T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर; अमेरिकेची सुपर-8 मध्ये धडक

PAK out OF t20 worldcup
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. काल आयर्लंड विरुद्ध USA सामना पावसामुळे वाया गेल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आले. यामुळे पॉईंट टेबल नुसार, USA चा संघ सुपर -८ मध्ये पोचला आहे. पाकिस्तानला पाहिल्यास सामन्यात USA कडून सुपर ओव्हर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, तोच पराभव आता निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. बाबर आझमच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

फ्लोरिडातील पाऊस आणि पूरस्थितीचा फटका तिथं होणाऱ्या सामन्यांना बसेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. काल सुद्धा नेमकं हेच घडलं. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळे वेळेवर होऊ शकला नाही. अखेर पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण दिला. याचा थेट फटका पाकिस्तानला बसला. कारण अमेरिकेचे आता 5 गुण जमा झाले आहेत तर पाकिस्तानचे केवळ २ गुण आहेत. पाकिस्तानची एक मॅच शिल्लक असली तरी त्यांना या गुणांची बरोबरी करणं अशक्य आहे. त्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचा प्रवास संपला आहे.

कसा होता वर्ल्डकप मधील पाकिस्तानचा प्रवास –

एकेकाळचा T20 वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तानच्या संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ सारखे तगडे खेळाडू पाकिस्तानकडे असल्याने पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठेलच असं वाटत होते मात्र साखळी फेरीतच पाकिस्तान गारद झाला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानलाअमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी हातात आलेली मॅच गमावली. त्यानंतर याशिवाय पाकिस्ताननं कॅनडाला पराभूत केल्यानं त्यांच्या नावावर दोन गुण जमा झाले होते. मात्र, अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 मधील प्रवेशाच्या आशा संपल्या आहेत.