Saturday, December 6, 2025
Home Blog Page 9

Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार नवी वंदे भारत एक्सप्रेस; कुठून कुठे धावणार?

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. देशातील अनेक मार्गावर नवनवीन रेल्वे धावत आहेत. खास करून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या (Vande Bharat Express) संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास अनुभवता येत असल्याने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मागणीही वाढतच चालली आहे. सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता राज्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. हि ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हीटी वाढवेल.

कसा असेल वंदे भारत एक्सप्रेसचा रूट ?

आम्ही तुम्हाला ज्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल सांगतोय ती आहे पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस. पुण्याला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन राहणार आहे. ही प्रस्तावित वंदे भारत डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ते नांदेड हे अंतर 550 किलोमीटर इतके आहे. सध्या या मार्गावर ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत त्या गाडीने जायचं म्हंटल तर १० ते १२ तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा का हि वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली कि हेच अंतर अवघ्या ७ तासांवर येईल. म्हणजेच काय तर प्रवाशांचा वेळ ३ तासाने वाचेल. या प्रस्तावित वंदे भारत ट्रेनला पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे या शहरातील प्रवाशाना या वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष लाभ होईल यात शंकाच नाही.

तिकीट किती असेल? Vande Bharat Express

पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी अंदाजे या ट्रेनचे तिकीट दर हे साधारणतः 1200 रुपयांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत जाऊ शकते असे बोललं जातंय.

सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस

सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावत आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या गाड्यांचा समावेश आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचा त्या 4 डॉक्टरांशी संबंध? AK-47 रायफल, स्फोटकं सगळंच सापडलं

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Bomb Blast Photos) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यादरम्यान हरियाणा येथील एकाच हॉस्पिटल मधील ४ डॉक्टर चर्चेत आले आहेत.

स्फोटाच्या दिवशीच म्हणजेच सोमवारी सकाळी, जम्मू आणि काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून २,९०० किलो आयईडी बनवणारे रसायने, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचे थेट कनेक्शन हे डॉक्टरांशी जोडलं जातंय. या स्फोटाशी संबंधित कोणताही धागा व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीपर्यंत घेऊन जातोय.

डॉ. आदिल अहमद राठर

दिल्लीत स्फोट (Delhi Red Fort Blast) होण्याआधी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी असल्याचे स्पष्ट झालं.

महिला डॉक्टर Delhi Red Fort Blast

7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.

अहमद मोहियुद्दीन सैयद

7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे.हा डॉक्टर रिसिन नावाचं एक खतरनाक विष बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.

डॉ. मुझमिल शकील

10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला असता तिथेही 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.

Delhi Bomb Blast Photos : गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचा मृत्यू, हातपाय गमावले, दिल्ली स्फोटाचे हादरवणारे Photos पहाच

Delhi Bomb Blast Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Bomb Blast Photos) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचे हादरवणारे फोटो समोर आले असून तुमचंही हृदय पिळवळून निघेल. दिल्ली स्फोटात तब्बल 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या, अनेकांचे हात-पाय गेले..९ जणांना जीव गमवावा लागला. संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि आक्रोश पाहायला मिळाला.

दिल्ली कार स्फोट हा इतका भीषण होता कि, मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. जवळपास 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. सर्वत्र आक्रोश पाहायला मिळाला. Delhi Bomb Blast Photos

हा स्फोट म्हणजे दहशतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती i20 कार होती. कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही हे स्पष्ट होईल. यामागचे कारण म्हणजे गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद आय-२० कारमधील प्रवासी होता.

दिल्ली पोलिसांनी पार्किंगमध्ये गाडी येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत आहे. तीन तास तो कारमध्येच बसलेला होता. ज्यामध्ये त्याने काळा मास्क घातला आहे.

फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मद याचा शोध घेत होते. त्यामुळे घाईगडबडीत उमरने हा आत्मघातकी स्फोट घडवून तर आणला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. Delhi Red Fort Blast

म्बस्फोटांच्या तपासात जम्मू आणि काश्मीरमधील तारिक आणि मोहम्मद उमर ही दोन नावं समोर आली आहेत. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला ती सलमान नावाच्या व्यक्तीचा होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान त्याने ती कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड केलं. पोलिस तपासात ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटप्रकरणी धक्कादायक माहिती!! 3 तास कारमध्ये बसून….

