पाकिस्तानकडून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट; संशयित आरोपीसह हँड ग्रेनेड जप्त

0
19
ram mandir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतीय सुरक्षा यंत्रणांनी (Indian Security Agencies) राम मंदिरावर (Ram Mandir) घडवण्यात येणार मोठा हल्ला टाळण्यात यश मिळवले आहे. फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयित अब्दुल रहमानच्या माध्यमातून पाकिस्ताननी (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचत होती, असे समोर आले आहे. या अब्दुल रहमानकडून पोलिसांनी हँड ग्रेनेडही जप्त केले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमान हा उत्तर प्रदेशातील फैजाबादमधील मिल्कीपूरचा रहिवासी आहे. तो अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय आहे. परंतु सध्या तो आयएसआयच्या हँडलर्सच्या संपर्कात होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने राम मंदिरावर हल्ला घडवून आणण्याची योजना आखल्याची कबुली दिली आहे. मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी याठिकाणी हल्ल्याचा कट रचला होता, असेही त्याने सांगितले आहे.

हँड ग्रेनेडसह अटक

अब्दुल रहमानने अनेकदा अयोध्येत जाऊन राम मंदिराची रेकी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तो फैजाबादहून फरिदाबादला पोहोचला, जिथे त्याला आयएसआयच्या हँडलरकडून हँड ग्रेनेड मिळाले. हे स्फोटक परत अयोध्येत नेऊन मंदिराजवळ हल्ला घडवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरात एटीएस आणि फरिदाबाद एसटीएफने वेळीच कारवाई करत त्याला अटक केली.

दरम्यान, अब्दुलने पाली भागातील एका घरात शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, रविवारी संध्याकाळी एटीएस आणि पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यादरम्यान घरातून दोन जिवंत हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, राम मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा बारकाईने तपास करत आहेत.