शेन वॉर्नसारखा भन्नाट स्पिन करून श्रीलंकेच्या बॅटरला केले बोल्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट विश्वातला महान स्पिन बॉलर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं. यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला होता. शेन वॉर्नची (Shane Warne) स्मृती आजही क्रिकेटर्स आणि जगभरातल्या फॅन्सच्या मनात कायम आहे. सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांच्या महिला क्रिकेट टीममध्ये तीन मॅचची वनडे सीरिज सुरू आहे. या सीरीजमधल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या महिला स्पिन बॉलरने बॅटरला चकवा देऊन तिला बोल्ड केले. तिचा स्पिन बघून सगळ्यांना क्षणभर शेन वॉर्नची (Shane Warne) आठवण झाली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या पाकिस्तानमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीम्समध्ये वनडे मॅचेसची सीरिज सुरू आहे. या सीरिजमधली पहिली मॅच कराचीतल्या साउथएंड क्रिकेट स्टेडियमवर खेळली जात आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानची स्पिनर बॉलर गुलाम फातिमाने आपल्या स्पिनच्या जोरावर श्रीलंकेच्या टीमला पार जेरीस आणले. एका ओव्हरमध्ये फातिमाने एक बॉल असा टाकला, की श्रीलंकन बॅटर पुरती गोंधळून गेली आणि जागेवर स्तब्ध उभी राहिली. हा बॉल विकेटला आदळणार नाही असं तिला वाटत असतानाच तिची विकेट पडली. हा बॉल बघून सगळ्यांना शेन वॉर्नची आठवण झाली.

श्रीलंकेच्या इनिंगदरम्यान 31व्या ओव्हरमध्ये हि घटना घडली. 31 ओव्हर्सपर्यंत श्रीलंकेने पाच विकेट्स गमावल्या होत्या. ग्राउंडवर ओशिदा आणि कविषा बॅटिंग करत होत्या. या दोघी क्रीजवर नवीन होत्या. ओशिदानं डावातल्या पहिल्या बॉलचा सामना केला आणि हा बॉल तिचा अखेरचा बॉल ठरला. दुसऱ्या बॉलला डावखुरी बॅटर ओशिदाला चकवण्याचा प्लान फातिमानं आखला आणि ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर बॉल टाकला. हा बॉल पिचवर पडल्यावर विकेटवर जाऊन आदळणार नाही, असं ओशिदाला वाटलं आणि तिनं बॉल सोडून देण्याचा निर्णय घेतला; पण तिचा हा अंदाज चुकला आणि बॉल थेट स्टंपवर जाऊन आदळला. हि विकेट पाहून सगळ्या क्रिकेटप्रेमींना शेन वॉर्नची (Shane Warne) आठवण झाली. या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Leave a Comment