Saturday, December 6, 2025
Home Blog Page 10

Ratnagiri Airport : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत उभारण्यात येणार नवीन विमानतळ; उदय सामंत यांची घोषणा

Ratnagiri Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ratnagiri Airport। एकीकडे नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनाकडे सर्वांचे लक्ष्य असताना आता महाराष्ट्राच्या प्रवाशांना आणखी एका नव्या विमानतळाची भेट मिळणार आहे. हे विमानतळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सुरु होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विमानतळाबाबत माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे विमानतळ पुढील 6 ते 7 महिन्यांत मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल तसेच यामुळे मुंबई ते रत्नागिरी 326 KM चे अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे. असं उदय सामंत यांनी सांगितलं. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईहून कोकणात जायचं म्हंटल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.. मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून १०० टक्के पूर्ण झालेले नाही. रेल्वेने जायचं म्हंटल तर तिथेही खूप गर्दी असते. मुंबई ते रत्नागिरीचे अंतर सुमारे 326 किलोमीटर आहे. रस्त्याने प्रवास केल्यास 7-8 तास लागतात, रेल्वे ने सुद्धा हीच अवस्था आहे. अशावेळी रत्नागिरी येथील विमानतळ कोकणवासीयांना खूप फायदेशीर ठरेल. कारण एकदा का रत्नागिरी विमानतळ (Ratnagiri Airport) सुरू झाले कि मग मुंबई आणि कोकणमधील प्रवास फक्त 1 तासात पार केला जाऊ शकतो. यामुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचेल.

रत्नागिरी विमानतळ कधी होणार सुरु ? Ratnagiri Airport

मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या (Ratnagiri Airport ) प्रगतीबाबत अपडेट्स देताना म्हंटल कि, पुढील 6-7 महिन्यांत हे विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्ण तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.

नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार?

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. नवी मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.

Mumbai Nanded Special Train : मुंबईहून मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी विशेष रेल्वे धावणार; पहा वेळापत्रक आणि थांबे

Mumbai Nanded Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Nanded Special Train । आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली असून मुंबई- पुण्यात नोकरीला असणारे अनेकजण या सणाच्या निमित्ताने मूळगावी जातात. नवरात्रीत प्रवाशांची वाढती गर्दी बघता रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. रेल्वे विभागाकडून नवरात्रीनिमित्त काही विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नवरात्री स्पेशल ट्रेनबाबत सांगणार आहोत जी मुंबईहून थेट मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला जोडेल. होय, नवरात्रीनिमित्त मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष रेल्वेगाड्या धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक आणि कोणकोणत्या स्थानकावर ती थांबणार आहे याबाबत आपण जाणून घेऊयात.

कसं आहे ट्रेनचे वेळापत्रक ? Mumbai Nanded Special Train

मुंबई आणि नांदेडला जोडणारी ही ट्रेन (Mumbai Nanded Special Train) क्रमांक 07603 ही रेल्वे 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी हुजूर साहेब नांदेड येथून रात्री 23:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 07604 ही रेल्वे 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 16:35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा ?

ही विशेष ट्रेन (Mumbai Nanded Special Train) ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या स्पेशल ट्रेनमध्ये 1 प्रथम श्रेणी वातानुकूलित, 2 द्वितीय श्रेणी वातानुकूलित, 6 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 6 शयनयान आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.

नाशिककरांना विशेष फायदा –

मुंबई नांदेड स्पेशल रेल्वेगाडीचा नाशिककरांना विशेष लाभ होताना दिसत आहे. कारण नाशिकहून मोठ्या प्रमाणात लोक मुंबई आणि संभाजीनगरला ये जा करत असतात. आणि या ट्रेनला इगतपुरी, नाशिक रोड, मनमाडला थांबा असल्याने येथील प्रवाशांना या रेल्वेचा अतिरिक्त फायदा होणार आहे.

