दिल्ली | पाकिस्तानात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे. शनिवारी पाकिस्तानातील कोरोना रुग्नांमध्ये झपाट्याने वाढ होत आता हा आकडा ७०० पार झाला आहे. पाकिस्तान मध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. सिंध मध्ये ३९६ कोरोना रुग्न असल्याची माहिती पाकिस्तान शासनाने जाहीर केली आहे.
दरम्यान कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
पुण्याहून गावाकडे जाणार्यांची राष्ट्रीय महामार्गावर रिघ; गर्दी टाळण्यासाठी टोलमाफ होणार का?