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट म्हणजे दहशतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती i20 कार होती. कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

3 तास तो कारमध्येच- Delhi Red Fort Blast

घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही हे स्पष्ट होईल. यामागचे कारण म्हणजे गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद आय-२० कारमधील प्रवासी होता. दिल्ली पोलिसांनी पार्किंगमध्ये गाडी येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत आहे. तीन तास तो कारमध्येच बसलेला होता. ज्यामध्ये त्याने काळा मास्क घातला आहे. फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मद याचा शोध घेत होते. त्यामुळे घाईगडबडीत उमरने हा आत्मघातकी स्फोट घडवून तर आणला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. Delhi Red Fort Blast

जेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये एकामागून एक अटक होऊ लागली, तेव्हा डॉ. उमरला अटकेची भीती वाटू लागली आणि घाबरून त्याने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने त्याच्या साथीदारांसह कारमध्ये डिटोनेटर ठेवले आणि स्फोट घडवून आणला. बॉम्बस्फोटांच्या तपासात जम्मू आणि काश्मीरमधील तारिक आणि मोहम्मद उमर ही दोन नावं समोर आली आहेत. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला ती सलमान नावाच्या व्यक्तीचा होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान त्याने ती कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड केलं. पोलिस तपासात ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना थेट या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबल सुरु असताना आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने करणारे आणि सरकारला सळो कि पळो करून सोडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) एका पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करून मुंडे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोज जरांगे पाटील यांना ऑफर दिली होती . मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करूणा मुंडे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या करूणा मुंडे?

करुणा मुंडे (Karuna Munde) यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेऊन गेली होती. मी त्या निवेदनात म्हंटल होत कि, आपण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे. जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे. त्यामुळे तुम्ही माझे निवदेन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको. फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारा आणि नवनवीन लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या अशी विनंती मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे केली होती असं करुणा मुंडे यांनी म्हंटल.

जरांगे पाटलांचे उत्तर काय आले? Manoj Jarange Patil

करुणा मुंडे यांची हि विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केली नाही. जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती नाकारली. मी एक समाजकारणी माणूस आहे. मी समाजासाठी लढतो असं सांगून मनोज जरांगे पाटील यांनी हे अध्यक्षपदाची मागणी नाकारल्याचे करुणा मुंडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी फुटली!! काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. महाविकास आघाडीतून (MahaVikas Aghadi) निवडणूक न लढवता काँग्रेसने (Congress) स्वबळाची नारा दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय असेही वडेट्टीवार यांनी म्हंटल. विजय वडेट्टीवार यांच्या या घोषणेनंतर ठाकरे गटाला आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे.

हि निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांची- Mahavikas Aghadi

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. मुंबई महापालिका ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी महापालिका आहे. या महापालिकेते जे आवश्यक प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही लढू. आम्ही सगळ्यांनी अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत. कारण हि निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांची असते. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. निवडून येण्याचे निकष हा घटक आमच्यासाठी दुय्यम आहे. आधी आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळेल. जिंकणं हा आमचा उद्देश नाही पण कार्यकर्त्यांना न्याय देणे उद्देश आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढायचं असा आमचा निर्णय झाला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटल. Mahavikas Aghadi

समविचारी पक्षांचा प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करु. उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि युतीचा प्रस्ताव आला तर स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. तसेच शरद पवार यांचा प्रस्ताव आला त्याचा पण विचार करू असे सांगायलाही विजय वडेट्टीवार विसरलं नाहीत. मुंबई महापालिकेत आमच्या नेहमी ३० ते ३५ जागा निवडून येत असतात. उलट आमच्या विरुद्ध जे तीन पक्षही सत्तेत वेगळे लढत आहेत. यात भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट हे वेगळे लढणार आहेत. जर त्यांचे विभाजन होत नाही, तर आमच्या विभाजनाची चिंता कशाला? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway : पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 3 तासांत; नवा एक्सप्रेसवे ठरणार गेमचेंजर

Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षात महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक सुधारली आहे. अनेक महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळेत होण्यासाठी ठिकठिकाणी नवनवीन महामार्ग आणि उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. सध्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) नवीन पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेचे (Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway) काम जोरदार पद्धतीने करत आहे. सुमारे 22,000 कोटी रुपये खर्चून हा महामार्ग उभारला जात असून या एक्सप्रेस वेमुळे सध्याचा 8 ते 10 तासांचा असणारा प्रवासाचा वेळ कमी होऊन तो केवळ 3 तासांवर येणार आहे. साहजिकच प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

३ टप्प्यात काम – Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway

या महामार्गाचे बांधकाम तीन प्रमुख टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून, यात पुणे–शिरूर उड्डाणपुलाचा समावेश आहे. या उड्डाणपुलामुळे पुणे–अहमदनगर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच गर्दीच्या पुणे-अहमदनगर महामार्गावरील जड वाहतूक कमी होण्यास मदत होईल.