Diwali School Holidays : दिवाळीनिमित्त शाळांना इतक्या दिवस सुट्ट्या; पहा संपूर्ण यादी

Diwali School Holidays

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Diwali School Holidays। शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीत शाळांना किती दिवस सुट्ट्या असणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीत १२ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत हि सुट्टी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या तुलनेत यंदा दिवाळीला खूपच कमी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा थोडासा हिरमोड झाला आहे.

16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी- Diwali School Holidays

तसे बघितलं तर याआधी ही सुट्टी जवळपास 21 दिवसांची असायची, म्हणजेच विद्यार्थी सगळा ताण सोडून ३ आठवडे मनसोक्त दिवाळी साजरी करत असायचे .. मात्र यंदा दिवाळीची सुट्टी अवघी 12 दिवस असणार आहे. यंदा 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात (Diwali School Holidays) आली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळीआधी होणार आहे, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा उन्हाळी सुट्ट्यांआधी होणार आहे. या बाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिवाळीच्या सुट्टयांमुळे काहीसे असमाधान दिसत आहे. कारण दरवर्षीच्या तुलनेते यंदा निम्म्या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये शिक्षकांना देखील त्यानुसार शैक्षणिक नियोजन करावे लागणार आहे.

यंदा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळांना १२९ दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये रविवारचा सुद्धा समावेश आहे. त्यात आता १२ सुट्ट्या दिवाळीत दिल्या जाणार आहे (Diwali School Holidays). शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, ५३ सुट्ट्या या रविवारच्या असणार आहे. सण-उत्सवानिमित्त ६७ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षात २२० दिवस अभ्यासाचे असणार आहेत. याशिवाय उन्हाळ्याच्या सु्ट्या देखील किती दिवस असतील हे देखील निश्चत करण्यात आले आहे. हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जवळपास 44 दिवस उन्हाळी सुट्ट्या असणार आहे. याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिली ते नववीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु आता त्या 8 ते 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता 25 एप्रिल ते 14 जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्यांची माहिती

  • दिवाळीची सुट्टी: 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर (12 दिवस).
  • उन्हाळी सुट्टी: 25 एप्रिलनंतर ते 14 जूनपर्यंत (44 दिवस).
  • रविवारच्या सुट्ट्या: 53 दिवस.
  • सण-उत्सवाच्या सुट्ट्या: 67 दिवस.
  • पहिल्या सत्रातील परीक्षा : दिवाळी सुट्ट्यांपूर्वी
  • दुसऱ्या सत्रातील परीक्षा : 8 ते 25 एप्रिलपर्यंत

Pakistan Air Strike : पाकिस्तानात एअर स्ट्राईक!! तब्बल 8 बॉम्ब टाकले, 30 जणांचा मृत्यू

Pakistan Air Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pakistan Air Strike । भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तान मधून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच देशाच्या नागरिकांवर एअर स्ट्राईक केला आहे. आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा एअर स्ट्राईक करण्यात आला. खैबर पख्तूनख्वा या भागात हे बॉम्ब टाकण्यात आले. या एअर स्ट्राईक मध्ये तब्बल ३० नागरिकांना जीव गमवावा लागला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. संपूर्ण परिसराला राखेचं स्वरूप आलं आहे. पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच देशातील नागरिकांवर एअर स्ट्राईक केल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

झोपेत असलेली लोक गाडली गेली- Pakistan Air Strike

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खैबर जिल्ह्यातील तिरह भागात पाकिस्तानी लष्कराने नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले आणि JF-17 लढाऊ विमानांमधून एकामागून एक आठ LS-6 बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटात गावाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला. परिसरात मोठा गोंधळ उडाला. अनेक घरांचे नुकसान झालं आणि गाढ झोपेत असलेली लोक गाडली गेली. सर्वत्र फक्त ढिगारा उरला. गावातील रस्ते उद्ध्वस्त झाली. हल्ल्याच्या सुमारे १० तासांनंतरही स्थानिक आणि बचाव पथके सोमवारी दुपारी ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधत आहेत . जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

