धोनीसारखा ‘निस्वार्थी’ कर्णधार पाकिस्तानलाही मिळायला हवा ; पाक यष्टीरक्षकाने केली धोनीची स्तुती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये भारताला No.1 बनवणारा धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली होती. अनेक युवा खेळाडूंनी धोनीला आपला आदर्श मानला आहे.धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातुन त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आभार व्यक्त होत आहे.

अशातच पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने धोनी वर स्तुतिसुमने उधळली आहेत. अकमल म्हणाला, “आजकालचे कर्णधार हे संघातील स्वतःची जागा पक्की करण्याच्या दृष्टीने खेळत असतात. संघ जिकतोय की पराभूत होतोय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. संघ आणि देशासाठी असे कर्णधार खूपच दुर्दैवी ठरतात. पण धोनी मात्र अप्रतिम कर्णधार होता. उत्तम खेळाडू, प्रतिभावंत फलंदाज आणि जगात भारी असं नेतृत्व ही धोनीची बलस्थानं होती. धोनीसारखा कर्णधार पाकिस्तानलाही मिळायला हवा”, असे पाकिस्तानचा फलंदाज कामरान अकमल म्हणाला.

“धोनीसारखे नि:स्वार्थी कर्णधार पाकिस्तानातही घडायला हवेत. सध्या कर्णधारांना माझी विनंती आहे की तुम्हीदेखील धोनीसारखं संघाचं नेतृत्व करण्याची तयारी दर्शवा. जोपर्यंत तुम्ही संघासाठी सर्वस्व पणाला लावणार नाही आणि संघासाठी विजयश्री खेचून आणणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या संघाला प्रगतीपथावर घेऊन जाता येणार नाही”, असेही तो म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’