दुसरा आणि तिसरा टप्पा हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाशी संबंधित आहेत. ज्यामध्ये शहरांभोवती बायपास आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणी असेल. शिरूर ते संभाजीनगर हा आधुनिक सहा-पदरी महामार्ग असणार असून, या मार्गात महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना आणि औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जाणार आहेत. मालवाहतुकीसाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरेल.

दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला निविदा उघडल्या जाण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 22 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 2026 च्या सुरूवातीपासून मोठ्या प्रमाणावर काम जोरात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हा महामार्ग महाराष्ट्रासाठी एक गेम-चेंजर असेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे ते छत्रपति संभाजीनगर महामार्गामुळे (Pune-Chhatrapati Sambhajinagar Expressway) प्रवाशांचा वेळ तर वाचेलच पण बीड आणि मराठवाडा सारख्या प्रदेशांमध्ये व्यापार, पर्यटन आणि नोकरीच्या संधी वाढण्यास देखील मदत होईल.

Mahaelgar Andolan Nagpur : या 4 गोष्टी ठरल्या नागपूर येथील शेतकरी आंदोलनाला मारक

Mahaelgar Andolan Nagpur

आंदोलन (Mahaelgar Andolan Nagpur) म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रचार करणं, निवडणूक लढण्याइतकं सोप्प काम नाही. कारण आंदोलन म्हटलं कि लोकांना पहिले त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून द्यावी लागते, त्यांना तुम्ही तुमच्यावरील अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे याची जाणीव करून द्यावी लागते. तसेच अन्यायाची जाणीव झाल्यावर आता त्याविरुद्ध लढायचं म्हटलं तर रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या गनिमी काव्यांनी सरकारला आपलं म्हणणं ऐकून घ्यायला लावावं लागतं. सरकारने ऐकलं पाहिजे, आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी तसा दबाव तयार करावा लागतो. एखाद्या नेत्याचं आख्ख आयुष्य आंदोलनं उभं करण्यात जातं. लढाई रस्त्यावरची असो वा सीमेवरची, डावपेच आखून, परीस्थितीचा अंदाज घेऊनच लढली जाते. एखादं आंदोलन यशस्वी करायचे असेल तर आपल्या ताकदीच, आपल्यातील कमी काय आहे अन आपण कशात स्ट्रॉंग आहोत याचा अंदाज बांधून डावपेच खेळावे लागतात. केवळ जोर आणि ताकद लावून आंदोलन यशस्वी होत नाहीत हे सत्य आहे. तसेच कोणतेहि आंदोलन केवळ आक्रमकपणा आणि भावनिकतेवर लढता येत नाही. तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी गनिमीकावा करून वेवेगळ्या क्लुप्त्या, शक्कल लढवून, गरज पडली तर चार पावलं माघार घेऊन, सरकारला अडचणीत आणून, सरकारवर दबाव टाकून यशस्वी करावे लागते. आंदोलनात आंदोलनाचं जीवंत राहणं फार महत्वाचं असतं. कारण आंदोलन जिवंत राहिलं तरचं आंदोलनकर्त्यांच्या आशा जिवंत राहतात. अन आशेच्या जोरावरच जगातल्या सर्व लढाया लढल्या जातात.
आता बच्चू कडू यांच्या कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाकडे आपण पाहायचे झाले तर यात काय कमी राहिल्या? कोणाचं काय चुकलं? आंदोलनाच यश अपयश मोजायचं झालं तर काय समोर येतं? यावर अगदी त्रयस्थ म्हणून चर्चा करूयात..


शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून एकत्र आणण्यात बच्चू कडू यशस्वी- Mahaelgar Andolan Nagpur

सर्वात अगोदर शेतकऱ्यांना जात, पात, धर्म आणि राजकीय पक्ष बाजूला ठेऊन फक्त शेतकरी म्हणून एकत्र आणण्यात बच्चू कडू यशस्वी झाले हे आपल्याला मान्य करावे लागेल. कारण तब्बल ३५ वर्षांनंतर शरद जोशींच्या नंतर पहिल्यांदाच कोणीतरी महाराष्ट्रातील शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात (जवळपास ५० हजार) एकत्र आणण्यात यशस्वी झाले. जाती धर्माच्या नावाने लोकांची गर्दी जमवणे सोप्प आहे, लोकांच्या भावनांना हात घालून मोर्चे, आंदोलन करणे शक्य आहे. पण फक्त शेतकऱ्यांना शेतीच्या मुद्द्यांवर गोळा करणे, पैसे न वाटता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होणे हि खूप कठीण आणि विशेष बाब आहे.


बच्चू कडू सरकारसाठी रेड अलर्ट का झाले?


तब्बल ८ महिने कडू यांनी यावर काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग करून सुरु केलेला शेतकऱ्यांसाठीचा हा लढा पुढे हळू हळू व्यापक झाला. आमदारांच्या घरावर मशाल आंदोलन, रक्तदान आंदोलन, मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण, राज्यभरात चक्काजामसह वेगवेगळी आंदोलने, ७/१२ कोरा कोरा कोरा यात्रा, शेतकरी शेतमजूर ते नागपूर येथे महाएल्गार आंदोलन अशी जवळपास १० हुन अधिक आंदोलने कडू यांनी केली. ८ महिन्यात साधारण २० हजार किमी प्रवास करत २०० हून अधिक सभा घेतल्या आहेत. याद्वारे साधारणपणे २५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. ८ महिने महाराष्ट्र पालथा घालून गावगावात सभा बैठक घेऊन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आपण एक होऊन लढलं पाहिजे असं म्हणत शेतकरी एकजुटीचा नारा दिला. दुसरीकडे सर्व शेतकरी नेते, संघटना यांनाही एकत्र करत त्यांची मोट बांधली. इथेच बच्चू कडू सरकारसाठी रेड अलर्ट झाले. कारण सरकार काहीही पचवू शकतं पण शेतकरी फक्त शेतकरी म्हणून एकत्र येणं सरकारला सहजासहजी पचण्यासाखी बाब नाही. मैदान तयार झालं होतं, आता शेवटचा मारा करायचा होता.. Mahaelgar Andolan Nagpur


मागील ८ महिन्यात बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनासाठी (Mahaelgar Andolan Nagpur) अगदी मजबूत मैदान तयार केले होते. शेवटचा मारा करण्यासाठी नागपूर हे ठिकाण ठरवून महाएल्गार आंदोलन २८ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आले. आंदोलनवीर अशी ख्याती असणाऱ्या कडू यांनी महाएल्गारसाठी व्यवस्थित रणनीती सुद्धा आखली होती. आता नागपूरात शेवटचा मारा करायचा आणि आंदोलनातून विजय खेचून आणायचा असा कार्यक्रम आखला गेला होता. कडूंच्या दिमतीला नागपूरच्या आंदोलनात विजय जावंधिया, वामनराव चटपर, Raju Shetti, महादेव जाणकर, Ajit Nawale, @bacc a कॉ राजन क्षीरसागर, प्रकाश पोहरे, दिपकभाई केदार, प्रशांत डिक्कर आणि विठ्ठलराजे पवार आदी शेतकरी नेते सुद्धा असल्याने खऱ्या अर्थाने शेतकरी एकजूट या आंदोलनात पाहायला मिळाली. २७ तारखेला बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर घेऊन अचलपूरहून नागपूरकडे निघाले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी २८ ऑक्टोबरला तब्बल ४० ते ५० हजार शेतकरी आंदोलनाला जमा झाले. कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलकांनी चक्काजाम करून सरकारला पहिल्याच दिवशी खिंडीत अडवले होते.


आंदोलन अगदी योग्य दिशेला असताना असं काय झालं कि समीकरणं बदलली?

आंदोलन म्हणजे एखादं युद्ध लढण्याहून लहान बाब नक्कीच नाही. कारण युद्धात आपल्याला कायम सतर्क राहावं लागतं, अनेकवेळा परिस्थिती पाहून निर्णय बदलावे लागतात, गनिमीकावा करत रणनीती आखून सावधगिरीने डाव टाकावे लागतात. आणि इतकं सर्व करून निसर्गाचीसुद्धा साथ लागते. महाएल्गार आंदोलनात असं काय घडलं कि सगळं काही अगदी व्यवस्थित सुरु असताना आंदोलन फसायला सुरवात झाली? तर आपण यासाठी कोणत्या चार गोष्टी महाएल्गार आंदोलन फसायला कारणीभूत ठरल्या ते समजावून घेऊयात..