पाकिस्तान सरकारने अद्याप त्यांच्याच देशातील हवाई हल्ल्याबद्दल (Pakistan Air Strike) अधिकृत निवेदन जारी केलेले नसले तरी, ही घटना तथाकथित दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली या प्रदेशात पाकिस्तानी लष्कराच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण आहे. तस बघितलं तर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन असे पाकिस्तानी प्रांत आहेत जिथे पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. या प्रांतांमधील अनेक सशस्त्र गट पाकिस्तानी लष्करालाही लक्ष्य करत आहेत. हे गट प्रांतासाठी अधिक अधिकार आणि संसाधनांमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे, पाकिस्तान सरकार आणि लष्कर या बंडखोर गटांना दहशतवादी म्हणून संबोधतात.

Thane Metro : ठाण्यात प्रथमच धावली मेट्रो!! 8 डब्बे, 10 स्थानके, 21 लाख प्रवाशांना फायदा

Thane Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thane Metro । ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने आज महत्वपूर्ण पाऊल पडले. मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ केला. ठाणे मेट्रोसाठी एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, त्यामुळे मी आज एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंचं कौतुक केलं.

मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा आहे. यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. आज मेट्रोच्या ट्रायल वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून आज आम्ही या रूटचे टेस्टिंग करत आहोत. या रूटची लांबी जवळपास 35 किलोमीटर आहे. याठिकाणी ८ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील वाहतूक या मेट्रोमुळे सुलभ होईल. त्यादृष्टीने हा महामार्ग अतिशय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. ठाणे मेट्रोतून (Thane Metro) दररोज २१ लाख ठाणेकर प्रवास करू शकतील. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. तसेच एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असे फडणवीसांनी म्हटले. मी खास करून एकनाथ शिंदे यांचं यावेळी अभिनंदन करतो कारण त्यांनी ठाणे मेट्रो साठी खूप प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार? Thane Metro

१) कॅडबरी

२) माजीवाडा

३) कपूरबावडी

४) मानपाडा

५) टिकुजी-नी-वाडी

६) डोंगरी पाडा

७) विजय गार्डन

८) कासरवाडावली

९) गोवानिवाडा

१०) गायमुख

शिंदेंचं महाविकास आघाडीवर खापर –

दरम्यान, ठाण्याला उशिरा मेट्रो (Thane Metro) मिळाल्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडलं. मला ठाणे मेट्रोकरिता आंदोलन करावं लागलं होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडला मेट्रो मिळाली, परंतु ठाण्याला मेट्रो नाकारण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ठाणे मेट्रोच्या कामाला ब्रेक लावला… त्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामाला उशीर तर झालाच याशिवाय तिचा खर्चही वाढला असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

ATM PIN : ATM यूजर्ससाठी महत्वाची बातमी!! PIN मध्ये चुकूनही वापरु नका ‘हे’ अंक!

ATM PIN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल ATM तर तुमच्या सर्वांकडे असेल.. बँकेच्या गर्दीत जाऊन पैसे काढण्यापेक्षा ATM मधून पैसे काढणे सर्वच जण सोयीस्कर मानतात. यामुळे आपला बहुमूल्य वेळ वाचतो. ATM मधून पैसे काढण्यासाठी सर्वात महत्वचा असतो तो म्हणजे ATM PIN.. हा एक ४ अंकी नंबर असतो जो व्यवस्थित टाकला तरच तुमच्या एटीएम मधून पैसे निघत असतात. अशावेळी ATM PIN खूप महत्वाची बाब आहे. आजकाल तर सायबर हल्ल्यांचे आणि हॅकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेकदा तर एटीएम पिन हॅक केल्याच्या आणि बँक खाते रिकामे केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा बघितल्या असतील. अशावेळी आपला एटीएम पिन सुद्धा तितकाच मजबूत असला पाहिजे जेणेकरून कोणताही हॅकर तो हॅक करू शकणार नाही….. चला तर मग आज आम्ही तुम्हाला एटीएम पिन बाबत अशाच काही टिप्स देणार आहोत.

