हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तान (Pakistan) या आपल्या शेजारील देशाची आणि कट्टर विरोधकांची भुके मरे अवस्था आपल्याला माहीतच आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र याच दरम्यान, पाकिस्तानी जनतेच्या चेहऱ्यावर हसू आणणारी घटना घडली आहे. पाकिस्तानला समुद्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा जगातील सर्वात मोठा चौथा मोठा साठा असून यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारू शकते. याशिवाय अनेक देशांतील महागड्या तेलाचा प्रश्नही सुटू शकतो असं बोलले जातंय.
बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा हा शोध (पीएके जिओग्राफिक सर्व्हे) तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. एका मित्र देशाच्या सहकार्याने पाकिस्तानने हा प्रचंड साठा शोधला आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणातून या ठिकाणाची ओळख पटली असून संबंधित विभागाने पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात या शोधांची माहितीही सरकारला दिली आहे.
तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात
एका अधिकाऱ्याने या उपक्रमाला ‘ब्लू वॉटर इकॉनॉमी’चा फायदा घेण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल म्हटले आहे. बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जात असल्याचे त्यांनी सूचित केले, यावरून त्याचा आकार निश्चित करण्याचे आणि शोधण्याचे काम लवकरच सुरू होऊ शकते. परंतु ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसव्यतिरिक्त या समुद्रातून अन्य मौल्यवान खनिजा आणि तत्वे मिळण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर पुढील कारवाईवर जोर देण्यात येणार आहे असेच अधिकऱ्यानी सांगितले.