चर्चा झाली आहे. परंतु अद्याप कोणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यावेळी वाटाघाटीच्या बर्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. ‘भ्रष्टाचारी लोकांच्या सोबत नितीश बाबू राहू शकत नव्हते म्हणून ते आमच्या सोबत आले आहेत’ असे सुचक विधान यावेही अमित शहा यांनी केले आहे. तसेच ‘भाजपला छोट्या पक्षाना सोबत घेऊन जायचं समजत. तेव्हा कृपया विरोधकांनी नितीशकुमारांच्यासाठी लाळ घोटने सोडून द्यावे’ असे म्हणुन शहा यांनी विरोधकांच्यावर तोंड सुख घेतले आहे.

लालू प्रसादांना घरी जाऊन भेटले अशोक गेयलोत

thumbnail 1531403541787
thumbnail 1531403541787

पटना | कॉग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव अशोक गेयलोत यांनी लालू प्रसाद यादव यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. २०१९ च्या निवडणुकांची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला आहे. एकुण चार घोटाळे नावावर असलेले आणि त्यासाठी एकत्रित शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव सध्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने अस्थायी स्वरुपाच्या जामिनावर बाहेर आहेत. २००९ साली लालू प्रसाद यांच्या राजद आणि कॉग्रेसची आघाडी तुटली होती. तेव्हापासून बिहार विधानसभेच्या निवडणुकापर्यंत ही आघाडी होऊ शकली नाही. विधानसभा निवडणुकीतील ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा अबाधित राहावी असा कॉग्रेसचा मनसुबा आहे. त्या अनुषंगाने गेहलोत आणि लालू यादव यांच्यात बोलणी झाल्याचे समजत आहे. राजद ने आपला निर्णय राखून ठेवला आहे. परंतु कॉग्रेसने बिहारच्या ४० जागी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

शशी थरूर यांच्या त्या विधानाला महंमद अन्सारींचा पाठींबा

thumbnail 1531399497042
thumbnail 1531399497042

दिल्ली | काल शशी थरूर यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या वर जबर हल्ला चढवला होता. ”२०१९च्या निवडणूकीत जर भाजप सत्तेत आले तर भारताचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही” असे सनसनाटी वक्तव्य थरुर यांनी केले होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती महम्मद हमीद अन्सारी यांनी आज थरूर यांच्या त्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘शशी थरूर हे शिकले सवरलेले व्यक्ती आहेत त्यामुळे ते बोलले ते योग्यच बोलले असावेत’ असं म्हणुन अन्सारी यांनी थरुर यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु ‘मी त्यांचे विधान ऐकले नाही’ अशी पुष्टीही यावेळी अन्सारी यांनी जोडली आहे.

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?

thumbnail 1531392762612
thumbnail 1531392762612

मुंबई | मास्टर बॉस्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बॉलीवूड मध्ये साराची एन्ट्री होताच जानवी कपूर आणि आलीया भट यांना प्रतिस्पर्धी निर्माण होईल असे बोलले जात आहे. बॉलिवूड मधील सिनेतारकांसोबत साराचे फोटो व्हायरल होत आहेत. यावरून हा अंदाज लावला जातो आहे की आगामी काळात सारा बॉलिवूडमध्ये झळकू शकते.
मागील वर्षी साराने एक चित्रपट साइन केल्याची आणि त्या चित्रपटाचा शाहिद कपूर हिरो असल्याची बातमी झळकली होती. त्यावर सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण दिले होते आणि ही अफवा असल्याचे सांगितले होते. तसेच साराला एका व्यक्तीने फोन करून लग्नाची मागणी घातली होती आणि नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याव्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.
मुकेश अंबानींचा मुलगा आकाश याच्या सारखरपुड्यात सारा आई वडिलांच्या सोबत आली होती तेव्हा या चर्चेला आणखीच उधाण आले होते. परंतु सारा तेंडुलकर बॉलिवूड मध्ये येणार या बाबतीत साराकडून कोणतेही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.