1) नेहमीचेच साधे पिन टाळा

सायबर तज्ज्ञांच्या मते, काही पिन क्रमांक असे आहेत जे अतिशय सोप्पे आहेत आणि अनेक ग्राहक त्याचा सातत्याने वापर करतात. उदाहरणार्थ 1234 हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा आणि सर्वात असुरक्षित पिन आहे.. हा पिन वापरयाला सोप्पा असल्याने अनेकजण हाच पिन एटीएम साठी ठेवण्यावर भर देतात… मात्र इथेच घात होण्याची शक्यता असते. यासोबतच 0000 हा पिन सुद्धा धोकादायक मानला जातो. त्यामुळे असे सोप्पे पिन टाळणे गरजेच आहे.

2) एकच अंक पुन्हा पुन्हा नको (ATM PIN)

कधी कधी आपण डोक्याला ताप नको म्हणून एकच क्रमांक डबल टिबल टाकून पिन तयार करतो. उदाहरणे द्यायची झाल्यास, 1111, 2222, 3333, 4444 किंवा 5555 … परंतु एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड सायबर गुन्हेगार प्रथम तपासतात आणि अशा नंबरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. हे पिन सोप्पे असल्याने हॅकरला सुद्धा हॅक करताना जास्त कष्ट घ्यायला लागत नाहीत. त्यामुळे असे पिन त्वरित बदलावेत.

3) अनुक्रमे येणारे क्रमांक टाळा

कधी कधी आपण सोप्यात सोपा पिन टाकण्यासाठी एकसलग नंबर टाकतो.. उदाहरणार्थ, 2345, 4567, 5678, 6789 … परंतु असे एटीएम पिन सायबर गुन्हेगारांना ट्रॅक करणे सोप्पं जाते. त्यामुळे कधीही एकसलग क्रमांक एटीएम पिनसाठी वापरू नयेत.

4) वैयक्तिक माहिती दाखवणारा पिन नकोच

अनेकजण एटीएम पिनसाठी (ATM PIN) आपल्या वाढदिवसाची तारीख किंवा गाडीच्या नंबर प्लेटचा क्रमांक टाकतात… उदाहरणार्थ १९९५…. २००१ … परंतु तुमच्या काही जवळच्या आणि ओळखीच्या लोकांना तुमची हि बातमी माहित असते.. अशावेळी त्यामुळे असे पिन वापरणे धोकादायक ठरू शकते.. त्यामुळे चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती दर्शवणारा एटीएम पिन टाकू नका.

5) कोणती काळजी घ्याल?

मित्रानो, सायबर हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हॅकरला सुद्धा अडचणीत टाकणारे आणि स्मार्ट एटीएम पिनचा वापर करा. आपल्या एटीएमचा पिन कोणालाही सहज ओळखता न येणारा असावा. आपले खाते सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा आणि कोणाच्या कधी लक्षातही येणार नाही असे एटीएम पिन ठेवा.
आपले बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा आणि. जर आपला पिन वरीलपैकी कोणत्याही प्रकारात बसत असेल, तर तो लवकरात लवकर बदलून सुरक्षित पिन सेट करा.

GST Savings Festival : आजपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार; संपूर्ण यादीच पहा

GST Savings Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन GST Savings Festival । केंद्र सरकारने GST स्लॅब मध्ये बदल केल्यानंतर आजपासून अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहे. काही वस्तूंवर शून्य टक्के टॅक्स असल्याने तसेच काही वस्तूंवर ५ टक्के टॅक्स असल्याने सर्वसामान्य ग्राहक आधीपेक्षा कमी किमतीत या वस्तू खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये अंघोळीच्या साबणापासून ते दुग्धजन्य पदार्थ, पिझ्झा बर्गर पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे यंदाची दसरा आणि दिवाळी देशवासियांना अतिशय आनंदाची आणि कमी खर्चात जाणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला खऱ्या अर्थाने हायसं वाटणार आहे. आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार? GST Savings Festival