१) तुफान पाऊस


नागपूर येथील आंदोलनाला पहिल्या दिवशी जवळपास ४० -५० हजार शेतकरी जमा झाले होते. पण पाऊसाने आंदोलनस्थळी धुमाकूळ घातला. पहिला दिवस पाऊसाची ये जा सुरु होती त्यामुळे कसाबसा गेला. मात्र २९ तारखेला संध्याकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. ज्या मैदानात आंदोलन स्थळ ठरवण्यात आले होते तिथे सर्वत्र चिखल झाल्याने आंदोलकांच्यात गोंधळ उडाला. आंदोलक नेत्यांनी तयानंतर एका मंगलकार्याल्यात आंदोलकांची सोय केली. मात्र सततच्या पावसाने जाग्यावर जेवण बनवून तिथेच राहणे कठीण झाले. अशा परिस्थितीतही आंदोलक लढले. पण २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या पावसामुळे अनेक आंदोलक माघारी गेले. पावसामुळे पहिल्या दिवशी ५० हजार आंदोलकांची असलेली संख्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अवघ्या १० हजारांवर आली.


२) कोर्टाची नोटीस


एका बाजूला पावसाचा मारा सुरु असताना दुसरीकडे बरोबर ५:५५ वाजता कोर्टाची नोटीस आली कि महामार्ग तात्काळ रिकामा करून आंदोलन स्थळी जाऊन बसावे. आता इथेच खरी मेघ आहे, कारण तुफान पावसामुळे आंदोलन स्थळ असलेले मैदान चिखलाने भरले होते. तिथे उभे राहणे कठीण बाब असताना अशात त्या ठिकाणी १० हजार लोकांची राहणे खाणे व्यवस्था होते मुश्किल होते. हीच बाब सरकारी गुप्तहेरांनी कदाचित संबधितांपर्यंत पोहोचवली असावी. आता आंदोलक मैदानात बसू शकत नाहीत, पावसामुळे यांची संख्यापण कमी झालीय आणि कोर्टाच्या नोटीसीने जर यांना महामार्गही खाली करायला लावला तर हे जाग्यावर चेकमेट होतायत हे सरकारच्या लक्षात आले असावे. वेळ साधून ठीक ५:५५ वाजता कोर्टाची नोटीस आंदोलक नेत्यांना देण्यात आली. अशा परिस्थितीतहि माघार न घेता आम्ही जेलभरो करू असा नारा देत सर्व आंदोलक पोलीस बंदोबस्ताच्या दिशेने पायी निघाले. सरकारकडून दोन मंत्रांनी पुन्हा एकदा आंदोलक नेत्यांना मुंबईतील बैठकीचे निमंत्रण दिले. मंत्र्यांसोबत आंदोलक रस्त्यावर बसलेले असतानाहि जोरदार मुसळधार पाऊस पडत होता. आता मात्र आपल्या मागे असणारे आंदोलकांची संख्याही पावसामुळे कमी झालेली असताना आता आपण आंदोलन (Mahaelgar Andolan Nagpur) ताणून प्रशासनाला अंगावर घेऊन आंदोलन संपवण्याची संधी सरकारला द्यायची कि आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला बैठकीला जायचे असा प्रश्न आंदोलक नेत्यांसमोर येऊन ठाकला होता.


३) गोरगरीब शेतकऱ्यांच्या भाड्याच्या गाड्या


आता हे आंदोलन गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगोदरच आपल्या अंगावरील कर्जाचे ओझे माफ व्हावे यासाठी हा शेतकरी लढतो आहे. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी झगडणाऱ्या गरीब शेतकरी भाड्याच्या गाड्या करून कसा बसा आंदोलनाला आला होता. आज २७ तारखेपासून पहिले तर तीसरा दिवस होता. वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे भाड्याच्या गाड्या परत करायचा तगादा यात त्या शेतकऱ्याची घुसमट होत होती. आंदोलन तीन दिवस चालेल आणि सरकार आपली दाद घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सरकार चालवणारे पण अति चलाख आणि संधीसाधू असल्याने त्यांनी आंदोलन पाऊसात फसणारे हे वेळेवर ओळखून आंदोलनाची दादच घेतली नाही. वरून आंदोलकांना मुंबईला बोलावून शेतकरी आणि आंदोलक यांच्यात दुफळी माजवण्याचा डाव टाकला. नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यामुळे सरकारचा डाव लक्षात येउनपण मुंबईच्या बैठकीत जाऊन कर्जमाफीची तारीख जाहीर करायला लावण्याची रिस्क आंदोलकानीं घेतली.


