मुंबई : पुणे येथील माईर्स एम.आय.टी. स्कूल प्रशासनाने बुधवारी विचित्र फतवा काढला होता. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न संस्था प्रशासनाने केला होता. त्यावर बोलताना संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हणले आहे. पुण्याच्या सहाय्यक शिक्षण संचालकांना सदरील प्रकरणाबाबत कमिटी नेमूण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले आहे.
विश्वशांती एम.आय.टी. स्कूलने फतवा काढून विद्यार्थी आणि पालक यांच्यामधे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात काही पालकांनी याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागीतली होती. विद्यार्थ्यांनी पांढर्या किंवा फिक्कट रंगांची अंतर्वस्त्रे खालावीत, मुलींनी लिपस्टीक लावू नये, स्कर्टची लांबी प्रमाणात असावी, इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा बोलल्यास प्रवेश रद्द केला जाईल अशा प्रकारचे विचित्र नियम फतव्यात नमुद करण्यात आले होते.
पुण्यातील एम.आय.टी. स्कूलवर चौकशी करुन कारवाई करणार – विनोद तावडे
शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही – सुब्रह्मन्यम स्वामी
दिल्ली : नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमूळे चर्चेत असणारे सुब्ह्रमन्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा सनसनाटी वक्तक्य केले आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना आता परदेशात जाऊन त्यांच्या गर्लफ्रेंन्ड्ना भेटता येणार नाही असे त्यांनी ए.एन.आय. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने सुनंदा पुष्कर खटल्यासंबधी निकाल देताना शशी थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय थरुर यांनी परदेशात जाऊ नये असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे. दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना सुब्र्हमन्यम स्वामी यांनी सदरील विधान केले आहे. “होय, आता शशी थरुर देशाबाहेर जाऊन जगातील विविध भागात असलेल्या त्यांच्या गर्लफ्रेंड्सना भेटू शकणार नाहीत” असे स्मामी यांनी म्हणले आहे.
शशी थरुर यांना परदेशी जाण्यास दिल्ली न्यायालयाचा मज्जाव
दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना परदेशी जाण्यास न्यायालयाने मज्जाव केला अाहे. सुनंदा पुष्कर प्रकरणासंबधी निकाल देताना दिल्लीच्या पटीयाला हाऊस न्यायालयाने थरुर यांना परदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय थरुर यांनी परदेशात जाऊ नये असे न्यायालयाने निकालात म्हणले आहे. यामुळे शशी थरुर यांच्या परदेश दौर्यांवर निर्बंध आले आहेत. शशी थरुर यांनी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातील पुरावे आणि साक्ष यांच्यात लुडबूड करु नये असेही न्यायालयाने म्हणले आहे.
या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती
टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे.
पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार जागा खालीलप्रमाणे –
ग्रामविकास विभाग – ११ हजार पदे
सार्वजनिक आरोग्य विभाग – १० हजार ५६८ पदे
गृह विभाग – ७ हजार १११ पदे
कृषी विभाग – २ हजार ५७२ पद
पशुसंवर्धन विभाग – १ हजार ૪७ पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग – ८३७ पदे
जलसंपदा विभाग – ८२७ पदे
जलसंधारण विभाग – ૪२३ पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग – ९०
नगरविकास विभाग- १ हजार ६६૪ पदे
आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!
मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिरात दिली जाईल. ‘शासनाच्या सर्व विभागांनी ३१ डिसेंबर २०१८ अखेर होणार्या एकुण रिक्त पदांची माहीती राज्य सरकाला १७ जुलै पर्यंत द्यायची आहे. त्यानंतर या महिणअखेरीस साधारण ३६ हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर केली जाईल’ अशील माहीती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या परिक्षा एकाच वेळी घेण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.
आषाढी वारीचा सोहळा आज पासून सुरु, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूवरुन प्रस्थान
देहू : आज पासून आषाढी वारीचा सोहळा सुरु झाला आहे. श्री क्षेत्र देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. देशभरातील वारकरी विठ्ठलाचा गजर करत सोहळ्यात दाखल होत आहेत. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होऊन निगडीमार्गे पालखी ६ जुलैला आकुर्डीमधे मुक्कामास असणार आहे. ७ जुलै रोजी पुण्यातील निवडुंग विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होणार असून ९ तारखेला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान हिणार आहे.
मुलींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालायची ते आता महाविद्यालय प्रशासन ठरवणार, पुण्याच्या एम.आय.टी. स्कुलचा अजब फतवा
पुणे : एम.आय.टी. संस्था प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी अजब आचारसंहिता लागू केली आहे. संस्थेने घालून दिलेले जगावेगळे नियम वाचल्यानंतर आपण भारतात आहोत की तालिबानमध्ये असा प्रश्न आचारसंहिता वाचणार्याला पडतो आहे. या नियमावलीत एका पेक्षा एक सरस नियम लागू करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाने केला आहे.
”मुलींनी पांढरी किंवा क्रीम रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत.” हा पहिला नियम. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे त्यांनाच माहीत. मुलींनी लिपस्टिक/लिपबाम लावून शाळेत यायचे नाही. कानातील आभूषणे सोडून कोणतीच आभूषणे परिधान करायची नाहीत. असे अनेक नियम आचारसंहीतेत नमुद केले आहेत. यामुळे महाविद्यालयातील मुलींच्या स्वातंत्र्यावरच गदा आली आहे.
मुलांनी कोणत्याच राजकीय सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही. विद्यार्थी जर दहा वेळा इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत बोलताना आढळला तर त्याचा प्रवेश रद्द केला जाणार. या अशा नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आले आहेत. आचारसंहितेतील कोणत्याही नियमाचा भंग अथवा शाळेच्या विरोधात आंदोलन केल्यास त्या विद्यार्थ्याच्या पालकांवर फौजदारी खटला भरला जाईल असेही नियमावलीत म्हणले आहे.
विद्येचे माहेरघर म्हणुन ओळख असलेल्या पुण्यामधे अशा प्रकारचा फतवा निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विविध विद्यार्थी संघटना एम.आय.टी. प्रशासनाच्या या तालिबानी फतव्याचा विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, ७२ हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर
मुंबई : पुढील वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तरुणाईला आकर्षीत करण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने मेगा भरती जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा भरती ही मागील वीस वर्षांतील सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे.
२०१९ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने बेरोजगारीला उतारा म्हणून सर्व खात्याची मेगा भरती काढली आहे. बेरोजगारी मुळे सरकारवर तरुण नाराज आहेत. या नाराजीला थोडासा दिलासा म्हणून ही मेगा भरती आखली असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मेगा भरतीची अधिसूचना ३१ जुलै पर्यंत सुटणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एकुण ७२,००० जागांसाठी मेगा भरती होणार असून ती दोन टप्प्यात होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.
शिवसेनेची दुटप्पी भूमिका, बुलेट ट्रेनला विरोध पण २५० कोटींच्या पुरवणी मागणीला पाठींबा
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधी मंडळात निधीचा पुरवणी मागणी प्रस्ताव मांडला आहे. बुलेट ट्रेनला सतत विरोध करणारी शिवसेना या पुरवणी मागणीतील २५० कोटी खर्चाच्या मागणीच्या प्रस्तावर गप्प आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २५० कोटींच्या मागणीचे समर्थन केले आहे. यामुळे शिवसेनेच्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
‘आमचा बुलेट ट्रेनला विरोध आहे. सभागृहात हा विषय चर्चेला आल्यास आम्ही विरोध करू’ असे शिवसेना नेते अनिल परब याणी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले असूनसुद्धा केसकर यांनी अर्थमंत्र्यांच्या मागणीचे समर्थन केल्याने शिवसेना तोंडावर पडली आहे. यातून शिवसेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
धुळे हत्याकांडा संदर्भात पुण्यात निषेध मोर्चा, भटके विमुक्त संघटना व सुराज्य सेनेचा सहभाग
पुणे : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्हातील साक्री तालुक्यात जमावाने पाच जणांना मारहाण केली होती. त्यामधे गोसावी समाजातील पाच जणांचा बळी गेला होता. मृत्यु झालेले पाचही जण भटक्या विमुक्त जमातीतील होते. त्यांच्या पोशाख आणि दिसण्यावरून ते मुलांची तस्करी करणारे असल्याच्या संशय आल्याने जमावाने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्या घटनेचे पुण्यात पडसाद उमटले असून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर डवरी, गोसावी, वाल्मिकी समाजाच्या लोकांनी आज मोर्चा काढला. खुनींना तीव्र शिक्षा ठोठावून पीडितांना न्याय मिळवून दिला जावा अशी मागणी या मोर्चाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
राईनपाडा, धुळे येथील निरपराध भटके विमुक्त भारतीय नागरिकांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलन, भटके विमुक्त जाती जमाती मानव सेवा प्रतिष्ठान, सुराज्य सेना आदी समविचारी संघटना एकत्र आल्या आहेत. धुळे हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटत असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.