1) खाद्यपदार्थ- अल्ट्रा-हाय टेम्परेचर (UHT) दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा, खाखरा

2) शैक्षणिक साहित्य- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या. व्यायामपुस्तक, आलेखपुस्तक, प्रयोगशाळेच्या नोटबुक आणि नोटबुकसाठी वापरले जाणारे अनकोटेड पेपर, पेपरबोर्ड. नकाशे

3) आरोग्य क्षेत्र- 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा

कोणत्या वस्तूंवर ५ टक्के GST ?

1) खाद्यपदार्थ- वनस्पती तेल, ब्राझील नट्स, संत्री, दुग्धजन्य पदार्थ, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी

2) शाम्पू, तेल, साबण, शेव्हिंग क्रीम, दंत फ्लॉस, टूथपेस्ट, टूथ पावडर, टॉयलेट साबण, GST Savings Festival

3) किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्त्या, टेपर्स आणि तत्सम, हस्तनिर्मित मेणबत्त्या, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर, भाजीपाला मेण

4) कृषी साहित्य- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप

5) वैद्यकीय वस्तू- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे

6) नक्षीकाम केलेल्या वस्तू, हस्तनिर्मित कागद आणि पेपरबोर्ड, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स, कार्टन्स, बॉक्स

कोणत्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी

1) इलेक्ट्रॉनिक वस्तू- एअर-कंडिशनिंग मशीन, वॉशिंग मशीन, एलईडी- एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर

2) वाहने- लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने

3) ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप (GST Savings Festival)

4) कोळसा; ब्रिकेट, ओव्हॉइड्स आणि तत्सम घन इंधन कोळशापासून बनवलेले
लिग्नाइट

5) पोर्टलँड सिमेंट, ॲल्युमिनियम सिमेंट, स्लॅग सिमेंट, सुपर सल्फेट सिमेंट आणि तत्सम हायड्रॉलिक सिमेंट

साताऱ्यातील पाथरपुंज जागतिक पर्यटनकेंद्र बनणार; सह्याद्रीच्या कुशीत लुटता येणार निसर्गसौंदर्याचा आनंद

Shambhuraj Desai On Patharpunj (3)

सातारा जिल्ह्याचं नाव आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरलेल्या आणि मागच्या काही वर्षात देशातील पावसाची जणू नवीन राजधानी बनलेल्या पाथरपुंज (Patharpunj) गावाला आपण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणार आहोत अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. हॅलो महाराष्ट्राने पाथरपुंज या गावावर आणि तेथील निसर्गरम्य वातावरण, पावसाचे प्रमाण यावर केलेल्या एका विशेष डॉक्युमेंट्रीवर बोलताना शंभूराज देसाई यांनी हि माहिती दिली. तसेच त्यासाठीचा रोडमॅप कसा राहिल हे सुद्धा शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.

पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने १-२ बैठकही झाल्या आहेत अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली. सध्या पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल. यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत मी सांगितलं आहे. ते सुद्धा यासाठी आग्रही आहेत. येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

एकदा का पाथरपुंजचा चेहरामोहरा बदलला आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलं कि, सातारा जिल्ह्याला नवीन पर्यटन स्थळ मिळेल. याठिकाणी पावसाळ्यात तुम्ही मनसोक्त पावसाचा आनंद घेऊ शकता.. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटू शकाल. इथल्या निसर्गसह खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची संधी पर्यटकांना मिळेल. एकूणच काय तर पर्यटनाच्या दृष्टीने पाथरपुंज हे फक्त सातारच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Shambhuraj Desai On Patharpunj : पाथरपुंजला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणार; मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला रोडमॅप

Shambhuraj Desai On Patharpunj (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shambhuraj Desai On Patharpunj। देशातील सर्वाधिक पावसाची नोंद ज्याठिकाणी झाली ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज गाव पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यटनमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाथरपुंज गाव जरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने याठिकाणी पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत. मी यासंदर्भात एक – दोन बैठकाही घेतल्याचे मंत्री देसाई यांनी “हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना सांगितले.