४) पोलिसांनी बाहेरून येणारी आवक रोखल्याने नवीन आंदोलक येऊ शकले नाहीत –


जेव्हा एखादे आंदोलन रस्तावर लढले जाणार असते, ३-४ दिवस किंवा त्याहून अधिक दिवस चालणारे असते तेव्हा साहजिकच सुरवातीला सहभागी झालेल्यांपैकी अनेक आंदोलक मागे जातात अन नव्या दमाचे हळू हळू सामील होत राहतात. त्यामुळे आंदोलक माघारी गेले तरी आंदोलनस्थळावरचा उत्साह टिकून राहतो. पण नव्या दमाच्या आंदोलकांना आंदोलनस्थळी पोहोचूच दिले नाही तर मात्र पहिल्यांदा आलेले आंदोलक माघारी गेल्यानंतर त्यांची कमी भरून काढण्यासाठी कोणीच राहत नाही. हे लक्षात ठेऊन सरकारने पोलीस प्रशासनाचा वापर करून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नागपूरला आंदोलनासाठी येत असेलेल्या आंदोलकांना त्यात त्या ठिकाणीच अडवले. परिणामी २९ तारखेला रात्रीपर्यंत आंदोलन स्थळी आंदोलकांची संख्या कमी कमी होत अवघी ७-१० हजार झाली. एक आंदोलनकारी नेता म्हणून अशा परिस्थिती आपण काय निर्णय घ्यायचा हे फार महत्वाचे ठरते. नागपूरच्या आंदोलनात राजू शेट्टी, चटप, जावंधिया, नवले, कडू असे एकसेबढकर एक अनुभवी नेते होते. अशावेळी आंदोलन जिवंत ठेवणे आणि त्यातून आपली मागणी मान्य करून घेणे हेच शहाणपणाचे असते हे त्यांनी ओळखले. अगदी ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत सर्व आंदोलक नेत्यांनी आंदोलनस्थळावरील परिस्थिती काही बदल होतोय का ते पहिले आणि शेवटी मुंबई येथील बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला.
आजवर अशाप्रकारे आंदोलक आणि आंदोलक नेते यांच्यात गैरसमज तयार करून आंदोलने संपवण्याचे कारस्थान प्रत्येक सरकार करत असते. आपल्याबाबतही असे होऊ शकते याची कल्पनासुनही या नेत्यांनी मुंबईला बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला. बैठकीत भरपूर घुमसान झाले. सुरवातीला आम्ही कर्जमाफी देऊच शकत नाही असे म्हणणाऱ्या सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करायला या नेत्यांनी भाग पाडले. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी जाहीर करू असे मुख्तमंत्र्यांनी जाहीर केले. आंदोलनाचे हे फार मोठे यश होते.


मात्र आंदोलक मुंबईत येऊन मॅनेज झाले, हे आंदोलन महायुतीसाठीच होते काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कर्जमाफीचा प्रभाव पडू नये यासाठी केलेला देखावा होते काय? कर्जमाफी आत्ताच होणे अपेक्षित होते, माघार घेतली नसती तर मंत्रिमंडळाला नागपूरला येऊन कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला असता. उपोषणावेळी ३ महिन्याचे आश्वासन आणि आता ६ महिन्यांचे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक आहे, पहिल्यांदाच शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाला होता. कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबायला नको होते. ४८ तासात आंदोलन संपवून शेतकरी नेते मॅनेज झाले असे अनेक फेक नॅरेटिव्ह पसरवून सत्ताधाऱ्यांनी आंदोलक आणि शेतकरी यांच्यात फूट पडण्याचा डाव टाकला आहे.
मात्र सत्ताधाऱ्यांच्या अशा गैरसमज निर्माण करणाऱ्या यंत्रणांचे बळी पडणाऱ्यांनी आंदोलकांच्या नजरेतून एकवेळ आंदोलन पाहणे फार गरजेचे आहे. कारण इंटरनेटवर काहीही अभ्यास न करता, अनुभव नसताना, रस्त्यावरची लढाई कशी लढावी लागते याची जाण नसताना केवळ सत्ताधाऱ्यांनी तयार केलेल्या फेक नॅरेटिव्हच्या घोड्यावर स्वार होऊन हवेत गोळीबार करण्याने हाती काहीच लागणार नाही. उलट यामुळे शेतकऱ्यांचे आणि आंदोलनाचे प्रचंड नुकसान होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कृपया तुम्हीसुद्धा यावर विचार करा. कारण एखादं आंदोलन उभं करायला लाखो लोकांची मोट बांधावी लागते, हजारो किमी प्रवास करून कित्तेक सभा मिटिंग घेऊन लोकांना एकत्र आणावं लागतं. मात्र हि एकजूट मोडायला एक फेक बातमी, एक गैरसमज पण पुरेसा ठरतो.
आदर्श पाटील
लेखक SPARK (Strategy, Planning, Analytics, Research, Knowledge) या संस्थेचे संस्थापक आहेत.

