भारतीय हद्दीत शस्त्रांनी भरलेली पाकिस्तानी बोट जप्त; तटरक्षक दलाची मोठी कारवाई

Indian Coast Guard Pakistan boat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलाकडून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. भारतीय हद्दीत शस्त्रे घेऊन आलेली पाकिस्तानी बोट दलाकडून जप्त करण्यात आली असून या बोटीवर 10 खलाशी, शस्त्रे आणि दारुगोळा होता. सुमारे 40 किलो वजनाचे आणि अंदाजे 300 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थही या बोटीवरून जप्त करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात एटीएस भारतीय हद्दीत पाकिस्तानातून एक शस्त्रांनी भरलेली बोट येत असल्याची माहगिती मिळाली.त्यानंतर एटीएसकडून भारतीय तटरक्षक दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पथकाडून धडक कारवाई करण्यात आली.

मुंबईतील 26/11 सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पाकिस्तानने पुन्हा एकदा कि काय? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. दरम्यान यामागे नक्की काय कारण आहे? याचाही तपास पथकडून केला जात आहे.