काय म्हणाले शंभुराज देसाई ? Shambhuraj Desai On Patharpunj

आज पाथरपुंजचा विचार जर केला तर पाथरपुंजमध्ये पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष रहिवास करणारी कुटुंबे त्याठिकाणी आहेत. काही लोक नोकरीनिमित्त साताऱ्याला आली,काहीजण मुंबई आणि पुण्याला गेली. वर्षातून एकदा – दोनदा हि लोक मूळगावी म्हणजेच पाथरपुंजला येत असतात. परंतु जेव्हा मी पर्यटन विभागाचा मंत्री झालो तेव्हा माझी एक कल्पना होती कि, जर देशातील सर्वाधिक पाऊस हा पाथरपुंजला होतो, जरी तो व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असला तरी पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक कसे आकर्षित होतील यासाठीचे माझे पर्यंत सुरु आहेत….

पाथरपुंज हे गाव अजून बऱ्याच लोकांना माहित नाही… अशावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वेबसाईटवर, पर्यटन संचालनाच्या वेबसाईटवर, अगदी देशाचे जे पर्यटन विभाग आहे त्यांच्याशीही लिंकिंग करून पाथरपुंज हे गाव जागतिक नकाशावर आणण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात मी एक- दोन वेळा प्राथमिक बैठकाही घेतल्या होत्या. आता ऑक्टोबरच्या महिन्यात माझ्या पर्यटन विभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत आम्ही पाथरपुंजच्या पर्यटनाबाबत नियोजन ठरवेन. Shambhuraj Desai On Patharpunj

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, पाथरपुंजला जायला रस्ता आहे, परंतु तो कच्चा रस्ता आहे. बऱ्याच वेळा तिथे चारचाकी घेऊन जाताना व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामुळे काही निर्बंध आहेत. पण इकोफ्रेंडली गाड्या घेऊन लोकांच्या त्याठिकाणी पाहणी करता येईल का? यादृष्टीने आराखडा बनवायच्या सूचना मी वनविभागाला आणि आमच्या पर्यटनाला दिल्या आहेत. पाथरपुंजला विशेषतः जून, जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान पाऊस पडतो. या अडीच महिन्यात लोकांना पाथरपुंजला जाता येईल, तिथला पाऊस अनुभवता येईल, तेथील निसर्ग पाहता येईल आणि तिथली जी खाद्यसंस्कृती आहे तिचा अनुभव घेता येईल,.. वनडे ट्रिप ज्याला आपण म्हणतो म्हणजे सकाळी लवकर लोक पाथरपुंजला गेली आणि संध्याकाळी रिटर्न आली तरी हे एक चांगलं पर्यटन ठिकाण म्हणून पाथरपुंज उदयास येईल. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.

येत्या महिन्यात किंवा २ महिन्यात आमचं प्राथमिक प्रारूप तयार होईल आणि पर्यटनाच्या बाबतीत अशी ठिकाणे जागतिक नकाशावर आणावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असतात, साताऱ्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही आग्रही असतात. त्यामुळे आमचं वनविभाग आणि पर्यटन विभाग एकत्रितपणे याच प्रारूप तयार करणार आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना दाखवू…. यांच्यात आणखी काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा करू. तसेच निधी कसा उपलब्ध करायचा? व्याघ्र प्रकल्प आणि वन विभाग याच्या नियमांना कुठेही अडथळा न येता निसर्ग कसा पाहता येईल याचा विचार करू. पाथरपुंजला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा आमच्या प्रयत्न सुरु आहे असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

यंदा पाथरपुंजला किती पाऊस पडला?