VerSe Innovation च्या महसुलात 88% वाढ; कंपनीचा पुढचा प्लॅन काय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतातील आघाडीची स्थानिक भाषा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि AI-चालित तंत्रज्ञान कंपनी, VerSe Innovation ने आर्थिक वर्ष २५ मध्ये दमदार कामगिरी केली आहे.  कंपनीने यावर्षीच्या आपल्या महसुलात तब्बल 88% वाढ केली आहे.  त्याचबरोबर EBITDA बर्नमध्ये म्हणजे कंपनीचा तोटा कमी करण्यात 20% यश मिळवला आहे. याशिवाय मुद्रीकरण आणि भौगोलिक विस्तार मजबूत केला आणि फायदेशीर, शाश्वत स्केलसाठी पाया रचण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवली. कंपनीसाठी हे सर्वात मोठे यश मानले जाते.

FY२५ कामगिरीचे ठळक मुद्दे : वाढ, कार्यक्षमता आणि विविधीकरण.

महसूलात वाढ:

2024 चे आर्थिक वर्षात VerSe Innovation कंपनीचा महसूल १,०२९ कोटी रुपये होता मात्र 2025 ची आर्थिक वर्षात यास महसुलात तब्बल 88 टक्के वाढ झाली आणि तो 1930 कोटी रुपयांवर पोहोचला. तर एकूण महसूल १,२६१ कोटी रुपयांवरून २,०७१ कोटी रुपयांवर पोहोचला. याशिवाय अधिग्रहण वगळून मिळणाऱ्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न आर्थिक वर्ष २४ मध्ये १,०२९ कोटी रुपयांवरून ३३% ने वाढून आर्थिक वर्ष २५ मध्ये १,३७३ कोटी रुपयांवर पोहोचले.

खर्च शिस्त:

EBITDA बर्न (नगैर-रोख खर्च वगळता) वर्ष-दर-वर्ष २०% ने वाढले, आर्थिक वर्ष २४ मध्ये INR (९२०) कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २५ मध्ये INR (७३८) कोटी रुपयांवर पोहोचले.

EBITDA मार्जिन -८९% वरून -३८% वर वाढले.

कार्यक्षमता वाढ:

कार्यान्वयनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या टक्केवारीत सेवांचा खर्च आर्थिक वर्ष २४ मध्ये ११२% वरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ७७% पर्यंत घसरला. सर्व्हर लीज आणि सॉफ्टवेअर शुल्क वगळता, तो आर्थिक वर्ष २४ मध्ये ८३% वरून आर्थिक वर्ष २५ मध्ये ५६% पर्यंत वाढला. इतर ऑपरेटिंग खर्च आर्थिक वर्ष २४ मध्ये ७७% वरून कमी होऊन ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६१% पर्यंत वाढले.

आता कंपनीचे ध्येय हेच आहे की 2020 च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जास्तीत जास्त नफा मिळवायचा. यासाठी कंपनीने काही विशेष गोष्टींवर आपला फोकस केला आहे.

AI- आधारित मुद्रीकरण: NexVerse.ai, VerSe चे प्रोग्रामॅटिक AdTech इंजिन, जाहिरातदारांचा ROI वाढवते आणि मोठ्या प्रमाणात डेटा-चालित अंतर्दृष्टी देते.

सबस्क्रिप्शन वाढ: Magzter द्वारे समर्थित Dailyhunt Premium, प्लॅटफॉर्मची सशुल्क, प्रीमियम सामग्रीमध्ये पोहोच वाढवते.

