Pakistan Train Hijack| पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेन हायजॅक (Train Highjack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेने बोलान परिसरात जाफर एक्सप्रेसचे अपहरण करून त्यातील 120 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. सुरक्षा दलांकडून कोणतीही लष्करी कारवाई झाली तर सर्व प्रवाशांना ठार मारण्यात येईल, असा इशारा दहशतवाद्यांकडून देण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत 6 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
BLA ने स्वीकारली जबाबदारी (Pakistan Train Hijack)
मिळालेल्या माहितीनुसार, BLA ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या लढवय्यांनी मश्काफ, धादर आणि बोलान परिसरात ही कारवाई आखली होती. रेल्वे ट्रॅक उडवल्याने जाफर एक्सप्रेस अचानक थांबली आणि त्यानंतर सशस्त्र दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेन ताब्यात घेतली. त्याचबरोबर, “जर पाकिस्तानी लष्कराने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सर्व प्रवाशांना ठार मारू. या संपूर्ण घटनेची जबाबदारी पाकिस्तानी लष्करावर असेल.” असे BLA ने सांगितले आहे.
पूर्वीही जाफर एक्सप्रेसला लक्ष्य(Pakistan Train Hijack)
दरम्यान, यापूर्वी 16 फेब्रुवारी 2023 रोजी जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता. पेशावरहून क्वेट्टाला जात असताना चिचावतनी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वीकारली होती. आता पुन्हा एकदा ही ट्रेन हायजॅक झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी सरकार धडपड करत आहेत.