दरम्यान, यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते

Patharpunj : पाथरपुंज – भारतातील पावसाची नवी राजधानी; टीम हॅलोच्या डॉक्युमेंटरीने उलगडलं सर्वाधिक पावसाचे रहस्य

Patharpunj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Patharpunj । मित्रानो, भूगोलाच्या पुस्तकात भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण चेरापुंजी असं आपण शिकलो आहे. मात्र आता महाराष्ट्रातील पाथरपुंज या गावात भारतातील सर्वाधिक पाऊसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणच्या कुशीत वसलेलं या गावात सर्वात जास्त पाऊस कसा काय पडतो? पाथारपुंजची भौगोलिक परिस्थिती नेमकी आहे तरी कशी ज्यामुळे वरुणराजाची कृपा सतत या परिसरावर असते हे जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्राची टीम थेट पाथारपुंजला पोचली …. आणि मागोवा घेतला इथल्या निसर्गाचा… निसर्गात लपलेल्या वातावरण निर्मितीचा… अनुभव घेतला पाथारपुंजमध्ये कोसळणाऱ्या धो धो सरींचा… हॅलो महाराष्ट्राची हीच डॉक्युमेंट्री तुमच्या समोर आज ठेवतोय….

तर मित्रानो, पाथरपुंज या गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलले हे गाव पाटण तालुक्यात असले तरी सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा मोठा वाटा आहे.

पाथरपुंज मध्ये का पडतो इतका पाऊस? Patharpunj

पाथरपुंज मध्ये पाऊस इतका जास्त आणि प्रचंड पडतोय कि गावातील कमान हि पाण्याने शेवाळलेले आहे…. त्यामुळे गावाचे नावही कमानीवर दिसत नाही. समुद्रातील बाष्पीभवन घेऊन येणारे जे काही ढग आहेत, ते ढग सह्याद्रीला धडकतात आणि पाणी खाली पाडतात. यावेळी वाऱ्याचा जोर हा इतका प्रचंड असतो कि पाऊस आडवा तिडवा कसाही पडतो. जोपर्यंत ढगातील पाणी संपत नाही तोपर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे दरवर्षी पाथरपुंजमध्ये मुसळधार आणि धुव्वाधार पाऊस कोसळतो. २०१९ पासून पाथरपुंज मध्ये सातत्याने सार्वधिक पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाची आकडेवारी सांगते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खास करून जुलै महिन्यात पाथरपुंजमध्ये सतत पाऊस पाहायला मिळतो. स्थानिक सांगतात कि एकेकाळी पाथरपुंजला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायचा कि रेड्याच्या अंगावरचं कातडे जायचं…

यावर्षी १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये (Patharpunj ) तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. फक्त मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन-

महत्वाची बाब म्हणजे पाथरपुंज हे गाव (Patharpunj) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मध्ये येते… साहजिकच जंगली प्राण्यांचा वावरही याठिकाणी पाहायला मिळतो. वारणा नदीचा उगमही याचा पाथरपुंज गावात होतो. सह्याद्रीत भयंकर पाऊस पडत असल्याने पावसाचे काही पाणी डोंगरावरून वाहून जाते तर काही पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले पाणी सह्याद्रीचा डोंगर त्याच्या पोटामध्ये साठवून ठेवतो.. कालांतराने हे पाणी झऱ्यांच्या माध्यमातून हळूहळू बाहेर पडते. अनेक ठिकाणी आपल्याला पाझर बघायला मिळतात…. नदीचा उगम हा अशाच पाझरामधून झालेला असतो. पाथरपुंजच्या २ किलोमीटर मागील बाजूला एक पाझर आहे, त्या पाझरातून वारणा नदीचा उगम झाला असं म्हंटल जाते. पाथरपुंजचे निसर्गरम्य वातावरण आणि मागच्या काही वर्षातील पावसाची आकडेवारी बघितली तर पाथरपुंज हे देशातील पावसाची नवी राजधानीच ठरली आहे असं म्हंटल तरी ते चुकीचं ठरणार नाही…