समुदाय आणि निर्मात्याची सहभाग: जोश ऑडिओ कॉलिंग वापरकर्त्यांना निर्मात्यांशी कनेक्ट होण्यास अनुमती देते, तर VerSe Collab अचूकता आणि प्रमाणात निर्मात्याच्या मोहिमा व्यवस्थापित करण्यासाठी पूर्ण-स्टॅक प्रभावक बाजारपेठ देते.

स्ट्रॅटेजिक अधिग्रहण: भविष्यातील अधिग्रहणांवर सतत लक्ष केंद्रित करून Magzter (प्रीमियम सामग्री) आणि ValueLeaf (एंटरप्राइझ एंगेजमेंट सोल्यूशन्स) यांचे एकत्रीकरण, B2B आणि ग्राहक परिसंस्थांमध्ये नवीन वर्टिकल स्केलिंग आणि कमाई वाढवण्यासाठी VerSe च्या वचनबद्धतेला बळकटी देते.

मजबूत भांडवल क्षमता, प्लॅटफॉर्म स्केल करण्याची सिद्ध क्षमता आणि AI-संचालित नवोपक्रमावर अथक लक्ष केंद्रित करून, VerSe इनोव्हेशन भारताच्या पुढील डिजिटल वाढीच्या लाटेचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे.

Car GST Price Cut : लाखो रुपयांनी स्वस्त झाल्या या 6 गाड्या; GST कपातीचा ग्राहकांना फायदा

Car GST Price Cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Car GST Price Cut । केंद्र सरकारने GST दर कमी करत सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीपूर्वीच मोठी भेट दिली आहे. यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंसोबतच गाड्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे दसरा आणि दिवाळीला गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन GST दरांनुसार, 4 मीटरपेक्षा लहान (under 4m) गाड्यांवर सर्वात जास्त जीएसटी कपात झाली आहे. अनेक गाड्यांच्या किंमतीत बदल झाला असला तरी, काही विशिष्ट गाड्यांना 1 लाखांपेक्षा जास्त सूट मिळालाय आहे. तुम्हीही दिवाळीला किंवा दसऱ्याला नवीन गाडी घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या जीएसटी कपातीनंतर लाखो रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. चला तर मग पाहुयात कोणती कार किती रुपयांनी स्वस्त झाली आहे.

कोणती गाडी किती रुपयांनी स्वस्त ? Car GST Price Cut

मारुती एस-प्रेसो तब्बल 1.30 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत फक्त 3.49 लाख रुपये आहे.

Honda Amaze च्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत आता 10 लाखांच्या खाली आली असून ती 1.2 लाखांनी स्वस्त झाली आहे.

मारुती सिलेरियो आता 94,100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कारची नवीन किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होतेय.

Kia Syros : Syros वर 1.86 लाख इतकी किंमत कपात झाली असून हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्काउंट आहे.

Skoda Kylaq : निवडक व्हेरिएंट्सवर 1 लाखा ते 1.11 लाखाइतकी किंमत कपात झाली आहे. Car GST Price Cut

Nissan Magnite : Magnite ची किंमत आता 1 लाखापर्यंत कमी झाली आहे.

Maruti Arena cars : Alto, Brezza आणि S-Presso या गाड्यांवर 1 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची कपात झाली आहे.

Maruti Nexa cars : Fronx वर 1.12 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे.

Mahindra XUV 3XO : GST कपातीनंतर XUV 3XO ची किंमत 1.56 लाखाने कमी झाली आहे आणि यासोबत इतर अतिरिक्त लाभही मिळत आहेत.

Hyundai Venue : Venue ची किंमत 1.23 लाखाने कमी झाली असून N-Line व्हेरिएंट 1.19 लाखाने स्वस्त झाले आहे.

Tata Altroz ची किंमत आता 1.10 लाखापर्यंत कमी झाली असून एकूण 1 लाखापर्यंत सूट मिळत आहे. Car GST Price Cut

मध्यमवर्गीयांची आवडती कार मारुती ऑल्टो K10 आता 1.08 लाख रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत फक्त 3.69 लाख रुपये झाली आहे.

Toyota Urban Cruiser Taisor चं टॉप-एंड व्हेरिएंट आता 1.11 लाखाने स्वस्त झाले आहे.

मारुती बलेनोची किंमत 86,100 रुपयांनी कमी झाली असून ती आता 5.98 लाख रुपयांत उपलब्ध आहे.

Kia Sonet च्या टॉप-एंड व्हेरिएंटवर तब्बल 1.64 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे.

मारुती वैगनआर 79,600 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या कारची नवीन किंमत फक्त 4.97 लाख रुपये.