हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता मात्र तो वेगळ्याच कारणाने चर्चेचे आहे.सचिन नव्हे तर दुसराच भारतीय फलंदाज शोएब साठी धोकादायक होता असे वक्तव्य शोएब अख्तरने केले आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा भरवशाचा फलंदाज राहुल द्रविड आहे.
आपल्या कारकीर्दीदरम्यान, शोएबचा सामना सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी अशा भारतातील काही महान फलंदाजांसोबत झाला. परंतु ज्या फलंदाजाने त्याला सर्वाधिक त्रास दिला तो म्हणजे अनुभवी राहुल द्रविड.
राहुल द्रविड लक्ष केंद्रित करून टिच्चून फलंदाज करणार अनुभवी फलंदाज होता. त्याला आऊट करणे माझ्यासाठी कठीण होते. तो माझ्याविरुद्ध सहज खेळत असे.
पाकिस्तानचे खेळाडू द्रविड सारख्या खेळाडूंसाठी योजना कसे तयार करतात याचा त्याने खुलासा केला जेथे त्याने त्याबद्दल एक किस्सा सांगितला. शोएब अख्तरने आकाश चोप्राला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, जर एखादा फलंदाज राहुल द्रविडसारखा खेळला तर आम्ही त्याला एक लांब चेंडू टाकू. स्टंपच्या जवळपास आम्ही फलंदाज आणि पॅड यांच्यातील फरक लक्षात ठेऊन चेंडू डायरेक्ट पॅडवर मारण्याचा प्रयत्न करीत होतो.